कौन ? डोन्ट ओपन द डोअर (माझ्या घरी घडलेला २६ तासाचा थरार ) : भाग ३ अंतिम

Submitted by दीपांजली on 30 May, 2026 - 04:08

या आधीचे भाग ;
भाग १
भाग २

चॅप्टर ४ : ट्रायल बाय रेस्क्युअर्स

शेवटी एकदाचा तो स्टिव्हन आला पण साप कुठे लपून बसलाय काही पत्ताच नाही .. काही हालचाल नाही कि कॅबिनेट ओपनिंग पाशी काही व्हिज्युअल्सही नाहीत !
सापच दिसत नाहीये तर तो रेस्क्यु कोणाला करणार ?
तो म्हणे जर तुम्हाला तो दिसत नाहीये तर मलाही दिसणार नाही, पण दिसला तर नक्की पकडून देईन !
त्याने एक गोष्ट कन्फर्म केली कि हा ‘कॅलिफोर्निया रेसर ‘ स्नेक / व्हिप्डस्नेक आहे जो बिनविषारी, हार्मलेस आहे, माणुस आणि डॉग साठीही , साधे गार्डन ग्लोव्ह्ज घालून उचलून फेकावा इतका हार्मलेस !
अर्थात डेंजरस नसला, पॉयझनस नसला तरी साप तो सापच , आम्हाला त्याचीही भीतीच वाटते !
वर स्टिव्हनचे म्हणणे असे कि लपून बसलेल्या सापाला बाहेर यायला प्रवृत्त करणे सोपे नाही, त्याला जर बाहेर यायला थ्रेट वाटत असेल तर तो आठवडा भर सुद्धा त्या भोकात जीवन्त राहु शकतो इतका त्याचा स्ट्राँग सरव्हायवल इन्स्टिन्क्ट असतो कारण " हि इज मोअर स्केअर्ड ऑफ यु, दॅन यु आर स्केअर्ड ऑफ हिम"
झालं…..म्हणजे त्याला आमची भीती वाटते आणि आम्हाला त्याची.. हा खेळ संपणार तरी कधी ?
थोडा वेळ थांबला स्टिवन , पण मि.स्नेक कडून काहीच हालचाल झाली नाही त्यामुळे काही टिप्स देऊन शेवटी तो परत गेला , त्याच्या म्हणण्या नुसार साप दुपारीच बाहेर येतात आणि आता संध्याकाळ झाल्याने तो बाहेर यायची शक्यता कमी आहे, थोडक्यात साप पकडला जाण्याचा चान्स गेलाच !

नंतर अजुन एका ‘ स्नेक रेस्क्यु पेड सरव्हिस’ देणार्‍या माणसानेही व्हिजिट दिली पण त्याने सांगितले कि लपला असेल तर तो काही करु शकणार नाही.. तरीही सल्ले हवे असतील तर कल्न्सटन्सीचे $२५०, साप दिसलाच आणि पकडला तर $५०० अशीच कॉन्व्हर्सेशनला सुरवात झाली , नुसते सल्ले घेऊन काय करु ,! ते तर स्टिव्हननेही दिले होते , म्हणून आम्ही त्याला परत पाठवले !

साप डेंजरस नाही या गोष्टीने थोडा दिलासा मिळाला पण पुढे काय ?
तो त्या भोकाच्या आतच कायमचा राहिला तर ?
असे एक ना अनेक प्रश्नं पडत होते !
दुपार पासून अक्शर्शः इतक्या ठिकाणी फोन लावले होते, कशाचाच उपयोग झाला नव्हता !
किचन कॉन्ट्रॅक्टरलाही फोन केला आणि विचारले कि ती कॅबिनेट्स काढून देईल का, पण तो लाँग विकेन्ड असल्यामुळे आउटऑऑफ टाउन होता !
सगळ्यांना विचारून झालं, शेजार्‍यालाही सल्ल्ला विचारला , त्याने तर असा डेंजर सल्ला दिला कि बास रे बास !
म्हणे पेट्को मधून एक उंदिर आणा आणि उंदराचा पिंजरा किचन मधे ठेवा म्हणजे ,साप बाहेर येईल !
उंदराची तरी काय कमी भीती वाटते आम्हाला ? साप उंदिर दोन्ही डेंजर !
हे म्हणजे घरात ‘अर्शद पप्पु ‘लपलाय म्हणून ‘उझेर बलौचला ‘बोलवावे इतके डेंजर .. भीक नको पण कुत्रा आवर !
undir.jpeg

कुत्र्यावरून आठवलं , या सगळ्या गडबडीत एका व्यक्तीला काडीचाही फरक पडला नव्हता , अर्थात ऑस्करला, कम्प्लिटली अनबॉदर्ड !

