Submitted by वाचिका on 8 October, 2026 - 03:34
नमस्कार,
मी सध्या 28 आठवडे pregnant आहे. नुकत्यात केलेल्या टेस्ट्स नुसार मला gestational diebeties असण्याची शक्यता आहे. त्या साठी 1 आठवडा रोज blood sugar checkup चालू आहे. या बद्दल कोणाकडे काही माहिती/अनुभव असल्यास जाणून घ्यायला आवडेल. तसेच आहार कसा असावा? वजन कसे नियंत्रणात ठेवावे? बाळावर gestational diebeties चा काय परिणाम होतो? इतर काय काळजी घ्यावी? याचेही माहिती/अनुभव असल्यास सांगावे.
धन्यवाद.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
डॉक्टर डॉक्टर डॉक्टर
डॉक्टर डॉक्टर डॉक्टर
डाएटिशियन डाएटिशियन डाएटिशियन
इथे फक्त लोकांनी धीर , दिलासा द्यावा आणि तुम्ही तो घ्यावा.
भरत यांच्याबरोबर सहमत.
भरत यांच्याबरोबर सहमत.
माझ्या एका मैत्रिणीने फक्त आहार आणि व्यायाम याने हा प्रकार कंट्रोल केला होता.
तर एकीला औषधे घ्यावी लागली होती.
त्यामुळे तुम्ही डॉक्टर काय म्हणतात ते करा.
तुम्हाला खूप शुभेच्छा..
आधी pregnancy बद्दल खूप
आधी pregnancy बद्दल खूप शुभेच्छा.
याच्या दोन केसेस बघितल्या आहेत.
पहिली थोडी लांबून ज्यामध्ये dr. चा सल्ला तोंडी लावण्यापुरता ऐकला.
'एवढ्याने काय होतंय, dr जरा जास्तच सांगतात" म्हणत diet पुरेसं पाळलं नाही.
परिणामी बाळाचे वजन वाढले, आईची कंबर दुखावली, जन्मानंतर बाळाला उचलणे अवघड झाले.
पण बाळ खूप हुशार, छान ऍक्टिव्ह आणि समजूतदार.
दुसरी अगदी जवळच्या मैत्रिणीची. यात तिला गोडाची मुदलात आवड आणि गोडाचेच डोहाळे.
पण मनावर दगड ठेऊन, dr आणि dietician जे सांगेल ते ऐकले.
बाळ अगदी व्यवस्थित, छान ऍक्टिव्ह, योग्य ते milestones घेतले. अजून वर्षाचापण नाही.
कशाचा उपयोग झाला:
१. आहार पूर्ण dietician सांगेल तो. तिला भात आणि चपाती जवळजवळ व्यर्ज्यच होती.
२. डाळींचा जास्त वापर. mix डाळीचे डोसे, उसळी, डाळी आणि अंडी मिक्स करून तडका नावाचा पदार्थ. यांत वेगवेगळे मसाले वापरून चवीत वैविध्य. डाळी असल्याने भरपूर आलं आवश्यक.
३. भरपूर चालणे आणि पाणी पिणे.
४. सलाड, nuts आणि seeds व्यवस्थित खाणे. हे आणि फळे dietician च्या सल्ल्याने.
५. चवीला म्हणून कोणत्याही पदार्थांत साखरेचा एक कणही नाही.
६. limited आहार असल्याने सांगितलेली सगळी व्हिटॅमिन्स आणि supplements. काहींचा वास pregnancy मध्ये त्रासदायक वाटायचा. म्हणून हे घेतल्यावर मोरावल्याचा छोटा तुकडा तोंडात ठेऊन चघळायचा.
Gestational डायबेटिसने घाबरू नका. pregnancy छान एन्जॉय करा. सगळं नीट होईल.
वाचिका अभिनंदन! आहार आणि
वाचिका अभिनंदन! आहार आणि जीवनशैलीतील इतर घटकांचे व्यवस्थित नियोजन केल्यास औषधे किंवा इन्सुलिन ह्यांची गरज न पडता जेस्टेशनल डायबिटीस व्यवस्थित मॅनेज होतो. त्यासंदर्भात चिऊ ह्यांनी लिहिलेल्या सगळ्या टीप्स खुप उपयुक्त आहेत.
तुम्हाला काही स्पेसिफिक प्रश्न किंवा कन्सर्नस असतील तर मला विपु करा आपण फोन वर बोलु शकतो.
सर्वांना धन्यवाद.
