https://www.bbc.com/news/articles/clyenxp540vo
बीबीसी ने या संदर्भातले वृत्त दिले आहे.
बोचासनवासी अक्षर पुरुषोत्तम स्वामिनारायण संस्थेचे काही साधू आयफेल टावरला भेट द्यायला गेले होते.
त्यावेळी आयफेल टॉवरची देखभाल करणार्या कंपनीला त्यांनी धार्मिक कारणांवरून इथे एकही महिला उपस्थित असू नये ही विनंती केली. कंपनीने ती मान्य केली आणि महिला कर्मचार्यांना दुसरीकडे हलवले. तिथे पुरूष कर्मचार्यांना नियुक्त केले. तर अन्य महिला कर्मचार्यांना या संस्थेची व्हिजिट होईपर्यंत त्यांच्या नजरेला पडू नये अशी सक्त ताकीद देण्यात आली.
ही व्हिजिट पूर्ण झाल्यानंतर अपमानित झालो अशी भावना झालेल्या महिला कर्मचार्यांनी आणि अन्य काही संघटनांनी आयफेल टावरचं काम करण्यास नकार दिला आणि आंदोलन केलं. कंपनीने महिला कर्मचार्यांची माफी मागितली आणि पुन्हा असे होणार नाही हे आश्वासन दिले.
त्यानंतर सर्वत्र या प्रकरणाची चर्चा सुरू झाली. त्यानंतर बॅप्सने आमचा कुणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नव्हता हे स्पष्ट केले. केवळ धार्मिक नियमांमुळे विनंती केली होती असे निवेदनात म्हटलेले आहे. आज भारतीय माध्यमांना जाग आली आहे.
पुण्यातल्या स्वामीनारायण मंदिराच्या मागे साधूंची निवासस्थाने आहेत. तिथे तसा काही बोर्ड नाही. ती निवासस्थाने सुद्धा सुंदर आहेत. ती निवासस्थाने आहेत हे माहिती नहतं. तो मंदीर संकुलाचाच भाग असल्याचा ग्रह झाल्याने आम्ही ग्रुपने पायीच तिकडे निघालो असताना सिक्युरिटी आणि काही स्वयंसेवक अंगावर धावून आले होते. त्या वेळी समजले कि महिलांचे दर्शन सुद्धा या साधूंना त्याज्य असते. त्यामुळे त्यांची तपस्या भंग पावते. त्यांच्या ज्या काही मान्यता असतील त्यावर आक्षेप असण्याचे कारण नाही. त्यांच्या देवळात जाताना आपणच माहिती घेऊन जायला हवे. ते त्यांचे स्थान आहे.
पण आयफेल टावर?
दलिंदर मानसिकता, विशेषतः
दलिंदर मानसिकता, विशेषतः परदेशात.
पण मग त्यांनी विमानात प्रवास
पण मग त्यांनी विमानात प्रवास कसा केला असेल???
त्यांची मागणी आचरट होती यात
त्यांची मागणी आचरट होती यात वादच नाही, पण आयफेलच्या मॅनेजमेन्टने ती मान्य का केली? त्यांचं उत्तरदायित्व कितीतरी पटींत मोठं आहे.
कोणीही सोम्यागोम्या या टर्म्स डिक्टेट कशा करतो? या बोचासनांना प्रवेश नाकारला का नाही?
स्वाती शी सहमत.
स्वाती शी सहमत.
एवढं मोठं देऊळ पॅरिस मध्ये बांधणाऱ्यांची आर्थिक ताकद आणि प्रभाव ही मोठाच असेल त्यामुळेच आयफेल प्रशासनाला एक विसाव्या शतकात एका पाश्चात्य देशात ही मागणी मान्य करावी लागली असेल.
आयफेलच्या मॅनेजमेन्टने ती
आयफेलच्या मॅनेजमेन्टने ती मान्य का केली? +१.
