बॄ. म्. म. मध्ये सुधारता येण्याजोग्या गोष्टी/सूचना..

Submitted by परदेसाई on 8 July, 2009 - 11:43

फिलाडेल्फियाचे अधिवेशन तर खूप छान झाले. ५००० लोकांना एकत्र करून कोणताही कार्यक्रम करायचा म्हणजे सोप्पे नाही. तेव्हा त्यांचे कौतुक. पण काही गोष्टी ज्या खटकल्या, किंवा कमी वाटल्या त्याबद्दल इथे लिहीलंत तर कदाचित पुढच्या (शिकागो) अधिवेशनात त्या कदाचित सुधारता येतील. टीका करण्यापेक्षा मदत म्हणून हा बातमी फलक वापरावा...

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>> ४ हजार माणसाना (त्यांची सीट देखील माहीत असताना)
विनय, म्हणजे सीट नंबर माहिती असताना असं म्हण. सीट्सबद्दल कोणीच असं छातीठोकपणे म्हणू शकलं नाही शेवटपर्यंत. Proud

-----------------------------------------------
I was born a Hindu. Soon I converted to Narcissism! Happy

कार्यक्रम नियोजक समितीचे प्रमुख, यांच्या मते, आशा भोसले, सुयोग इ. नावे नसली तर लोक बीएम एम ला पैसे देऊन येणार नाहीत. सध्या ती नावे येथील मराठी मंडळींच्यात जास्त लोकप्रिय आहेत. उपस्थित असलेल्यात ५५ वर्षांवरील लोकांचे प्रमाण फार जास्त होते, व त्या लोकांना हेच जास्त आवडेल असा त्यांचा समज होता. व्यक्तिशः माझे मत तसे नाही, पण मला समजले ते असे.

' दिवसा तू.. ' हे नाटक महाराष्ट्रात खूप गाजले, तसेच 'पळा पळा' पण. आपल्याला ते आवडले नाही, कारण आपले मन अगदी क्लोSSजड आहे, जुन्या गोष्टीच आपल्याला आवडतात, पण महाराष्ट्र आज खूप पुढे गेला आहे, तेंव्हा तुम्हाला नवीन गोष्टी समजून घ्यायला पाहिजेलेत!

पण समजा कुणि म्हंटले अमुक कार्यक्रम ठेवा, नि त्यांनी नाही ठेवला तर ते लोक येणारच नाहीत! नि आम्हालाहि कळतं ना, काय कार्यक्रम ठेवायचा ते, कसे संमेलन करायचे ते!

शिवाय एकंदरीतच सर्व बीएम एम च्या आयोजकांमधे ही भूमिका, की आम्ही स्वतः विनाशुल्क अहोरात्र राबतो आहोत, तुम्ही काहीच करत नाही. नुसती नावे ठेवता!

तुम्हाला जरी समोरची जागा मिळेल असे सांगितले असले तरी 'अहो, आयत्या वेळी, असे तसे झाले त्याला आम्ही काय करणार? पण तुम्हाला जागा नक्की देतो. ही पहा शेवटच्या रांगेतली कोपर्‍यातली जागा, त्यावर आम्ही 'हा G सेक्शन' अशी पाटी लावतो, मग तर झाले!' नि नंतर "जर दुसरीकडे कुठे जागा रिकामी असेल तर तिथे बसा ना!" बर्‍याच जणांना हे आवडले नाही म्हणून लिहीले. विशेषतः चार पाच जणांनी आणखी जास्त २५ डॉ. दरडोई भरून सुद्धा त्यांच्या नशीबी हेच आले!
पण म्हणूनच तर मला कश्या उत्कृष्ट जागा मिळाल्या. तेंव्हा माझी तरी काहीहि तक्रार नाही हो.

