Submitted by जागू-प्राजक्ता-... on 26 June, 2009 - 03:09
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
५-६ सुके बोंबिल तुकडे करुन
१ कांदा चिरुन
१ बटाटा
शेवग्याच्या शेंगा २ तुकडे करुन
अर्धी मुठ होईल इथक्या चिंचेचा कोळ
चवी पुरते मिठ
२ छोटे चमचे तांदळाचे पिठ
थोडे हिंग, हळद
२ चमचे मसाला
२ - ३ मोठे चमचे तेल
कोथिंबीर, १ हिरवी मिरची
क्रमवार पाककृती:
प्रथम टोपात तेल गरम करुन त्यात कांदा गुलाबी रंगावर तळावा. मग हिंग हळद, मसाला घालुन त्यावर बोंबिल, बटाटा, शेवग्यांच्या शेंगांचे तुकडे घालावेत. थोडे पाणी घालून शिजत ठेवावे. बोंबील आणि बटाटा शिजत आला की त्यात चिंचेचा कोळ घालावा पिठ थोड्या पाण्यात कालवुन पातळ करुन ते सोडावे. मग मिठ, चिरलेली कोथिंबीर, हिरवी मिरची मोडून घालावी. थोडा वेळ उकळुन गॅस बंद करावा.
वाढणी/प्रमाण:
३ ते ४ जणांसाठी
अधिक टिपा:
पिठ लावल्यामुळे रश्याला घट्टपणा येतो. शेवग्यांच्या शेंगाची चव ह्यात खुप छान लागते. असेच कालवण सुक्या वाकटीचेही करतात.
माहितीचा स्रोत:
आई
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
धन्स जागु
धन्स जागु
****************************************
वक्रतुंड महाकाय सुर्यकोटि समप्रभ|| निर्विघ्नं कुरूमेदेव सर्वकार्येषुसर्वदा ||||
मस्त
मस्त वाटतेय..
*****&&&*****
Excellence is not for someone else to notice but for your own satisfaction and efficiency...
जागूताई तुमच्या पध्दतिने केले
जागूताई तुमच्या पध्दतिने केले होते. शेवगा नाही मिळाला ऐनवेळी. छानच झाले होते.
धन्यवाद वैशाली वहिनी. पुढच्या
धन्यवाद वैशाली वहिनी. पुढच्या वेळी शेवग्याच्या शेंगाही घाला. मस्त लागतात ह्या रश्यात.
मस्त रेसिपी वर काढली वैशाली
मस्त रेसिपी वर काढली वैशाली हरिहर .
जागू ताई सेम पद्धतीने मी पण करते पण चिंचेचा कोळ न घालता आमसुल घालते ते पण छान लागत.
एका बटाट्याचे फारतर चार तुकडे
एका बटाट्याचे फारतर चार तुकडे पुरे. एकदम बारीक चिरू नये. चिंच नसेल तर त्याऐवजी कोकमासोबत टॉमॅटो पण चालेल. रस्सा अधिक तिखट करावा. तांदळाच्या पिठाने घट्टपणा येतो पण तिखटजाळ चविष्ट रस्सा हवा असल्यास कालवणात पीठ टाकणे टाळले तर उत्तम. सोबत बारीक तांदळाचा भात. स्पेशली वाडा कोलम झकास. गोडा तांदूळ भाताला वापरू नये, उदा. इंद्रायणी वगैरे. शिवाय भात 'गिजका' शिजवू नये
अधिकची टीप: भातात बटाटा कालवून घ्यावा. कालवण थोडे अधिक घेवून अधेमध्ये दोन हातांनी ताट उचलून ओरपत रहावे
बोंबील बटाटा भात म्हणजेच सुख
२००९ ला लिहिलेली पाककृती एकदम
२००९ ला लिहिलेली पाककृती एकदम २०१९ ला उत्खनन करून वर काढल्याबद्दल वैशाली हरहर यांचे आभार. वेळ पण काय साधली आहे एकदम मस्त. या रविवारी अश्या पध्दतीने सुक्या बोंबलाचे कालवण बनवून भाताबरोबर ओरपण्यात येईल.
फिल्मी, काय लिहिलंय. वाचुनच
फिल्मी, काय लिहिलंय. वाचुनच तोंपासु.
फिल्मी टिप छानच आहे. हा रस्सा
फिल्मी टिप छानच आहे. हा रस्सा मला भाताबरोबरच आवडला. आता पावसाची वाट पहात आहे.
मी अगदी कालच बनव्लेले.
मी अगदी कालच बनव्लेले.
आम्ही कोकमवाले आणि अगदी वाडा कोलम वालेच. गिचका न बनवता.
पद्धत नक्कीच वेगळी आहे.
टोमॅटो नाहीच घालत. मस्त कांद्या खिबर्याचे वाटण लावून. भरपुर कोथींबीर उतरताना घालायची.
फिल्मी एकदम परफेक्ट टिप्स
फिल्मी एकदम परफेक्ट टिप्स दिल्यात.
सगळ्यांचे धन्यवाद.
स्लर्प..
स्लर्प..
जागू तुम्हाला एक आग्रहाची
जागू तुम्हाला एक आग्रहाची विनन्ती आहे. तुम्ही यू त्यूबला चॅनल सुरू करा. एक तर ह्या सगल्या गोष्टींचे डॉक्युमेन्टेशन होउनक्जाइल आणि ठेवा कायमचा जतन होइल. शिवाय तुम्हाला व्युअर शिप खूप मिळेल त्यामुळे अर्थार्जनही होइल (अर्थात हा जास्तीचा फायदा ) .यू टूबच्या रेवेन्यू मॉडेलचा अभ्यास करा .इथेही जाणकार आहेत. मला हे फार महत्वाचे वाटते . तुम्हाला?
बाबा कामदेव यांना जोरदार
बाबा कामदेव यांना जोरदार अनुमोदन. जागुताई मनावर घेच आता. मीही जमेल तशी मदत करेन.
होना, तसेच ईथे त्यांच्या
होना, तसेच ईथे त्यांच्या इतक्या पाककृती आहेत कि त्याचे एक पुस्तक होईल.
एक तर ह्या सगल्या गोष्टींचे
एक तर ह्या सगल्या गोष्टींचे डॉक्युमेन्टेशन होउनक्जाइल आणि ठेवा कायमचा जतन होइल.>>> अगदी अगदी!
जागुताई, खरोखरीच हा ठेवा जतन
जागुताई, खरोखरीच हा ठेवा जतन करा नाहीतर काळाच्या आओघात ह्या रेसिपीज लोक विसरून जातील
जागुताई, खरोखरीच हा ठेवा जतन
जागुताई, खरोखरीच हा ठेवा जतन करा नाहीतर काळाच्या ओघात ह्या रेसिपीज लोक विसरून जातील
आता जागुताई चॅनेल कधी सुरु
आता जागुताई चॅनेल कधी सुरु करेल तेंव्हा करेल पण मी आजवर तिने पोस्ट केलेल्या माशांच्या पाककृतींची पिडीएफ आणि इपब बनवून ठेवली आहे.