ऑल टाईम ग्रेट टीम

Submitted by मुकुंद on 20 July, 2009 - 17:00

अमोल.. क्रिक इन्फोवर ऑल टाइम ऑस्ट्रेलियन ११ पाहीली का? हेडन व मार्क टेलर नाही व त्या ऐवजी ट्रंपर व आर्थर मॉरीस? निल हार्वे व बॉबी सिंप्सनची गैरहजेरी सुद्धा मला जाणवली. तसच बिल ओरायली ऐवजी मी रिचि बेनॉला घेतल असत व बॉर्डरऐवजी स्टिव्ह वॉ किंवा निल हार्वेला. पॉन्टिंगला पण जागा नाही त्यात. पण ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट इतिहास बघता फक्त ११ खेळाडु निवडणे फारच कठीण!आपण मायबोलिवर सुरु करुयात का तसे सदर? म्हणजे ऑल टाइम इंडियन ११ वगैरे? सगळ्यात कठीण.. ऑल टाइम वेस्ट इंडि़ज ११!

चल मीच सुरु करुन टाकतो इथे..

ऑल टाइम वेस्ट इंडिज ११.

रोहन कन्हाय्,गॉर्डन ग्रिनिज्,विव्ह रिचर्ड्स्,एव्हर्टन विक्स्,गारफिल्ड सोबर्स(कप्तान)जेफ्री दुजॉन(यष्टीरक्षक),माल्कम मार्शल,अँडी रॉबर्ट्स्,जोएल गार्नर्,मायकेल होल्डिंग व लान्स गिब्स! १२ वा गडी.... आल्विन कालिचरण. हॉनरेबल मेन्शन.... क्लाइड वॉलकॉट्,क्लाइव्ह लॉइड, कोर्टनी वॉल्श व वेस्ली हॉल

ऑल टाइम इंडियन ११.

सुनिल गावस्कर्,विजय मर्चंट्,राहुल द्रविड्,सचिन तेंडुलकर्,मन्सुर अलि खान पतौडी(कप्तान) कपिल देव्,अनिल कुंबळे,जवगळ श्रिनाथ्,एरापल्ली प्रसन्ना,बिशन सिंग बेदी व भागवत चंद्रशेखर. बारावा गडी. दिलिप वेंगसरकर. हॉनरेबल मेन्शन... गुंडप्पा विश्वनाथ,विनू मांकड,व्ही व्ही एस लक्ष्मण व पॉली उम्रिगर

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुकुंदराव,

काही लोकांच्या मते (नेव्हील कार्डस) ट्रंपर ऑस्ट्रेलियाचा सर्वोत्क्रूष्ट फलंदाज होता. (अर्थात आपण सर्वांनी फक्त वाचलय)

विंडीज च्या टीम मधे लारा राहिला.

आणि भारताच्या टीम मध्ये इंजिनियर/किरमाणी विकेटकिपर घेतल्याने कुंबळे बारावा. मी बेदीच्या ऐवजी विनू मांकडना घेइन. आणि सुनिलच्या तोडीचा पार्टनर म्हणून आघाडी वीर अजूनही झाला नाही हेच खर. तूमचा विंडीजचा तोफखाना एकदम मान्य. आणि त्या सर्वांना सुनिलने समर्थ पणे तोंड दिलय.
चंदू बोर्डे आणि मोहिंदरचाही उल्लेख करायला हवा. मोहिंदरचा केवळ जिगरी साठी.

शिवाय अजून एक. सर्वात चांगला निवड समितीचा अध्यक्ष कोण असेल तर ते चंदू बोर्डे.

भारतीय संघाला कुणि यष्टिरक्षक नको का? का इतक्या चांगल्या संघात यष्टिरक्षक नसला तरी चालेल?? का द्रविड् ला करणार यष्टिरक्षक? केलेले आहे ते काम त्याने कधी कधी. कपिल देवबरोबर दुसरा कुणि जलद गति गोलंदाज नको का? मला रमाकांत देसाई आठवतो.

Happy Light 1

झक्की, श्रीनाथ आहे की कपिलदेव बरोबर. ही जर कसोटी-११ असेल तर द्रविड काही कसोटीमध्ये यष्टीरक्षक नव्हता कधी.