Happy Light 1

संपूर्ण बी एम एम मध्ये स्वयंसेवकांची संख्या आवश्यकतेपेक्षा कमी वाटली. बहुतेक सगळे जण सकाळी ७:३० ला येत ते रात्री ११ पर्यंत असे दिसले. तोकड्या संख्यमुळे बहुदा त्यांच्या ६-८ तासाच्या बॅचेस केलेल्या दिसल्या नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर कामाचा बराच भार पडत असणार. त्यात त्यांच्या त्यांच्यात असलेली communication gap. त्यामुळे झालेला सावळा गोंधळ आणि त्याचा त्यांना स्वतःला आणि प्रेक्षकांना झालेला त्रास.
हे सगळे टाळण्यासाठी - फक्त स्वयंसेवकांवर अवलंबुन न रहाता कॉलेजच्या १००-१५० विद्यार्थ्यांना रीतसर समर जॉब नाही का देता येणार. यावेळी बी एम एम चे ८ कोटी रुपयांचे बजेट होते असे भाषणात ऐकले, त्यात अश्या विद्यार्थ्यांच्या पगाराची तरतुद नक्कीच करता आली असती. आपण दिलेली सेवा ही उत्तम असायला हवी ही मंडळाची भुमिका हवी, चलता है, थोडे इकडे तिकडे झाले तर काय झाले, समजुन घ्या, ५००० लोक येणार म्हणजे असे सगळे होणारच असा आयोजकांचा अटीट्युड नसावा. जर एवढे करुनही हेळसांड झाली तर त्याबद्दल प्रेक्षकांना नीट सांगीतले तर सगळ्यांची चिडचिड कमी होईल.
यावेळच्या मंडळाची भुमिका काय होती माहित नाही पण पुढच्या बी एम एम च्या वेळी आयोजकांनी या शक्यतेचा विचार करायला हवा.

बी एम एम च्या इंग्रजी वेबसाईट बद्दल नंतर सविस्तर लिहीन. ही साईट इंग्रजी आणि मराठी अश्या २ भाषेत असावी असे एकाही पदाधिकार्‍याला वाटु नये याचे आश्चर्य वाटते.

कार्यक्रमाचे वेळापत्रक थोड्या छोट्या आकारात छापायला हवे. गार्टनर/ ओरॅकल अशा ठिकाणी साडेचार दिवसात शंभरहून अधिक सेशन्स असतात पण सगळ्यांचं संक्षिप्त वेळापत्रक छोट्या आकारात ( आय डी कार्डा एवढ्या कागदांचा गठ्ठा ) सगळ्यांना देतात. दरवेळी वर्तमानपत्र उघडायचं म्हणजे किती त्रास!

सगळ्या हॉलच्या बाहेर एका स्क्रीनवर नाउ प्लेयिंग अन कमिंग सून याचे बरोबर डिस्प्ले हवेत.

मधून मधून मोट्या स्क्रीनवर जुन्या अधिवेशनांच्या फिल्म्स च्या क्लिप्स लावाव्यात.

हॉलवे, कॉमन एरिया मधे बसायला भरपूर खुर्च्या हव्यात. आई / सासू/ मावशी / बाबा/काका यांचे पाय तर दुखतातच पण उंच टाचांच्या चपला घालणार्‍या नॉन -काकवांचेही पाय भरुन येतात.

चहा कॉफी साठी साडे तीन पेक्षा जास्त स्टेशन हवीत. तिथे पिंप संपली की लगेच दुसरं लागलं पाहिजे.

दिंडी च्या वाटेवर प्रेक्षकांना बाजूला उभं राहण्याची सोय हवी .

जेवणा करता किंवा ब्रेफा करता बॉक्स्ड लंच / ब्रेफा ठेवायला काय हरकत आहे. वेळ / गर्दी / गोंधळ किती वाचेल.

ज्या ठिकाणी कंव्हेंशन असेल त्याचे मोठे मॅप्स आत सगळ्या ठिकाणी हवेत . "२१४ कुठे हो" हे मीच दहा बारा लोकांना सांगितलं असेल.

कार्यक्रम सुरु व्हायच्या आधी लोक बसायला सुरुवात झाली की स्क्रीनवर शिकागो मंडळाच्या/ जुन्या अधिवेशनाच्या/ साहित्य संमेलनाच्या/ जुन्या नाटकांच्या अशा फिती दाखवाव्यात. वाट बघणारी मंडळी कमी कंटाळतात.

कार्यक्रमाचे उद्घाटन मराठी नृत्य/नाट्य्/कला प्रकाराने व्हावे. इथे कथ्थक होतं . शिकागोवाल्यांनी मराठी कलाकारांचा भांगडा ठेवला तर ?

मुख्य कार्यक्रमाखेरीज इतर ठिकाणी निवेदक विशिष्ट शहरातल्या मराठीत बोलत होते. चार दोन वाक्य मराठीत लिहून हवी असली तर बरेच मायबोलिकर देतील Happy

प्रसिद्ध किंवा उदयोन्मुख लेखक , कवी , पत्रकार यापैकी कोणीच नव्हते फिली मधे. ( खरे वगळता ). शिकागोला असे होऊ नये अशी इच्छा आहे.

फिलीच्या आयोजकांशी सुद्धा बोलून पहा - त्यांनाच जर परत असं काही करायची संधी मिळाली तर ते काय गोष्टी बदलतील / नव्या करतील इत्यादी. आमच्या लक्षात आलेल्या गोष्टींव्यतिरिक्त बरीच माहिती त्यांच्याकडनं मिळेल.

