चन्नपटना चे रंग..
जिथे हल्दिराम भुजियावाला, चितळे बंधु यांच्या शाखा शहराशहरात आणि विदेशात देखील प्रसिद्धी मिळवतात तिथे धारवाडचा पेढा, बेळगावचा कुंदा आणि चन्नपटनाची खेळणी आपला विस्तात का वाढवत नाही म्हणून खंतही वाटते आणि ती वाटता वाटता असेही वाटते की खूप बाजारीकरण झाले की त्या गोष्टीचे महत्त्व पुर्वीइतके राहत नाही.

माझ्या बालपणी दिवाळी जवळ आली की गांधी रोड वर पसाभर जागा शोधून कुठुन तरी दुरवरून आलेली गरीब माणसे पोत्यात मातीची सुबक आणि रंगीबेरंगी खेळणी विक्रिला ठेवत. ऐरवी माझे वडील हौसेला मोल नसते म्हणून उगीच पैसे खर्चे करायला हात आखूड करत असतं पण दिवाळी आली की आमच्या घरात ही मातीची खेळेणी दोन तीन वेळा ते आणत. माझा मातिचा रायगड, विशालगड, पन्हाळगड, चितोडगड त्या खेळण्यांसमोर एकदम फिका ओकाबोका मला वाटे. यावर तोडगा म्हणून माझा गड मी बहिणीच्या घरकुंडामधे करायला लागलो. (पुर्वी वाड्यामधे घरे असायची. वाड्याची भिंत घरासाठी संरक्षक असायची. घरकुंड हा असाच एक प्रकार विदर्भात चिकन माती वापरून दिवाळीला मुली करतात. मुलं आणि किल्ला बनवतात.) आज चन्नपटनाची खेळणी मला भेट म्हणून मिळाली आणि म्हणून हे एक प्रकाशचित्र तुमच्यासाठी टाकण्याचा मोह मला आवरला नाही. इतकी सुंदर, सुबक, कलाकुसरीत, सुशोभित, गुळगुळीत आणिक किती विशेषणं बरे!!!!!
मस्त फोटु .. त्या लांब लांब
मस्त फोटु .. त्या लांब लांब चोची आवडल्या ..
हे चन्नपटना कुठेय? सापडलं नेट वर बँगलोर म्हैसूरजवळ..
चन्नपटना toys असं गुगलंल तर मस्त मस्त खेळणी
bhalchandra.phadnis यांनी
bhalchandra.phadnis यांनी पोस्टलेला कोकणातील सावंतवाडी येथील सुंदर लाकडी कला़कृतीचा फोटो.
http://www.maayboli.com/node/8218
अमि, नव्हतो गेलो प्रदर्शनात.
अमि, नव्हतो गेलो प्रदर्शनात. स्वाईन फ्लूने बराच गोंधळ घातला होता.
धन्यवाद.
धन्यवाद.
Pages