बॄ. म्. म. मध्ये सुधारता येण्याजोग्या गोष्टी/सूचना..

Submitted by परदेसाई on 8 July, 2009 - 11:43

फिलाडेल्फियाचे अधिवेशन तर खूप छान झाले. ५००० लोकांना एकत्र करून कोणताही कार्यक्रम करायचा म्हणजे सोप्पे नाही. तेव्हा त्यांचे कौतुक. पण काही गोष्टी ज्या खटकल्या, किंवा कमी वाटल्या त्याबद्दल इथे लिहीलंत तर कदाचित पुढच्या (शिकागो) अधिवेशनात त्या कदाचित सुधारता येतील. टीका करण्यापेक्षा मदत म्हणून हा बातमी फलक वापरावा...

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्वयंसेवकाना आपण काय करतोय आणि ते कसे करायचे याची माहीती हवीच...

प्रसंगः २ तारखेच्या रात्रीच्या आशा भोसलेंचा कार्यक्रम. Registration च्या रांगेत तासभर उभे राहिल्यानंतर 'तिकीटे सापडत नाहीत'. असं होतं कधी कधी. पण त्याठिकाणी असलेले गॄहस्थ 'तुम्ही Ballroom मध्ये जा... तिकडे तिकिटे मिळतील म्हणुन लोकाना पाठवतात. तिकडे गेल्यावर कळतं की 'तिकीट असल्याशिवाय Ballroom ला प्रवेश नाही'. मग परत रांगेत वाट बघा. मग ते गॄहस्थ कबूल करतात 'मला काही माहीत नाही'. मग जोगळेकरांच्या मागे लागा. या असल्या प्रकाराने लोक वैतागतात. मी स्वत: ३ तारखेला तिकडे गेलो तेव्हा रांगही नव्हती. मी काऊंटरला गेलो तेव्हा Registration Number दिला तरी तिकीटं मिळेनात. मग पुन्हा नंबर चेक करा. तो बरोबरच होता. मग दुसर्‍या बाई. त्यानी तिथे समोरच असलेली उचलून मला दिली. पण ते गॄहस्थ काही हलले नाहीत.

१. स्वयंसेवक उत्साही असावेत. काही लोक स्वतः म्हणून काही करू इच्छीत नाहीत. त्याना Front Desk चे काम देऊ नये.
२. Resgistration च्या वेळी एकाच व्यक्तीकडे सगळी माहीती व मदार असू नये.
३. असलेल्याना वेळोवेळी नीट माहीती द्यावी.....
४. Resigration आणि Printing online करता आले तर हे सगळे कष्टच वाचतील...

कार्यक्रमाच्या वेळात तयारीचा ही वेळ लक्षात घ्यायला हवा...

उभ्या उभ्या.. सारख्या एक Microphone कार्यक्रमालाही तयारीला २० मिनीटे लागली. त्यामागून त्याच ठिकाणी असलेल्या गाण्याच्या कार्यक्रमाला १५/२० मिनीटे लागणार होती. पण एक कार्यक्रम १०:३० ला संपला तर दुसरा त्याच वेळी सुरू. मग त्याना उशीर होणारच.

'मी आशा' च्या Setup ला २ तास लागतात म्हणे. पण जाहीरातीत 'लय आणि...' तो ८ वाजता संपणार आणि 'मी आशा' साडेआठला सुरू. म्हणजे संयोजकानी २ तास विचारात घेतले नाहीत की 'मी आशा' वाल्यांनी सांगितले नाहीत. बरं ८:१५ ला हे लक्षात आलं आणि Hall रिकामा करण्यात आला तर लोकाना सांगायचं की कार्यक्रम १०:३० शिवाय सुरू होत नाही. त्याना दोन तास रांगेत उभं करून ठेवण्यात काय साधलं गेलं? ९:००, ९:३०, १०:०० अश्या वेळा सांगून फसवणूक कश्यासाठी?

काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात.
१. कुठलाही कार्यक्रम लांबण्याची शक्यता असते.
२. भारतातून आलेले कलाकार वेळेच्या बाबतीत ढिले असतात (काही अपवाद सोडता...)
३. लहानश्या कार्यक्रमाला देखील Setup साठी वेळ लागतो. मोठ्या कार्यक्रमाला तर भरपूर वेळ लागतो.
४. Setup ला लागणारा वेळ हा आवश्यक असतो आणि तो द्यावा, संयोजकाना तो माहीती असावा आणि हिशेबात धरला जावा..
५. कार्यक्रम लांबला तर PM (Program Manager) ला 'पुढे काय आहे आणि काय करायचे' ते माहीत असायलाच हवे...
६. प्रेक्षकापेकक्षा कलाकार मोठा नाही हे लक्षात ठेऊन निर्णय घ्यावेत.

जिथे कार्यक्रम आहे तिथे अकुस्टीक कितपत चांगलं करता येईल याचा आधीच अंदाज असावा. आशा भोसलेंच्या सारख्या कार्यक्रमाकरता कंव्हेंशन सेंटरचा कॅव्हर्नस हॉल अगदीच चुकीचा. बॉल रूम मधे जरा तरी बरा आवाज होता. यापेक्षा जवळपास उघड्यावर असलेल्या मान म्युझिक सेंटर मधे बरे असते अकूस्टीक!

गंमत म्हणजे G सेक्शन नि इतरहि एक दोन सेक्शनच नव्हते!! आमचा नं २००३ म्हणजे रजिस्ट्रेशन करणार्‍यात तिसरा नं आमचा, वाटले चांगल्या जागा मिळतील, पण शेवटी कुठेतरी कोपर्‍यात, जिथून सर्व स्टेजसुद्धा धड दिसत नव्हते! नंतर जखमेवर मीठ चोलाण्यासाठी त्यांनी त्याच कोपर्‍यातल्या जागांवर G सेक्शनचा कागद लावला नि म्हणाले, पहा आहे की नाही तुमचा सेक्शन इथे!!

तर हे टीका म्हणून नाही, पण पुढल्या वेळी लक्षात ठेवायला. पण तक्रार करायची काहीच गरज नाही, तसे जिथे जागा रिकामी असेल तिथली खुर्ची पकडावी नि बसावे. मी असाच नाटकाला (अवघा रंग..) स्टेजपासून दहा रांगा मागे (म्हणजे देणगीदारांच्या नि तहाहयात सभासदांच्या हि पुढे. नि आशा भोसले यांच्या कार्यक्रमाला समोरून तिसर्‍या रांगेत!! )

म्हणून माझी काही तक्रार नाही.

एव्हढ्या मोठ्या प्रमाणात बसायची सोय करणे म्हणजे, मला तरी अजिबात माहित नाही कसे ते. तेंव्हा थोडा गोंधळ होणारच. अशा वेळी, आपले महाराष्ट्रीयन तत्वप्रेम बाजूला ठेवून, संधिसाधू लोकांप्रमाणे स्वतःचा फायदा बघावा, मग पुनः महाराष्ट्रीय बनून शहाजोगपणे इतरांना शहाणपणा शिकवावा, स्वतःला अक्कल असो वा नसो.
Happy Light 1

वा वा. पुढच्या कन्वेंशनच्या मिटींगमध्ये मी येथील प्रिंटाउट नेणार आहे. Happy ह्या सर्व गोष्टींचा विचार व्हायलाच हवा.

Resgistration सगळी माहीती व मदार >> अगदी बरोबर. अगदी हाच विषय मी इन्ट्रो मिटींग्स मध्ये मांडला होता. प्रिटींगची सुचना आम्ही इकडे अमंलात आणली होती. (एबीके साठी, तिकीट स्कॅन केले होते) तिकीटे आणि जमले तर सिट नंबर (सिटींग नकाश्यासहीत) ठेवायची अशी माझी कल्पना आहे. पण ऑडीटोरियम सारख्या खुर्च्या फिक्स नसल्यामुळे ह्यावर विचार चालू आहे.

