आरक्षण झालेच पाहिजे!

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

विप्रोचे अध्यक्ष अझीम प्रेमजी यांचे 'आरक्षण' या विषयावरील मत
(मराठीत स्वैर भाषांतर)

मला वाटते, सर्व क्षेत्रांमध्ये 'आरक्षण' ही संकल्पना राबविलीच गेली पाहिजे. यासाठी आपले पंतप्रधान आणि सर्व राजकारणी, नेते यांना मी अनुमोदन देत आहे.

आपल्या सर्वांचा आवडता विषय 'क्रिकेट' यापासूनच याची सुरूवात करू या. आपल्या राष्ट्रीय संघामध्ये १०% जागा मुस्लिम, ३०% जागा ओबीसी, एससी / एसटी इ. साठी राखीव झाल्या पाहिजेत.

अनुसुचित जातीजमातींच्या खेळाडूंसाठी सीमारेषा कमी केली गेली पाहिजे. शिवाय या खेळाडूंनी चौकार मारल्यास त्याच्या ६ धावा, तसेच षटकार मारल्यास ८ धावा मोजल्या गेल्या पाहिजेत. अशा प्रकारे तो साठ धावांपर्यंत पोचला, की त्याने शतक केल्याचे घोषित केले जावे.

आयसीसीवर दबाव टाकून सर्व नियम सुधारून घ्यायला हवेत. जेणेकरून ओबीसी खेळाडूंना शोएब अख्तरसारख्या धोकादायक गोलंदाजांचा सामना करावा लागू नये. इतर गोलंदाजांनीही ८० किमी प्रतितास या वेगाच्या वर चेंडू फेकल्यास तो चेंडू 'नो बॉल' किंवा अशाच काहीतरी नियमांतर्गत बेकायदेशीर ठरवावा.

'ऑलिंपिक्स' मध्येही आरक्षण आवश्यकच आहे. १०० मीटर्स च्या शर्यतीत ८० मीटर्स पुर्ण केलेल्या ओबीसी खेळाडुला सुवर्णपदक दिले जावे. असेच आणखी अनेक नियम आपण ऑलिंपिक्समध्ये प्रगती करण्यासाठी जरूरीचे आहेत.

सरकारी नोकर्‍यांमध्ये तर हे व्हावेच व्हावे. अतिशय कमी मार्क्सचे निकष पुरे करून पायलट झालेल्या मागासवर्गीय उमेदवारास आपले मंत्री, राजकारणी, नेते इ. मोठे लोक नेहेमी प्रवास करीत असलेल्या विमानाचा ताबा द्यावा. ही खरी देशसेवाच ठरेल.

असेच कमीत कमीचे निकष पार करून डॉक्टर्स झालेल्या मागासवर्गीय उमेदवारांनाच आपल्या नेत्यांच्या शस्त्रक्रिया आदि करण्याची परवानगी द्यावी. देशाला वाचवण्याचा यापेक्षा सुरेख मार्ग आणखी दुसरा कोणता असेल?

तर, हे व्हावेच व्हावे अशी माझी जोरदार मागणी आहे.

***

हे शब्दशः प्रेमजी यांनी लिहिले / बोलले असेल की नाही, हे मला माहिती नाही. हे मला मेल मधून आलेले एक फॉरवर्ड आहे. ते इंग्रजीत होते, अन त्याचे हे स्वैर मराठी भाषांतर.

प्रकार: 

अशाप्रकारे आरक्षणाला विरोध करणे आत्यंतिक अपरिपक्वतेचे लक्षण आहे. एवढे फालतू पत्र प्रेमजी ह्यांनी नक्कीच लिहिले नसावे. एखाद्या सुखवस्तू फोरमवर उच्चवर्णीय हशा पिकविण्याची किमया मात्र हे पत्र नक्कीच साधू शकेल.

..............................................................................................................
अगदी नीट रोख धरून | म्हैस मागी येता धावून | एकदम छत्री उघडून | तिला पळविता येतसे || जुन्यानव्याची चोरी करून | भिकार कवि येता कविता घेऊन |कशी तरी एकदा वाचून | चुकविता येतसे ||सर्वांस उपाय येत दिसून | परि एका गोष्टीस आहे न्यून | तोंडाळ बायको कडकडून — | येता, काय करावे ||

कदाचित् प्रेमजी यांना असे सुचवायचे असेल की आरक्षण असले तरी गुणवत्ता कमी होऊ नये. हा मुद्दा पूर्वी सॉफ्टवेअर कं च्या चालकांनी मांडला होता. ते म्हणाले, आज जगात आमचा धंदा चांगला चालतो याचे कारण नुसतेच स्वस्त नव्हे तर आम्ही उत्तम दर्जाचे लोक घेतो, व ते ते उत्तम दर्जाचे काम करतात म्हणून. भारतात काय किंवा अमेरिकेत काय, नुसत्या स्वस्त असण्याला किंमत नाही. धंद्यामधे quality महत्वाची. कुणि मागास वर्गातला असेल म्हणून त्याचे कमी दर्जाचे कामहि खपवून घ्यायचे हे खरे नव्हे.

