तेलाचे प्रकार

Submitted by माणूस on 23 July, 2009 - 14:37

सध्या बाजारात विविध प्रकारचे खाद्य तेल मिळते.
कोणते तेल, कोणती गोष्ट बनवताना वापरावे हे ईथे मांडता येईल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ग्रेप सीड ऑईल रोजच्या जेवणासाठी चांगले असते का?

भारतीय जेवण बनवण्यासाठी, canola, peanut किंवा olive oil पेक्षा ग्रेप सीड ऑईल वापरावे असे मला कोणीतरी सांगीतले. It has very high level of omega 6; smoke point of 485 degrees F. हे कितपत खरे आहे?

btw थोडेसे विषयांतर... बायकांसाठी, Tea Tree Oil नखाला लावले की नखे लवकर वाढतात.

कोणते तेल वापरावे तसेच ते कोणत्या प्रकारे बनवलेले असावे याचा पण विचार केला पाहिजे. उडो इरास्मस (http://www.udoerasmus.com/about/about_biography.htm) या माणसाने यावर बरेच संशोधन केले आहे. तेल बनवल्यानंतर त्याची शेल्फ व्हॅल्यु वाढवण्यासाठी त्यावर पुन्हा केमिकल प्रक्रिया केली जाते. त्याचे पण प्रचंड साईड इफेक्ट्स शरिरावर होतात.

माझी मम्मी अजुनही कराडमधे घाण्यावरुन शेंगदाणा तेल विकत घेते. ते जर ४-५ महिन्याच्यावर शिल्लक राहिले तर त्याला वास देखील येतो. तसेच तूप, खोबरेल तेलाला देखील जास्ती दिवस ठेवले तर वास येतो. मग आपण बाटल्यांमधुन जे तेल आणतो त्याला का वास येत नाही? कारण सोपे आहे, त्यावर केमिकल प्रक्रिय केली जाते जेणेकरुन त्याला वास येउन वाया जाउ नये.

मग आता तेल कोणते वापरावे? मेकॅनिकली प्रेस्ड असे लिहिलेल्या बाटलीतले तेल हे कमी प्रॉसेस केले असते भारतात जसे घाण्यावर काढतात तसे काढलेले असते. त्यामुळे लवकर संपवावे लागते. 'एक्स्ट्रॉ व्हर्जीन ऑलिव ऑइल' हे देखील मेकॅनिकली प्रेस्ड असते. त्यामुळे आणि त्याचा स्मोकिंग पॉइंट कमी असल्याने ते जास्त तापवू नये असे म्हणातात.

ग्रेप सीड ऑइलमधे अँटीऑक्सीडंड्स असतात ते तापवल्याने कमी नाही क होणार? आणि ते कितपत कॉस्ट इफेक्टीव होईल हा देखील विचार करावा लागेल.

~~~~~~~~~~~~~
मराठी रेसिपीज साठी आजच अवश्य भेट द्या: http://vadanikavalgheta.blogspot.com/
~~~~~~~~~~~~~

extra virgin olive oil is the best. पण त्याला फ्राय करता येत नाही. ज्या तेलामध्ये सैच्युरेटेड फैट्स कमी असत्तात ते चांगले. लहान मुलांमध्ये मेंदुच्या विकासाकरता फिश ओइल खुप चांगले.

http://en.wikipedia.org/wiki/Docosahexaenoic_acid हे वाचा. DHA ल हान मुलांच्या फार्मुला मध्ये प ण असते.

सगळेच निवांत झाले की कित्ती मज्जा येइल ना...
की बोर्डचे आणि बोटांचे नाते कधी जुळ्णार,
राया मला टाइपायला कधी येणार.........

माझ्यामते, शेंगदाणा तेलापेक्षा सुर्यफुल तेल वापरलेले अधिक चांगले.
शेंगदाणा तेलात कोलेस्टेरोल व स्निग्दांश जास्त असते. करडई तेल मिळत अस्ल्यास उत्तम.
ऑलिव्ह तेल पण चांगले आहे असे ऐकले, पण ते सवयीचे होण्यास थोडा वेळ लागेल.

माझी मम्मी अजुनही कराडमधे घाण्यावरुन शेंगदाणा तेल विकत घेते.>>
घाण्यावरचे तेल शक्यतो टाळावे कारण बर्‍याचदा तेथे single Filter केलेले तेले मिळते, बर्‍याच वेळेस Filter व्यवस्थित कार्य करत नसल्यास, फिल्टर न होता तेल तसेच बाहेर येते.