राजकारणी नकोत हे मलाही पटलं.
निदान या व्यापक व्यासपीठाचा आपल्या पक्षाच्या टिमकीसाठी तरी वापर करू नये.

<<चहा कॉफी साठी साडे तीन पेक्षा जास्त स्टेशन हवीत. तिथे पिंप संपली की लगेच दुसरं लागलं पाहिजे.
जेवणा करता किंवा ब्रेफा करता बॉक्स्ड लंच / ब्रेफा ठेवायला काय हरकत आहे. वेळ / गर्दी / गोंधळ किती वाचेल.>>

हॉल घेतला तर तिथलेच युनियनचे सभासद असलेले लोक वापरले पाहिजेत असा नियम होता, म्हणून हॉल स्वस्त मिळाला. नि एकदा युनियनच्या हातात गेले की ते जे काय करतील ते मुकाSट सहन करायचे. पहिल्या दिवशी अळूवड्या नि सुरळीच्या वड्या कमी पडतील, म्हणून मोठ्या मुश्किलीने आपलेच लोक ठेवायची परवानगी मिळाली.

मी दीड व॑र्षे युनियन वाल्या लोकांबरोबर काम केले. 'आम्हाला करता येत नाही, पण तुम्हाला करू देणार नाही' अशी वृत्ति. अश्या वेळी त्यांना काही लाच द्यावी नि गप्प बसवावे असे वाटते. पहिल्या एक दोन महिन्यांनंतर मी त्यांच्या स्ट्यूवर्डला कंपनीच्या खर्चाने जेवायला नेत असे अधून मधून. मग ते म्हणतील त्या कागदावर सही करून त्यांना स्वस्थ बसवले नि कामे केली.

राजकारणी नकोत. नि महाराष्ट्र सरकार किंवा भारत सरकार यांच्याकडून एका पैची पण मदत नको. नाहीतर ते लोक मुसलमान लोकांना सरकारी खर्चाने इथे पाठवतील, नि त्यांचा इथला खर्च आपल्याला करावा लागेल. शिवाय पन्नास टक्के जागा आरक्षणल्यांना द्याव्या लागतील, नि ते हिंदू असल्याने सरकार ऐवजी आपण त्यांची सोय करावी अशी अट घालतील. ते आर्थिक दृष्ट्या परवडणार नाही. स्वखर्चाने आले तर फार आनंद होईल, वैयक्तिक रीत्या भरपूर मदत करू.

शिकॅगो ला ३५०० संख्येची मर्यादा घालण्याचा विचार आहे असे काही लोक बोलत होते. मला ती कल्पना आवडली. जर त्यांच्याकडून लेखी लिहून घेता आले की तक्रार करणार नाही, तर बरे होईल. त्यामुळे तो कार्यक्रम १०० टक्के यशस्वी होईल. या सूचनेचा गंभीरपणे विचार करावा.

आशा भोसले यांचा कार्यक्रम फार महाग असल्याने महाराष्ट्रात फार कुणि ठेवू शकत नाही. आपण ठेवू शकतो, नि ठेवतो, असे तेथील वर्तमानपत्रात लिहून आले तर आपली वट वाढते. नि आपण किती श्रीमंत हे जगाला कळते. म्हणून तर राजकारणी लोक येऊ इच्छितात, जिथे पैसा तिथे राजकारणी. नाहीतर क्रिकेटचा नि शरद पवारांचा काय संबंध?

Happy Light 1

म्हणजे त्याबद्दल पण मतदान होतं म्हणायचं! >> हो मृ. एक समिती असते ती हे ठरवते, त्यात साधारण १०-१२ लोक असतात, मग ते लोकं मोठ्या समिती समोर ठेवतात, त्यांचे भाडे ( फिस), माणसं व इतर खर्च हे सर्व तपासून निर्णय केला जातो.

