Submitted by अजिंक्यराव पाटील on 9 April, 2026 - 16:43
गेल्या काही वर्षांत अनेक अशा गोष्टी घडल्यात, ज्यामुळे आपण या देशाचे नागरिक आहोत याची लाज वाटावी, जेव्हा आपण सर्वच लोक भारतातील न्यायव्यवस्था, राजकारणी, प्रशासन मूर्खात काढले गेलोय, फसवले गेलो आहोत. इथं फक्त अश्या घटना लिहिणं अपेक्षित आहे. कुणालाही धरून झोडपणे हा उद्देश नाही, फक्त हतबलता व्यक्त करण्यासाठी हा धागा आहे.
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
वृक्षवल्ली आम्हा सोयरी, वनचरे
वृक्षवल्ली आम्हा सोयरी, वनचरे... असे म्हणणारा संत तुकारामांचा महाराष्ट्र राहिलेला नाही.
पुण्यातही वृक्षतोड होत आहे
पुण्यातही वृक्षतोड होत आहे मुख्य रस्त्यांवरती दांडेकर पूल ला जोडणारे रस्त्यांवर वृक्षतोड दिसते.
वृक्षतोडीचा एक कालावधी असतो
वृक्षतोडीचा एक कालावधी असतो म्हणे .modus operandi.गुरुवारी का शुक्रवारी ऑर्डर काढायची आणि शनिवार रविवारी काम उरकून टाकायचं .
न्यायाधीश भारतातल्या बेरोजगार
न्यायाधीश भारतातल्या बेरोजगार तरुणांना झुरळ म्हणत आहेत. चाकणकर भगिनी स्वत: खरातबाबासोबत गुवाहाटी फिरून आल्याचं उघड झालं. नसरापूर-एका ६५ वयाच्या नीच माणसाने ३ वर्षाच्या मुलीचा बलात्कार करून खून केला- हि बातमी प्रसिद्ध झाल्यावर असे अनेक प्रकार अजून अजून उघड झाले, जसे कि बलात्काऱ्यांची लाटच अली असावी.. थोडा अभ्यास केल्यावर लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे नसरापूर नंतर या प्रकरणांची दाखल मीडिया जास्त प्रमाणात घ्यायला लागली. लाट बलात्काऱ्यांची नाही तर बातम्यांची आली- प्रसिद्धीच्या आणि TRP जास्तीत जास्त encash करण्यापुरती रिपोर्टींग .
अरेच्च्या, भारतातल्या
अरेच्च्या, भारतातल्या विकासाबद्दल इथं काहीच नाही लिहिलं गेलं अजून..
नीट पेपरफुटी: भारताच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा. महाराष्ट्र याही प्रकरणात आघाडीवर आहे.
जितू मुंडा ओडिसा : याची बहीण वारली, तिच्या नावे बँकेत अडकलेल्या २०००० रुपयांसाठी बँकेने death certificate मागितले, निरक्षर जितूला कुणीही मार्गदर्शन केले नाही, त्याने बहीण मेल्याचा पुरावा म्हणून तिचे पुरलेले कलेवर उकरून काढून खांद्यावर टाकले आणि बँकेत पोहचला.
Porsche प्रकरण पुणे: जामिनावर सुटलेल्या अगरवाल परिवाराकडून जोरदार पार्टी. घटनेनंतर पहिल्या 4 दिवसात या परिवाराने न्यायव्यवस्थे वर अक्षरश: बलात्कार केला होता.. आता केस सुरू आहे आणि अजून काय काय करतील काही सांगता येत नाही.
दापोडी आणि हडपसर मध्य विषारी
दापोडी आणि हडपसर मध्य विषारी दारूने २५ बळी.
प्रशासन म्हणतय १५.
अनेक ठिकाणी हातभट्ट्यांवर कारवाई होताना दिसत आहे, लोकांना अटक पण होत आहे तरीही पुरवठा सुरळीत चालू आहे असं आजच्या पेपरमध्ये वाचलं
विषारी दारु विकणार्या
विषारी दारु विकणार्या लोकांची घरं बुल्डोझर लावुन पाडली!! असा न्याय हवा!! जय फवीसभाऊ!!
डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत
डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत रामरहीम सिंग याला नुकतीच पुन्हा एकदा पॅरोल मंजूर झाली आहे.
२०१७ मध्ये शिक्षा झाल्यापासून आतापर्यंत त्याला एकूण १६ वेळा पॅरोल (किंवा फर्लो) मिळाली आहे.
या सर्व सुट्ट्यांची एकूण बेरीज केली, तर तो आतापर्यंत ४४० पेक्षा जास्त दिवस बाहेर राहिला आहे.
सर्वसामान्य गुन्हेगाराबाबत न्यायालय एवढ औदार्य दाखवते का

पैशाने न्याय विकत घेतल्यासारखं आहे हे
त्या राम रहीम कडे सत्ताधारी
त्या राम रहीम कडे सत्ताधारी लोकांची काही गुपित असू शकतील का?
असली तर त्याला जिवंत ठेवलं
असली तर त्याला जिवंत ठेवलं असतं का? एपस्टीन झाला असता त्याचा.
सलमान खानलाही अर्ध्याच दिवसात
सलमान खानलाही अर्ध्याच दिवसात bombay High कोर्टा कडून जामीन मिळालेला. सामान्य माणसाला हे शक्यच झालं नसतं.
मला नाही वाटत भारताची
मला नाही वाटत भारताची व्यवस्था त्रयी पक्षी कार्यकारी, विधिमंडळ आणि न्यायपालिका इतकीही जास्त सडलेली आहे, बहुसांस्कृतिक, बहुभाषिक, सगळेच बहू असणाऱ्या देशात जितकी ढिसाळ असावी तितकी नक्कीच आहे आणि एक ७५-७६ वर्ष जुने (का नवतरुण) गणराज्य असावे तितकी स्खलनशील आहे. जगातील इतर लोकशाह्या जशा सुरू आहेत तसेच थोड्याबहुत अंतराने आणि लोकल फ्लेवरिंगने भारत पण सुरू आहे असे वाटते. आपल्याकडे कायद्यातून पळवाट काढायला डोके खर्च करणारी जनता पण तितकीच आहे. पैसा फेक तमाशा देख हे तर व्यवच्छेदक लक्षण म्हणता येईल पण एकंदरीत फारच सडलेली आहे अन् पूर्ण भारताचे गोथम शहर झाले असे/ बॅटमॅन यायला हवाच इतपत पण वाटत नाही तूर्तास तरी.
औरंगाबाद जवळ धाड टाकायला
औरंगाबाद जवळ धाड टाकायला गेलेल्या एफडीच्या पथकातल्या महिला अधिकार्यांसह सर्वांवर जीवघेणा हल्ला. अंगावर स्कॉर्पिओ घालण्याचा प्रयत्न. गुंडांच्या म्होरक्याने गोळ्या घाला सर्वांना असे साथीदारांना ओरडून सांगितले. कायदा सुव्यवस्थेचे तीनतेरा.
https://www.youtube.com/watch?v=mfU98kYrxgw
Pages