मुकुंद विंडीज चा तुझा संघ म्हणजे एक दोन अपवाद वगळता ७० च्या दशकात सोबर्स्-लॉईड वगैरेंनी उभारलेला संघ दिसतोय. कन्हाय बद्दल गावस्कर च्या पुस्तकात वाचलेले आहे. बाकी संघ तर एकदम चपखल आहे. फक्त लारा कसा घुसवायचा त्यात? आणि फ्रेडरिक्स ही राहिला.

आपल्या संघात - श्रीनाथ एवजी झहीर खान आणि वेंगसरकरच्या ऐवजी विश्वनाथ. भारताबाहेर फास्ट बोलिंग खेळायची असेल तर एक (किंवा दोन) स्पिनर कमी करून मोहिंदर आणि ऑस्ट्रेलियाविरूद्ध असेल तर लक्ष्मण स्मित

West indies 11

Leary Constantine
George Headley
Lara
Haynes to open with Greenidge

Indian 11
No Prasanna for me. Vinoo Mankad in for him.
Drop Pataudi. make Kapil captain.
Subhash Gupte instead of Chandra (who was very inconsistent)
Wicketkeeper -whoever kirmani ir engineer

England 11 will be fun too. So many good players.

विक्रम,अमोल.. अरे हो की.. लाराला कसा विसरलो मी? मग एव्हर्टन विक्स ऐवजी लाराला घेतल पाहीजे. थ्री डब्ल्युज पैकी फ्रँक वॉरेललाही बाहेर बसवायला लागले. फ्रेड्रिक्सचा विचार केला होता पण मग कॉनराड हंट व लॉरेन्स रोचाही विचार करायला लागला असता. पुह्चेही बरोबर आहे. लिअरी कॉन्स्टन्टाइन व जॉर्ज हॅडलिचाही विचार केला होता. जॉर्ज हॅडलीला ब्लॅक ब्रॅडमन म्हणत असत.. पण जागा ११च! कोणा कोणाला घ्यायचे?:(

आपल्या संघात इंजीनिअर व किरमाणिचा विचार केला होता पण मग काढायचे कोणाला? द्रविड वन ऑफ टेस्ट मधे यष्टिरक्षण करु शकेल असे मला वाटते. पतौडी माझ्या मते सगळ्यात मस्त कप्तान होता व त्याचे क्षेत्ररक्षणसुद्धा कसले जबरी होते... ब्रेबॉर्न स्टेडिअमला..कव्हरमधे तो पनामा कॅप घालुन.. चित्त्याच्या चपळाइने क्षेत्ररक्षण करत असताना मी त्याला बघीतले आहे. उगाच नाही त्याला टायगर पतौडी म्हणत.. आणि पिच जर फिरकी गोलंदाजीला अनुकुल नसेल तर प्रसन्ना ऐवजी अजुन एक फलंदाज्(मोहिंदर्,लक्षमण्,वेंगसरकर किंवा विश्वनाथ.. टेक अ पिक!) व कुंबळे ऐवजी अजुन एक जलदगती गोलंदाज्(रमाकांत देसाइ,झहीर खान्,वेंकटेश प्रसाद किंवा मोहम्मद निस्सार.. टेक अ पिक!) घेता येइल.

आणि व्हिक्टर ट्रंपरबद्दल मीही वाचले आहे पण त्याची आकडेवारी त्याच्या लौकीकाला साजेशी दिसत नाही. अर्थात आकडेवारी सगळे काही सांगत नाही पण हेडन व टेलरला बॅटिंग करताना बघीतले असल्यामुळे त्यांची अनुपस्थिती जाणवली. माझ्या ऑस्ट्रेलियन संघात मॅथ्यु हेडन्-बॉबी सिंप्सन अशी सलामीची जोडी असली असती. व मधल्या फळीत बोर्डर ऐवजी निल हार्वे व शेन वॉर्न बरोबर रिचि बेनॉ व किथ मिलर ऐवजी मी स्टिव्ह वॉ ला घेतले असते. असो.

