१. हरवलेले रुपये-
तीन मित्र सहलीसाठी कोकणातील एका निसर्गरम्य गावात आले. तिथल्या घरगुती खानावळीत त्यांनी जेवणाची भलीमोठी ऑर्डर दिली. बिल ३००० रुपये झालं. प्रत्येकाने १००० रुपये भरले आणि ते मग पुढील प्रवासासाठी बाहेर पडले. खानावळीचा मालक नोकराला म्हणाला, आपल्याला एवढी मोठी जेवणाची ऑर्डर कोणीच दिली नव्हती तर आपण त्यांना ५०० रुपये डिस्काउंट देऊ या. त्याने नोकराला ५०० रुपये दिले आणि त्या तिघांच्या मागे धावत जाऊन ते त्यांना द्यायला सांगितले. नोकर धूर्त होता. त्याने २०० रुपये आपल्याजवळ ठेवले आणि ३०० रुपये त्या तिघांना परत केले. अर्थात नक्की डिस्काउंट किती रुपयांची होती त्याची शहानिशा करायला ते तिघे काही खानावळीत परत येणार नव्हते ते त्याच्या पथ्यावरच पडलं.
आता ३०० रुपये तिघांना म्हणजे प्रत्येकाला १०० रुपये परत मिळाले. याचा अर्थ असा की प्रत्येकाने १०००-१०० म्हणजे ९०० रुपये भरले. पण ९०० गुणिले ३ २७०० होतात. २०० रुपये नोकराने ढापले. मग राहिलेले १०० रुपये कुठे गेले?
२. तोटा किती झाला?
शनिवारी सकाळी एक महिला स्टेशन रोडवरील 'विविध वस्तू भांडार' मधे आली आणि तिने १०० रुपयाच्या वस्तू खरेदी केल्या. दुकानदाराला १००० रुपयाची नोट दिली. दुकानदाराकडे सुट्टे नव्हते त्यामुळे त्याने शेजारच्या हॉटेलवाल्याकडून ती नोट देऊन सुट्टे पैसे घेतले आणि त्या महिलेला राहिलेले पैसे परत केले. ती महिला निघून गेल्यावर काही वेळातच हॉटेलवाला येऊन म्हणाला, 'तुम्ही मला मगाशी जी नोट दिलीत ती नकली आहे, ही बघा.' दुकानदाराने निमूटपणे आपली दुसरी एक चांगली १००० ची नोट त्याला दिली.
आता या व्यवहारात दुकानदाराचा एकूण तोटा किती झाला?
दोन्ही सुटली
दोन्ही सुटली
यातले मागेही कुठेतरी वाचलेले ज्यावर वाद चालू होता.
असो,
ज्यांना सोडवायचे आहे त्यांनी उत्तरे वाचू नका
१) पहिल्या कोड्यात ९०० * ३ = २७०० मध्ये २०० रुपये जोडायचे नसून त्यातून २०० रुपये वजा करायचे आहेत.
ते २७००-२०० = २५०० रुपये हॉटेल मालकाच्या गल्ल्यात गेले असा हिशोब टॅली झाला.
२) दुसऱ्या कोड्यात १००० रुपयाची नकली नोट खपवली म्हणजेच १००० रुपये तोटा.
हिशोब टॅली करायला महिलेचा १००० रुपये फायदा (१०० सामान + ९०० रोख) आणि शेजारच्या हॉटेलवाल्याचा ना नफा ना तोटा.
थोडेसे extra advance उत्तर.
जर त्या १०० रुपये सामानावर दुकानदाराला नेट प्रॉफिट २० रुपये होत असेल तर त्यात तोटा ८० रुपये आणि एकूण तोटा ९८० रुपये झाला असे समजून तो मनाचे समाधान करू शकतो
यातले मागेही कुठेतरी वाचलेले
यातले मागेही कुठेतरी वाचलेले ज्यावर वाद चालू होता.>> हो. हे तसे फार जुने कोडे, रादर कोडे नसुन वेगळाच हिशेब सांगुन गोंधळ करून गमंत करण्याची ट्रिक आहे.
दुसऱ्यात दुकानदाराचा तोटा १०००₹.
हिशेबा करता महिलेचा १०००₹ फायदा हे बरोबरच आहे.
फाटे फोडायला फायदा महिलेचा किंवा हॉटेलवाल्याचा. (हॉटेलवाला आणि दुकानदार ओळखीचे, हॉटेलवाला फसवणूक करणार नाही वगैरे फक्त अंदाज. १००% तसेच असेल हे सांगता येत नाही. त्याने आपल्याकडील इतर कुणाकडुन आलेली १०००₹ ची नोट दुकानदाराकडे खपवली असु शकते. अंतिम फायदा नकली नोट छापणाऱ्या टोळीचा.)
यातही १००₹ च्या वस्तु विकल्याने दुकानदाराचा काही फायदा झाला असेल ना, मग एकूण तोटा १०००₹ नसेल असा वाद पाहिला आहे, तो चुकीचा आहे. तेवढा फायदा त्याचा हक्क होता. आपण दुकानात वस्तु विकत घेतो त्यावर दुकानदाराचा फायदा हा आपला तोटा नसतो. व्यवहार आहे.
हो, म्हणून पुढे असे लिहिले की
हो, म्हणून पुढे असे लिहिले की असे समजून तो मनाचे समाधान करू शकतो Happy
बरोबर!
बरोबर!
ही तशी सोपी कोडी होती..कोडी म्हणण्यापेक्षा हिशेबातील गंमत म्हणू