आजवर एकही बृ म मं च्या अधिवेशनात गेले नाही. त्यामुळे काय अपेक्षा आहेत तेवढंच सांगता येईल. त्यातल्या बर्‍याच गोष्टी होतही असतील.
*नक्षत्रांचे देणे सारखा नव्या जुन्या गीतांचा कार्यक्रम,
*चांगली तीन अंकी नाटकं (व्यावसायीक मंडंळींकडून. हौशी नको!) ह्यात जुन्या संगीत नाटकांपासून, नव्या चांगल्या नाटकांचा समावेश असावा.
*महाराष्ट्राच्या लोककलेवर आधारित असा एखादा कार्यक्रम असावा.
*जुन्या मराठी सिने आणि नाट्यकलाकारांच्या मुलाखती असाव्यात. म्हणजे मी कलाकार म्हणून कसा घडलोखेरीज "आठवणींच्या राज्यात" असा देखिल.
*शक्यतोवर राजकारणी लोकांना टाळावं मुलाखतींसाठी.
*महाराष्ट्रात कार्यरत असलेल्या सेवाभावी संस्थांच्या कार्यकर्त्यांना आमंत्रित करून त्यांच्या कार्याबद्दल माहिती घ्यावी. हा कार्यक्रम चर्चात्मक ठेवता आला तर बघावं. अशा वेळी मदत करताना जास्त सोईचं जातं.

मी पण एकही अधिवेशन पाहिल नाही पण एक डिमांड करायल आवडेल.

श्री. अशोक हंडे यांचा मराठी लोकनृत्यावर अधारीत 'मराठी बाणा' अप्रतिम, भव्य दिव्य, बिग बजेट प्रोग्रॅम कधीच कसा बाहेर देशात होत नाही ?
पुढच्या अधिवेशना मधे 'मराठी बाणा' जरुर सादर व्हावा, 'अजिबात चुकवु नये', प्रत्येकानी किमान एकदा तरी पहावा असा मराठी बाणा सादर करायला बी एम एम पेक्षा जास्त योग्य प्लॅटफॉर्म कुठला असेल ?:)

मला भरत जाधवचे सही रे सही नाटक पुढच्या बी एम एम ला बघायला आवडेल. त्याचे प्रयोग अमेरीकेत झालेले नाहीत ना. Happy
तसच या वेळी झाले तसे आशा भोसलेंच्याच २ कार्यक्रमाऐवजी २ वेगवेगळ्या (प्रसिद्ध) कलाकारांचे कार्यक्रम बघायला आवडतील. जसे अरुण दाते, श्रीधर फडके, बेला-सावनी शेंडे, सारगमप चे ५ लीटल चँप्स. इ. इ.

अतिप्रसिध्द मंडळींच्या मागे लागण्यापेक्षा सर्वसाधारण प्रसिध्द लोक चालतील..

आशा भोसले, लता मंगेशकर किंवा तत्सम व्यक्तीला आणायचे म्हणजे सोपस्कार, नखरे, पैसे या सगळ्याच बाबतीत जड पडू शकतं. Z-level Security वगैरे भानगडी ह्याही असतात. एक चागलं उदाहरण. भीमरावांची गझल. शप्पथ सांगतो, यापूर्वी मी करंट्याने त्यांचे नावही ऐकलं नव्हतं. कुणीतरी म्हणालं म्हणून गेलो, आणि दोन तास त्यांच्या गाण्यात आणि अनेक (अ-प्रसिध्द) कवींच्या शब्दात गुंगून आलो.

DJ, मराठी बाणा एक उत्कॄष्ट कार्यक्रम आहे. पण त्यांचा ताफा आणायला एक स्पेशल विमान लागेल...

विनय म्हणुनच मी आशाताई नको लिहीलय, अतिप्रसिद्ध नकोत पण प्रसिद्ध व्यक्ती लागतीलच थोड्याफार, अधिवेशनाला गर्दी खेचायला त्याचा उपयोग होईल,

एकावेळी दोन अत्यंत चांगले कार्यक्रम लाऊन लोकाना हळहळ वाटायला लावणे...

'अवघा रंग...' आणि 'मैतर' यांच्याबाबतीत हेच झालं. खरंतर गर्दी कमी करण्यासाठी ही कल्पना चांगली आहे कारण प्रेक्षक विभागले जातात. पण यामुळे एक पाहिले की एक चुकते.
काही Popular कार्यकम Repeat ठेवले तर लोकांना दोन्ही बघता येतील. अर्थात कुठले कार्यक्रम Popular आहेत हे ठरवणे अति कठिण. 'अवघा रंग...' आणि 'मैतर' खरंतर माहीत होते, पण 'स्वरगंध' आणि 'उभ्या उभ्या...' माहीत नसताना HouseFull झाले. 'स्वरगंध' पहिल्यादिवशी असल्याने त्याचे अजून दोनदा प्रयोग करता आले, पण 'उभ्या उभ्या...' तिसर्‍या दिवशी असल्याने Repeat करता येणे शक्यच नव्हते. भारतातून येणार्‍या कार्यक्रमांची Popularity सर्वसाधारणपणे माहीत असते. Registration च्या form वर संभाव्य कार्यक्रमांचा Popularity Survey घेतला तर निराशा टाळता येईल नक्कीच..

