https://www.bbc.com/news/articles/clyenxp540vo
बीबीसी ने या संदर्भातले वृत्त दिले आहे.
बोचासनवासी अक्षर पुरुषोत्तम स्वामिनारायण संस्थेचे काही साधू आयफेल टावरला भेट द्यायला गेले होते.
त्यावेळी आयफेल टॉवरची देखभाल करणार्या कंपनीला त्यांनी धार्मिक कारणांवरून इथे एकही महिला उपस्थित असू नये ही विनंती केली. कंपनीने ती मान्य केली आणि महिला कर्मचार्यांना दुसरीकडे हलवले. तिथे पुरूष कर्मचार्यांना नियुक्त केले. तर अन्य महिला कर्मचार्यांना या संस्थेची व्हिजिट होईपर्यंत त्यांच्या नजरेला पडू नये अशी सक्त ताकीद देण्यात आली.
ही व्हिजिट पूर्ण झाल्यानंतर अपमानित झालो अशी भावना झालेल्या महिला कर्मचार्यांनी आणि अन्य काही संघटनांनी आयफेल टावरचं काम करण्यास नकार दिला आणि आंदोलन केलं. कंपनीने महिला कर्मचार्यांची माफी मागितली आणि पुन्हा असे होणार नाही हे आश्वासन दिले.
त्यानंतर सर्वत्र या प्रकरणाची चर्चा सुरू झाली. त्यानंतर बॅप्सने आमचा कुणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नव्हता हे स्पष्ट केले. केवळ धार्मिक नियमांमुळे विनंती केली होती असे निवेदनात म्हटलेले आहे. आज भारतीय माध्यमांना जाग आली आहे.
पुण्यातल्या स्वामीनारायण मंदिराच्या मागे साधूंची निवासस्थाने आहेत. तिथे तसा काही बोर्ड नाही. ती निवासस्थाने सुद्धा सुंदर आहेत. ती निवासस्थाने आहेत हे माहिती नहतं. तो मंदीर संकुलाचाच भाग असल्याचा ग्रह झाल्याने आम्ही ग्रुपने पायीच तिकडे निघालो असताना सिक्युरिटी आणि काही स्वयंसेवक अंगावर धावून आले होते. त्या वेळी समजले कि महिलांचे दर्शन सुद्धा या साधूंना त्याज्य असते. त्यामुळे त्यांची तपस्या भंग पावते. त्यांच्या ज्या काही मान्यता असतील त्यावर आक्षेप असण्याचे कारण नाही. त्यांच्या देवळात जाताना आपणच माहिती घेऊन जायला हवे. ते त्यांचे स्थान आहे.
पण आयफेल टावर?
बापटांना ऍमेझॉन या जंगलात
बापटांना ऍमेझॉन या जंगलात राहण्याचा सल्ला मिळालेला आहे, तसाच सल्ला ह्या ब्रह्मचारी बाबांना द्यायला हवा
पण तिकडे जर बायका मुद्दामून
पण तिकडे जर बायका मुद्दामून गेल्या तर?
पूर्वी मेनका, उर्वशी अशा अप्सरा परीक्षा घ्यायला जात असत.
नाही हो. पुराणकथा वाचून
नाही हो. पुराणकथा वाचून त्यांना निदान एवढं तरी समजलं पाहिजे की बायकांना unless and until they are scorned (like movie Pinjara) or on specific mission कुणाला तरी हनीट्रॅप करण्याची अज्जिबात नॅचरल उर्मी किंवा गरज नसते. खरा लाभार्थी बरेचदा कुणी वेगळाच असतो
पिंजरा कि पिंजारा? दुसरा नाही
पिंजरा कि पिंजारा? दुसरा नाही पाहिलेला. पहिल्या मधे मास्तरची तपस्या स्प्रिंगताईंनी भंग केली होती.
ऋषीमुनींचा तपोभंग करायला इंद्र अप्सरांना पाठवायचा कि ओ.
मेनकाच ना ती विश्वामित्रांची तपस्या भंग करणारी.
पिंजराच हो.
पिंजराच हो.
इंद्र अप्सरांना पाठवायचा >>> तेच तर. मेनकेला स्वतःहून कुठे विश्वामित्रामध्ये इंटरेस्ट होता?