IMG_4012_0.jpeg

त्याचे आपले नेहेमीची वेळ झाल्यावर वॉकला न्या, खेळायचा मुड झाला कि खेळा ,ट्रिट्स मागा ही भुणभुण चालुच होती , जणु काही घरात सापाच्या अस्तित्त्वाची याला सवयच आहे !
हेच जर घरात ससा किंवा खार घुसली असती किंवा शेजार्‍याच्या सल्ल्या प्रमाणे उंदिर आणला असता तर त्याने घर डोक्यावर घेतले असते, तांडव नृत्त्यं दाखवले असते नक्की !
आता फक्तं नगिना मधल्या पुंगी घेऊन येणार्‍या अमरिश पुरी टाइप सपेर्‍याला बोलवायचे तेवढे बाकी होते , जेणे करून लपलेला साप फिमेल असेल तर श्रीदेवी सारखा / मेल असेल तर 'नागिन' मधल्या जितेन्द्रं सारखा नाचत बाहेर येईल !
pungi.jpeg

थोडक्यात काय तर ६ तास झाले तरी कशाचाही काही एक उपयोग झाला नव्हता !
आता रात्रं होण्या आधी काहीतरी केले पाहिजे म्हणून शेवटी नवर्‍यानेच त्या किचन कॅबिनेटची बॉटमला असती ती स्कर्टिंग ची फळी ओढून काढली आणि पालथे पडून काही हालचाल दिसते का पहायचे ठरवले..पण नो लक !
IMG_4013_0.jpeg

थोडा वेळ तर फक्तं आम्ही त्या कॅबिनेट कडे बघत बसलो पण पाहुणा बाहेर यायची काहीच लक्षणं दिसेनात बघून शेवटी कंटाळून मी साप असलेल्या किचन मधे गेले , कॉफीमेकर उचलला, इन्स्टन्ट पॉट उचलला , खिचडीचं बेसिक सामान उचललं आणि डायनिंग एरीयात सेट्प मांडला !
एक कप कडक कॉफी मारून स्ट्रेस थोडा कमी झाला , लंचही स्किप केला होता, मग खिचडी लावली आणि गरम गरम जेवण करून थोडे पोटही शान्तं झाले !
तसेही आता आमच्या हातात काहीच नव्हते !

