तेलाचे प्रकार

Submitted by माणूस on 23 July, 2009 - 14:37

सध्या बाजारात विविध प्रकारचे खाद्य तेल मिळते.
कोणते तेल, कोणती गोष्ट बनवताना वापरावे हे ईथे मांडता येईल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी शेंगदाणे तेल वापरून पहिले पण ह्याने पित्त खूप वाढले , ह्याबाबत कोणाचा कसा अनुभव ? जुने तेल असेल त्यामुळे पित्त वाढले असावे का ? लाकडी घाण्या वरचे तेल होते ....

करडई/तीळ तेल उष्ण वाटले.

कूकिंग चे तीळ तेल हे वेगळे मिळते का ? किंवा काही वेगळी पद्धत असते का वापरण्याची ?

अजून काय वापरून पाहता येईल ?

पॅक्ड तेलाचे प्रकार रिफाईंड, फिल्टर यात काय फरक असतो आणि वापरण्यास, तळणीसाठी यातील नेमके कोणते चांगले कोणी सांगू शकेल काय? दर पंधरा दिवसांनी सोयाबिन, शेंगदाणा आणि राईसब्रान हे काॅम्बिनेशन कसे राहील?

तांदुळाच्या कोंड्याचे तेल हे एकंदर भारतातील स्वयंपाकच्या पद्धतीला (गरम तळणीत तळणे) सोयीचे असे तेल आहे. याबद्दल सविस्तर माहिती या दुव्यात आहे.
http://icar-nrri.in/wp-content/uploads/2018/07/35.-Rice-Bran-Oil-%E2%80%...

तेलात असलेली काही द्रव्ये तेलाचे आयुष्य कमी करतात. शेंगदाणा, खोबरे काही दिवसांनी जसे खवट होते तशीच त्यांची तेलेही खवट होतात. त्यामुळे शेल्फ लाईफ कमी होते. तेले दीर्घकाळ टिकावीत म्हणून ही द्रव्ये तेलातून काढून टाकली जातात. ती काढण्यासाठी तेलात केमिकल्स, कॉस्टिक सोडा वगैरे मिसळतात. अर्थात ही केमिकल्स नंतर पूर्णपणे काढून टाकली जातात पण त्यांचे ट्रेसेस शिल्लक राहतात. तेले जिवंत ठेवणारी द्रव्ये काढल्यावर तेलातील व्हिटॅमिन्सही जातात. म्हणून रिफाईंड तेलात वरून वेगळी व्हिटॅमिन्स घालतात. तेलाच्या डब्ब्यावर फॉरटीफाईड विथ वीट ए वगैरे लिहिलेले असते ते यामुळे.

फिल्टर मध्ये वेगवेगळे फिल्टर वापरून कचरा काढला जातो. तेलातील द्रव्ये टिकून राहतात.

बहुतेक सगळी भारतीय तेले तळणीला वापरता येतात. खोबरेल तेल लगेच तापते पण तरीही तळणीला वापरता येते. प्रत्येक तेलाचा स्वतःच्या वेगळा वास व चव असल्यामुळे तळणाची चव बदलते.

मला आठवते लहानपणी करडई तेल घरी जास्त प्रमाणात वापरले जायचे त्या खालोखाल शेंगदाणा तेल. पण करडई हमखास आमच्या अ. नगर आणि मराठवाड्यातल्या जिल्ह्यात करडईची शेती बर्‍याच प्रमाणात होती त्यांनतर मात्र त्याची जागा सुर्यफुलाच्या शेतीने घेतली आता मराठवाडा आणि विदर्भात तर सोयाबीनच्या शेतीवर भर त्यामुळे ही तेले कमी झाली.
हिवाळ्यात आई करडईचे बी आणुन भिजवून त्याचे दुध काढुन गव्हाची पौष्टीक करड-खीर बनवायची. ती करडईची शेती जवळपास दिसेनाशी झाली आजकाल.

खोबरेल तेल केवळ डोक्याला लावायला आणि थंडीत आमसुलाचे तेल बनवायला वापरले जायचे!