उपस्थित असलेल्यात ५५ वर्षांवरील लोकांचे प्रमाण फार जास्त होते, व त्या लोकांना हेच जास्त आवडेल असा त्यांचा समज होता. व्यक्तिशः माझे मत तसे नाही, पण मला समजले ते असे. >>> झक्की हे खरे आहे. ही मोठी माणसं फार विरोध नको तिथे करतात. दोन महिन्यांपुर्वी संदिप- सलिलचा कार्यक्रम ठेवायचा होता तर आमच्याकडच्या जुन्या माणसांनी खूप घोळ घातला. एक तर ते कमिटीत नसतात वर परत जुने म्हणून त्यांचे ऐकायचे व त्यांना सहसा भारतात नविन काय चालू आहे ह्याचा अंदाज नसतो. मग आम्हाला खास करुन मला व रेवतीला ह्या सर्वांना पटवून सांगावे लागले व कार्यक्रम हाउसफुल्ल गेल्यावर ही मोठी माणसं मग नंतरच्या पार्टीला मात्र ह्या माणसांनी आम्हा दोघांना, ' हे हे हे बरं केलतं तुम्ही हा नविन कार्यक्रम आणून' परत आणा आम्ही येऊ असेही सांगीतले. नंतर राहुल देशपांडे बद्दल बोललो तर म्हणे की तो तर पोरगाच आहे, लोक येतील का? घ्या आता. काय आणनार मग?

शिकागोचे अधिवेशन ज्या ठिकाणी होणार आहे ती जागा 'य' लोकांना सामावून घेता येईल अशी घेतली आहे. डाउनटाऊन मध्येच. तिथेही युनीयन आहे. त्यावर काय तोडगा काढता येईल त्यावर पुढे विचार केला जाईल. (म्हणजे उशीर बिशीर झाला तर)

(बाय द वे झक्की त्याच दिवशी मुसलमांनाचे पण अधिवेशन शिकागोत आहे. त्यांचा अधिवेशनामुळे आमची एक चांगली जागा गेली. तिथे अजुन हॉल आहेत, पण लोकांनी मग ते इकड अन हे तिकड होतील म्हणून ते सभागृह फेटाळून लावले. Proud )

पत्रकार यापैकी कोणीच नव्हते फिली मधे >>> होते गं. त्यातल्या एका पत्रकाराशी माझा आधीपासून संपर्क होता. झुलेलाल ह्यांचे ते मित्र होते. पण सगळ्याच पेपरवाल्यांचे लोक नसणार, ते परवडायला पण पाहिजे त्यांना.

यावेळच्या रजिस्ट्रेशनमधे (म्हणजे मी केलं तेंव्हा तरी) एक खूप मोठी उणीव होती. क्रेडिटकार्डने ऑनलाईन रजिस्ट्रेशन होते पण Secure website (SSL) केलेली नव्हती. त्यामुळे कुठल्याही Hacker ला एका जागी इतकी सगळी credit cards मिळणे सोपे झाले होते. देव करो आणि तसे झालेले नसावे. अधिवेशनाचा अर्थसंकल्प पाहता इतकी साधी गोष्ट का केली नसावी असा प्रश्न पडतो. अधिवेशनाला आलेल्या व्यक्तिंचा डाटाबेस प्रायवेट ठेवला जाणार आहे का विकला जाणार आहे याबाबतचे धोरण माहिती नाही.

मुख्य म्हणजे माझी क्रेडिट कार्डाची माहिती मी भरली अन ते पान एकदम freeze झाले!
त्यात माझ्या संगणकाचा काही दोष नसावा, कारण इतर सर्व नीट चालले होते. त्यामुळे मला हे पण कळले नाही की त्यांना पैसे मिळाले की नाही.
नि ती क्रेडिट कार्डाची माहिती जगभर गेली तर झालेच. नशीबाने अजून तरी तसे काही झालेले नाहीये.

मला सगळ्यात गंमत वाटली की ती याची की ३१ डिसेंबरला रात्री बरोब्बर १२ वाजता रजिस्ट्रेशन सुरु होईल म्हणाले नि ते भारतीय वेळेप्रमाने रात्री १२ ला सुरु केले. म्हणजे आपल्याकडचे आदल्या दिवशीचे दुपारचे १:३० वाजले होते. म्हणूनच ते क्रेडिट कार्डचे पान freeze झाले! माहित होते, ३१ डिसेंबरला रात्री बारा ला सुरु होईल तर तुम्ही आधी केलेच का? म्हणजे चूक आमची.

शिवाय समजत कसे नाही ते काम आम्ही भारतात outsource केले होते. तिथे six sigma, CMM level 5 असे दिगंत किर्तीचे लोक आहेत. त्यांना अद्ययावत SDLC माहित असतात. ते नसले तर अमेरिकेचे सर्व व्यवहार ठप्प होतील, असे बरेच काही काही मी ऐकले होते. फक्त या मूर्ख अमेरिकन लोकांना सुद्धा जे कळते की वेळ म्हंटल्यावर EST का PST हे विचारायचे असते, ते या CMM 5 वाल्यांना कळत नाही!!

Happy Light 1

केदार,
एक आवर्जून सांगतो. सध्या इथे कितीहि टीका झालेली असली तरी पुढच्या संमेलनाला पुनः तितक्याच उत्साहाने लोक येतील याची खात्री बाळगा.

