पोर्टर रॅन्चची ओळख भाग १ मधे झाली, आता बॅक टु २२ मे ची दुपार !
मी वरच्या फ्लोअरला होते आणि कपडे बदलून खाली जेवायला येतच होते इतक्यात नवरा ऑस्करला घेऊन धावत वर आला, "किचन मधे साप मोठा आला आहे "
काय ? कुठे ? ?कसा ? ?, मी किंचाळले !
"मी आणि ऑस्कर गार्डन मधे खेळत होतो, दार उघडच होतं, इतक्यात प्रचंड वेगाने सळसळत एक साप आत शिरला आणि मी काठी घेऊन येईपर्यन्तं तो वळवळत लेझी सुझॅन कॅबिनेट मधे शिरला आणि तिथेच लपलाय"
पायाखालची जमिन सरकणे, बोबडी वळणे, अंगावर काटा येणे ( नव्हे सुया येणे) म्हणजे काय याचा साक्षात अनुभव त्या एका क्षणात घेतला !
आमच्या ‘सोरॅन्टो ‘ हाउजिंग कम्युनिटी मधे गार्डन मधे साप दिसणे कॉमन आहे पण हा थेट घरात घुसला होता , असा घरात घुसणारा हा आमच्या कॉलनी मधल्या पहिलाच !
चॅप्टर ३ : शेर - ए- सोरॅन्टो
मे २०२४ मधे मी माझे जुने किचन पूर्णपणे डिमॉलिश करून रिनोव्हेट केले तेंव्हा २ गोष्टी नॉन निगोशिएबल होत्या, एक म्हणजे मिनि आयलंड ऑन व्हिल्स आणि दुसरे म्हणे कॉर्नर मधे लेझी सुझॅन !
आता हे लेझी सुझॅन म्हणजे काय हे ऑलरेडी बर्याच लोकांना माहितच असेल, तरी ज्यांना माहित नाही त्यांच्या साठी : किचनच्या किंवा कुठल्याही कॉर्नर कॅबिनेटना जास्तीत जास्तं युटिलाइझ करण्यासाठी बनवलेले हे कॉर्नर कॅबिनेट असते, विथ रोटेटिंग ट्रे शेल्व्ह्ज , यामुळे कॉर्नरचा डेड झोन युटिलाझ होतो आणि शेल्व्ह्ज रोटेट होत असल्यामुळे अॅक्सेस करायलाही सोपा जातो !
पण त्यावेळी लेझी सुझॅन कॅबिनेटचा 'असा' वापर एक क्रिपी सरपटणारा प्राणी करेल असे माहित असते तर ?????
पण नवरा सांगत होता म्हणजे हे घडले होते !
आता करायचे तर करायचे काय !
मुळात तो बोट भर जाड, साडे तीन चार फुट लांब साप किचनच्या बन्द असलेल्या कॅबिनेटच्या आत गेलाच कसा ?
कॅबिनेट्स च्या दाराची फट अशी असते किती मोठी ? हे आता खाली जाऊन सॉर्ट करायचे होते !
सर्वात आधी ऑस्करला बेडवर झोपवले , बेडरुमचे दार लावले आणि घाबरत घाबरत जिना उतरून आम्ही खाली आलो !
काठी ऑलरेडी होती, एक जाळीची लाँड्री बॅग पण घेतली , नवर्याला म्हंटलं , तू काठीने त्याला ओढ मी पिशवीत भरते.
पण त्या लेझी सुझॅन कॅबिनेटचं दार कोण उघडणार ?
नवर्याने हिंमत करून हळुच ते दार उघडलं, दोघांनी सगळे बळ एकवटले , पाहिले तर साप गायब.. मग दिसले कि त्या कॅबिनेटला किचन कॉन्ट्रॅक्टरने तिथून प्लंबिंगचा पाइप जातो म्हणून एक ओपनिंग केले होते.. त्या भोकातून हा धुरंधर आत जाऊन लपला होता #कपाळबडवति
कॉन्ट्रॅक्टरला सांगितलेही होते ते ओपनिंग मोठं झालय, ते लहान करून देतो म्हंटला आणि ते राहूनच गेलो, आमची चूक म्हणजे आम्हीही विसरून गेलो.. आता २ वर्षांनी लक्षात आलं तोवर ही त्या सापासाठी आयडिअल अंधारी सुरक्षित जागा बनली होती !
मग बाजुचे कॅबिनेट पण ओपन करून पाहिले, तर बाजुच्या कॅबिनेटलाही बॉटम रॅकला ओपनिंग .. कर्मं माझं.. म्हणजे या क्रिपी जनावराला २ कॅबिनेट्स बॉटमला लपून बसायला अॅक्सेस आहे , इट वॉज हिज लकी डे !
मग धीर करून ती दोन्ही कॅबिनेट्स आधी रिकामी केली आणि तिथली सगळी भांडी डिशवॉशरला लावली !
काठीने ठक् ठक् आवाज केला ज्यामुळे तो बाहेर येईल.. पण अॅब्सोल्युट्ली नो सक्सेस !