चॅप्टर ५ : स्लिपिंग विथ द एनिमी !
आता रात्रं झाली होती आणि खात्रीच पटली होती कि तो लेझी सुझॅन बरोबर वन नाइट स्टँड करून दुसर्‍या दिवशी दुपारीच बाहेर पडणार !
जणु काही त्याने ऐलानच केले होते ,
“ये नया पोर्टररँच स्नेक है, ये घरमे घुसेगा भी और सोएगा भी !”
आम्ही झोपायला जाण्या पूर्वी काहीतरी सेफ्टी अरेन्जमेन्ट करायला हवी होती ज्यामुळे रात्री साप बाहेर आलाच तर घरात इतरत्रं कुठे जाणार नाही !
नवर्‍याने होम डिपो मधे जाऊन ‘माउस ट्रॅप’ साठी असतात त्या स्टिकी प्लेट्स आणल्या, उंदिर पकडायचा असेल तर या स्टिकी प्लेट्स हमखास काम करतात, इथे कामी येतील कि नाही हे ट्रायल अ‍ॅन्ड एरर्स च प्रकार होता !
आपेक्षा हीच होती कि साप बाहेर आला तर त्या प्लेट्स ना चिकटून बसेल आणि त्याला बाहेर गार्डन मधे ढकलायला सोपे जाईल !
तसेही बेडरुम्स वरच्या मजल्यावर आहेत आणि आम्हाला शोधत तो साप स्टेअरकेसने वरती यायची शक्यता काही वाटत नव्हती , पण त्याचे डेअरींग झालेच तर ? म्हणून ही अरेन्जमेन्ट केल्या शिवाय झोपच आली नसती !
स्टिकी ट्रॅप प्लेट्स लेझी सुझॅन कॅबिनेट च्या आत, कॅबिनेट जवळ आणि किचन फ्लोअर वर सगळीकडे पसरल्या , किचनच्या बॉर्डर्स शक्यं होतील तितक्या सिल केल्या, गॅरेज मधल्या लाकडाच्या फळ्या, बॉक्सेस जे दिसेल त्याने !
लाइफ इज सो अनप्रेडिक्टेबल…. रेप्टाइल्स चा फोबिया ,किळस, तिटकारा सगळे विसरून , आज माझ्या घरात साप लपला असताना मी शान्तपणे वर झोपायला निघून गेले, शेवटी काय सरव्हायवल ! आमचे आणि सापेचेही!
झोपतानाही विचार चालु होतेच.. तो साप कधीच सापडला नाही तर ? तिथेच मेला आणि वास सुटला तर ? नव्याने केलेले हे किचन कॉन्ट्रॅक्टरला बोलावून पूर्णच डिसमेन्टल , झालच तर डिमॉलिशच करावे का ? का सरळ घरच विकून टाकावे ? घर विकायचे कारण काय द्यायचे ? कि गुपचुप सापा बद्दल काही न सांगता सापासकट घर विकावे ?
असे विचार चालुच होते पण प्रचंड दमल्यामुळे नंतर गाढ झोप लागली !
नवरा मात्रं रेस्टलेस होता , दर थोड्या वेळाने खाली जाऊन बघायचा काही हालचाल आहे का, साप स्टिकी प्लेट्सला चिकटलाय का !
चॅप्टर ५ : धुरन्धर
२३ मे २०२६
दुसरा दिवस उजाडला पण सकाळी दहा वाजे पर्यन्तं काहीही हालचाल नाही !
मग अचानक त्या लेझी सुझन कॅबिनेट्सच्या बॉटम पाशी कडकड आवाज आला, तो आवाज वाढु लागला, मग आम्ही पुन्हा हिंमत करून ते दार उघडलं , आता सापाने त्या भोकातून डोकं बाहेर काढलं होतं आणि त्याचं डोकं त्या प्लेट्सना चिकटल्यामुळे तो हालचाल करत होता !
झालं, पुन्हा धावपळ, नवर्‍याने पालथे झोपून त्य कोनाड्यातला सापाला प्लेट सकट ओढायचा प्रयत्नं केला, पण तो समहऊ साप सटकला आणि त्या कॅबिनेटच्या भोकात गेला.. प्रचंड निराशा , चिडचिड , थयथयाट झाला !
त्या माउस ट्रॅपच्या प्लेट्स खूप चिकट असतात आणि त्यातून सोडवून घेणे सोपे नाही, पण हि मॅनेज्ड इट !
मग लक्षात आहे कि ३ ते ४ इन्चाचा छोटा उंदिर त्या प्लेट्स्ला चिकटणे वेगळे आणि साडे तीन फुट लांब सापाचे फक्तं डोकं चिकटणे वेगळे !
मग आम्ही त्या कॅबिनेटच्या भोकापासून प्लेट्स थोड्या लांब ठेवल्या, ज्यामुळे तो साप थोडा पुढे येईल आणि त्याची जास्तं बॉडी प्लेटला चिकटली तर ओढायला सोपे जाईल !
शेवटी दुपारी दोनच्या सुमारास पुन्हा आवाज झाला.. पुन्हा कॅबिनेट उघडले.. यावेळी मात्रं तो पुढे आला होता आणि जास्तं चिकटला होता, पुन्हा नवर्‍याने धीर करून प्लेट काठीने खेचली , आता काम होतय असं वाटतच होतं , पण……. तो महामूर्ख साप पुन्हा सटकला .. कसा ते त्याचे त्याला ठाउक !
आता मात्रं पेशन्स संपला, काल येऊन गेलेल्या स्टिव्हन ला फोन करून घरी रहायला बोलवावे अशी इच्छा होत होती.. पण हे शक्यं नसले तरी त्याला अजुन काय करता येईल विचारले घेतला, त्याने साप पुढे ओढण्या साठी पकडी सारखे एक मोठे गॅजेट सांगितले , ते कुठल्या दुकानात जनरली मिळत नाही , तरी रेप्टाइल्स स्पेशल शॉप्स मधे शोधले तर सापडु शकेल असे कळले !
या शिवाय स्टिव्हनच्या म्हणण्यानुसार साप स्टिकी प्लेट मुळे इन्ज्युअर होऊ शकतो, त्या पेक्षा त्या काढून टाका , ते मात्रं आम्हाला मान्यं नव्हतं आत्ता या प्लेट्समुळे निदान त्याच्या हालचालीचा आवाज तरी येत होता, तो कुठे आहे हे तरी समजत तरी होतं !
स्टिवनने सांगितलेले गॅजेट मिळते का पहायला नवरा लग्गेच बाहेर गेला , मी लो व्हॉल्युम वर टि.व्ही. लाऊन बसले , सो दॅट सापाचा आवाज झाला तर समजेल , पण बराच सगळ कसं शान्त शान्तं !
इतक्यात सुमारे साडेतीनच्या आसपास पुन्हा कडकड आवाज झाला, मी आधी ऑस्कर सोफ्यावर झोपलाय याची खात्री केली आणि हळुच उठले.. आता ‘कडकड’ आवाज सरपटल्या सारखा येऊ लागला !
पटकन किचन मधे गेले तर तो साप ऑलरेडी सगळे अडथळे पार करून कॅबिनेट मधून बाहेर आलाच होता आणि चक्क किचन मधून बॅकयार्ड मधे जाणार्‍या काचेच्या दारापाशी एका जागी वळवळत होता !!!!!!!!!
जणु काही मला सांगत होता ‘दार उघड बये दार उघड‘ !
दॅट वॉज द मोमेन्ट……… नाउ ऑर नेव्हर.. मी गेले , सापा जवळ.. ते दार उघडले आणि तो धुरन्धर काही क्षणात सळसळत गवतातून निघूनही गेला आणि मी ते दार घट्ट बन्दं केले !!!!!
हे सगळे इतके फ्रॅक्शन ऑफ सेकन्द्स मधे घडले, ना मी आरडाओरडा केला, ना सापाचे फोटो काढले , somehow I just knew what to do and so did he !
ऑस्कराही जागा झाला होता, मागे बसून तो हे शान्तपणे बघत होता, जसे काही हे तो रोजच बघतो, साप गेल्यावर सोफ्यावर जाऊन पुन्हा झोपला.. सुखी प्राणी Happy
आमचे घर आता सर्पमुक्तं झाले होते आणि तोही मुक्तं झाला होता, त्याला त्याच्या नॅचरल वस्तीत जाण्याचा मार्गं मिळाला होता !
आमचा आणि त्या सापाचा हा २६ तासाचा ट्रॉमॅटिक एपिसोड अशा प्रकारे फायनली संपला होता !
खरं तर सगळी रिस्की कामं, धावपळ नवर्‍याने केली पण सुटका मात्रं माझ्या हातून झाली !