'हे आमचे शेवटचे संमेलन, पुनः कध्धी येणार नाही' म्हणणारे अनेक लोक दर संमेलनाला परत भेटतात.

या संमेलनांत मिळणार्‍याला आनंदापेक्षा जास्त आनंद फार क्वचितच, इतर कुठे मिळतो. माझ्या दृष्टीने, टी़का केवळ गंमत म्हणून करायची. कुठलीहि गैरसोय फार अल्प काळ लक्षात रहाते. पण आनंदमय आठवणी मात्र चिरकाळ लक्षात रहातात, असे बहुतेक सर्व लोकांचे म्हणणे आहे.

Happy Light 1

एकाच प्रकारचे कार्यक्रम.. म्हणजे यावर्षी झाला तसा कथ्थकातिरेक (हा नवीन शब्द).. होऊ नये.
वैविध्य असणे महत्वाचे आहे.

'युनियनची माणसं' हे एक वेगळंच दुखणं आहे. ते स्वतः काम करत नाहीत आणि दुसर्‍याला करू देत नाहीत. त्याना लागणारा अतिरिक्त वेळ हिशेबात असावा. म्हणजे, माणसं रांगेत उभी, वाढणारे स्वयंसेवक उभे, जेवण स्वयंपाक घरात तयार, पण युनियनवाले आणतील तेव्हा मिळणार.

किशोर पाठारे हे कोणत्याही कार्यक्रमाच्या नेपथ्यावर रामबाण उपाय असले, तरी त्याना मदत करायला एक स्वयंसेवकांची फौज ठेवणे अति गरजेचे आहे. ते बिच्चारे सकाळ पासून रात्रीपर्यंत सगळीकडे One Man Army सारखे लढत होते (निदान मी बघितले तेव्हा तरी).

Highschool, College च्या मुलांचा स्वयंसेवक, किंवा पगारी ताफा असण्याची कल्पना आवडली. एकतर इथली बहुतेक मराठी मुलं मराठी कार्यक्रम (नाच गाणे सोडले तर) बघत नाहीत. त्यामुळे ते हे काम नीट करू शकतील....

५५ च्या वरच्या लोकांना वेळ पण असतो आणि पैसे पण त्यामुळे त्यांची गर्दी असतेच. त्याना काही विशेष सुविधा (वेगळ्या रांगा, बसण्याची सोय) इत्यादी द्यावंच...

कथ्थकातिरेक Happy

मी फक्त 'मैतर'मधला शर्वरी जमेनीसचा आणि अर्चना जोगळेकरने बसवलेला 'विश्वनायिका' असे दोनच कथ्थक performances पाहिले आणि दोन्ही प्रचंड आवडले.

यूनियनच्या दुखण्याबद्दल विनयला अनुमोदन.

-----------------------------------------------
I was born a Hindu. Soon I converted to Narcissism! Happy

<<५५ च्या वरच्या लोकांना वेळ पण असतो आणि पैसे पण त्यामुळे त्यांची गर्दी असतेच. त्याना काही विशेष सुविधा (वेगळ्या रांगा, बसण्याची सोय) इत्यादी द्यावंच...>>
अहो पण बहुसंख्या त्यांचीच असते, म्हणजे भारतातल्या आरक्षणासारखे. सगळेच मायनॉरिटी, मग राखीव जागा कुणाला?

Happy Light 1

कलाकारांची आर्थिक सुस्थिती असल्याशिवाय लोकांना बोलवू नका नाहीतर तुम्हालाच आयत्यावेळेला व्हिसाअभावी कार्यक्रम रद्द करावे लागतील. (संदर्भ: विठ्ठल उमपांच्या ताफ्याला व्हिसा नाकारण्याचे कारण त्यांची आर्थिक परिस्थिती)

माफ करा माझा BMM शी काही संबंध नाही, यायची शक्यताही कमीच (मी भारतातच रहाते, मी व्यावसायिक अभिनेत्री नाही आणि सत्कार केला जावा असं माझं कर्तुत्वही असणार नाहीये..) पण एवढ्या मोठ्या आणि महान कलाकाराला असं अपमानित व्हावं लागलं याचं फार वाईट वाटलंय. व्हिसा ऑफिसमधले बिन्डोक अमेरीकन हे त्याचं कारण असलं तरी अनुषंगाने का होईना इथे व्यक्त करावसं वाटलं.

----------------------
हलके घ्या, जड घ्या
दिवे घ्या, अंधार घ्या
घ्या, घेऊ नका
तुमचा प्रश्न आहे!