जुने तेल असेल त्यामुळे पित्त वाढले असावे का ? लाकडी घाण्या वरचे तेल होते
<<
नट अ‍ॅलर्जी असावी.
आपल्याकडे ही अशी अ‍ॅलर्जी असू शकते हेच बर्‍याच लोकांना ठाऊक नाही.
तरीही बर्‍याच लोकांना शेंगदाणे खाऊन डोके दुखते, पित्त होते.

धन्यवाद आ.रा.रा.
सोयाबेन तेलाचा स्वतःचा अनुभव कोणी सांगाल का ?

साधारण ७०-८० वर्षांपूर्वी दक्खनपठारावर तीळ, जवस, करडई हीच तेले अधिक प्रचलित होती. आणि कोंकणपट्टीत ( दीव दमण ते मंगळूर ) आणि मलबार किनाऱ्यावर खोबरेल. गुजरातमध्ये शेंगदाण्याची लागवड होत असे. ती किफायतशीर ठरल्यामुळे खूपच वाढली. १९३०-४० च्या सुमारास हाय्ड्रोजनेटेड ऑइल्स तयार करताना त्यात थोडाफार शेंगदाण्याच्या तेलाचाही वापर होत असे. ( आता पाम तेल वापरतात) शेंगदाण्यामुळे बाकी इंडिजीनस तेले मागे पडली. पूर्वी लोणच्यासाठी तिळाचे तेल वापरीत असत. नंतर लोकांच्या चवी बदलल्या. करडई जवस वगैरेंची मागणी घटली आणि त्यामुळे उत्पादनही घटले. ही तेले महाग झाली त्यामुळे मागणी आणि उत्पादन अधिकच घटले. पूर्वी भाकरीवर जवसाचे तेल पसरून ती खात असत किंवा पिठल्यात कच्चे जवसाचे तेल घालून खात असत.

प्याराशूट कोकोनट ऑइल स्वयंपाकाला वापरता येते का ?

की खायचे खोबरेल तेल वेगळे असते ?

हे विचारले कारण 2,4 दिवसासाठी बाटली बाळगणे handy आहे.

न्यूट्रिशन हा विषय नाही

गुगल

Parachute coconut oil is sourced from sun-dried coconuts which goes through a 5-stage purification process and 27 quality tests to ensure superior quality. Since it is free from added preservatives and chemicals, it is graded as an edible oil too. Hence, it can be used for cooking purposes.

प्याराशूट कोकोनट ऑइल स्वयंपाकाला वापरता येते का ?>> हो. कंपनी ते खाद्यतेल म्हणूनच विकत असल्याने स्वस्त असते. Wink

बरोबर

सौंदर्य तेल म्हणून विकले असते तर कर वाढला असता.

म्हणून ते जाहिरातीत तेलाची बाटली दाखवतात व केस वाढवलेली बाई दाखवतात , तेल आणि केस हा संबंध प्रेक्षक लावतात

प्रत्यक्षात तेल अन केस हे जाहिरातीत कुठेही नसते , बाटलीवर खाद्यतेल छापले आहे.
म्हणे.

व्हाट्सप म्हणे

कंपनी ते खाद्यतेल म्हणूनच विकत असल्याने स्वस्त असते....+१.
काही मासे,भाज्या खोबरेल तेलात जास्त चांगल्या लागतात.अर्थात प्रत्येकाच्या सवयींवर आहे.

पॅरा शूटचे हेअर oil ही निघाले आहे.त्या बाटलीवर ऑरेंज पट्टा की तिलक आहे.

गुगल

Parachute coconut oil is sourced from sun-dried coconuts which goes through a 5-stage purification process and 27 quality tests>> लै गुगलबाबावर इस्वास बोवा तुमचा.

कायम शेंगतेल वापरलेले आहे, गुलाब कंपनीचे (प्रसिद्ध गुजराती ब्रँड आहे) तेलाचा गोडसर वास अन चव परफेक्ट असते.

सौभाग्यवतींना बेकिंगचा आजार जडला असताना एकदा फोकाशिया का काहीसे नाव असणारे एक ब्रेड केले होते तिनं, गिळगिळीत पिठात बोटं खुपसून पडलेले खड्डे ऑलिव्ह ऑइलनं भरून काहीसे केले होते, बरे होते चवीला.