तो गेला तरी २ मिनिटं मला काही सुचलच नाही, बन्द दारातल्या काचेतून मी त्याला गवतातून पुढे कुंपण्याच्या फटीतून बाहेर जाताना शान्तपणे बघितल !
भानावर आल्यावर शेवटी आनंदाची बातमी फोन करून नवर्‍याला दिली, त्याला इतका आनंद झाला, खरेच वाटेना॓
.पण खरोखर त्या घटनेचा ‘दी एन्ड ‘ झाला होता, मुख्य म्हणजे without hurting the snake !
स्टिव्हनलाही अपडेट दिले, त्याने शाबासकी दिली, " गुड वर्क, यु अ‍ॅक्चुअली रेसक्युड हिम"
मी रेस्क्यु केले ? अरे खरच , मीच केले कि, पण त्या सापानेही सुटका करून घेण्याचे १००% दिले, इन फॅक्ट त्याला हवं तेंव्हा तो आला आणि हवं तेंव्हा गेला, मी फक्तं दार उघडून जाऊ द्यायला निमित्तं झाले .. कदाचित त्याचा ट्रॉमा माझ्यापेक्षा जास्तं असेल !
क्लिअर फोटो घ्यायला चान्सच नाही मिळाला , लांबून तो लॉन वरून सरपटत जातानाचा घेतलेला हा फोटो, झुम करून पहावा लागेल!
IMG_4011.jpeg
आज ती घटना घडून ८ दिवस झाले, आम्ही इथेच रहातो, आमच्या पोर्टर रँच मधे, 'त्यांची ' जंगल तोडून बांधलेल्या कॉलनी मधे. !
असे पाहुणे पुन्हा येणारच नाहीत असे नाही , पण काळजी घेणे आपल्या हतात आहे !
तुम्हीही लॉस अ‍ॅन्जलिस, सदर्न कॅलोफिर्निया मधे रहात असाल तर पुढील काळजी नक्की घ्या :
स्नेक रिपेलन्ट पावडर मिळते ती बॅकयार्ड मधे, कुंपणावर झाडांवर मारा.
घरात येणारे बॅकयार्डचे सगळे एन्ट्रन्स बन्द ठेवत जा, व्हेन्टिलेशन साठी खिडक्या असतात !
तुमच्या पेट्सना कधी अनअटेन्डेड बॅकयार्ड मधे सोडु नका !
बॅकयार्डचे दार उघडताना आधी कानोसा घ्या, आजुबाजुला कोणी पाहुणे नाहीत याची खात्री घेऊन मगच बाहेर जा आणि लगेच दार लावा !
पण………. जर दारा बाहेर सळसळ , खुडबुड जाणवली तर….. डोन्ट ओपन द डोअर !
फार लांब नाही कुंपणाच्या बाजुच्याच झाडीत किंवा तुमच्याच लॉन मधे एखादा साप, नाग, रॅकुन , कायोटी किंवा कोल्हा लपला असेल आणि जर तो घरात घुसलाच तर आपण पूर्णं हतबल होतो !
तो साप तर जणु इशाराच देऊन गेलाय ,
"पडोसमेही रहते है, गुदेभरका दम लगालो और बिगाडलो जो बिगाड सकते हो "