निदान त्या केसमध्ये इंद्रासन डळमळीत तरी झालेलं असायचं. यांच्या तपस्येने विमानाची सीट तरी रिक्लाईन होईल काय?
(No subject)
हे सुद्धा नॉन बायोलॉजिकल आहेत
हे सुद्धा नॉन बायोलॉजिकल आहेत की काय?
कारण यांना स्री स्पर्श वर्ज्य आहे.
काय म्हणावे याला आता.
हे लोक घरातल्या स्त्रियांशी
हे लोक घरातल्या स्त्रियांशी कधी भेटायला वगैरे आल्या तर कसा संपर्क साधत असतील?
यांच्या तपस्येने विमानाची सीट
यांच्या तपस्येने विमानाची सीट तरी रिक्लाईन होईल काय? >>
इंद्राच्या आसनात पण रिक्लायनरच असावं. सारखं डळमळीत व्हायचं.
>>> यांच्या तपस्येने विमानाची
>>> यांच्या तपस्येने विमानाची सीट तरी रिक्लाईन होईल काय?
हाहाहा. या लंकेचे दासीपद तरी कमला घेइल का? च्या चालीवर अक्षरक्षः वाचले.
>>यांच्या तपस्येने विमानाची
>>यांच्या तपस्येने विमानाची सीट तरी रिक्लाईन होईल काय? >>
घ्या! रिक्लायनरचा शोध पण आपलाच ना! हे पाश्चिमात्य लोक सगळ्या चोर्यामार्याच करतात आपल्या पुराणातून.
हाहाहा अगदी बरोबर! आपल्या
हाहाहा अगदी बरोबर! आपल्या पूर्वजांनीच रिक्लायनरचा शोध लावलाय.
माझेमन
माझेमन
कुणाच्या लक्षात आले का ? की यांचे गृहितकच स्त्रिया यांना मोहात पाडतील म्हणून त्यांना दूर ठेवा असे आहे. कोण आहात तुम्ही हृतिक रोशन? मदनाचा पुतळा? खऊट शेंगदाण्याचे रूप घेऊन हिंडत आहात कोणी ढुंकूनही बघणार नाही. ह्या सगळ्या स्त्रिया त्यांच्या कामामुळे तेथे आहेत तुमच्यामुळे नाही! या कामामुळे त्यांचा उदरनिर्वाह चालतो. ह्या पेक्षा जास्त काही नाही. Chill बाबा, you don't even exist for me! असं म्हणायला हवं. थकले अपुले "बाबा" आता एकच चिंता उरी, स्खलनशील आम्ही असू तरी टाळत राहू नारी"
काही बायका खोडकर असू शकतात
काही बायका खोडकर असू शकतात आणि आता त्यांना घरात कोंडून ठेवता येत नाही. एकदा दाराबाहेर पडल्या कि त्या शॉपिंगलाच जातील असं काही नाही.
"कोण तपस्येला बसलंय, बघतेच कशी पूर्ण करतो ते" असा विचार करून रानावनात पण जाऊ शकतील. किंवा कुणी खट्याळ इंद्र, देवेंद्र, नरेंद्र, महेंद्र त्यांना पाठवू शकतो.
गौतमी पाटील, राधा पाटील आणि अजून ....... यांना दहीहंडीच्या सुपार्या नसतानाच्या मोकळ्या वेळात रील बनवण्यासाठी तपस्येत बाधा हा विषय असू शकतो.
पूर्वीच्या काळी मास्टर विनायक या ब्रह्मचार्याला मीनाक्षी शिरोडकर या ललनेने "यमुनाजळी खेळू खेळ" म्हणत त्रास दिला होता.
नाय नाय तसं नाय. स्त्री दिसली
नाय नाय तसं नाय. स्त्री दिसली की "तपस्या" ऑटोमॅटिक भंग होत असेल. कृपाचार्य आणि द्रोणाचार्य ह्यांची जन्मकथा बघा.
>>> यांच्या तपस्येने विमानाची
>>> यांच्या तपस्येने विमानाची सीट तरी रिक्लाईन होईल काय?

