Submitted by 'स्वच्छंदी on 29 May, 2026 - 13:58
पापणी भिजवून गेलेले
स्वप्न.....दारातून गेलेले
वाट पाहत थांबलो आपण
दूर गेले.. ऊन गेलेले
थांबवू नाही शकत कोणी
बाण शब्दातून गेलेले
केवढे होते गुलाबी ना?
नाव ओठातून गेलेले
सौख्य झाले दूर वेळेला
दुःख कुरवाळून गेलेले
जात नाहित आठवांमधुनी
लोक हृदयातून गेलेले
जन्म करणारच सुगंधी ना?
(मोगरे जवळून गेलेले)
*: महेश मोरे (स्वच्छंदी)*
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
तुम्हाला कल्पना आहे की नाही
तुम्हाला कल्पना आहे की नाही हे माहीत नाही, पण दुसरा शेर अक्षरशः अप्रतिम झाला आहे. गेलेल्या उन्हाची वाट पाहत होतो की गेलेले ऊन (म्हणजे सावलीही) दूर गेले आणि आपण त्याची वाट पाहत राहिलो / थांबलो... अतिशय गुंतवणारा शेर! की ज्यांच्या आयुष्यातील ऊन गेलेले आहे त्यांची आपण वाट पाहत होतो! व्वा
एक नोंदवतो: झालेले, गेलेले, दिसलेला, म्हंटलेली ही रूपे जर अनुक्रमे झाले होते, गेले होते, दिसला होतास, म्हंटली होतीस या अर्थाने वापरली जात असतील तर ते (फक्त माझ्यापुरते तरी) चुकीचे आहे. (तसे काही ठिकाणी झाले आहे असे वाटते)
शेवटून दुसरा शेरही छान!
शेवटचा मोगर्याचा शेर सुरेख
शेवटचा मोगर्याचा शेर सुरेख सुरेख
मनःपूर्वक धन्यवाद बेफिकीरजी..
मनःपूर्वक धन्यवाद बेफिकीरजी..
आपणास खूप आवडलेला शेर लिहून झाल्यावर इतर शेरांना चुचकारण्यात खुद्द माझ्याकडूनच थोडासा दुर्लक्ष झालेला..
तुम्ही तो पुन्हा उजेडात आणताय...
आणि आता तो मलाही खूप आवडलाय..
बाकी सूचनेकडे बारकाईने पाहतो आहे...
धन्यवाद सामो अजून छान लिहिन
धन्यवाद सामो
अजून छान लिहिन
>>>>जन्म करणारच सुगंधी ना?
>>>>जन्म करणारच सुगंधी ना?
(मोगरे जवळून गेलेले)
आय कुड आयडेंटिफाय.