…………………………….. समाप्त …………………………….

'द एन्ड ' नंतर सिनेमा चालु रहायची ट्रेन्ड आहे ना, मग हे घ्या बोनस :

सगळे घडल्यावर मग मित्र मैत्रीणी , नातेवाईक यांना सांगितले.. त्यावर आलेले व्हॉट्सॅप मेसेजेस एक से एक एन्टरटेनिंग होते !

*शंकरजी भी न जाने कौनसे रुपमे दर्शन देते है "
*शिवजी कि कृपा समझके भुल जाओ
* सापाला मारले असते तर सर्पदोष येतो, बरं झालं न मारता पुण्याचं काम केलस !
* The Karma of the Rescue :
Saving a snake from harm or relocating it safely away from human settlements is believed to generate immense Punya (good karma). Hindus view rescuing an animal in distress as the ultimate practice of Ahimsa (non-violence)
* In Hindu culture, rescuing a snake is considered a highly virtuous act.
It signifies respect for all forms of life, alignment with the concept of cosmic harmony (Dharma), and adherence to the belief that you are protecting a divine creature that embodies eternity, wisdom, and spiritual rebirth.

……………….. द एन्ड ……………..
विशेष आभार : ‘मै’ चित्रां साठी मैत्रेयी !

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी पहिला. हा भाग मस्त जमलाय. (जणू काही कथा किंवा धुरंधरचा भाग! कर्म माझं असं म्हणाल!)

मला वाचताना त्या सापाचीच काळजी वाटत होती आणि तुम्हांलाही तशीच वाटत होती म्हणून लेख आणखी आवडला.

ही मैचित्रं आहेत का विचारणारच होतो.

<तो साप कधीच सापडला नाही तर ? तिथेच मेला आणि वास सुटला तर ? नव्याने केलेले हे किचन कॉन्ट्रॅक्टरला बोलावून पूर्णच डिसमेन्टल , झालच तर डिमॉलिशच करावे का ? का सरळ घरच विकून टाकावे ? घर विकायचे कारण काय द्यायचे ? कि गुपचुप सापा बद्दल काही न सांगता सापासकट घर विकावे ?> माझीही विचार करायची पद्धत अशीच आहे, पण मी घर विकण्यापर्यंत गेलो नसतो.