साधारण दहावी पर्यंत सर्वांना शिक्षणाची संधि हवीच. नि जे मागास आहेत, त्यांना अभ्यास करण्यात जास्त मदत करणे हेहि चांगले. पण त्यासाठी जास्त तास अभ्यास करायची जबाबदारी कुणाची? कुणाला लवकर समजत असेल, नि कुणाला नसेल, तर ज्याला नसेल त्याने जास्त अभ्यास करायला नको का? त्याला शिकवायला सरकारी खर्चाने शिक्षक ठेवणे योग्य. पण दहावी नंतर जर त्याला इतरांच्या बरोबरीने मार्क मिळाले नाहीत, तरी वर चढवायचे, तर त्याला तो वरच्या वर्गातला अभ्यास झेपेल का?

कुणि म्हणेल जास्त मार्क म्हणजे जास्त हुषार नव्हे. पण सध्या तरी दुसरे काय माप आहे? आय क्यू टेस्ट ठीक आहे, पण विषयाचे ज्ञानहि महत्वाचे. काढा असे पेपर की ज्यात विषय समजल्याखेरीज, चांगले मार्क मिळणारच नाहीत. पुष्कळ ठिकाणी असे करतात.
Happy Light 1

एखाद्या सुखवस्तू फोरमवर उच्चवर्णीय हशा पिकविण्याची किमया >>>>
हो. तसं समजा हवं तर. मग काय?

ही अशी बोंब कुणीतरी ठोकणार, हे मला लिहितानाच माहिती होते. हे पत्र वगैरे नाही. प्रेमजी यांनी बोलता बोलता काढलेया उद्गारांचे ह्युमरस कन्व्हर्जन असावे. शिवाय शब्दशः त्यांनी असे लिहिले / बोलले आहे की नाही, ते मला माहिती नाही- हे मी सुरूवातीलाच स्पष्ट केले आहे. त्यामुळे त्यावरून फालतू वाद घालू नयेत, ही विनंती. आरक्षणाच्या बाजून एवढी तळमळ असेल स्वतंत्र बीबी उघडून त्यावर स्वतःची बहूमोल मते मांडून आपली परिपक्वता दाखवावी. बुरखा घालून आलेल्यांनी स्वतःचे महत्व वाढविण्यासाठी पांचट विधाने करून मुळ विषयापासून भरकटवू नये.

झक्की व इतर सर्व, योग्य मुद्दे मांडल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. Happy

-----
असं एखादं पाखरू वेल्हाळ, त्याला सामोरं जातंया आभाळ!

हे पत्र गेल्या दीडशे वर्षांपासून प्रेमजींच्या नावे इंटरनेटवर फिरते आहे. हे पत्र ह्या पब्लिक फोरमवर देण्यामागे कुठला निखळ, निकोप हेतू आहे? टाइमपास म्हणा किंवा दुसरे काही, मला तरी हा अतिशय हिणकस प्रकार वाटतो आहे. अशी पत्रे, अशा चर्चा म्हणजे अनेक उच्चवर्णीयांचा फेवरट पासटाइम आहे.

'बुरखा घालून आलेल्यांनी स्वतःचे महत्व वाढविण्यासाठी पांचट विधाने करून मुळ विषयापासून भरकटवू नये.'
अशा फालतूपणाला माझ्याकडून कुठलेच प्रत्युत्तर येणार नाही. तुमचे चालू द्या.
..................................................................................................................
अगदी नीट रोख धरून | म्हैस मागी येता धावून | एकदम छत्री उघडून | तिला पळविता येतसे || जुन्यानव्याची चोरी करून | भिकार कवि येता कविता घेऊन |कशी तरी एकदा वाचून | चुकविता येतसे ||सर्वांस उपाय येत दिसून | परि एका गोष्टीस आहे न्यून | तोंडाळ बायको कडकडून — | येता, काय करावे ||

.

अहो, very.sane.subodh, जेंव्हा एखाद्या विषयाबद्दल कळकळ असते, पण लोकांकडून प्रतिसाद मिळत नाही, तेंव्हा काहीतरी भडक, अतिरेकी विधाने करून लोकांचे लक्ष वेधून घेणे हा एकच मार्ग उरतो.

