ध्येय्य

आनंदयात्रा

Submitted by मुग्धानंद on 10 July, 2012 - 07:07

कवितेच्या प्रांतात मुशाफिरी करण्याचा पहिलाच प्रयत्न. कार्यालयात असलेल्या काव्यस्पर्धेनिमित्त एक कविता केली, "ambition", या विषयावर.

आनंदयात्रा (गाणे ध्येय्यपथाचे)

मानसीच्या कल्पनांना,प्रयत्नांची साथ दे रे !
डोळ्यातील मधु स्वप्नांना, कर्तुत्वाचे हात दे रे!!

निश्चयाच्या बळाला, विश्वासाचा आधार दे रे!
कल्पकतेच्या खांद्यावरी योजकतेची मदार रे!!

ध्येय्यमार्गावरी पसरले जरी काटे कुटे रे!
ध्यासपंथी पावलांना निर्भयता वरदान दे रे!!

सोबत्यांची साथ होई, वाटेवरला दिवा रे!
अंधाराची भ्रांत कोणा? असता मायेचा विसावा रे!!

पंखामधे बळ, यश-शिखराची आस दे रे!

गुलमोहर: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - ध्येय्य