>> पण आयफेलच्या मॅनेजमेन्टने
>> पण आयफेलच्या मॅनेजमेन्टने ती मान्य का केली? >> हो ना. फुटा इथून म्हणायला हवं होतं.
कोणीही सोम्यागोम्या या टर्म्स
कोणीही सोम्यागोम्या या टर्म्स डिक्टेट कशा करतो? या बोचासनांना प्रवेश नाकारला का नाही?>>
सोम्या गोम्या म्हणुन गेले नसतील डिप्लोमॅटिक चॅनेल मधुन व्हिजिट अरेंज केली असेल.
https://www.youtube.com/live/DGziGzy99bU?si=tB3rFDQfAIV9BkgE
बुली - खुशमस्करे + सर्वेगुणा:
बुली - खुशमस्करे + सर्वेगुणा: कांचनं आश्रयंति!
फिफा वर्ल्डकप घरी देतो, सार्वभौम देशाचा अध्यक्ष रातोरात किडनॅप होतो, विमान मिळतं, नोबेल ही मिळू शकेल!
आयफेल टॉवर ऍडमिनला कणा नाही. कणा जगात फार कमी ठिकाणी शिल्लक आहे.
मोडून पडला कणा तरी मोडला नाही
मोडून पडला कणा तरी मोडला नाही टावर
खिशामध्ये हात घालून म्हणा “व्हॉटेव्हर!”
स्वाती +१
स्वाती +१
हपा! अगदी!
हपा! अगदी!

आणि हे फ्रेंच्यांच्या पॅरिस मध्ये त्यांच्या नाकावर टिच्चुन व्हावं याची आणखी मजा वाटली.
बाकी हे बोचा/ बोचासन वाचुन आणखी करमणुक झाली.
स्वातंत्र्य समता बंधुता
स्वातंत्र्य समता बंधुता वगैरेचा उगम जिथे झाला, तिथेच कडेलोट
त्यांची मागणी आचरट होती यात
त्यांची मागणी आचरट होती यात वादच नाही >> त्यांच्या मागणीला आचरट मी तरी म्हणणार नाही. 'पतनाचे कारण स्त्री' हा तर फार पुरातन मामला आहे. पुन्हा एकदा त्या स्लीपरी स्लोपकडे वाटचाल सुरु झालेय ती देखील पूर्ण ताकदीने.
हर्पा
हर्पा
>>> बोचासन वाचून आणखी करमणूक
मला बोचासन म्हणजे 'तशरीफ़'चं भाषांतर वाटतंय सारखं.
>>> पुरातन मामला आहे
हो, पण त्यासाठी संन्याशाने गुहेत राहायची पद्धत होती.
दिवसाढवळ्या बाहेर पडून 'माझ्या अंगावर सूर्यप्रकाश पडता कामा नये' म्हणणं हे आचरटच आहे ना! कॉन्टेकस्ट मॅटर्स!
>>> सोम्या गोम्या म्हणुन गेले नसतील डिप्लोमॅटिक चॅनेल मधुन व्हिजिट
मानव, हो. पण उद्या कोणी 'आमच्या धर्मात पाहुण्यासमोर नरबळी देऊन स्वागत करायची पद्धत आहे, तर तुम्ही आमचं स्वागत तसंच करा' म्हटलं तर डिप्लोमॅटिक चॅनल्स मान्य करतील काय?
आणि हे फ्रेंच्यांच्या पॅरिस
आणि हे फ्रेंच्यांच्या पॅरिस मध्ये त्यांच्या नाकावर टिच्चुन व्हावं याची आणखी मजा वाटली >> मला ही .
पैसा बोलतो शेवट हेच खरे.
मला या धाग्याचे शीर्षकही
मला या धाग्याचे शीर्षकही आवडले नाही. 'भारतीयांमुळे" , सिरीयसली?
हे ज्यांच्यामुळे झाले त्या पंथाचे शीर्षकातच द्यायचे होते की!