मी माईल्ड टेस्ट असलेले आणि तळण्यासाठीसुद्धा चालेल असे ऑलिव्ह ऑईल वापरते. अर्थात मी तळणच करत नाही. पण सुरवातीला जरा सवय व्हावी म्हणून हे आणले.

आजकाल डॉ. अभय बंगांचे पुस्तक (माझा साक्षात्कारी हृदयरोग) वाचतेय. त्यात बराच उहापोह आहे. कुठले तेल वापरावे हे ही त्यांनी दिले आहे... ( बर्‍याच जणांना माहीत असेलच..) त्यातला काही भाग टाईप करते इथे..

फॅट्सचे स्रोत व त्यातील फॅटी ऍसिड्सचे प्रमाण टक्के :
oil_fats_percent.jpg

आपल्या आहारातील सॅच्युरेटेड फॅट वगळण्याचा व ओमेगा ६ फॅट कमी करण्याचा प्रयत्न करावा. फॅटच्या एकूण मर्यादेच्या आत राहून मोनोअनसॅच्युरेटेड व ओमेगा ३ चे प्रमाण वाढवावे , ते हृदयरोगकारक नाहीत.
भारतात सहज उपलब्ध अशा मोहरी ( सरसरसो, शेंगदाणा व जवस अथवा सोयाबीन या तीन तेलांच्या समभाग मिश्रणात मोनोअनसॅच्युरेटेड पॉलीअन्सॅच्युरेटेड ( ओमेगा ३ व ओमेगा ६) आणि कमीत कमी सॅच्युरेटेड असं फॅटी अ‍ॅसिड्सचे संतुलन साध्य होते. मोहरी/सरसो/कनोला तेलात असलेल्या PUFA मधे जास्त प्रमाणात ओमेगा ३ फॅटी ऍसिड्स आहेत,जे हृदयाला उपकारक आहेत. सूर्यफूल व करडी तेलाची जाहीरात हृदह संरक्षक अशी असली ,तरी त्यात PUFA मधे ओमेगा ६ फॅटी ऍसिड्स जास्त आहेत व ओमेगा ३ व मोनोअनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड्स कमी आहेत. म्हणून ती सुरक्षित नाहीत.

भाग्यश्री, मी घरी जाऊन हेच करणाअर होते बरे झाले लिहिलेस ते.

टिल्लू, हो माहिती आहे.
~~~~~~~~~~~~~
मराठी रेसिपीज साठी आजच अवश्य भेट द्या: http://vadanikavalgheta.blogspot.com/
~~~~~~~~~~~~~

इथे ऑस्ट्रेलियात एक कॅनोला ऑइल मिळते, जे आम्ही तळण केलेच तर वापरतो. बाकी कोशिंबीर, सॅलडस इ. मध्ये फर्स्ट कोल्ड प्रेस्ड ऑ ऑ वापरतो. कॅनोला बद्द्ल बरेच उलट्सुलट विवाद नेटवर सापडले. कोणाला माहित आहे का या तेलाच्या गुणधर्मांबद्द्ल? वरील चार्टमध्ये दिसले नाही.

>>शेंगदाणा तेलात कोलेस्टेरोल व स्निग्दांश जास्त असते.

नाही. शेंगदाणा तेलात जराही कोलेस्टेरॉल नाही. कोलेस्टेरॉल हा प्राणीजन्य स्निग्धांशासारखा घटक आहे, वनस्पतीत तो नाही.

इथल्या कार्डीयॉलॉजिस्टने ऑलिव्ह ऑइलपेक्षाही कनोला (कॉर्न ऑइल) वापरायला सांगीतलंय. पण ह्याबद्दल जास्त माहीती मिळवून सांगु शकेन.

कनोला (कॉर्न ऑइल) वापरायला सांगीतलंय >> कनोला आणि कॉर्न ऑइल हे वेगळे आहेत. कनोला हे rapeseed पासून derive केलेल्या बियांपासून बनवतात.

असामी, हो बरोबर. माझं चुकलं. 'मेझोलाचं कॉर्न ऑइल' म्हणायचं होतं.

खरे तर नारळाचे तेल सगल्यात चांगले जेवणाला व तळणाला. हो हो.. usual belief की coconut oil is bad. पण त्यांची chain of free hydrogen वगैरे बघता तेच तेल चांगले.
ऑऑ कधीही तळायला वापरू नये.
बेस्ट तिळाचे तेल सुद्धा चांगले. मी आजकाल जेवणाला mild roasted sesame oil वापरते. नारळाच्या तेलाची सवय अजून नाही. पण प्रयत्न करतेय.