हो, प्रभुण्यांचे पण तेच झाले. त्यांना अपुर्‍या आर्थिक पाठबळामुळे व्हिसा नाकारण्यात आला.

जेवणाच्या वेळी पॉप्युलर पदार्थ लवकर संपून जात होते. आवडता कार्यक्रम मध्येच सोडून उठवत नसल्याने लांबलचक रांगात उभे राहून जेवणगृहात पोहोचेपर्यंत बरेचसे (चांगले) पदार्थ संपलेले असायचे. माझ्या मैत्रिणीच्या आईवडिलांना पहिल्या दिवशी ब्रेकफस्टला सा. खिचडीच मिळाली नाही. त्यांचा उपास होता त्यामुळे सिरिअल इ. त्यांना खाता आले नाही. आणि फार पण उशीरा नव्हते गेले. ८:४० ला ते त्या हॉलमध्ये होते. ९ पर्यंत ब्रेकफस्ट अव्हेलेबल आहे असं म्हंटल्यावर तुम्ही तो खरच अव्हेलेबल ठेवायला हवा.

बाकी मला खटकेलेले मुद्दे लोकांनी मांडलेच आहेत. वेटेज काऊंट करत असाल तर Happy
१. छोटे वेळापत्रक (इनसर्ट सारखे) हवे
२. बदललेले वेळापत्रक भरपूर प्रमाणात सगळीकडे ठेवावे आणि लोकांना सांगावे की ते उपलब्ध आहे.
३. साऊंड सिस्टीम आधीच ट्राय करावी.
४. भारतातून आणलेले कार्यक्रम आधी (निवड करण्यापूर्वी) कुणीतरी संपूर्ण पाहीलेले असावे.
५. त्या मसाला चहाच्या पिंपाची संख्या पाचपटीने वाढवावी. Happy

अश्विनी तुझ्या मसाला चहाच्या मुद्द्याला २००% अनुमोदन. चहा हा सतत दिवसभर उपलब्ध असायला हवा. Happy
वाचतोयस ना केदार.

पदार्थ संपतात याचे कारण लोक आधाशासारखे खूप खूप घेतात नि टाकून देतात. ही अमेरिकन लोकांची सवय आपल्या लोकांना पण लागली आहे.
मी एक गंमत केली. शेवटच्या दिवशी एका मानसाच्या प्लेटमधे कांदेपोहे इ. संपले होते नि चार लिंबाच्या फोडी जश्याच्या तश्याच. मी मुद्दाम पदार्थ जिथे मिळत होते, तिथे तोंड करून जोरात ओरडलो, 'अहो, लिंबे कमी पडतील, लोक चार चार फोडी खुशाल जास्तीच्या घेऊन फेकून देताहेत.' त्या माणसाने चटकन त्या फोडी रुमालाने झाकल्या!! Happy Light 1

केदार, पुढच्या अधिवेशनाला झक्कींना जेवणाच्या जागी उभं करा म्हणजे अन्न फुकट जाणार नाही आणि सगळ्यांना मिळेल. अर्थात ते मदत करायला तयार असतील तर. किंवा त्यांना ट्रेनींग द्यायला सांग त्या कमिटीला. त्यांना ट्रेनींग द्यायचापण अनुभव आहे. Happy

बिच्चार्‍या आशा भोसले. आपल्यावरील प्रेमाने या वयातदेखील येतात नि दोन दोन कार्यक्रम देतात. २०१३ चे संमेलन बहुधा बागराज्यात होईल. तेंव्हा त्या 'बुगडी माझी सांडली' या गाण्याबरोबर नाचहि करून दाखवतील म्हणे. या वेळी 'गोमू संगतीने' गाण्यासाठी सुदेश बरोबर नाचल्याच की नाही?

"माफ करा माझा BMM शी काही संबंध नाही, यायची शक्यताही कमीच "
आमचे दुर्भाग्य.
"सत्कार केला जावा असं माझं कर्तुत्वही असणार नाहीये.. "
एक विवाद्य मुद्दा. २०११ च्या संमेलनाला यायची तयारी ठेवा. बोलावणे येईल.
Happy Light 1

सूरवाट करयची तर Registration desk पासून, July 2nd. शैला कर्णीक registration desk वरच्य महीला आमच्यावर उध्ध्ट्पणे तर बोलल्याच तर एका वयस्कर माण्सावर देखिल ओरडल्या, त्या फ्क्त ओरडत सुटल्या होत्या. हा फक्त मझाच अनुभव नहि तर मझ्या काहि मित्रांचे अनुभव देखिल आहेत.
Registration desk वर उत्साहि, हसरे आणि मदत करण्याची व्रुति असलेले लोक असावीत.