तुमच्या मते, हे सर्व, "स्वतःचे महत्व वाढविण्यासाठी पांचट विधाने" , "सुखवस्तू फोरमवर उच्चवर्णीय हशा पिकविण्याची किमया" वगैरे असेल. पण तुम्ही सुखवस्तू नाही का? मग तर तुमची मते अवश्य मांडा! ऐकायला आवडेल.

केवळ दुसर्‍यावर टीका केली, उगाच दुसर्‍याने काय लिहावे नि काय नाही हे लिहीणे , म्हणजे स्वतःचे म्हणणे खरे होत नाही. त्यापेक्षा आपली जी काय मते असतील ती मांडावीत.
Happy Light 1

मग तर तुमची मते अवश्य मांडा! ऐकायला आवडेल.
---- ऐकायला - मायबोली मराठी वाचणारे नवे तंत्र विकसित झाले आहे?

अशी पत्रे, अशा चर्चा म्हणजे अनेक उच्चवर्णीयांचा फेवरट पासटाइम आहे.
---- उच्च, निच्च, मध्यम (आहेत का हे?) किती भिंती उभारायच्या? Sad मला तर सकाळच्या चहात साखरेच्या जागी मिठाची... चव लागली.

<<ऐकायला - मायबोली मराठी वाचणारे नवे तंत्र विकसित झाले आहे? >>

हो!! दोन वर्षापूर्वीच्या मायबोली दिवाळी अंकात लोकांनी म्हंटलेली गाणी आहेत!! अजून २५ वर्षांपूर्वीच्या काळात रहात का काय?? तसे म्हंटले तर आजकाल जगात जवळपास कुठेहि (कदाचित् अफ्रिका, नि दक्षिण अमेरिका सोडून) कुठेहि फोनवर बोलता येते!!

<<उच्च, निच्च, मध्यम (आहेत का हे?) किती भिंती उभारायच्या?>>

हाच तर विषय आहे. अश्या भिंती जर असतील तर त्या तोडायच्या कश्या? आणि कोण तोडणार? त्या बद्दल काही सुचत असेल तर लिहा की! तुम्हाला काही सुचत नाही तर इतरांना कशाला नावे ठेवता??

Happy Light 1

उच्चवर्णीय, टाईमपास वगैरे वादात मी पडत नाही. परंतु जर पुरावा नसेल तर इथे 'misreprestation' करू नये. फक्त ईमेल मधून आलेल्या पत्राचा अनुवाद असे लिहावे. फारतर मेलमध्ये प्रेमजींचे नाव होते पण स्वतः खात्री केलेली नाही असा 'डिस्क्लेमर' द्यावा. प्रेमजींच्या नावे लिहायचे असेल तर तसा पुरावा (प्रेस नोट, व्हिडीओ लिंक वगैरे) देणे योग्य ठरले असते असे वाटते.

कृपा करून माझा मुद्दा नीट लक्षात घ्या. मी आरक्षणाच्या बाजूने लिहितो आहे किंवा विरोधी लिहितो आहे असे गृहित धरून वस्सकन धावून येऊ नका. मी त्यावर कोणतेच मत दिलेले नाही हे कृपया लक्षात घ्या.

क.लो.अ.

वैयक्तिक मतः मला स्वतःला प्रेमजी इतक्या बेजबाबदारपणे आपले मत (समजा हेच असले तरी) व्यक्त करतील असे वाटत नाही. त्यांचे सामाजिक स्थान लक्षात घेता त्यांची प्रतिक्रिया याहून खूपच संयत असेल.
हे एखाद्या रिकामटेकड्या संगणक साक्षराचे काम आहे झालं.

बाकी ज्याना टाईमपास म्हणून, ज्याना गंभीरपणे चर्चा करायची आहे त्यानी चालू द्या.

आयला, पोटात मळमळत असल्यावर हवा फुंकली, की बुडालेला बाफ कसा बुडबूडे येऊन वर येतो, त्याचं हे ज्वलंत उदाहरण. Proud

राघवशास्त्री, कुणी लिखाण आधी वाचतं, मग इतरांचे प्रतिसाद अन मग स्वतःचा प्रतिसाद. काही जण लिखाणाआधीच इतरांचे प्रतिसाद वाचून लिखाणाचा, वातावरणाचा अंदाज घेतात, अन मग प्रतिसाद देतात. तुम्ही वरचं ८-१० ओळी वाचल्यानंतर प्रतिसादही वाचण्याचे कष्ट घेतले असते, तर तुमच्या लक्षात आले असते, की तुम्ही म्हणताय, ते मी आधीच, प्रतिसादांत म्हटले आहे.