१.तेल तापल्यावर त्याचे oxidation होते. म्हणून कमी उष्मांक असलेली तेल ऑऑ तापवू नये.
२.कोकोनट तेल saturated असले तरी त्याचे high temp मध्ये जे काही hydrogen chain होते ते महत्वाचे असे त्या रेफ गाईड मध्ये होते. मला नाव लक्षात नाही आता.

खरे तर ऑऑ जे इथे मिळते इटालियन ब्रँडचे ते जराही चांगले नाही. (दोन तीन इटालियन मित्र व बरोबर काम करणारे डॉक्टर्स ह्यानी सांगितले). मी मग CA brand इथेच अमेरेकेत तयार झालेले वापरते. तसेही बेक करायला ऑऑ वापरते पण ते ही स्पेशल कूकींग ऑऑ असे असते तेच वापरते. ब्रेड बुडवून खायला,ड्रेसींग साठीचे ऑऑ जेवणाला वापरत नाही. मी ऑऑ नेहमी फ्रीज मध्येच ठेवते. cold pressed असेल तर लवकर संपवावे.

एका डॉ मित्राने सुचवलेली ५-६ पुस्तके मी कोकोनट ऑएल वर वाचून काढली . बरेच रेफ त्याने दिले वाचायला. ४० -५० वर्षामागे भारतातील कोकोनट ऑ खाणारे जनता, आफ्रिकन वगैरे जनता(आता लक्षात नाही कोण कोण होत ते) हृदय विकार कमी होते. पण नवीन मिथ की कोकोनट ऑ वाईट, बदलेली जिवन्पद्धती ह्याने हृदय विकार वाढीस लागले.

कॅनोला बद्द्ल बरेच उलट्सुलट विवाद नेटवर सापडले.>>>>>>

सगळे मार्केट पोइंट आहेत. कैनडाची ओइल इ कोनोमी बहुतेक त्याव र अवलंबुन आहे.

ऑऑ इथे पहा... http://www.aolhealth.com/healthy-living/aging-well/olive-oil-slows-aging

http://www.aldenteblog.com/2008/02/drink-olive-oil.html

पेला भरुन राहुदे प ण २ चमचे रोज तसेच प्यायला हरकत नाही. मी पितो.... मधाबरोबर...

http://www.samsclub.com/shopping/navigate.do?dest=5&item=188179#reviews

आठवड्यातुन एकदा डो क्याला पण ला वुन घेतो.... तैल बु द्धी Happy

सगळेच निवांत झाले की कित्ती मज्जा येइल ना.....
की बोर्डचे आणि बोटांचे नाते कधी जुळ्णार,
राया मला टाइपायला कधी येणार.........

इथे या लिंक वर खाली एक तक्ता आहे त्यातही बरीच तेलं आणि त्यांचे फॅटी अ‍ॅसिड्सचे प्रमाण आहेत..
http://www.scientificpsychic.com/fitness/fattyacids1.html

कनोला ऑईलच्या जनरल माहीतीसाठी ही लिंक बरी वाटली.. http://www.canolacouncil.org/canola_oil_the_truth.aspx

वर दिलेला डॉ. बंगांचा तक्ता प्रमाण मानला, तर इथे दिलेल्या तक्त्यानुसार : कनोला ऑइल मधे कमी सॅच्युरेटेड फॅट्स व जास्त मोनोअनसॅच्युरेटेड आणि पॉलिअनसॅच्युरेटेड फॅट्स असतात.. (जे चांगले आहे. . ) ओमेगा ३ आणि ६ चे प्रमाण पाहीले तर ओमेगा ६ खूपच जास्त आहे ओमेगा ३ पेक्षा ! ते खरं तर चांगलं नाही ( वरच्या माहीती नुसार.. )

आता मेन प्रश्न.. तेलाने खरंच इतका फरक पडतो का?? जर आपण कमीच तेल वापरत असलो तर फारसा फरक पडू नये ना?

www.bhagyashree.co.cc/

माझ्या सोसायटीत काही लोकांनी http://www.amcsa.co.za/ ही भांडी घेतली आहेत.विना तेल ही तुम्ही ह्यात भाज्या शिजवू शकता,फोडणी टाकून.

पण भांड्यांचे रेट्स कै च्या कैच आहेत. कोणाला ह्याबद्द्ल जास्त माहीत असेल तर इथे शेअर करा कृपया.
-------------------------
Light 1

खोबरेल तेलाबद्दलची मनूए लिहिलेली माहिती अगदी बरोबर आहे. त्याबद्द्ल डेविड वूल्फने पण बरेच चांगले साम्गितले आहे.
~~~~~~~~~~~~~
मराठी रेसिपीज साठी आजच अवश्य भेट द्या: http://vadanikavalgheta.blogspot.com/
~~~~~~~~~~~~~

त्यांची chain of free hydrogen वगैरे बघता तेच तेल चांगले.
कोकोनट तेल saturated असले तरी त्याचे high temp मध्ये जे काही hydrogen chain होते ते महत्वाचे
>>>>>

या वाक्यांवरून फारसा काही बोध होत नाही. खोबरेल तेलाविषयी कुणी काही ठोस माहिती, विश्वासार्ह रेफरन्ससहित सांगू शकेल काय?