एकच बाफ काढला? बरं. Happy
विनय आणि शोनूच्या मुद्द्याला अनुमोदन. त्या हॉलमध्ये आवाज घुमत होता. पुन्हा स्टेज कार्यक्रमापुरते तयार केलेले. जवळजवळ ५ फूट उंच. 'विंगेत जाणे' असा काही प्रकार नव्हता, स्टेजवरुन एक्झिट घेतली की लक्ष नाही दिले तर कडेलोटच! Proud दोन्ही बाजूला २-२ असे ४ जिने होते.

मृ, तुझे २ मुद्दे अजिबात पटले नाहीत. हौशी कलाकरांचे नाटक का नको? अर्थात दर्जा बघूनच कार्यक्रम सिलेक्ट करावेत. राजकारणी (म्हणजे राजकारणातले) लोक का नको मुलाखतीसाठी? उद्धव ठाकरे चांगले बोलले आणि मुलाखतही चांगली झाली.

बाकी अजून लिहीन.

केदार इथे २००३ - न्यू यॉर्क
आणि २००५ - अ‍ॅटलांटाचा वृत्तांत आहे बघ. अर्थात तू तेंव्हा गेला नसलास तर.

http://www.maayboli.com/hitguj/messages/644/50448.html?1059663727

http://www.maayboli.com/hitguj/messages/644/88030.html?1121257940

हौशी कलाकारांचे कार्यक्रम हा Hit or Miss असा प्रकार असू शकतो. जमला तर उत्तम आणि नाही जमला तर बट्ट्याबोळ. (हे व्यावसायिकांचेही होतेच - पळा पळा कोण.... किंवा दिवसा तू...)
कोणतेही नाटक निवडताना त्याचा जाहीर प्रयोग (तालिम नाही) बघितलेला असावा. त्यामुळे प्रयोगाची ताकद आणि प्रेक्षकांचा प्रतिसाद कळू शकतो...
आपल्यातले कितीतरी लोक पुढच्या दोन वर्षात भारतात जातील, तिथली नाटकं बघतील. त्यातल्या नाटकप्रेमी मंडळीना गोळा करून त्यांची मतं घेतली तरी २/४ चांगली नाटकं निवडता येतील. हे झालं तिकडच्या नाटकांसाठी. इथल्या लोकांचे नाटक असेल तर ते दिवाळी, गणपती अश्या वेळी असतं. काही प्रेक्षक, किंवा आपलीच माणसं त्यावर मत देऊ शकतील..

विनय,
हो मराठी बाणा '70 mm' इथे आणणे एक मोठ अफेअर असेल ..अत्यंत भव्य दिव्य, १५० गृप् डान्सर्स, नेपथ्य सगळच लागेल पण तरीही इतका उत्कृष्ट प्रोग्रॅम इथे आणायलाच हवा एकदा तरी.. मग भले मोठे स्टार्स, राजकिय नेते, अशा ताई असे लोक न का येइनात !

ज्यांनी मराठी बाणा पाहिल नाही त्यांच्या साठी ही छोटीशी झलक, अर्थात ट्रेलर पाहून त्याची भव्यता जाणवणार नाही , तरीही पहा झलकः ( नोट: व्हिडिओ उशीरा सुरु होता, १:२५ ला सुरु होतो:))
Must Watch : http://www.youtube.com/watch?v=Mi_L9_PJUQ0&NR=1

>> अर्थात दर्जा बघूनच कार्यक्रम सिलेक्ट करावेत.
प्रश्ण तोच आहे. कोणी आणि काय निकषावर दर्जा ठरवणायचा. बर्‍याच एकांकिका बघीतल्या हौशी कलाकारांच्या. हौशी मंडळींनी एकत्र येऊन कराव्या इतपतच ठीक वाटल्या. त्यांनी आपल्या रोजच्या कामातून वेळ काढून नाटक बसव्ल्याचं कौतुक वाटलं, पण असे प्रयोग अधिवेशनात उरकानी बघावेसे वाटणार नाहीत.