Program Schedule – BMM च्या newspaper चा रुपान्तर छान आहे पण तिथे आखलेला schedule आम्हि सगळि कडे घेउन फिरत नहि, शीवाय program चा schedule थीक थीकाणी लावला देखिल नव्ता, program schedule registration desk वर लावल होता पण घेउन जय्ला नव्ता. Atleast programs काय आहेत ते तरि कळले पहिजेत.
Volunteers – लोकांच्या आधि जेवले, त्यन्च्या कडे कसल्याहि प्रशनांचं उत्तर नव्हत, सगल्या प्रशनांचं एकच उत्तर, Kiran Joglekaranna वीचारा, आणि Kiran Joglekar कुठे आहेत हे महित नाहि.
The EC was over burden with work need more people to manage the event. Eka program च्या मागे atleast 2 main आणि 2 volunteers तर हवेतच.
2 workshops ला जयचा प्रयत्न केला, लावणी workshop आणि दुसरा म्हण्जेhow to wear a sari, दोनिहि workshop ला teacher आलेच नाहि, program cancel झल्यच registration desk वर सुद्ध महित नव्ह्त. How to wear a sari chya workshop ला आलेलि volunteer क्रान्ति मला भूक लगली म्हनूण गेलि .
Help Desk आणि Lost and Found desk – जरूर थेवा.

Asha Bohsale – त्यन्च्या programmla उभे अस्तना volunteersni सन्गितलेय की snr citizen ना बाहेर सोडा दुसर्या रन्गेत उभ राहयला सन्गितलेय आणि दुसर्या volunteerni अडवले आणि सन्गितले "हे काय करत आहात, volunteers मधेच एक मेकांशी नीट communication नव्ता.
Food - जेवन उत्तम होते, चव चांगली होति, सोय चांगली केलि होति. पण जेवण संपेल म्हनुण कहि programs चुकले. Food area मद्धे झलेल्या announcements अजिबात ऐकु नाहि आल्या
Sound sytem चा trial करुन घ्यावे, set up चा वेळ लक्शत घेहुन program आखा.
मला आवड्ले ते Philadelphia नी त्यंन्ना आलेल्या problem पासुन शिकुन पुड्चे पाउल उचलले. They were reactive not proactive जे आवडले अस्ते, असो, तरिहि अम्हि नेक्ष्त BMM ला नक्कीच येऊ.

अधिवेशनाला झक्कींना जेवणाच्या जागी उभं करा<<<<जागी नको. जेवणाच्या शेजारी चालतील.... पण तसं केलं तर ते लोकांना मिरच्या वाढतात आणि खायचा आग्रह करतात..... Sad

कुठला Program काय आहे हे मात्र कळलंच पाहीजे. Internet वर 'उभ्या उभ्या विनोद' आणि कार्यक्रम पत्रिकेत 'Standup Comedy'. हे पण काही लोकाना कळलं नाही. थोडं लॉजिक वापरलं तर कळेल म्हणा. पण 'Music Program' असं म्हटलं तर 'स्वरगंध', 'स्वारालाप', 'पालवी', की अजून काय कळत नव्हतं. मी ८:५० पर्यंत Standup Comedy म्हणजेच 'उभ्या उभ्या विनोद' असं सांगत बाहेर उभा होतो..

विनय

रूनी: मला भरत जाधवचे सही रे सही नाटक पुढच्या बी एम एम ला बघायला आवडेल <<<<<<

हे नाटक इथे अमेरिकेत चालेल की नाही याबद्द्ल मला शंका आहे (खरं तर खात्री आहे की चालणार नाही). भरत जाधव त्याला येणारे तीन चार Characters परत परत करतो, आणि भारतात प्रेक्षक नक्की का हसतात हे शेवटपर्यंत कळत नाही. मी एका प्रयोगाला गेलो होतो, तेव्हा प्रेक्षक पुढे विनोद होणार म्हणून आधीच हसायचे..

अजून एक अत्यंत महत्वाची गोष्ट. खरं तर हे स्थानीक मंडळापेक्षा बृहन्महाराष्ट्र मंडळाने सुधारण्याची गरज आहे.

BMM दर अधिवेशनाला विविध क्षेत्रात उत्तम कामगिरी केलेल्या व्यक्तिंना/संस्थेला पुरस्कार देउन त्यांचा गौरव करतात. गेल्या अधिवेशनात मायबोलीला हा पुरस्कार मिळाला होता. हा सोहळा प्रमुख पाहुण्यांचा हस्ते मुख्य सभागृहात झाला होता.
यंदा हे पुरस्कार अधिवेशनाच्या आदल्या दिवशी अक्षरश्: उरकण्यात आले. स्मरणिकेमध्ये देखील या मान्यवरांचा काहीही उल्लेख नाही.