मी डॉक्टर्स (स्पेशली ह्या विषयात रिसर्च करणारे) ह्यांचे पेपर्स व रेफेरेन्सचे गाईड वाचले(मित्र ओळखीचे होते म्हणून वाचायला मिळाले). पण एक अतिशय सुंदर पुस्तक मी वाचले होते बर्‍याच पुस्तकांपैकी. त्याचे नाव लक्षात नाही. पण मस्त चित्र दाखवली होती प्रत्येक ऑईलची. त्यांची reaction if heated on different temp वागिरे होते.
chemistry सगळी समजावली होती,chain of hydrogen काय असते वगैरे. वाचायला पण easy होते. मस्त chemistry class मध्ये आहे असे वाटले. तसाही chemistry was my fav. असो. मी त्या मित्राला विचारून लिहिते इथे.
मूळात तेल गरम केल्याने त्याचे अपाय होतात कच्च्या तेलापेक्षा.
दुर्दैव हे आहे ना की सगळे डॉक्टर्स ना वेळ नसतो एवढे नीट समजावून सांगायला की कुठले तेल वापरा वगैरे. असो.
मी कोकोनट ऑईल वापरून चटणी केली, मला एवढी आवडली नाही. पण अवियल केले तेव्हा बरी वाटली. ते चटणीत खोबरे, फोडणीला खोबरेल तेल जरा अतीच वाटले. त्यापेक्षा तिळाचे बरे. वास येत नाही.

ऑलिव्ह ऑइल विषयी अजुन काही माहीती आहे का ? मी जपान मधे असल्यापासून तर तेच वापरतोय..

गेल्या हजारो वर्षा पासून आपण वेग्वेगळी तेले वापरत होतो, अगदी आत्तापर्यान्त. सुमारे ४० वर्षापुर्वी आपल्या मनावर हे बिम्ब्वण्या आले कि हि सर्व तेले आपल्या आरोग्यासाठी चान्गली नाहीत खास करून शेगदाणा तेल ज्यात जास्त कलोस्ट्रोल असते, तेन्व्हा पासून आपण डालडा वापरू लागलो. साधारण १५ वर्षा पुर्वी आपल्या वर सुर्यफुल तेलाच्या जाहीराती चा मारा केला गेला. तेन्व्हा सुर्यफुल तेलात कलोस्ट्रोल नसते असे तद्यान्चे म्हणणे होते.

आता आपल्या सर्वाना माहीत् आहे की जी तेले आपण पूर्वी वापरत होतो तीच खरी उपयुक्त तेले आहेत.
शेगदाणा तेल, तीळ, मोहरी , नारळाचे तेल हीच खरी तेले.

ह्याचा परीणाम असा झाला की आपली जनता आज डालडा आणी सुर्यफुल तेलाचे दुष्परीणाम भोगत आहेत कारण त्यानी काही वर्ष ही तेले वापरली. अजूनही डालडा आणी सुर्यफुल तेल मार्केट मध्ये वीकली जातात आणी काही लोक ही तेले वापरत आहेत. भारत सरकारला त्याच काही सोयारसूतक नाही.

महत्वाचा मुद्दा हा की गेले हाजारो वर्षा पासून आपण वेग्वेगळी तेले वापरत होतो पण फक्त जाहीराती मुळे आणी आपल्या World of mouth मूळे भारतीय जनता आपली सन्सक्रूती विसरून विदेशी तेले वापरू लागली.

तीळाच्या तेलाचा आयुर्वेदात अजर तेल असा केला गेला आहे.

>>>तेन्व्हा सुर्यफुल तेलात कलोस्ट्रोल नसते असे तद्यान्चे म्हणणे होते.
तज्ञच ते!!! हुशार होते. Happy त्यांना वनस्पतीजन्य पदार्थांत 'कोलेस्टेरॉल' नसतं हे माहिती होतं! Happy

एवढ वाचुन ही कन्फ्युजन कंटिन्यु आहेच.:अओ: बरं रोजच्या वापराला जस भाज्यांना फोडणी, पोळिला लावायला, आणि अधेमधे तळणीला कोणते तेल वापरावे?
कॉस्टकोत 'मझोला ऑइल' मिळते ते चांगले कि ऑलिव्ह ऑइल?.