तो आधीचा एक माझा भाऊ पण का वैतागला आहे माझ्यावर कळत नाही. मी एकदा सांगूनही त्याने तेच टुमणे लावले आहे. तर काय उत्तर द्यावे..? तुम्हाला काही सुचत असेल तर सांगा. जर तुम्हाला काहीच सुचत नसेल, तर misreprestation सारखे अजून काही बुडबूडे हवेत उडवून देता येतील. त्यासाठी काय फारसा विचार करावा लागत नाही.

तोवर मी जरा वस्सकन अंगावर येण्यासारखा काही मुद्दा सापडतो का, त्याची तयारी आणि उजळणी करतो. Proud

---
असं एखादं पाखरू वेल्हाळ, त्याला सामोरं जातंया आभाळ!

>>तोवर मी जरा वस्सकन अंगावर येण्यासारखा काही मुद्दा सापडतो का, त्याची तयारी आणि उजळणी करतो.

तुमचा वरचा प्रतिसाद माझ्या अपेक्षेहून वेगळा नाही. पहिलीच ओळ तुमच्या सभ्यतेची पातळी उलगडून दाखविणारी. My precaution stands vindicated, although ignored.

अहो तात्या, प्रतिक्रिया वाचूनच लिहिले होते. प्रतिक्रीयेत काहीही लिहिलेत तरी तुम्ही अजूनही मूळ लेख संपादित केलेला नाही यातच सगळे आले. अशा प्रकारचे लिखाण करणारे वीर आणि त्यांची प्रवृत्ती मला चांगलीच ठाऊक आहे. म्हणूनच खास करून मुद्दा अधोरेखित केला होता. तरीही अशी बटबटीत प्रतिक्रीया आलीच. जित्याची खोड दुसरे काय.

आणि बुडबुडे सोडण्यात तुम्ही जास्त पटाईत नाही का? बघा ना बिचारे प्रेमजी त्यांच्या नावावर काहीच्या काही खपवताय.

राघवजी, तुमचे म्हणणे जसे येथिल वाचकान्ना केवळ तुमच्या घेतलेल्या नावात "शास्त्रीजी" आहे म्हणून पटेल असेच काही नाही, तसेच, साजिर्‍याने पुनरुध्रुत केलेले लिखाण भले "प्रेमजी" नावाखाली आहे म्हणूनच पटतय असे नाही
तर त्या "खपवलेल्या" मजकुरात बरेच तथ्य आहे, अन बाकी सगळ्यान्च्या प्रतिक्रिया या त्या तथ्याला आहेत, प्रेमजीन्ना नाहीत, हे न समजण्याइतके कोणी दुधखुळे असेल इथे असे मला वाटत नाही!
तरीही त्यातुनही तसा आव कुणास आणायचा असेल तर आणो बापडा........! Proud
हे आपले माझे प्रच्छन्न मत, बर का शास्त्रीजी! Happy

राघवशास्त्रींना अनुमोदन.. त्यांनी सुरुवातीलाच स्पष्ट केलेले आहे की आरक्षण समर्थन-विरोधी असा कुठलाही मुद्दा ते उभा करत नाहियेत. ते स्पष्टपणे म्हणत आहेत की फॉरवर्ड म्हणुन आलेली ही होअ‍ॅक्स मेल शहानिशा न करता टाकली असल्यास तसे डिस्क्लेमर टाका किंवा निदर्शनास आणून दिल्यावर मूळ मजकुरात योग्य तो बदल करावा.
जर एखाद्याने स्वतःचे साहित्य प्रकाशित केले नाही किंवा फॉरवर्ड आलेली मेल/कविता माबोवर प्रकाशित केली (स्वतःची म्हणुन) तर आपण सगळेच त्या आयडीस लगेच सांगतो की बाबा हे बदल. माझ्या मते शास्त्रीदेखील हेच सांगत आहेत.
साजिरा यांनी ह्या गोष्टीची दखल घ्यावी ही विनंती.

माझेही अनुमोदन. एक ओळीचा डिस्क्लेमर टाकला तर बरे होईल.

माझ्याच आयडीने, मीच लिहिलेल्या प्रतिसादात तसे लिहिले आहे, ते पुरेसे नाही काय?

'जित्याची खोड' यात सारेच येतात शास्त्री. तसेच तुम्हीही. तुमचाही प्रतिसाद माझ्या अपेक्षेपेक्षा वेगळा नाही. वस्सकन अंगावर येण्याचा उल्लेख तुम्हीच आधी केला तेव्हा तुम्ही सभ्य, अन नंतर तेच शब्द उचलून मी लिहिले तर मी असभ्य का? असे का? की सभ्यतेचा ताम्रपट सोबतच कपाळी घेऊन आलात तुम्ही?