(भारतात?) चार जाती सोडल्या तर सगळे साप बिनविषारी असतात, हे पुस्तकात शाळेत शिकलेलं लक्षात आहे, त्यामुळे लेख वाचताना भीतीचा लवलेश नव्हता. पण प्रत्यक्षात कोणताही साप जवळ दिसला तर काय रिअ‍ॅक्शन होईल ते सांगता येत नाही.

शाळेत असताना बोरिवलीत एक सर्पप्रदर्शन भरलं होतं. आणि साप अगदी जवळून दाखवले होते. हातही लावायला देत होते.

सापाची आणखी एक आठवण.

आमच्या जिन्याशी एक दगडी बाक बसवला आहे. एका बोक्याचं ते सिंहासन आणि घर सुद्धा. एकदा मी बाहेरून येत असताना तो बोका एका बारक्या ( लांबी रुंदी दोन्हीने) सापाशी झटापट करत होता. सापाला काही कळत नसल्यासारखा तो त्या बोक्याच्याच दिशेने जात होता. आता हे शूट करावं का असा विचार आला. पण असं कोणाला मरताना पाहवणार नाही म्हणून वळून सरळ घरी आलो.

असो. प्रतिसादात मी मी खूप झालं.

तुमचा अनुभव थरारकच आहे - धोका नसला, तरी डोक्याला ताप टाइप . अनुभवकथन छान जमलंय.

थरारक !

बाहेर पडतांना श्रीदेवी सारखा नाचला की जितेन्द्र सारखा हे नाहीच समजले 😀

सापाजवळ जाऊन दार उघडून देणं हे खरोखरच धैर्याचं काम आहे. भले तो बिनविषारी आहे हे माहिती असलं तरीही!
मी कोकणात जन्माला आल्यामुळे घराजवळ आणि घरातही अनेक वेळा साप (विषारी-बिनविषारी दोन्ही प्रकारचे) पाहिले आहेत. पण असा इतका वेळ घरात ठाण मांडून बसलेला साप हे नवीनच. तेव्हा तरी साप दिसला की मारणे हीच पद्धत होती. घरापासून लांबच्या आंब्यांच्या बागेत वगैरे दिसला आणि विशेषतः बिनविषारी असला तर दुर्लक्ष केलं जायचं.
माझी आजी घरात आलेल्या सापांचे अनेक किस्से सांगायची. त्यातला सगळ्यात फेमस म्हणजे रात्रीच्या वेळी तिने दुभत्याचं कपाट उघडलं, दुधाचं पातेलं उचललं तेव्हा त्या पातेल्याच्या मागे फणा काढलेला नाग होता! (ही चाळीसच्या दशकातली गोष्ट.)

मस्त एकदम! धुरन्धर स्टाइल चॅप्टर्स ची नावे भारी ! दरवाज्याजवळ साप पाहुन मी सापाच्या दिशेने गेले असते की विरुद्ध बाजूला पळाले आसते सांगता येत नही !

भारी लिहिलंय.
एकदम डिटेलिंग.
चित्रे पाहून ही मै चित्रे आहेत का विचारावे म्हणेपर्यंत लेखात उल्लेख आलाच.
छान चित्रं आहेत Lol

चुकून घुसलेल्या सापाला दरवाजा उघडून जाउ दिल्याचे धैर्यवान काम केलेय.
बिनविषारी असला तरी भिती असतेच.

मैचित्रं आहेत हे कळलंच होतं. बाकी धुरंधर स्टाईल लिखाण आवडलंच.
बिनविषारी साप होता हे एक बरं पण घरात साप आहे हे माहित असताना रिलॅक्स्ड असणं अशक्यच.

फार मस्त डीटेलिंग केलेले आहे. कॅलिफो र्नियात मी व मुलगी अपार्टमेन्ट कॉम्प्लेक्स म धे असताना एकदा साप दिस ला हो ता.