मी ३ वर्षांपूर्वी सकाळमध्ये 'तुमचे तेल वेळीच बदला' असा लेख लिहिला होता. त्यावेळेस निरनिराळ्या तेलांचा अभ्यास केला होता आणि त्यात मला खाद्यतेल बनवणार्‍या कंपनीच्या ऑइल टेक्नॉलॉजिस्टची खूप मदत झाली होती. आता थोडी निरीक्षणे देतो. (भारतीयांच्या आहारातील खाद्यतेलांबाबत)
* महाराष्ट्र, गुजरात या राज्यांत मध्यमवर्गीय शेंगदाणा तेल वापरतात. गरीब लोक पामतेल खातात. शेंगदाणा तेलात तळलेले पदार्थ टिकतात म्हणून डीप फ्राईंगसाठी, सणासुदीचा फराळ तळण्यासाठी ते तेल वापरतात. मध्य प्रदेशात सोयाबीन व सूर्यफूल तेल वापरतात. उत्तर भारतात मोहरीचे तेल वापरतात, तर दक्षिणेकडे खोबरेल तेल स्वयंपाकात वापरतात. लहानपणापासून जे तेल खाण्यात असेल त्याची सवय जिभेला असते त्यामुळे दुसरे तेल सहजी आवडत नाही. दक्षिणेकडील लोकांना मोहरीच्या तेलाची सवय नसते. त्याची चव किंचित कडसर असते आणि अंगात कडकीही येते. मराठी लोक मोहरीचे तेल केवळ लोणचे टिकवण्यासाठी वापरतात. तसेच मराठी लोकांना खोबरेल तेलही रूचत नाही. त्यांनी शेंगदाणा तेलच वापरावे, हे येथील हवामान लक्षात घेता म्हणावे लागेल. शेंगदाणा तेलात करडी तेल मिसळल्यास त्याची चव छान लागते, पण हे मिक्स तेल लगेच वापरून संपवावे लागते नाहीतर बरेच दिवस ठेवल्यास त्याला वास येऊ लागतो.
* तिळाचे तेल खाण्यासाठी, अभ्यंगासाठी उत्तमच, पण ते महाग आहे. सर्वांना परवडतेच असे नाही. जेवणात तेल, तूप यांचा वापर मर्यादित (गरजेपुरताच) असावा, हे उत्तम. अलिकडे एक नवे तेल आले आहे. ते म्हणजे भाताच्या कोंड्याचे तेल (राईस ब्रान ऑईल). हे तेल सर्वात हलके (लाईट) आहे. त्यात शॅलो फ्राईंग (पापड कुरडया तळणे) चांगले ठरते. सोयाबीन तेलही चांगलेच, पण त्याला किंचित माशासारखा वास असतो. सगळ्यांना आवडते असे नाही, पण स्त्रियांनी आरोग्यासाठी खावे.
* मला पटलेला आणि सध्या मी वापरत असलेला उपाय म्हणजे दर पंधरवड्याला वेगळे तेल आणणे. यामुळे सगळ्या तेलांमधील आवश्यक घटक शरीरात जातात. चव बदलते, पण आरोग्य राखणेही महत्त्वाचे. मी अजून ऑलिव्ह तेल वापरलेले नाही.
एक संशोधन माझ्या वाचनात आले. जगातील बहुतेक महिलांना रजोनिवृती (मेनॉपॉज) काळात व नंतर विशिष्ट त्रासाला सामोरे जावे लागते. पण जपानमधील महिलांना मात्र हा त्रास फारसा जाणवत नसल्याचे आढळले. त्याचे कारण त्यांच्या आहारातील सोयाबीन व सोयाबीन तेलाचा वापर. त्यामुळे तिशीनंतर महिलांनी आहारात सोयाबीन तेल घेणे (ठराविक काळाने) श्रेयस्कर.

तिळाचे तेल किंवा मोहरी चे तेल कोणी स्वैपाक साठी वापरले आहे का ? खूप फायदे आहेत पण ते उष्ण असते असे ऐकून आहे , तुमचा अनुभव/माहिती share कराल का ?
मला स्वतःला ह्याने खूप जास्त भूक लागली असे निरीक्षण आहे , वापरण्याची पद्धत चुकली असेल का ?

बांगडा, रावस इ.वासवाले मासे खोबरेल तेलात तळले की म्हणे झकास लागतात.काही माशांच्या आमटीत्,काही भाज्यांमधे हे तेल मस्त लागते.

Pages