असुरांच्या राजाने कधी एखाद्या नवीन उदयाला येणार्या असुराला डिस्ट्रॅक्ट करायला असुरसुंदर्या वापरल्याचं ऐकलं आहे का? देव स्वतःला देव म्हणवतात आणि इतकी इनसिक्युरिटी?! शिवाय अप्सरांचा कन्सेन्ट घेत असतील आणि बक्कळ कॉम्पेन्सेशन देत असतील का?
यांची साइड काही न्यायाची दिसत नाही मला!
आजच्या काळात मंदिर बांधायला
आजच्या काळात मंदिर बांधायला आलेल्या पुरुष मजुरांना दिवसाला एक अमेरिकन डॉलर देऊन अमेरिकेत राबवुन घेतलं म्हणे. त्यामुळे कॉम्पेंन्सेशन नसावं.
बाकी पॅरिस मध्ये असं झालं नसतं तर इतकी जाहिर छिथू झालीच नसती ना? वाईटात सुख ते हेच!
"यांच्या तपस्येने विमानाची
"यांच्या तपस्येने विमानाची सीट तरी रिक्लाईन होईल काय?" -
कल्पनाच भारी आहे.. आवडली!! 
विचार करतोय स्त्री ला स्पर्श
विचार करतोय स्त्री ला स्पर्श न करता ह्या बोच्यानि जन्म कसा घेतला असेल.
हे विषयांतर वाटेल, पण हे
हे विषयांतर वाटेल, पण हे विषयाच्या अनुषंगानेच आहे.
रॅशनलिस्ट विचार सांगणे हे या चॅनलचे उद्दीष्ट आहे. यातला पहिला किस्सा आणि आयफेल टॉवर मधे घडलेला किस्सा यामागची मानसिकता आजही अस्तित्वात आहे. ती आता नाही असं सांगण्याचा प्रयत्न होत असतो.
https://www.youtube.com/watch?v=-yaDXF2nLV4
यांचा कंटेंट चांगला आहे.
यांचा कंटेंट चांगला आहे. नुकतेच त्यांनी लॉजिकल फॅलसीज याबद्दल व्हिडीओ केले आहेत. ते चांगले वाटले. पण ते आधी लिहून आणलेले वाचत आहेत. वरचा तुंम्ही दिलेला पण. त्यामुळे जरा रसभंग होतो.
(No subject)
यत्र नारी हाकलंते, रमन्ते तत्र बॅप्स् साधू: ।
https://www.facebook.com/reel
https://www.facebook.com/reel/2629228320856956
पॅरिसमधली यांची शोभायात्रा.
आपल्या प्रजासत्ताकदिनाच्या परेडच्या तोडीस तोड आहे. वेगवेगळ्या राज्यांची झलक दिसते. नऊवारी सुद्धा आहेत.
आताच जाधवपूरला जे झालं ते सुद्धा एक्स्पोर्ट केलं पाहिजे.
यात तर स्त्रिया दिसताहेत.
यात तर स्त्रिया दिसताहेत. त्यांनी भस्म वगैरे फासलंय का कि ज्यामुळे त्या या साधूंना दिसत नाहीत?
अमेरिकेत एका बाईला जेल मधे
अमेरिकेत एका बाईला जेल मधे टाकलं, फ्रान्स मधे हा प्रकार झाला.
आता भारतीय वंशाच्या घरमालकिणीला अटक केली. घर तिचं, भाडेकरूने बार्बेक्यू नको म्हणून सांगितलं तर अटक केली.
भारतीय लोकांच्या विरोधात हे लोक कटकारस्थान करत आहेत.
हा फोटो पाहून मला गॉट मधले
हा फोटो पाहून मला गॉट मधले religious militants आठवले, ज्यांना सर्सी एका धमाक्यात उडवून टाकते. तेवढ्या एका कृतीमुळे ती फार आवडली होती. Religious militants ह्या शब्दामधेच यांच्या सैन्याची ताकद येते, कंट्रोल करण्याची. स्त्रियांविरूद्धचे सैन्य आहे हे, हा धर्म नाही! धर्मात तर वीरांचे लक्षण म्हणजे आपल्या पेक्षा दुर्बलांचे रक्षण करणे असे सांगितले आहे हे तर त्रास देतात आणि यांची संघटित शक्ती आहे.
Pages