राजकारणातली मंडळी कायम आपला अजेंडा घेऊन व्यासपीठावर येतात असं मला वाटतं. हे अधिवेशन कुठल्याही राजकीय पक्षाचं नाही. शिवसेनेचा किंवा कॉंग्रेसचा नेता का? मग बाकीच्या पक्षांनी काय घोडं मारलं? असाही प्रश्ण उद्भवू शकतो. एकूणच 'नेता' मंडळींना बोलवण्यामागची भावना पटली नाही.

आशाताईंचा कार्यक्रम खूपदा पाहिला आहे आणि अप्रतीम होत असे त्यांचा कार्यक्रम. ह्यावेळी मात्र खूपच निराशा झाली. वयानुसार आवाजावरपण मर्यादा येऊ लागते. मला पहिल्यांदा झगमगवर नीट ऐकू येत नाही का असं वाटलं. त्या गात असलेली त्यांची गाणी यूट्युबवर तेंव्हाच लावून ऐकली. काय आवाज होता त्यांचा आणि तफावत जाणवली.

असं वाटून गेलं की वैशाली माडे भैसणे आली असती तर तिने मैफिल नक्कीच गाजवली असती. पैसेपण जास्त घेतले नसते. सिक्युरिटिचापण जास्त प्रॉब्लेम आला नसता. नव्या आवाजाला प्रेरणा आणि दाद मिळाली असती.

डीजे, 'मराठी बाणा' आमच्याच कार्यक्रमासारखं काहीतरी वाटतंय. Happy आम्ही १५० जण नव्हतो, ८० असू.

कार्यक्रम निवडण्यापूर्वी कमिटी व्हिडिओ पहाते ना? मृ, तू कशाशी तुलना करते आहेस मला कळत नाही आहे, पण हौशी लोकांनी केलेले कार्यक्रम उत्कृष्ट असू शकतात आणि व्यावसायिक कधीकधी पाट्या टाकतात. वर विनयने उदाहरण दिलेच आहे.

आता राजकारणी म्हणजे अजेंडा पाहिजेच की, नाहीतर काय उपयोग? Wink त्यात पक्षाचा काही संबंध आहे असे वाटत नाही, लोकांना ज्याला पहायला, ऐकायला आवडेल त्याला बोलावणार.

लालू, तुलना नाही केली गं कशाशीच. पण एकूणच संवाद विसरणं, अभिनयात जराही सहजता नसणं, काहीवेळा स्थानिक लेखकांनी लिहीलेलं पहीलं वहीलं नाटक असतं आणि अजीबातच दम नसतो असं बरंच काही. कमिटी व्हिडीओ बघते हे माहिती नव्हतं.

>>> लोकांना ज्याला पहायला, ऐकायला आवडेल त्याला बोलावणार.

म्हणजे त्याबद्दल पण मतदान होतं म्हणायचं!

विनय, शोनू आणि लालूला अनुमोदन.

मला आणखी एक महत्त्वाचा मुद्दा मांडायचा आहे. आलेल्या लोकांना informed ठेवणं हे फार महत्त्वाचं काम अगदीच मनावर घेतलं जात नाही असं दिसतं. कार्यक्रमांच्या वेळा/जागा बदलणं, उशीर होणं, यांनी त्रास होतो, पण मुख्य त्रास त्याबद्दल कोणाला विचारावं (किंबहुना विचारायला का लागावं?) हे न कळल्याने येणार्‍या anxietyचा असतो.

इथे updated वेळापत्रकं अगदी कमी छापलेली, ती फक्त मुख्य काऊंटवर ठेवलेली, त्यांची कॉपी मागितेली तर द्यायला खळखळ - असं का? कार्यक्रमाला उशीर म्हणजे नक्की किती उशीर होणार आहे? काय कारणाने होतो आहे? जेवणाचा नक्की काय गोंधळ झाला आहे? हे लोकांना आपण होवून (त्रासिक चेहरा न करता) सांगितलं तर त्यातला निदान चिडचीड फॅक्टर गाळता येईल असं वाटतं.

-----------------------------------------------
I was born a Hindu. Soon I converted to Narcissism! Happy

कन्व्हेंशन सेंटर्मधे झालं ना अधिवेशन? मग अश्या ठिकाणी तर इलेक्ट्रॉनिक बोर्ड असतात अपडेटेड माहीती द्यायला. त्याचा उपयोग नाही का करून घेतला?