हे आपले सगळे गंमत म्हणुन... प्रत्येकाचे विचार या बाबतीत वेगळे असले तरी काही हरकत नाही ..:)

अझरुद्दीन (मॅच फिक्सिंग) बंदी मुळे कटाप की इतर खेळाडुंच्या तुलनेत कमी पडला?
गांगुलीची इथुन पण हकालपट्टी Happy

पतौडी बद्दल मी खूप ऐकले आहे, नाही दादाला सरकवलेच असते पुढे Happy आम्हाला माहीत असलेल्या पिढीत दादाला कप्तान म्हणून तोड नाही.

आणि विश्वनाथ, वेंगसरकर (आणि फिक्सिंग वगळता अझर) कितीही चांगले असले तरीही द्रविड आणि तेंडुलकर सरसच वाटतात मला. विश्वनाथ मी बघितलेला मी धरलेला नाही, त्याचा आधीचा लौकिक धरून सुद्धा (होल्डिंग ऐन भरात असताना विशीला दोन थर्ड मॅन लावत आणि हा त्यांच्या मधून स्केवर कट मारून फोर मारत असे म्हणतात).

महागुरु... हो अझरुद्दिन फिक्सिंगमुळे कटाप... आणि दादाला वन डे टिममधे पहिले स्थान.. तेही कप्तान म्हणुन! पण टेस्ट टिममधे विश्वनाथ्,वेंगसरकर,मोहिंदर व लक्ष्मणच्या पुढे त्याला मी सरकवणार नाही.

हॉनरेबल मेन्शनमधे चंदु बोर्डे,विजय हजारे व विजय मांजरेकर यांची नावेही घेतली पाहीजेत... सेंटिमेंटल फेव्हरेट मधे संदिप पाटिल्(आमच्या बालमोहनचा असल्यामुळे!:) ) व सलिम दुराणि!

(अमोल.. विश्वनाथबद्दल अजुन एक.... तो कठिण परिस्थिति असताना जास्त चांगला खेळायचा. त्याची अनेक अनेक उदाहरणे देता येतील पण उत्तम उदाहरण म्हणजे १९७६ च्या वेस्ट इंडिजविरुद्ध मिळवलेल्या विश्वविक्रमी व ऐतहासिक विजयाच्या वेळी! गावस्कर शतक मारुन जेव्हा आपला स्कोर १६० च्या आसपास असताना आउट झाला त्यानंतर विश्वनाथ व मोहिंदरमधे जी जवळजवळ दिडशतकी भागीदारी झाली त्यामुळेच तो विजय शक्य झाला.. म्हणजे गावस्करने पाया रचला व विश्वनाथ व मोहिंदर अमरनाथने त्यावर कळस चढवला... विश्वनाथचे त्या इनिंगमधले शतक मी कधीच विसरणार नाही... होल्डिंग व ज्युलिअनने सर्व प्रयत्न केले.. बाउंसर्स.. व सतत शॉर्ट पिचचा मारा.. व लॉइडने रफिक जुमादिन् व अल्बर्ट पॅडमोरच्या फिरकी गोलंदाजीच्या वेळी क्लोज इन फिल्डर्सचा सापळाही लावुन पाहीला पण गट्सी मोहिंदर अमरनाथ व क्लासी विश्वनाथने काहीच दाद लागु दिली नाही.(या मॅचनंतर लॉइडने परत कधी ३ स्पिनर्स टिममधे ठेवले नाहीत व नियमीत चार जलदगती गोलंदाज त्याच्या संघात दिसु लागले.) )

माझ्या मते टेस्ट साठी फिट म्हणजे द्रविड आणि व्हीव्ही एस लक्ष्मण.
आधीचे खेळाडू खेळताना पाहिले नाहीत. त्यामुळे नो कमेंट्स. Happy

अशीच वन डेची पण यादी करायची का? पण मग कप्तान गांगुली पाहिजे. Happy

--------------
नंदिनी
--------------

माझा All Time Great भारतीय संघ -

कसोटी सामने - गावसकर (कर्णधार), सेहवाग, द्रविड, सचिन तेंडुलकर, विजय ह़जारे, मोहिंदर अमरनाथ, फारूक इंजिनिअर, कपिल देव, विनू मंकड, सुभाष गुप्ते, श्रीनाथ