त्या सुबोधने (ते तुमचे कोण?) पुन्हा लिहिल्यावर मी कंटाळून काहीच उत्तर दिले नव्हते. झक्कींच्या पोस्टनंतरही कुणी काही लिहिले नाही, अन हा बाफ मागेच पडला. तर आज प्रतिक्रिया देऊन या अशा शिळ्या झालेल्या कढीला ऊत आणलात. हे मुद्दाम फुंकून बुडबूडे आणणेच नाही तर काय?

दुसर्‍यांना बटबटीत म्हणण्याआधी स्वतःच लिहिलेले शब्द नीट तपासून पाहा. माझ्या वाक्यांपुढे स्माईली टाकल्यात, त्याही पाहा. वरच्या प्रतिक्रिया संयत शब्दांत लिहिल्या आहेत, हे कृपया लक्षात घ्या.

असो. तेच वाक्य उचलून मुळ उतार्‍यात टाकतो. त्याने काय साधेल, ते साधो बापडे. पण कृपया तेच तेच दळण दळू नये. Happy

---
असं एखादं पाखरू वेल्हाळ, त्याला सामोरं जातंया आभाळ!

माझ्या मते आक्षेप या साठी की प्रेमजींचे नाव टाकल्याने काही लोकांमधे काही गैरसमज होऊ शकतात की 'प्रेमजी असे म्हणतात.'

पुष्कळ लोक साजिरांचे स्पष्टीकरण वगैरे काही वाचत नाहीत. एव्हढा विचार करून, मग प्रतिसाद द्यायला पुष्कळांना वेळ नसतो, म्हणून प्रेमजी वगैरे नावे टाकूच नयेत, असे माझे मत आहे.

खरे तर त्यांचे नाव न लिहीता, स्वतःचे मत म्हणून लिहीले तरी 'हे प्रेमजींचे तुम्ही चोरले' असा आरोप करणारेहि इथे येतील.
एकूण काय, काही लोक नेहेमी मूळ विषयापेक्षा (आरक्षण झालेच पाहिजे!) बाजूच्या गोष्टींवरच जास्त लिहीतात.

इथे काय, मी जरी 'सूर्य पूर्वेला उगवतो' असे नि एव्हढेच म्हंटले तरी बर्‍याच लोकांना ते सुद्धा मी भारतावर टीका केली आहे असे वाटून ते पुनः शिव्या द्यायला सुरुवात करतील. कारण नाव पाहून आधीच मत बनवलेले. बाकी विचार वगैरे काही नाही! मूळ विषय काही का असेना! काही लोकांना एव्हढेच येतं!

Happy Light 1

>>माझ्याच आयडीने, मीच लिहिलेल्या प्रतिसादात तसे लिहिले आहे, ते पुरेसे नाही काय?
ते पुरेसे नाही हे मी नम्रपणे सांगू इच्छीतो. कारण मूळ मजकूर वाचणारे सारेच सारे प्रतिसाद वाचतील असे नव्हे. तरीही मूळ मजकूरात आपण खुलासा केला आहे त्यामुळे आता हा विषय सम्पवायला हरकत नसावी.

साजिरा मुळ मजकुरात शेवटी तुम्ही उल्लेख केलेला आहे, तसाच उल्लेख सुरवातीला (सर्व वाचक अनुवाद पुर्ण वाचतीलच अशी अपेक्षा नको) पण करा, थोडे ठळक करता आले तर उत्तम. गैरसमज Happy पसरायला वाव रहाणार नाही.

>>>> शेवटी तुम्ही उल्लेख केलेला आहे, तसाच उल्लेख सुरवातीला (सर्व वाचक अनुवाद पुर्ण वाचतीलच अशी अपेक्षा नको) Lol उदय...... Lol

माझ्या मते आक्षेप या साठी की प्रेमजींचे नाव टाकल्याने काही लोकांमधे काही गैरसमज होऊ शकतात की 'प्रेमजी असे म्हणतात.'

>>>

आक्षेप ह्यापैकी कुठल्याच गोष्टीला नाहिये. ही मेल प्रेमजींनी लिहिली असल्याचे पुरावे नसल्याने योग्य तो बदल मूळ मजकुरात करावा अशी विनंती होती. आक्षेप नव्हता. विजय कुलकर्णींनी लिहिल्याप्रमाणे केवळ प्रतिसादात तसा उल्लेख करणे हे चूक.

