चित्रकला उपक्रम : माझा आवडता लोगो - जाई. - भार्गवी

Submitted by जाई. on 15 September, 2026 - 12:38

आम्हाला या गणेश चतुर्थीला २ वर्षे पूर्ण झाली आणि आईच्या मायबोलीसाईट वर संयोजक मामा मावश्यांनी लोगो रंगवा उपक्रम जाहीर केला . तस आम्ही घरच्या भिंती, दरवाजे, स्वतःचे हात पाय वगैरेवर स्वतःच्या चित्रकलेचे प्रदर्शन लावले होतेच. तसेच भिंती साफ करण्यासाठी शार्क टँक वरील प्रॉडक्टवर ५०० रुपडे खर्चून आईच्या कंबरेला/ हाताला चांगलाच व्यायाम दिला होता. पण दिवसभर आमच्यापाठी धावणाऱ्या आईसाठी हे काम म्हणजे दर्यामे खसखस. तर ते असो!

आता वेळ मायबोलीकरांची होती . आईने आमच्या सध्या फेवरिट लोगोचा प्रिंटबल कागद आणून दिला आणि मग काय ! आम्ही पिकासोची जेन अल्फा पिढी असल्यचे सिद्ध करत स्क्रिबलिंग करून टाकले.

हुश्श! फारच लिहून घेतलं आईने. मायबोली संयोजक मामा मावश्यानी पल्हाळ लेखन स्पर्धा ठेवली असती तर आईचा पहिला नंबर आला असता..! ते असो . लोगो आवडला का ते जरुर सान्गा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

भले शाबास!

पाककृती लेखन स्पर्धेत पाल्हाळ लेखनाचा पर्याय आहे. त्यात भार्गवीसाठी केलेल्या एखाद्या पदार्थाचे वर्णन करता येईल.

सर्वाना भार्गवीतर्फे थेन्क ! (हा तिचाच उच्चार )

भरत. , तिच्यासाठी पदार्थ करण्यापे़क्षा तिला भरवण्यासाठी ज्या युक्त्या कराव्या लागतात त्या पाल्हाळ लेखनाचे मटेरियल जास्त आहे. Happy

कोकोमेलन!!!
मस्त भार्गवी. तू पण हे बघत जेवतेस ना! मी कित्येक वर्ष हे बघत जेवलो आहे! Happy