सोयाबीन एकदा आणले होते इतके कोरे टेस्ट प्रोफाइल का म्हणता सोय नाही, शेवटी भजी तळायला वापरून संपवले कसेबसे

नॉनव्हेज बनवले तर कायम मोहरीच्या तेलात

असे आमचे तेलपाणी होय.
images (7).jpegimages (6)_0.jpeg

वरील प्रमाणे होती काहीतरी ती फोकाशिया

सर्व तेल मला चालतात.
पण मोहरीच्या तेलात काही ही बनवले असेल तर मी खात नाही.
मला त्या तेलाची बिलकुल टेस्ट आवडत नाही आणि वास तर बिलकुल आवडत नाहीं
निगेटिव्ह विचार मोहरीच्या तेला विषयी असल्या मुले चुकून मी खाल्ले आणि नंतर माहीत पडले तर त्रास होतो.
जे मानसिक असावे.
मोहरी विषयी तिरस्कार नाही ती चालते पण मोहरीचे तेल बिलकुल नाही.
बाकी करडई शेतात च होत असे तेल खूप खाल्ले आहे.
काळ्या तिळाचे तेल मला जास्त आवडतं.
ते पण शेतात च होत होते.
हल्ली तीळ आणि करडई कोणी करत नाही.
करडई काढण्यात खूप मेहनत असते.त्याला काटे असतात.
भुईमूग तेल ,सूर्यफूल तेल.
आवडीचे आहे.
सोयाबीन काही जास्त आवडतं नाही.
राइस ब्रँड पण ठीक वाटले.
मोहरी तेल हे एकटेच बाकी सर्व तेलापासून खूप वेगळे आहे.
भयंकर वास आणि कडू चव.
Horrible.

मोहरीचे तेल फक्त भारताचा काही भाग, बांगलादेश,,पाकिस्तान आणि आशिया मधील काही लहानसा तुकडा .
इथेच वापरले जाते
भारतात वापरतात काही राज्यात म्हणून त्याची समीक्षा नको असे होवू शकत नाही.
बाकी सर्व तेल
तीळ,सोयाबीन,भुईमूग,राइस,,खोबरे ,ऑलिव्ह, सर्व जगात वापरले जाते.
पण मोहरीचे तेल जग सोडा भारता मधील खूप मोठ्या भागात वापरले जात नाही.
मोहरीचे तेल खरेच eddible oil आहे का?

ऋन्मेष , फोटो इंटरनेटवरून वरून साभार असे लिहायचे राहिले खरे पण हे फोटो आमच्या घरचे किंवा आम्ही काढलेले नाहीत हे निःसंदिग्धपणे नमूद करणे विसरलो होतो ते आता करतो.

हेमंत ३३, होय मोहरीचे तेल हे खाण्यायोग्य असतेच. किंबहुना मोहरी वर्गीय तेलांविषयी तुम्ही दिलेली माहिती/ निरीक्षण हे साफ चूक आहे.

मोहरीच्या फॅमिलीला आंतरराष्ट्रीय लेव्हल किंवा इंग्रजीत रेपसिड फॅमिली म्हणले जाते, कॅनोला हे जगात तिसरे का दुसरे सर्वाधिक वापरात आणले जाणारे तेल हे मुळात एक मोहरीवर्गीय पिकच आहे, आणि यूएसएफडीएनुसार हृदविकार होण्याची रिस्क कमी करणारा तैलपदार्थ आहे, कॅनोला, रेपसिड, मस्टर्ड, हे सगळे एकाच परिवारातील तेलंबियांचे प्रकार असून जगात प्रचंड प्रमाणात खाल्ले जातात असे किमान आकडे पाहून लक्षात येते.

Rapeseed (Brassica napus subsp. napus), also known as rape, or oilseed rape, is a bright-yellow flowering member of the family Brassicaceae (mustard or cabbage family), cultivated mainly for its oil-rich seed, which naturally contains appreciable amounts of erucic acid. Canola are a group of rapeseed cultivars which were bred to have very low levels of erucic acid and are especially prized for use as human and animal food. Rapeseed is the third-largest source of vegetable oil and the second-largest source of protein meal in the world.

स्रोत -

https://en.m.wikipedia.org/wiki/Rapeseed

Pages