मर्यादित षटकांचे सामने - गांगुली (कर्णधार), सेहवाग, श्रीकांत, सचिन तेंडुलकर, युवराज सिंग, कपिल देव, धोनी, हरभजन, श्रीनाथ, इरफान पठाण, मोहिंदर अमरनाथ

मला अजूनहि रमाकांत देसाई ची आठवण येते. पाकीस्तानचा हनिफ महम्मद, ज्याने ३३४ पेक्षा जास्त धावा करण्याचा विक्रम मोडला नि एरवीहि सर्व जलद गोलंदाजांचा कर्दनकाळ असलेला हनीफ, रमाकांतला चक्क घाबरायचा. तो पहिला येत असे, पण रमाकांत देसाई प्रथम गोलंदाजी करत असला तर दुसरा! रमाकांत हा स्वतंत्र भारतातला पहिला जागतिक दर्जाचा जलद गोलंदाज. तोपर्यंत भारताच्या संघात एकही जागतिक दर्जाचा जलदगति गोलंदाज नव्हता. फडकर. गुलाम महम्मद हे आपले फिरकी गोलंदाजांच्य पेक्षा थोडे जास्त जलदगतीने चेंडू टाकत म्हणून गोलंदाजीची सुरुवात करत असत पण जितक्या लवकर मंकड, गुप्ते यांना आणता येईल तितके आणत असत.

गुप्ते, मंकड, चंद्रशेखर, प्रसन्ना, बेदी, नाडकर्णी (४०- ३५- १०-० असे ज्याचे आकडे असत), असे लोक आठवतात. पतौडी आल्यावर भारतीय क्षेत्ररक्षकांना खाली वाकून, धावत जाऊन चेंडू अडवणे क्रिकेटमधे 'allowed' आहे हे कळले म्हणे! कपडे जरा मळले तरी चालतात हेहि कळले. नाहीतर फॅशन म्हणून नवा चेंडू पँटवर घासून लाल रंग लावायचा एव्हढेच माहित होते. चेंडू नाही मिळाला, तर इतर दुसरा लाल रंग लावायचीहि फॅशन होती.

१९७० नंतरचे खेळाडू केवळ ऐकूनच माहित. नंतर २००६ नंतर इंटरनेटवर मी पहायला लागलो. चंद्रशेखर वरूनच लगानमधला तो हात वाकडा असलेला गोलंदाज दाखवला होता.

Happy Light 1

पतौडी आल्यावर भारतीय क्षेत्ररक्षकांना खाली वाकून, धावत जाऊन चेंडू अडवणे क्रिकेटमधे 'allowed' आहे हे कळले म्हणे! >>> Lol

ऑल टाईम ग्रेट वन डे टीम मधे धोनी ऐवजी द्रविड हवा...
संकटकाळी तारून नेण्याच्या हतोटीमुळे...
तसे इतर भरपूर आक्रमक फलंदाज आहेत आणि द्रविड चं यष्टीरक्षण ही बर्‍यापैकी चांगलं आहे...
आणि दहा हजाराहून अधिक धावा करणारा हा खेळाडू टीम मधे असायलाच हवा....

_______
चक दे सारे गम, तेरे संग है हम!!!

झक्की... Rofl तुम्ही क्षेत्ररक्षकांबद्दल अगदी अचुक बोललात बघा.. आणि जलदगति गोलंदाजांबद्दलही बरोबर बोललात. ते फिरकी गोलंदाजांपेक्षा थोडेसे जलद चेंडु फेकायचे म्हणुन २-३ ओव्हर्स त्यांना दिल्या जायच्या. उदाहरणार्थ.. अबिद अलि,एकनाथ सोलकर्,करसन घावरी,मदनलाल्,रॉजर बिन्नी,मोहिंदर अमरनाथ वगैरे वगैरे... मला आठवत की काही काही कसोटित सुनिल गावस्करनेही पहिली २-३ षटके टाकुन डावाची सुरुवात केली आहे. मग चौथ्या- पाचव्या षटकात बेदी, प्रसन्ना, वेंकटराघवन किंवा चंद्रशेखर यायचे..

