अमोल.. क्रिक इन्फोवर ऑल टाइम ऑस्ट्रेलियन ११ पाहीली का? हेडन व मार्क टेलर नाही व त्या ऐवजी ट्रंपर व आर्थर मॉरीस? निल हार्वे व बॉबी सिंप्सनची गैरहजेरी सुद्धा मला जाणवली. तसच बिल ओरायली ऐवजी मी रिचि बेनॉला घेतल असत व बॉर्डरऐवजी स्टिव्ह वॉ किंवा निल हार्वेला. पॉन्टिंगला पण जागा नाही त्यात. पण ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट इतिहास बघता फक्त ११ खेळाडु निवडणे फारच कठीण!आपण मायबोलिवर सुरु करुयात का तसे सदर? म्हणजे ऑल टाइम इंडियन ११ वगैरे? सगळ्यात कठीण.. ऑल टाइम वेस्ट इंडि़ज ११!
चल मीच सुरु करुन टाकतो इथे..
ऑल टाइम वेस्ट इंडिज ११.
रोहन कन्हाय्,गॉर्डन ग्रिनिज्,विव्ह रिचर्ड्स्,एव्हर्टन विक्स्,गारफिल्ड सोबर्स(कप्तान)जेफ्री दुजॉन(यष्टीरक्षक),माल्कम मार्शल,अँडी रॉबर्ट्स्,जोएल गार्नर्,मायकेल होल्डिंग व लान्स गिब्स! १२ वा गडी.... आल्विन कालिचरण. हॉनरेबल मेन्शन.... क्लाइड वॉलकॉट्,क्लाइव्ह लॉइड, कोर्टनी वॉल्श व वेस्ली हॉल
ऑल टाइम इंडियन ११.
सुनिल गावस्कर्,विजय मर्चंट्,राहुल द्रविड्,सचिन तेंडुलकर्,मन्सुर अलि खान पतौडी(कप्तान) कपिल देव्,अनिल कुंबळे,जवगळ श्रिनाथ्,एरापल्ली प्रसन्ना,बिशन सिंग बेदी व भागवत चंद्रशेखर. बारावा गडी. दिलिप वेंगसरकर. हॉनरेबल मेन्शन... गुंडप्पा विश्वनाथ,विनू मांकड,व्ही व्ही एस लक्ष्मण व पॉली उम्रिगर
( अर्थात टी-२० मधल्या
( अर्थात टी-२० मधल्या क्रिकेटला क्रिकेट म्हणायचे की नाही हा एका वेगळ्या बीबीचा विषय होउ शकेल Happy ) >> आता ह्यावर एक बाफ येईलच
असामी ओके. मी ते प्लेअर
असामी ओके. मी ते प्लेअर खेळतान पाहिले नाहीत. त्यामुळे कुतुहल वाटले की आताच्यांना डावलून ते कसे आले? आताचे म्हणजे कोहली सेहवाग यांनाही स्थान नव्हते संघात.
बाकी सचिनचे नाव असणे समजू शकतो. त्याच्या काळात २०-२० असते तर त्याने काय धुमाकूळ घातला असता याची कल्पना करू शकतो. तिथेही सर्वाधिक शतकांचा विक्रम आपल्या नावावर केला असता.
छान धागा वर आलाय. ही
छान धागा वर आलाय. ही excercise माझी आवडती आहे.
माझी वनडे टीम बाकी इतरांसारखीच आहे. थोडेसे बादल आहेत. माझ्या वनडे टीम मध्ये मी रोहित शर्माला वगळू शकत नाही. गांगुली पण चांगला ऑप्शन आहे. पण त्याला मी खाली खेळवू शकतो. रोहित शर्माबद्दल तो पर्याय नाही. तो खाली खेळेलही. पण त्याचा खरा गेम सलामीलच आहे. तो जेवढा धोकादायक पहिल्या क्रमांकावर आहे तेवढा कुठेही नाही.
दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या टीमचा कर्णधार धोनी असेल. नुसत्या आयसीसी ट्रोफी साठी नाही. पण तो जेव्हा कर्णधार झाला तेव्हा भारतीय संघाचा फॉर्म खूपच बिघडला होता. त्यामुळे त्यानंतर अशी टीम बनवणं याचं क्रेडिट धोनीलाच जातं.
अजून एक गोष्ट म्हणजे मी तिसरा फास्ट बोलर म्हणून बुमराह घेणार. बरेच जण श्रीनाथला निवडतात. पण मला बुमराह जास्त भेदक आणि अचूक वाटतो.
माझी वनडे टीम : रोहित शर्मा , सचिन तेंडुलकर , सौरव गांगुली, विराट कोहली, युवराज सिंह , महेंद्रसिंह धोनी (कर्णधार आणि यष्टीरक्षक )कपिल देव, रवींद्र जडेजा, हरभजन सिंह , जहीर खान, जसप्रीत बूमराह
Pages