विनय,
पूर्ण अनुमोदन. सही रे सही जाम बोर वाटलं मला तरी.
भारतातून मोठी कलाकार मंडळी आणण्यापेक्षा स्थानिक गुणी कलाकारांना व्यासपीठ मिळवून देण्याच काम आता BMM ने करावं. २५ वर्षांपूर्वी जेव्हा बृ. म. म. अधिवेशन सुरू झालं तेव्हा परिस्थिती वेगळी होती. भारतातून जास्त कलाकार यायचे नाहीत. मराठी कार्यक्रम फारसे बघायला मिळत नसत. त्यामुळे लोकप्रिय नाटकं, बाकी कार्यक्रम, कलाकार आणले जायचे. आता इतके कलाकार, नाटकं, चित्रपट इथे येतात. लोक भारतात जाऊन बरेच कार्यक्रम बघतात. त्यामुळे भारतातल्या कार्यक्रमांच फारसं अप्रूप राहीलं नाहीये. इथल्या लोकांनाही संधी द्यावी.

आज खूप दिवसानी ह्या सूचना वाचल्या. जरा घाबरले आहे कारण पुढच अधिवेशन आमच्याकडे आहे.

समीर, तुझ्या सूचनेला अनुमोदन. खर तर बीएमएम पुरस्कार हे आपल्या उत्तर अमेरिकेतल्या गुणिजनांच कौतुक आहे पण अगदी उरकल्या सारख करतात. बीएमएम च्या कार्यकारिणीने ठाम राहून हा कार्यक्रम सोहळयासारखा पार पाडायला पहिजे.
२००७ मधे पुरस्कार वितरणाच्या १० मि. आगोदर हा कार्यक्रम रद्द कराअसा दबाव टाकला जात होता. छोट्याशा खोलित करा, दुपारि लंच टाईम ला करा वगैरे वगैरे.

मी त्यावेळी बीएमएम ची सेक्रेटरी होते आणी आयोजकांना समजावून (?) देउन हा कार्यक्रम मुख्य रंगमंचावर पार पाड्ला. असो त्यातून किती मनस्ताप झाला हे लिहीत नाही. Outcome was in the best interest of the community. २०११ मधे हे निश्चितच होणार नाही.

कल्पू

कल्पना, ह्या सर्वांची एक छोटी यादी मी आपल्या मिटींगमध्ये वाचणार आहे. Happy

केदार,

यातल्या काही सूचना खरोखर चांगल्या आहेत आणि त्यांची अमंलबजावणी करण सुद्धा सोपं आहे. उदा. पुरस्कार मिळालेल्या व्यक्ती आणि त्यांच्या कामाची माहिती स्मरणिकेत द्यावि. या सूचनांची यादी सुद्धा करता आली तर बघ. मी मदत करीन.
कल्पू

माझ्या वहिनी डॉ. विजया बापट यांना कसलेतरी बक्षीस मिळणार होते. त्या २ ता. पासून अधिवेशनाला येऊन विचार्त होत्या की तो क्र्यक्रम केंव्हा नि कुठे होईल. पण कुणालाच माहित नव्हते. शेवटी ४ ता. ला संध्याकळी त्यांना सांगण्यात आले की कार्यक्रम होऊन गेला. त्यांनी विचारले माझे बक्षीस कुणि घेतले तर त्यांना काही ती माहिती मिळू शकली नाही. शेवटी कुणितरी ते घेतले आहे एव्हढेच त्यांना कळले. मला साईनफेल्डमधे क्रेमर ला चुकून टोनि मिळते, त्याची आठवण झाली.

दॉ. विजया बापट यांनी सम्न्वय मधे एक गोष्ट लिहीली आहे. वाचली नि काही शेरे असल्यास मला ऐकवा, मी त्यांना सांगीन.

Happy Light 1

सगळ्या सूचना / तक्रारी वाचल्या.
आमच्या कमिटींकडे पाठवीन आणि पुढच्या अधिवेशनासाठी केदारलाही उपयोगाच्या आहेतच.

>> संपूर्ण बी एम एम मध्ये स्वयंसेवकांची संख्या आवश्यकतेपेक्षा कमी वाटली.
रुनी -- एका वाक्यात तू बर्‍याच उणींवाचे कारण सांगितले आहेस Happy

Pages