पुन्हा एकदा त्या स्लीपरी
पुन्हा एकदा त्या स्लीपरी स्लोपकडे वाटचाल सुरु झालेय ती देखील पूर्ण ताकदीने. >>> हे त्या मंदिरांमध्ये खूप पूर्वीपासून आहे. नव्याने काही नाही.
कॉलेजमध्ये वगैरे असेन...दादर पूर्वेला मैत्रिणीची वाट बघत होते. वेळ होता म्हणून बाजूच्याच स्वामीनारायण मंदिरात गेले. आतून कसे असते हे बघण्याचा हेतू होता. तिकडे चालत नाही वगैरे माहीतच नव्हते. मी आत जाऊन direct देव बघायला आत घुसले (गाभारा वगैरे असावा आणि तो बघावा म्हणून) तर 'इथे बायका आत आलेल्या चालत नाहीत' असं जोराने सांगून बाहेर काढलं गेलं होतं.
>>> 'भारतीयांमुळे" ,
>>> 'भारतीयांमुळे" , सिरीयसली?
Like it or not, that's how the world sees it!
बदलायचं असेल तर 'हिंदूं'मुळे
बदलायचं असेल तर 'हिंदूं'मुळे करा. तो हिंदू धर्माचा पंथ आहे. हिंदू लोकांना उत्तरदायित्त्व नाकारणे शक्यच नाही.
दॅट्स हाऊ वर्ल्ड सीज इट हे ही आहेच.
मला या धाग्याचे शीर्षकही
मला या धाग्याचे शीर्षकही आवडले नाही. >> बरोबर.
आपण जेव्हां परदेशात काही कृती करतो (चांगली किंवा वाईट) तेव्हां ती कुठला धर्म, पंथ, जात, प्रांत, भाषा याच्याशी त्या देशातल्या लोकांना काही एक देणं घेणं नसतं. त्यांच्यासाठी ही त्या देशाच्या नागरिकांनी केलेली कृती ठरते. प्रत्येक जण परदेशात गेल्यानंतर आपल्या देशाचा राजदूतच असतो (सरकारी अर्थाने नव्हे). आज एका पंथाने केली, उद्या अन्य कुठल्या धर्माचे लोक करतील, परवा एखाद्या विशिष्ट जातीचे करतील. परदेशात तुमची आयडेन्टिटी , ओळख ती नसते, ज्यातून तुम्ही कृती करता.
आयफेल टॉवर मधे जे झालं त्याची जबाबदारी एका पंथाची नाही. ती प्रत्येक भारतियावर येते.
>>दिवसाढवळ्या बाहेर पडून
>>दिवसाढवळ्या बाहेर पडून 'माझ्या अंगावर सूर्यप्रकाश पडता कामा नये' म्हणणं हे आचरटच आहे ना!>> हो पण हाच आचरटपणा शतकानुशतके अन्यायाला कारणीभूतही ठरला. माणसाचे माणूस असणेच नाकारले. 'तुमची सावली पडली, विटाळ झाला' हे तर अगदी १-२ शतके मागे गेले तरी होते. काळ सोकावत असताना आचरटपणा म्हणून बघणे मला तरी शक्य नाही.
आधी बायकांना अर्थार्जनाची
आधी बायकांना अर्थार्जनाची क्षमता/शिक्षण आणि संधी नाकारायच्या, मग त्यांना चावट मासिकांसारखं माजघरात लपवून ठेवायचं.
या असल्या 'देवळां'च्या देणगीदार बायका असत्या तर त्या पतनाचं कारण वाटल्या असत्या काय?!
जबाबदारी अशी काही येत नाही.
जबाबदारी अशी काही येत नाही.
भारतीय उपखंडातील सगळ्यांना देसी ब्राऊन स्किन म्हणतात. मग भारत पाकिस्तान बाग्लादेश श्रीलंका सगळे साऊथ एशियन. आता प्लुलर मध्ये कुणाला नावं ठेवायची असतील तर ठेवो बापडा, त्याची मॉरल जबाबादारी वगैरे काही कोणावर येत नाही. घेऊ ही नये. दुष्परिणाम भोगायला मात्र तयार रहावे.