बापु नाडकर्णी यांच्या मेडन वर मेडन टाकण्याच्या हातखंड्याविषयी नुसते ऐकुन माहीत आहे. सुभाष गुप्ते,बापु नाडकर्णि, रमाकांत देसाइ,चंदु बोर्डे वगैरे हे साठीच्या दशकातले खेळाडु खेळताना कधी बघीतले नाहीत..

नंदिनी.. मग तुच का नाही सुरुवात केलीस? Happy

तुझ व अमोलचे बरोबर आहे.. वन डे टिमसाठी दादाच कॅप्टन!अ‍ॅन्की न. १.. द्रविडबाबत तुझ्याशी सहमत..

माझी वन डे टीम अशी असेल...

विरेन्द्र सेहवाग्,सचिन तेंडुलकर्,सौरव गांगुली(कप्तान्),युवराज सिंग्,महेंद्र सिंग धोनी(यष्टिरक्षक),राहुल द्रविड, कपिल देव्,हरभजन सिंग,झहिर खान्,वेंकटेश प्रसाद,जवगळ श्रिनाथ.(जर टुर्नामेंट इंग्लंडमधे असेल तर वेंकटेश प्रसाद ऐवजी मोहिंदर अमरनाथ व फिरकी गोलंदाजीला अनुकुल असलेल्या पिचवर प्रसाद ऐवजी अनिल कुंबळे)). बारावा गडी.... क्रिशनामाचारी श्रिकांत.

अरे हा धागा बंदच पडला की...

आजच क्रिक इन्फो वर पाकिस्तानच्या ऑल टाइम टिम बद्दल वाचले. ओपनर्ससाठी मी हनिफ मोहम्मद व सईद अन्वरला निवडले,( माजिद खान, मोहसिन खान्,सादिक मोहम्मद्,आमिर सोहेल व मुद्दस्सर नझर हे बाकीचे कँडीडेट होते)

मधल्या फळीत मी झहिर अब्बास्,जावेद मियान्दाद व इन्झमाम उल हकला निवडले.( बाकीचा चॉइस होता... सलिम मलिक्,मोहम्मद युसुफ्,असिफ इक्बाल्,युनिस खान व मुश्ताक मोहम्मद)

पुढे विकेट किपर म्हणुन मी वासिम बारीला निवडीन.

फास्ट बोलर्स मधे इम्रान खान(कप्तान)वकार युनुस व वासिम अक्रमला तोड नाही..

स्पिनर्स मधे अब्दुल कादिर व इक्बाल कासिम पण एकच स्पिनर व ४ फास्ट बोलर्स घ्यायचे असतील तर शोएब अख्तरला चौथा फास्ट बोलर म्हणुन घेइन...

मुकुंद सर्फराज नवाज च्या आधी शोएब? २००३ पर्यंतचा शोएब जबरी होता, पण निदान भारताविरूद्ध तो २००३ च्या त्या वर्ल्ड कप च्या मॅच नंतर कधीच चालला नाही.

हनिफ मोहम्मद ला खेळताना पाहिला नाही, तसेच माजिद खान सुद्धा बघितल्याचे आठवत नाही, पण एकदम स्टाईलिश खेळायचा असे ऐकले आहे.

झहीर भारतात कधीच चालला नाही, मियाँदाद सुद्धा फारसा नाही. आठवणीतून लिहीतोय, स्टॅट्स पाहिले नाहीत अजून. पण पाक मधे न चाललेला भारतीय खेळाडू आपण निवडला नसता कधीच.

अमोल.. तुझ्या ब्लॉगची लिंक देशील का इथे परत?

मी सर्फराजची बोलींग बघीतली आहे.. माझ्या लहानपणी सर्फराज्-इम्रान ही जोडी होती. त्यांच्याबरोबर सिकंदर बख्त हाही होता. पण शोएब अख्तर हा सर्फराजच्या तुलनेत स्ट्राइक बोलर व मॅच विनर म्हणुन मला जास्त चांगला वाटतो.