बाकी झक्कीकाका, >>> इथे काय, मी जरी 'सूर्य पूर्वेला उगवतो' असे नि एव्हढेच म्हंटले तरी बर्‍याच लोकांना ते सुद्धा मी भारतावर टीका केली आहे असे वाटून ते पुनः शिव्या द्यायला सुरुवात करतील >>>>>>
सूर्य पुर्वेला उगवतो ह्या वाक्यांनंतर तुमचे पुढचे वाक्य 'भारतात किती भ्रष्टाचार' व तत्समच असेल. लोकांना टिका करायला कारण शोधण्याची गरजच पडणार नाही.

झक्की.. उदय.. Lol

आता मुळ मजकूर संपूर्ण उडवून ते वाक्यच ठळक अन शक्य झालं तर मोठ्या अक्षरात लिहितो. (कारण तेवढेच बाकी आहे. Proud

हा बाफ अजूनही सगळ्या पोष्टींसकट तसाच आहे, म्हणजे थोरच आहे बुवा. कदाचित यानंतर केव्हातरी या विषयावर खरोखर चर्चा होईल, अशी अंधूक आशा अ‍ॅडमिन ना वाटत असली पाहिजे! Happy

-----
असं एखादं पाखरू वेल्हाळ, त्याला सामोरं जातंया आभाळ!

Fools rush in where angels fear to tread हे माहित असूनही ,

हे पत्र बालिश आणी खोडसाळ आहे.
आरक्षण हे अ‍ॅडमिशन पुरते असते. एकदा मेडिकल ला अ‍ॅडमिशन मिळाली की दर वर्षी पास होण्यासाठी आणी शेवटी पदवी साठी सर्वांना समान निकष असतात. फायनल ला आरक्षीत विद्यार्थ्याला टॉपर पेक्षा आगदी एक मार्क कमी पडला तरीही गोल्ड मेडल दिले जात नाही. या पार्श्वभूमीवर पत्रातली बहुतेक विधाने हास्यास्पद ठरतात. आरक्षीत जागेवरून डॉ. किंवा पायलट झालेला कुठेतरी कमी असतो हे आपलं उगाचाच.

एखादा हिंदी सिनेमा तयार झाला की पब्लिक को खुष करनेके लिये एखादे आयटेम सॉन्ग टाकतात तसा शेवटी पुढारी आणी नेते यांना उगाच दगड मारण्यात आलेला आहे.

मेरिट नसतानाही भरपूर देणगी देऊन डॉक्टर्स झालेल्यांनाच आपल्या नेत्यांच्या शस्त्रक्रिया आदि करण्याची परवानगी द्यावी. देशाला वाचवण्याचा यापेक्षा सुरेख मार्ग आणखी दुसरा कोणता असेल?
असेही लिहिता आले असते.

टण्या, मी या बा. फ. वर काय लिहीले त्याबद्दल फक्त बोलत जा. माझे पुढचे वाक्य काय "असेल", इतर ठिकाणी काय लिहीले, वगैरे बद्दल, माझी जास्त माहिती नसताना, गृहित धरणे हे मला बरोबर वाटत नाही.

तुमच्यासारख्यांना मग कुणाचे काही वाचण्या ऐवजी नुसते नाव बघून पुरत असेल. एकंदरीत तसाच कारभार इथे दिसतो आहे. आणि नुसतेच लिहायचे काय, ते नाही, तर ते पहिल्या वाक्यात लिहावे की नंतर लिहीले तरी चालेल, हे पण तुम्ही इतरांना सांगणार!

आता असे करा, पैसे भरून स्वतःचे पान विकत घ्या, नि त्यावर लिहीत बसा काय लिहायचे ते.

म्हणजे मग "आरक्षण समर्थन-विरोधी असा कुठलाही मुद्दा ते उभा करत नाहियेत" असे मधेच विषयाला फाटे फोडणारे काही निघणार नाही.

Happy Light 1

टण्या, मी या बा. फ. वर काय लिहीले त्याबद्दल फक्त बोलत जा. माझे पुढचे वाक्य काय "असेल", इतर ठिकाणी काय लिहीले, वगैरे बद्दल, माझी जास्त माहिती नसताना, गृहित धरणे हे मला बरोबर वाटत नाही.
>>>
तुम्हाला ह्या बाफवर कोणी भारताबद्दल शिव्या देता म्हणुन बोलले होते? तुम्हीच 'मला काहिही बोललो तरी लोकं शिव्या देतील' म्हणुन सुरुवात केलीत. जर तुम्ही ह्या बाफवर इतर बाफंचे संदर्भ काढणार असाल तर बाकीच्यांनी देखील ते का काढू नयेत?