हपा
हपा
मला हे बॅप्सवाले आवडतच नाहीत. ह्यांची मंदिरं कॅलिफोर्नियात , ह्यूस्टन मधे पाहिली आहेत. ते स्त्रियांना गाभाऱ्यात जाऊ देत नाहीत. मलाही जाऊ दिले नव्हते. महामूर्ख आहेत आणि त्यांच्या महामूर्खपणाचा अभिमान ओसंडून वाहत आता आयफेल टॉवर पर्यंत पसरला आहे. हे नेहमीच असेच होते. मी सात आठ वर्षापूर्वीच यांच्या मंदिरावर बहिष्कार घातला आहे, जेथे स्त्रियांना/ दलितांना lesser human वागणूक मिळते तेथे जायचंच नाही. ह्या ह्यांच्या व्हॅल्यूज आहेत. क्रूर!
आता याची जबाबदारी घेऊन चूक कबूल करणार का ? अपेक्षा नाही. आयफेल टॉवर वाले तरी आम्ही यांच्या नादाला लागून मूर्खपणा केला म्हणणार आहेत का ? आणि पुन्हा अशी चूक होऊ नये म्हणून काय दक्षता घेतली जाणार आहे?
हर्पा >>> आवडलं
हर्पा >>>
आवडलं
जबाबदारी टाळता आली असती तर
जबाबदारी टाळता आली असती तर किती बरं झालं असतं. (कटाक्षाने स्मायली टाळणारी स्मायली).
एका मुद्द्याच्या प्रतिक्षेत आहे. बहुधा हळूहळू येईल.
स्वाती, अर्थात मॅनेजमेंटने
स्वाती, अर्थात मॅनेजमेंटने मान्य करायला नको होतं तरीही. मी फक्त अतिरिक्त माहिती पुरवली की।हे केवळ एका मंदिराचे, धार्मिक संघटनेचे लोक म्हणुन नव्हे तर डिप्लोमॅटिक चॅनलने गेले असावेत.
देरासर जैन लोकांचं असतं ना?
देरासर जैन लोकांचं असतं ना? हे स्वामीनारायणवाले.
अस्पृश्यांना देवळात प्रवेश देणारा कायदा तेव्हाच्या मुंबई राज्यात १९४७ साली आला , तेव्हा हे लोक त्या विरुद्ध कोर्टात गेले. आम्ही हिंदू नाही. आम्हांला हा कायदा लागू नाही. सत्संगी नसलेल्या हरिजनांना आमच्या देवळांत येण्यास मनाई करावी.
https://www.casemine.com/judgement/in/5609ab4be4b014971140c23e
"पण मग त्यांनी विमानात प्रवास
"पण मग त्यांनी विमानात प्रवास कसा केला असेल???" - सोमि वर असं वाचलं कि विमान कंपनीला पण त्यांनी हे कळवलं होतं आणि त्या विमानात बायका क्रू मेंबर्स म्हणून नियुक्त केल्या नव्हत्या.
मागे ह्युस्टनच्या स्वामिनारायण देवळात एकदा, त्यांचे कुणीतरी बालसंन्यासी भारतातून आले म्हणून बायकांना देवळात प्रवेश बंद केला होता थोडा वेळ. तेव्हा 'संन्यासी असून जर स्वतःवर इतका ताबा नसेल, तर संन्यास सोडून संसारात परतावं' असं म्हटल्याबद्दल बराच रोष ओढवून घेतला होता. तेव्हापासून त्या देवळाच्या कॅफेटेरियापर्यंतच जाणं ठेवलंय.
कॅफेटेरियात तरी कशाला जाता?
कॅफेटेरियात तरी कशाला जाता?
सहज म्हटलं.
Pages