फार मस्त डीटेलिंग केलेले आहे. कॅलिफो र्नियात मी व मुलगी अपार्टमेन्ट कॉम्प्लेक्स म धे चालत असताना एकदा साप दिस ला हो ता.

मस्त एकदम! धुरन्धर स्टाइल चॅप्टर्स ची नावे भारी !.... +१.

लिखाण एकदम चित्तथरारक!
मी फक्तं दार उघडून जाऊ द्यायला निमित्तं झाले .. कदाचित त्याचा ट्रॉमा माझ्यापेक्षा जास्तं असेल !....... .. आवडलं.

लिखाण एकदम चित्तथरारक!
मी फक्तं दार उघडून जाऊ द्यायला निमित्तं झाले .. कदाचित त्याचा ट्रॉमा माझ्यापेक्षा जास्तं असेल >>> +१
स्टिकी पेपरची आयडीया भारी होती.

बिनविषारी साप होता हे एक बरं पण घरात साप आहे हे माहित असताना रिलॅक्स्ड असणं अशक्यच. >>> अगदी बरोबर. सरपटणार्‍या प्राण्यांची वळवळ पहातानाच माझ्या अंगावर काटा येतो. साप तर यादीतलं पहिलं नाव. मगर पण Proud

आमच्या मैत्रिणीच्या घरात पुढील दाराने शिरुन ऐटीत स्वयंपाकघरात शिरला तेव्हा तिथल्या गुळगुळीत टाईल्समुळे त्याला सरपटताच येईना. म्हणुन तसाच उघड्यावरच पडुन राहिला. त्यांना त्यामुळे स्पेशल काठीने उचलता आला.

थँक यु सगळ्या प्रतिसादां बद्दल !
या निमित्ताने प्रत्येकाचे साप किस्से वाचायला मजा येतेय, खरं तर धडधडतय Happy
भरत, वावे,
डिटेल्ड प्रतिसादा बद्दल धन्यवाद !
तुमच्या आठवणी पण मस्तं, आय मिन स्केअरी Happy
आमचे ‘धुरन्धर’ मॅरेथॉन प्लॅन ‘त्यानी ‘ घरात घुसून टेकओव्हर केले, त्यामुळे हीच आयडिआ उतरली लिहिताना !

मेल असेल तर 'नागिन' मधल्या जितेन्द्रं सारखा नाचत बाहेर येईल ! >> डीजे ह्याचे टेंशन होते ना खरखर सांग Lol

स्टिकी प्लेट बद्दल स्टीव्ह म्हणाला ते एकदम बरोबर आहे. Its one of the cruelest form to kill animal. क्षणाक्षण मरण येत राहते. नशिबाने तसे झाले नाहि , नाहितर तुला कायम्ची टोचणी लागून राहिली असती. वरती समजा प्लेट घेऊन तो फटीत परत गेला असता नि मेला असता तर वास , तोडफोड नि पुढचे फ्युमिगेशन हा प्रकार असह्य झाला असता. एका मित्राकडे खारीबाबत बघितला आहे. भीक नको पण कुत्रा आवर अशी स्थिती होती.

बाय त वे, कॅबिनेट कसे काढणार होता तुम्ही ? वरचा टॉप फिक्स्ड असेल ना ?

मेल असेल तर 'नागिन' मधल्या जितेन्द्रं सारखा नाचत बाहेर येईल ! >> डीजे ह्याचे टेंशन होते ना खरखर सांग
>>>
यु गॉट इट Biggrin
कॅबिनेट कसे काढणार होतो काय माहित, विचार होता कि कॉन्ट्रॅक्टर येऊन त्या २ कॅबिनेट्च्या मागची फळी तरी काढेल !
नुसतेच क्रेझी थॉट्स .

चित्त थरारक होता सगळाच प्रसंग... पण शेवट गोड झाला हे त्यातल्या त्यात चांगलं झालं. स्वतःच्या हाताने दार उघडून त्याला बाहेर जाताना बघितलं हे वाचलं तेव्हा मी ही सुटकेचा निःश्वास टाकला.
लिहिलंय फारच भारी, आणि चित्र ही छानच.

धुरंधर सापाला घरी पोचायला वाट काढून दिलीस? तुला आता जमील जमाली म्हणायला हरकत नाही.