>>>>
तुमच्यासारख्यांना मग कुणाचे काही वाचण्या ऐवजी नुसते नाव बघून पुरत असेल. एकंदरीत तसाच कारभार इथे दिसतो आहे. आणि नुसतेच लिहायचे काय, ते नाही, तर ते पहिल्या वाक्यात लिहावे की नंतर लिहीले तरी चालेल, हे पण तुम्ही इतरांना सांगणार!
>>>
माझ्या तसेच इतरांच्या पोस्टमधूनदेखील 'नम्र विनंती', 'असे केलेत तर बरे होइल' अशी विधाने आहेत. कुणी काय लिहावे वा लिहू नये ह्याप्रकारचे माझे वा इतर कुणाचे ह्या बाफवरील विधान दाखवावे.

>>>
आता असे करा, पैसे भरून स्वतःचे पान विकत घ्या, नि त्यावर लिहीत बसा काय लिहायचे ते.
>>>
ज्यांनी कुणी पैसे भरुन वा माबोचे काम केल्यामुळे मिळालेल्या पानावर जर काही लिहिले असेल तर त्यावर टिका-टिप्पणी करण्याचा अधिकार केवळ ज्यांच्याकडे पान आहे त्यांनाच आहे असा आपला उद्देश आहे का? तसे असल्यास अ‍ॅडमिननी रंगीबेरंगीवर फक्त मालकाने परवानगी दिलेल्या लोकांनाच लिहिण्याची सोय उपलब्ध करुन द्यावी. तसेच जर त्या पानाच्या मालकाने इथे येउन लिहू नका अशी विनंती केल्यास मी येणार नाही इतकी माझ्या स्वतःपुरती मी खात्री देउ शकतो.

राहता राहिला आपली इतर काही बाफंवर केलेली थट्टा (जिचा संदर्भ/पुरावा बहरावर उपलब्ध आहे). तर इतःपर तुमच्या संदर्भात कुठलीही थट्टा-मस्करी मी करणार नाही.

<<मेरिट नसतानाही भरपूर देणगी देऊन डॉक्टर्स झालेल्यांनाच आपल्या नेत्यांच्या शस्त्रक्रिया आदि करण्याची परवानगी द्यावी. देशाला वाचवण्याचा यापेक्षा सुरेख मार्ग आणखी दुसरा कोणता असेल?
असेही लिहिता आले असते.>>

हा टोला फार उत्तम बसला आहे. एकदम ६ धावा. आरक्षणापेक्षा हे फार भयंकर! Happy Light 1

मेरिट नसतानाही भरपूर देणगी देऊन डॉक्टर्स झालेल्यांनाच आपल्या नेत्यांच्या शस्त्रक्रिया
---- भरपूर देणगी देऊन डॉक्टरकी साठी प्रवेश मिळवता येत असेल, पण अ‍ॅडमिशन मिळाली म्हणजे डॉ. झाला असे नाही ना? तुमच्या याच पोस्ट मधे 'दर वर्षी पास होण्यासाठी आणी शेवटी पदवी साठी सर्वांना समान निकष असतात.' देणगी दिल्यावर निकष शिथील कसे होतील ?

माझ्या दृष्टिने दोन्ही (देणगी तसेच आरक्षण प्रवेश) प्रकार हे कोणावर तरी अन्याय करतातच.

<< मेरिट नसतानाही भरपूर देणगी देऊन डॉक्टर्स झालेल्यांनाच आपल्या नेत्यांच्या शस्त्रक्रिया आदि करण्याची परवानगी द्यावी. देशाला वाचवण्याचा यापेक्षा सुरेख मार्ग आणखी दुसरा कोणता असेल?
असेही लिहिता आले असते. >>
विजयराव, पूर्ण अनुमोदन. मागासवर्गीयांना, दुर्लक्षित घटकांना संधी मिळवून देणे हे महत्त्वाचे असल्याने आरक्षण. त्या संधीचा कसा उपयोग करावा हे ज्याच्या त्याच्या हातात. शिवाय, संधी मिळालेले सर्वचजण चमकदार कामगिरी करतात असे कुठे आहे ? कुठल्याच जातीत नाही.

<< भरपूर देणगी देऊन डॉक्टरकी साठी प्रवेश मिळवता येत असेल, पण अ‍ॅडमिशन मिळाली म्हणजे डॉ. झाला असे नाही ना? तुमच्या याच पोस्ट मधे 'दर वर्षी पास होण्यासाठी आणी शेवटी पदवी साठी सर्वांना समान निकष असतात.' देणगी दिल्यावर निकष शिथील कसे होतील ? >>
उदय, वैद्यकीय, अभियांत्रिकी व औषधनिर्माणशास्त्र या विद्यालयांच्या कारभाराबद्दल जवळून माहिती आहे. त्या विद्यालयांमध्ये नात्यातले/ओळखीतले लोक प्राध्यापकी करतात. अतिशयोक्ती नाही, पण यात सरकारी, खाजगी, स्वायत्त, अभिमत इ. सर्व आले. (प्राध्यापकी ही घराण्याला आजन्म लागलेली साडेसातीच आहे म्हणा ना !) तेव्हा काही उघड गुपिते सांगतो Happy

१. प्रवेशपरीक्षा होऊन जी यादी लागते ती 'अ‍ॅडजस्ट' करता येते, केली जाते. खासकरून खाजगी, अभिमत इ. विद्यालयांची प्रवेशपरीक्षा.