माजिद खानचा खेळही मी बघीतला आहे. स्टायलीश होता हे खरे आहे पण अन्वरसारखी कन्सिस्टंसी नाही म्हणुन त्याला मी निवडला नाही.

झहिर अब्बासला जर तु खेळताना बघीतल असतस तर तो निव्वळ भारतात जास्त चमकला नाही म्हणुन घेणार नाही असे कधीच म्हणाला नसतास.. क्लास बॅट्समन होता तो.. मला आठवत की १९७८ मधे आपण पाकीस्तानला गेलो होतो तेव्हा त्याने चंद्रा बेदी व प्रसन्ना ला बदडुन काढले होते व त्यांची कारकिर्द्र संपुष्टात आणली . तेव्हा तो डोक्यावर पट्टी बांधुन खेळायचा.. पण समालोचक म्हणायचे की ज्या फॉर्म व स्टायलीश रित्या झहिर अब्बास खेळत आहे त्या फॉर्ममधे तो ती त्याची डोक्यावरची पट्टी डोळ्यावर बांधुन सुद्धा खेळु शकेल!

जावेद मियांदाद बद्दल काय लिहु? ८० च्या दशकात त्याने सर्वात जास्त मला दुखणे दिले आहे.. त्याने चेतन शर्माच्या लास्ट बॉलवर षटकार मारल्यावर मला कित्येक दिवस पोटात मळमळत होते व जेवण गेले नव्हते..:(

झहीर भारतात कधीच चालला नाही, मियाँदाद सुद्धा फारसा नाही.>>>
अरे जहीरच्या काळात भारतात फारश्या मॅचेस झाल्याच नाहीत. त्यावेळी युद्धामुळे.
पण सुनील गावस्कराच्या आयडॉल्स मध्ये १९७८ च्या त्या सीरीज मध्ये त्याने आपल्या विख्यात फीरकीला कसे धुतले ह्याच वर्णन आहे.
बाय द वे, आयडॉल्स हे लयी भारी पुस्तक आहे. मला रद्दीच्या दुकानात चुकुन भेटल Happy

चला, १२-२३ वर्षांनी परत हा धागा वर काढतो.

या १२ वर्षात बरेच पाणी पुलाखालुन वाहुन गेले आहे. भारताच्या ऑल टाइम टिम्स मधे विराट कोहलीला स्थान आहे का? असेल तर कोणाच्या बदल्यात? गांगुली, धोनी व पतौडी ऐवजी तो कप्तान होउ शकतो का?

गांगुली, धोनी व पतौडी ऐवजी तो कप्तान होउ शकतो का?

मला तसे वाटत नाही, त्याच्यात पेशन्स थोडा कमी वाटतो, गेम तो उत्तम ओळखतो पण coolness थोडा कमी वाटतो, अर्थात हे मत मी आपल्या घरच्या पलंगावर भरपेट जेवण करून फावल्या वेळात टाईप करतोय हा भाग अलाहिदा Happy

टेस्ट टीम (टेस्ट नसती तर धोनी , विराट, गांगुली , मोहिंदर अमरनाथ, सुभाष गुप्ते असते)
सुनिल गावस्कर्, सेहवाग, राहुल द्रविड् ,सचिन तेंडुलकर्, मन्सुर अलि खान पतौडी(कप्तान) , पंत, कपिल देव्, युवराज , अनिल कुंबळे, रविन्द्र जडेजा, मोहम्मद निस्सार

टेस्ट टीम : सुनिल गावस्कर्, सेहवाग, राहुल द्रविड् ,सचिन तेंडुलकर्, मन्सुर अलि खान पतौडी(कप्तान) , पंत, कपिल देव्, चंद्रा, विन मंकड, मोहम्मद निस्सार, गुप्ते (भारताबाहेर खेळताना चंद्रा /गुप्ते ऐवजी बुमरा). हजारे नि मर्चंट माझे राखीव बॅटस्मन , झहिर खान राखीव बॉलर.