बाकी लिहीताना कितीही विनोद केलेस तरी घरात साप असताना नॉर्मल वावरायलासुद्धा कमालीचं धाडस लागतं.
रत्नागिरीत खूप विषारी, बिननिषारी साप पाहिलेत. रात्री सापाने बेडकाला पकडल्यावर जीवाच्या आकांताने ओरडणाऱ्या बोडकांचे आवाजही घरात बसून ऐकलेत. पण तरी घरात आलेला साप झेपला नसता.

थँक यु सगळ्यांना !
माझेमन,
बापरे साप बेडुक आवाज या कल्पनेनेच अंगावर काटा आला..काह क्रीपी जनावरं आहेत ही Uhoh

तिसरा भाग अतिशय रंजक झालाय. प्रत्येक भागाला दिलेल्या शीर्षकांनी आणखीन मजा आणली.
खरंतर एकूण अनुभव थरारक होता पण तू अतिशय खुसखुशीत लिहिले आहेस त्यामुळे मजा आली. सुदैवाने सांप विषारी नव्हता ही गोष्ट भाग्याचीच.

साप आपल्या आपणच बाहेरच्या दारापाशी गेला हे वाचून हहपुवा. अगदी अँटिक्लायमॅक्स! तू देखिल शांतपणे दार उघडून दिलंस हे विशेषच.

बापरे बाप! थरारक वर्णन आहे! तुम्ही दोघं हिम्मतवान आहात !
धुरंधरचा हा तिसरा भाग हॅपन्ड इन एलए Lol

गंमत अपार्ट! जेवढी बहादुरी तु दाखवलीस त्याला सलाम. त्या दरवेळीच्या कडकड आवाजाने मला मिनी हार्ट अ‍ॅटेकच आले असते.
साप इज साप.. तेव्हा काय विचार येणार हा विषारी बिनविषारी!
त्याला रस्ता लक्षात होता तर बाहेर जायचा Wink दुसरीकडे मोर्चा वळवला नाही नशीब!

ऑस्कर अरे तुला काय म्हणावं आता Lol

मै चित्र Lol

मी लिहिलं होतं ना मागच्या प्रतिसादात कॅम्पिंगला एके ठिकाणी गेलो असताना साप दिसला. तिथे वॉर्निंग होती.

74c14b47-b703-4050-aa93-8755c9ea55d0.jpg

गुगललं असता हा बाबा venomous आणि endangered species आहे कळलं. त्यामुळे अगदी ट्रेलवर, नदीजवळ वगैरे कुठे दिसलाच तर लक्ष ठेवून होतो. ती ट्रेल प्रचंड घाबरतच केली मी तरी आणि ते ताडोबाला व्याघ्रदर्शन झाल्यावर जसं ट्रीप सफल झाली म्हणतात तसं आमची ही ट्रीप या (बहुतेक तोच असावा असा अंदाज काढत) टिंबर रॅटलस्नेकच्या दर्शनाने संपूर्ण झाली.

मुलं पुढे चालत असताना त्यांना रस्ता ओलांडताना दिसला.

https://youtube.com/shorts/uR1_iIiyPJc?si=C1B0UG_77RbjILt5

https://youtube.com/shorts/Q585G-9k4KM?si=L1-5RJdklE_WQGXy

अंजली, सो स्केअरी !
इथेही आम्ही आधी ऑस्करलस ज्या पार्कला न्यायचो, तिथे रॅटलस्नेक वॉर्निंग होती , ते पार्कच चेन्ज केलं मग आही, पोर्टर रँच मधे नवीन झालेल्या पार्क मधे अजुन तरी नाहीयेत अशा वॉर्निंग्ज !
बाकी थँक्स सगळ्यांना , साहसी वगैरे नाहीये आम्ही उलट भयंकर भिती वाटते सापांची , आत्ताही मला त्या दारापाशी गेले कि तो सीन आठवून अंगावर काटा(सुया) येतात पण तेंव्हा वेळच अशी आल्यावर थोडे गट्स दाखवण्या शिवाय दुसरी ऑप्शनच उरली नव्हती, माझ्या जागी तुम्हीही असतात तर हे धाडस दाखवलच असतं (आय होप कोणावर ही वेळ येऊच नये ).