मग वाचलं कि या आवाजाने साप घाबरतो , म्हणजे बाहेरच येणार नाही घाबरून आतच लपेल !
आता मात्रं आम्ही दोघेही आपापल्या फोन वरून निरनिराळ्या सरव्हिसेस ना फोन लाऊ लागलो !
पेस्ट कन्ट्रोल, अॅनिमल रेस्क्यु, स्नेक रेस्क्यु, रेप्टाइल रेस्क्यु, काय काय नंबर शोधले, नवर्याने तर ९११ आणि फायर डिपार्टमेन्टलाही फोन लावले , त्यांनी फक्तं इथून तिथे फोन ट्रान्स्फर केले , बाकी सगळे मेसेजेस व्हॉइस मेसेज वर गेले.
शेवटी मला थोडेफार यश आले, एक नंबर लागला , ८०५ एरीआ कोड वरून तो सिमि व्हॅली एरीयाचा वाटला , एका बाईने फोन घेतला , ती म्हणे पोर्टर रँच म्हणजे लॉस अॅन्जलिस काउन्टी , आम्ही व्हेन्चुरा काउन्टी मधे व्हॉलेंटिअर वर्क करतो !
मी म्हंट्ल कि काउंटी वेगळी असेल पण सिमी व्हॅली पासून मी लांब नाही, ती बाई म्हणे ती सिमि व्हॅली नाही तर सॅन्टा पॉलाला रहाते म्हणजे बरीच लांब, तरीही तिने दिलासा दिला , ती म्हंटली आमच्या व्हॉलेंटिअर्स पैकी आज कोणी त्या एरीयात असेल तर तुला टेक्स्ट करते !
फोन ठेवला, फार काही आपेक्षा नव्हत्या पण तिने लगेच टेक्स्ट करून अॅव्हेलेबल माणुस येऊ शकतो पण २ तासाने असे सांगितले , ओके म्हणण्या शिवाय पर्यायच नव्हता !
तब्बल २ तास होते त्या रेस्क्यु व्हॉलेन्टिअरला यायला.. तोवर तो असणार का तिथे ?
मिनव्हाइल नवर्याला त्या सापाची डार्क ब्राउन शेपुट कॅबिनेट मधून बाहेर येतेय असे दिसले , मलाही काहीतरी वळवळ त्या कॅबिनेटच्या बारीक फटीतून दिसली.. फार क्रीपी दृश्य होते !
आम्ही पुन्हा दबा धरून बसलो.. पण आमच्या पावलांचा आवाज झाला कि हा पठ्ठ्या पुन्हा कॅबिनेटच्या भोकात जायचा !
शेवटी ४ वाजता एकदाचा 'स्टिव्हन' नावाच्या व्हॉलेंटिअरचा फोन आला, अर्ध्या तासात येतो म्हंटला !
तोवर त्याने आधी फोनवर सापाचे वर्णन विचारले आणि पॉसिबल ब्रीडचा हा फोटो पाठवला :

(क्रमशः)
पुढे : भाग शेवटचा
बाबो ! लयच डेन्जर सिच्युएशन
बाबो ! लयच डेन्जर सिच्युएशन !
(बाय द वे किचन रिमॉडेलिन्ग झक्कास झालय )
सापाचा चेहरा रीना रॉय सारखा
सापाचा चेहरा रीना रॉय सारखा दिसतोय.
स्वतः शोधाशोध केली म्हणजे
स्वतः शोधाशोध केली म्हणजे शूर आहात की!
डीजे आता सव्वीस भागांमधे
डीजे आता सव्वीस भागांमधे लिहू नकोस म्हणजे झाले
ते ओपनिंग बंद करण्याबरोबर बॅकयार्डसाठी रीट्रॅ़ट होणारा दरवाजा करून घे बरं.
'तो' कॅबिनेट मधे कसा घुसला ही खरच मिस्टरी आहे
बापरे! डायरेक्ट घरात ! सो
बापरे! डायरेक्ट घरात ! सो स्केअरी!
आम्ही एकदा कँपिंगला ट्रेल वॉक करत असताना दिसलेला असा काळा डिझायनर साप! एवढी भिती वाटलेली. खूप जवळून बघितला होता तेव्हा.
बादवे किचन एकदम देखणं, स्पॉटलेस आहे. भांडी पण चकाचक आहेत
नवर्याने हिंमत करून हळुच ते
नवर्याने हिंमत करून हळुच ते दार उघडलं, दोघांनी सगळे बळ एकवटले ,>>>
मग धीर करून ती दोन्ही कॅबिनेट्स आधी रिकामी केली>>> यासाठी तुम्हाला दंडवत!
