शाई विरघळत नाही

Submitted by अर्जुन ..✍️ on 31 July, 2026 - 07:27

माणसे मरणानंतरही जिवंत राहतील,
जी कागदावर आपले शब्द मांडत राहतील.

कवितेच्या ओळी प्रेम करायला शिकवतील,
वाचणारे कलेमध्ये स्वतःचे अस्तित्व शोधतील.

पानाफुलांवर आणि पावसावर अनेक कविता होतील,
पहिल्या पावसात लोक आपला पाऊस शोधतील.

एक कप चहावर अनेक कथा येतील,
आणि अपूर्ण राहिलेल्या भावना पुन्हा जाग्या होतील.

एका ओळीने कोणाच्या डोळ्यात अश्रू उभे राहतील,
तर एकाच ओळीने कोणाचे आनंदाश्रू वाहतील.

शब्दांनीच अनेक आंदोलने होतील,
रस्त्यावर येऊन आपल्या हक्कासाठी लढतील.

अनेक संघर्ष शब्दांनीच मिटतील,
जगण्याची नवीन उमेद देऊन जातील.

शब्दांनीच अनेक जीव पुन्हा एकत्र येतील,
आपल्या आयुष्याला एक नवीन अर्थ देतील.

शब्द मांडणारे भावनांचे जग उभे करत राहतील,
मरणानंतरही ते लोकांच्या मनात एक जागा करून जातील.

Group content visibility: 
Public - accessible to all site users