२. ज्यांना सरकारी/राजकीय/आर्थिक वरदहस्त आहे, असे ढ विद्यार्थी 'पास' व्हावेत म्हणून अनेक उपाय योजले जातात. ते पदवीधर होतात. त्यांना पास केले जाण्यामागची विचारसरणी - 'जाऊ दे हो, ढकला त्याला/तिला पुढे. तो/ती कुठे व्यवसाय करणार आहे ?' हे खरे असते. असे पास होणारे विद्यार्थी घरच्या पिढीजात राजकारणात उतरतात. बहुतेक वेळा या पालकांना मुलांमागे 'डॉक्टर/इंजिनिअर' वगैरे पदवी पाहिजे असते, बस्स ! पास केले नाही तर जिणे हराम होते.
त्यातही तुम्ही टिकून राहिलात तर दुसरे परीक्षक असतातच. यात लेखी, तोंडी परीक्षा दोन्ही आले. तुम्ही पास केले नाही तरी इतरजण पास करतात. हो, यात सरकारी विद्यालयेसुद्धा आली.

पुण्यातील एका संस्थेत अनेक प्रशासकीय अधिकार्‍यांची मुले असतात. पुण्याचे मनपा आयुक्त, पोलिस आयुक्त, जिल्हाधिकारी इ. प्रशासकीय अधिकार्‍यांची मुले बरेचदा या संस्थेत शिक्षण घेत असतात. ही एक गंमतीची बाब म्हणून सांगितले Happy
परीक्षक व विद्यार्थी यांची जात सारखी असेल तर पास करण्याची विनंती/आग्रह करताना 'आपल्यातलाच/आपल्यातलीच आहे' हे पुंगीसुद्धा वाजवली जाते. ती पुंगी मात्र झाडून सर्व जातीचे वापरतात.

  ***
  Assume there is something witty and creative here.

  हे पत्र प्रेमजींचे नाही कारण वॉल्क द टॉल्क या शेखर गुप्ताच्या शोमधील मुलाखतीत आंध्रातील मुस्लिम आरक्षणाबद्दल विचारल्यावर प्रेमजींनी 'मी आरक्षणाच्या निर्णयावर काहीही मत व्यक्त करणार नाही पण माझ्यामते आरक्षणाने दर्जा घसरतो.' इतके सावध मत दिले होते.त्यामुळे प्रेमजींच्या नावाने पसरवला जाणारा हा मेल खोटारडा आहे.

  दुसर म्हणजे झक्कींना 'ती' चर्चा चांगलीच जिव्हारी लागलेली आहे असे दिसते ,त्यामुळे सध्या ते माबोवर जेथे जेथे गरळ ओकत असतात त्याच्यात 'त्या' चर्चेतले उल्लेख येतातच्.फक्त खोटारडा प्रचार करत जनतेची सहानुभुती मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे काय्??कारण लोकसंख्या आणि फट्टू अशी तुलना आता लोकांना दाखवु लागले आहेत ती खोटी असुन लोकसंख्या आणि नामर्द यांची तुलना मी केली होती.शिवाय या पानावर जणुकाही झक्कींनाच शिव्या द्यायला लोक सुरुवात करतात असे लिहिले आहे पण शिवीगाळ तिकडे कोणी सुरु केली होती हे सर्वांनाच माहीत आहे.स्वतः एकही मुद्दा न मांडता गरळ ओकणार्‍यांनी दुसर्‍यांच्या मुद्देसुद लिखाणावर टिका करणे हास्यास्पद आहे.वरती टण्यानी चांगलाच जोडा हाणला आहे.त्याला अनुमोदन
  ~~~~~~~~~~~~~~~~~~
  जब जब जगने कर फ़ैलाए
  मैने कोष लुटाया
  रंक हुआ मै नीज निधी खो कर
  जगतीं ने क्या पाया!
  भेंट न जिससे में कुछ खोऊं
  पर तुम सब कुछ पाओ
  तुम ले लो मेरा दान अमर हो जाए।
  तुम गा लो मेरा गान अमर हो जाए।

  Pages