(माझ्या सासर्यांनी एक बारकं पिल्लू आमच्याच बागेत काठीने उचलून पटकन प्लास्टिकच्या कॅरी बॅगमधे पकडून लगेच ती बॅग बंद केली होती. मग एकावर एक २ बॅग्स लावून ते बंद केलं होतं आणि ते तसलं पार्सल मी गाडीत पायाशी ठेवून कात्रजच्या सर्पोद्यानात नेलं होतं, घरापासून साधारण ४ किलोमीटर. म्हणजे नवरा गाडी चालवत होता, मी शेजारी बसून लक्ष ठेवून होते. हे आता भयंकर वाटतंय आठ्वलं तरी. बिनविषारी होता पण तो साप)
बाप रे…घरात साप!
बाप रे…घरात साप!
पुढचा भाग लवकर लिहा…
डीजे आता सव्वीस भागांमधे लिहू
डीजे आता सव्वीस भागांमधे लिहू नकोस म्हणजे झाले Happy
ते ओपनिंग बंद करण्याबरोबर बॅकयार्डसाठी रीट्रॅ़ट होणारा दरवाजा करून घे बरं.
<<
हाहाहा नाही, एकाच भागात लिहिणार होते , इतक्या इमेजेस अपलोड केल्या कि स्क्रीन हँग होतोय , बरेचदा असं झालं म्हणून २ भाग स्प्लिट केले, मग झाले पोस्ट !
बहुतेक पुढच्या भागात होतील २६ तास , संपेल
प्रज्ञा९,
बापरे, साप घेऊन गाडीवर ?
दिपांजली, क्रेझी अनुभव. पुढे
दिपांजली, क्रेझी अनुभव. पुढे कसा पकडला, उत्सुकता लागली आहे.
माझ्या पहिल्या नोकरीत कंपनीच्या बसमध्ये बॅग ठेवण्याच्या रॅकवर साप निघाला होता तो अनुभव विसरणे जन्मात शक्य नाही.
अरे देवा, किती चॅप्टर्समध्ये
अरे देवा, किती चॅप्टर्समध्ये येणारे ही गोष्ट आणि मारधाड आहे का फार?
साप असताना तुम्ही ते सगळं रिकामं केलंत म्हणजे धन्यच आहे.
ओह्, वाचायला थ्रिलिंग अनुभव,
ओह्, वाचायला थ्रिलिंग अनुभव, अनुभवताना भयंकर!
बापरे, भलतंच थ्रिलिंग आहे हे.
बापरे, भलतंच थ्रिलिंग आहे हे. पटपट लिही गं.
थ्रिलिंग.
थ्रिलिंग.
पुढचा भाग लवकर लिहा.
बाकी ते "लेझी सुझॅन" म्हणजे काय ते फोटोसकट समजावलं ते बरं झालं. माझ्या ज्ञानात भर पडली.
वाचताना सारखं लेडी सुझॅन वाचलं जात होतं.
किचन एकदम देखणं, स्पॉटलेस आहे. भांडी पण चकाचक आहेत>>>+१
थरारक अनुभव. पुढच्या भागाची
थरारक अनुभव. पुढच्या भागाची उत्सुकता आहे .
किचन सुरेख आहे. लेडी सुझन ला लेडी सुझन नाव का आहे ? एनी स्पेसिफिक रीज़न ?
हा लेखही आवडला.
हा लेखही आवडला.
अतिथी तुम कब जाओगे ?
चांगले धैर्य दाखवले.
चांगले धैर्य दाखवले.
<< किचन सुरेख आहे. लेडी सुझन
<< किचन सुरेख आहे. लेडी सुझन ला लेडी सुझन नाव का आहे ? एनी स्पेसिफिक रीज़न ? >>
------- आळस शोधाची जननी आहे.
घरकाम करणारी मेड (बहुधा सुझनच असते) आळशी असते असा (गैर ) समज म्हणून लेझी. नावामागे इतरही कहाण्या आहेत.
जागेच्या प्रत्येक इंचासाठी लढाई आहे मग उपलब्द जागेचा जास्तित जास्त वापर कसा करायचा ? या गरजेतून लेझी सुझनचा किचन मधे वापर सुरु झाला. किचन मधला कोपरा अशी जागा असते तिला कुठे लपवायचे ? सिंक तिथे ठेवला तर तेव्हढी शोभा येत नाही. कॅबिनेट ठेवली तर शेजारच्या कॅबिनेटच्या दरवाजाशी सततची खडाजंगी.
मग वर चित्रात दाखविल्या प्रमाणे ३६० डिग्री मधे गोलाकार फिरणारे टर्न टेबल आत मधे install करायचे आणि छोटे खानी bi-fold दरवाजा. छोट्या जागेतून प्रवेश करायचा, टेबल हवे तसे फिरवायचे, सबंध कोपर्याचा १०० % वापर करता येतो आणि कुणाशीही खडाजंगी होत नाही.
थ्रिलिंग.
थ्रिलिंग.
पुढचा भाग लवकर लिहा.
थ्रिलिंग, यस
थ्रिलिंग, येस 👍
धन्यवाद उदय
धन्यवाद उदय
थँक्स सगळ्यांना, पुढचा आणि
थँक्स सगळ्यांना, पुढचा आणि शेवटचा भाग पोस्ट केलाय !
व्हेरी थ्रिलिंग.
व्हेरी थ्रिलिंग.