सर्वांना धन्यवाद.
सध्या डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे डाएट चालू आहे. रोज ग्लूकोज टेस्ट देखील करत आहे. 91 - 120 mg/dl च्या मध्ये रिझल्ट येत आहेत. पण मला गोडाचे डोहाळे लागले आहेत. जेवल्यानंतर थोड तरी गोड खावे असे वाटते पण, मनावर ताबा ठेवून गोड खात नाहीये. घरी किंवा आजूबाजूला कोणाची अशी केस पाहिली नसल्याने, माझेही पहिलेच बाळंतपण असल्याने थोडी भीती वाटत होती. बरेच ब्लॉग वाचले, रिसर्च पेपर्स वाचले तेव्हा डाएट आणि व्यायाम केल्यास बराच फायदा होईल असे वाटले. मायबोली वर खूप चांगले सल्ले मिळतात व अधिक माहिती मिळण्यास चांगलेच म्हणून इथे विचारले.
पर्णीकाजी धन्यवाद, तुम्हाला विपु करेन.
वाचिका अभिनंदन आणि शुभेच्छा.
वाचिका अभिनंदन आणि शुभेच्छा.
वाचिका अभिनंदन व शुभेच्छा!
वाचिका अभिनंदन व शुभेच्छा! माझ्या मुलीलाही होता आठव्या महिन्यात तिला इतर काही प्रॅाब्लेम झाल्याने दवाखान्यातच ठेवले होते जेवण तिथलेच असल्याने तिला चालत असलेले तेच मिळत होते. महिनाभर अमेरिकन डायट फुड पाहून मलाच कसेतरी व्हायचे पण तिनं केलं बाई सगळं….. आपलं बाळ स्वस्थ व्हावं हे मोटिवेशन इतकं मोठं असतं ना… तिने केलं तुही करशील डायटीशीयनचा सल्ला नक्की पाळ सगळं छान होईल काळजी करू नको काळजी घे…
काही महत्त्वाच्या गोष्टी-
काही महत्त्वाच्या गोष्टी- आपल्याला अजून १२ आठवडे( किंवा थोडे कमी) जायचे आहे. या काळात आपल्या रक्तातील ग्लुकोज वर उत्तम नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.
यासाठी आपण आपल्या स्त्रीरोगतज्ज्ञ आणि आपल्या आहार तज्ज्ञ यांचाच सल्ला घ्या.
बाकी कुणाचाही सल्ला ऐकू नका.(यात अतिशय जवळचे नातेवाईक किंवा खरे हितचिंतक असू शकतात. त्यांचा हेतू स्तुत्य आणि मनापासून चान्गला असला तरी ज्ञान उत्तम असेलच असे नाही). देवाने आपल्याला दोन कान यासाठीच दिलेले आहे.
आपली ग्लुकोज अतिरिक्त वाढली तर बाळाला मिळणारी ग्लुकोज पण जास्त असते यामुळे बाळाचे वजन लवकर वाढते. परंतु त्याचा अर्थ बाळ मॅच्युअर झाले असा नाही. आपली रक्तातील ग्लुकोज जास्त असली तर प्रसूतीच्या वेळेस किंवा सिझेरियन झाले तर त्यावेळेस गुंतागुंती होण्याची शक्यता जास्त असते.
शेवटच्या महिन्यात आपली ग्लुकोज जास्त असेल तर बाळाला अतिरिक्त ग्लुकोज मिळते जिचा वापर करण्यासाठी बाळ स्वतःच्या शरीरात अतिरिक्त इन्स्युलिन तयार करते. पण ज्या क्षणी बाळाची नाळ वेगळी होते. त्यानंतर बाळाच्या शरीरात अतिरिक्त इन्स्युलिन पण येणारा ग्लुकोजचा पुरवठा बंद या स्थिती मुळे बाळाच्या रक्तातील ग्लुकोज धोकादायक पातळीवर खाली उतरून बाळ बेशुद्ध किंवा कोमा मध्ये जाण्याची शक्यता निर्माण होते असे होऊ नये म्हणून पुढचे ४८ तास बाळाला सलाईन मधून ग्लुकोज देऊन हळूहळू त्याचे इन्स्युलिन कमी करत आणावे लागते. यासाठी बाळाला अतिदक्षता विभागात ठेवतात.
आपले बाळ आपल्या शेजारी नाही तर तिसऱ्याच नर्सच्या देखरेखीखाली आहे हा विचार आईला फार तणावपूर्ण असतो.