मृ त्याचा वापर बर्‍याचदा वेगवेगळ्या जाहिरातीसाठी केला गेला Happy

त्या बोर्डांवर जुनीच माहिती दिसत होती. स्वयंसेवक काळे (का? का??) बिल्ले लावून (कुठेतरी) होते (म्हणे!) जे सापडले त्यांनाही माहिती देता आली नाही. हे मुख्यतः सीटिंग अरेंजमेंट आणि आशाच्या कार्यक्रमाच्या बाबतीत प्रकर्षाने झालं.
कोणीही काहीही (आर्टिस्ट्स यायचेत / हॉलमधे त्यांच्या सिक्युरिटीची व्यवस्था (म्हणजे काय?) होते आहे / स्टेज अरेंजमेंट होते आहे) उत्तरं देत (फेकत?) होते.
९ चा कार्यक्रम साडेदहा होवून गेल्यावर सुरू झाला. बरं, आशाच्या म्हणण्यानुसार ती सात वाजल्यापासून 'आत्ता बोलावतील.. मग बोलावतील' म्हणून वाट पहात बसली होती! कार्यक्रम सुरू झाला तोपर्यंतही साऊंड सिस्टीम योग्य प्रकारे टेस्ट केली गेली नव्हती. स्टेजवर फीडबॅक मिळत नव्हता. त्यामुळे वाद्यमेळ जमत नव्हता. हॉलच्या अकुस्टिक्सबद्दल शोनू बोलली आहेच.

-----------------------------------------------
I was born a Hindu. Soon I converted to Narcissism! Happy

इलेक्ट्रॉनिक बोर्ड होते. पण त्यावरचं वेळापत्रक इतकं जुनं होतं की न आलेल्या व्यक्तींची नावेही त्यात झळकत होती. Happy

११ वाजता एक अमेरिकन मराठी एकांकिका सुरू होणार होती. ११:१५ पर्यंत तयारीत वेळ गेला. मग कळलं की परिक्षक बारा पर्यंत पोचू शकणार नाहीत. याची रीतसर Anouncement झाली. प्रेक्षक उठून जाऊ लागले. तर तयारी करणार्‍या एक बाई बाहेर येऊन म्हणतात, 'अरे असं सांगायचं नाही लोकाना. मग ते गेले तर येणार नाहीत.'

परीस्थिती अशी निर्माण झाली की त्यात कलाकारांचा दोष नव्हता.
पण प्रेक्षकांचा वेळेचा विचार न करता त्याना तासभर लटकवून ठेवणं त्याना चाललं असतं?

मग ते नाटक बाराला सुरू झालं. बाहेर गेलेले बरेच लोक आले. (अर्थात एकांकिका सुरू झाल्यावर परत पळाले हेही खरं).

परिक्षकांचा काहीतरी घोळ झाला म्हणे.

लोकाना अंधारात ठेवणे हा आपला हक्क आहे हे थांबायलाच हवं. नीट सांगितलंत तर लोक ऐकतात.

अश्या बदलांची माहिती आपल्या सेलफोन्सवर पाठवण्याची सोय होऊ शकते का? बराच मनस्ताप कमी होईल.

वेबसाईटवर वेळापत्रक होते ते प्रिन्ट करायला किती त्रास! Happy

नाश्ता, जेवण चांगले होते.
(आवडलेल्या गोष्टीही लिहा हां.. )

अश्या बदलांची माहिती आपल्या सेलफोन्सवर पाठवण्याची सोय<< एवढे नसले तरी चालते, पण Electronic Board वर माहीती आली की झाले.... लोक Adjust करून घेतात. पण माहीती नाही म्हणुन ४ हजार माणसाना (त्यांची सीट देखील माहीत असताना) दोन तास रांगेत उभे करून ठेवणे हे बरोबर नाही... आपण कशासाठी उभे आहोत हेच माहीत नाही याचे वाईट वाटते...

(मी तिथेच खाली बसून गप्पा मारल्या पण तरीही..)

केदार, पुढल्यावेळी तुम्ही अश्या रांगेत उभ्या असलेल्या लोकांसाठी रिफ्रेशमेंट्स आणि चहापाण्याची सोय करा. Happy

Pages