टेस्ट टीम : सुनिल गावस्कर्, सेहवाग, राहुल द्रविड् ,सचिन तेंडुलकर्, मन्सुर अलि खान पतौडी(कप्तान) , पंत, कपिल देव्, चंद्रा, विन मंकड, मोहम्मद निस्सार, गुप्ते (भारताबाहेर खेळताना चंद्रा /गुप्ते ऐवजी बुमरा). हजारे नि मर्चंट माझे राखीव बॅटस्मन , झहिर खान राखीव बॉलर.
>>
मंकड, मर्चंट आर गुड वन !

चला, १२-२३ वर्षांनी परत हा धागा वर काढतो.
>>>>

कसोटीमध्ये यष्टीरक्षकाची जागा ऋषभ पंत याने घेतली आहे. सविस्तर टीम लवकरच...

वन डे टीम :
सचिन तेंडुलकर्, कर्नल नायडू , कोहली, युवी, सेहवाग, धोनी (कप्तान) , कपिल, अनिल कुंबळे, विनू मंकड , झहीर , बुमरा
बॅकप : वेंगरसरकर , चंद्रा, निस्सार

टी २० टीम :
सचिन तेंडुलकर्, रोहित, कर्नल नायडू , युवी, धोनी (कप्तान) , कपिल देव, सलिम दुराणी , बेदी, विनू मंकड , नेहरा , बुमरा
बॅकप : श्री कांत, चंद्रा, निस्सार

असामी, जे लोकं २०-२० खेळले नाही त्यांची नावे त्यात कश्याच्या बेसिसवर टाकावीशी वाटली.
हा प्रश्न स्पेशली पंतची आतापर्यंतची २०-२० कारकिर्द पाहून पडला. त्याकडे बघूनही वाटते की हा २०-२० मध्ये आणखी चमाकेल. पण तिथे नेमके उलटे होतेय.
तर हेच जुन्या खेळाडूंबद्दल ते या फॉर्मेटला खेळले नसताना अमुकतमुक खेळले असते असा अंदाज बांधणे आणि त्या अंदाजावर ऑलटाईम संघात स्थान द्यावेसे वाटणे ईंटरेस्टींग वाटले Happy

जडेजा( निलिमाचा टेस्ट चमु सोडुन)व आश्विन चे नाव कोणाच्याच व कोणत्याही टीम मधे नाही. ह्म्म!

असामी, विनु मांकड टेस्ट टीममधे जस्टीफाय होउ शकतो. पण वन डे मधे व टी-२० मधे? ऑल राउंडरचाच हट्ट असेल तर जडेजा टीममधे येउ शकतो. फिल्डींगमधे टायगर पतौडी नंतर त्याचाच नंबर मी लावेन! गोलंदाजी टाइट करतो व फलंदाजीचा दर्जाही त्याने खुपच सुधारला आहे.

१०० च्या वर टी-२० खेळुनही कोहलीची सरासरी टी-२० मधे ५० च्या वर आहे.. व्हिच इज इनक्रेडीबल! टी- २० चमुमधे त्याला न घेणे मला वाटते चुक ठरेल.

( अर्थात टी-२० मधल्या क्रिकेटला क्रिकेट म्हणायचे की नाही हा एका वेगळ्या बीबीचा विषय होउ शकेल Happy )

लोकं २०-२० खेळले नाही त्यांची नावे त्यात कश्याच्या बेसिसवर टाकावीशी वाटली. >> मी एक खेळाडू म्हणून विचार करण्याआधी टीम म्हणून विचार केला. टी २० चे स्वरुप काय आहे नि त्या पोझिशन्साठी भारताकडून खेळलेला वन ऑफ त बेस्ट प्लेयर कोण होता हे बघून त्यातला मला सूट होईल तो प्लेयर घेतलाय. उदा : टी २० मधे ऑल राऊण्डर्स ( दुराणी, मंकड) नि बिग हिटर्स (दुराणी, नायडू)असणे जरुरी आहे असे माझे मत आहे. विली लेफ्ट आर्म स्पिनर टी २० मधे गेम चा फ्लो कंट्रोल करतात. बेदी त्यात विकेट टेकिंग किंवा धावा दाबणे ह्यात सर्वा भारतीय लेफ्ट आर्म बॉलर्स मधे उजवा आहे म्हणून जाडेजा च्या पुढे त्याचा नंबर. राहता राहिला 'टी २० मधे न खेळलेले लोक कसे खेळले असते ' हा प्रश्न तर हा सगळा जर तर चा भाग आहे. हा पूर्ण बाफच काल्पनिक आहे. पण त्या खेळाडूंची गुणवत्ता बघता करू शकले नसते असे म्हणायला माझी जीभ धजावत नाही. अगदी गावस्कर सारख्या तंत्र शुद्ध फलंदाजाने वन डे शी शेवटी जुळवून घेतलेच होते.

मुकुंद, जाडेजा बद्दल मी विचार केला होता पण मला मंकड नि जाडेजा ह्यामधे फिल्डींग चा भाग वगळता (जाडेजा बद्दल कौतुक असूनही) माझ्या मते तुलना होउ शकत नाही. मंकड मूळात लेग स्पिनर होता नि नंतर लेफ्ट आर्म ऑर्थोडोक्स बॉलर झालाय. ओपनर पासून ८ पर्यंत प्रत्येक क्रमांकावर बॅटींग ओपन केली आहे. जवळ्जवळ प्रत्येकाने मंकड च्या फ्लेक्सिबिलिटी बद्दल उल्लेख केला आहे . He was regarded as one of the best all rounder of his time with no ifs and buts. तो ज्या काळात ज्यांच्या विरुद्ध खेळला आहे ते बघून आय रेट हिम वे हायर दॅन जाडेजा. त्याच्या अ‍ॅडॉप्टिबिलिटी चा उप योग होउ शकतो. नि केवळ मंकडींग हे एक उदाहरण त्याची क्रिकेटची ग्रास्प दाखवते. (हे टेस्ट क्रिकेट मधे केले ह्यातून पॅशन दिसते) . फक्त फिल्डींग साठी हवे असेल तर जडेजा सब म्हणून येउ शकतोच ना रे. (तसे तर मग मला मनिष पांडे नि एकनाथ सोलकर पण आवडतील मैदानामधे फिल्डींग साठी - बेस्ट फ ल्डींङ ईलेव्हन लिहायची का ?) ). मंकड नि बेदी (युवीही) दोघे एकत्र असणे हा तोटा मला जाणवला नि मी बेदी च्या जागी चंद्रा किंवा कुंबळे असाही विचार केला होता (टी २० साठी माझ्यापुरते तरी लेगी नि लेफ्ट आर्म ट्रेडीशनल ऑफ स्पिनर च्या आधी येतात) पण सचिन काम चलाऊ लेग स्पिन टाकू शकत असल्यामूळे नि मला ऑल राउंडर हवे असल्यामूळे हे कंपोझिशन केले. कोहली बद्दल मी टॉसप केले पण तू नीट बघितलेस तर माझी टीम मुख्यत्वे गो बिग टाईप ची आहे ( उदा: बॅकप : श्री कांत) नि सचिन मोटर चे काम अधिक चांगले करू शकत असल्यामूळे कोहली पेक्षा बिग हीटर्स उचलले गेले. हीच बेस्ट टीम आहे असा माझा दावा नक्कीच नाही. Happy

अगदी बॅलन्स्ड करायचीच असेल तर असे करता येईल - अश्विन/कुंबळे पैकी कोण आहे त्यावरून सचिन/सेहवाग अनुक्रमे लेग/ऑफ स्पिनर नि युवी लेफ्ट आर्म स्पिन लेग/, दुराणी मिडियम पेस बॅकप. ८-९ पर्यंत बेटींग खेचतो आहे नि २-३ बॅकप बॉलर्स देतो आहे. २००७-२०१० चा कप्तान धोनी धरून चालतो आहे अन्यथा कपिल कप्तान असेल.
टी २० टीम :
सचिन तेंडुलकर्, सेहवाग, कर्नल नायडू , युवी, धोनी (कप्तान) , कपिल देव, सलिम दुराणी , अश्विन/कुंबळे , विनू मंकड , नेहरा , बुमरा
बॅकप : श्री कांत, चंद्रा, निस्सार

Pages