
काजू कतली
काजू कतली ही सर्वांची आवडती मिठाई आहे त्यामुळे कोणाकडे जाताना खाऊ म्हणून ही बहुतेक वेळ काजू कतलीच नेली जाते. पण जनरली घरी कोणी फार करत नाही, बाजारातूनच विकत घेतली जाते.
आमच्या घरात काजूचा खूप मोठा पॅक कोणीतरी खाऊ म्हणून आणला होता पण घरातले मेंबर फार खात नव्हते म्हणून मी ते काजू वापरून काजू कतली करून बघण्याच ठरवलं. यू ट्यूब वरील अनेक व्हिडिओ मधून थोडं ह्यातलं थोडं त्यातलं घेत रेसिपी फायनल केली. आणि विशेष म्हणजे जास्त काही त्रास न होता विनासायास मस्त झाली म्हणून इथे लिहून ठेवत आहे.
साहित्य
एक वाटी काजूची मोकळी पावडर (पल्स मोडवर केलेली आणि चाळून घेतलेली )
अर्धी वाटी साखर किंवा आवडीनुसार कमी जास्त
पाव वाटी पाणी.
एक चमचा तूप
सजावटीसाठी चांदीचा वर्ख वगैरे ऐच्छिक.
बटर पेपर किंवा थोडं तूप लावून ग्रीस केलेला जाड प्लास्टिक चा कागद
एका पॅन मध्ये साखर घेऊन त्यात पाणी घालून मंद गॅसवर एक तरी पाक करून घ्यावा. त्यात एक चमचा तूप घालावे. नंतर त्यात काजूची पावडर घालून मंद गॅसवर ढवळत राहावे. पाच सात मिनिटे झाली की थोडं मिश्रण चमच्यात घेऊन गार करावे आणि हातावर त्याची बोटाला न चिकटणारी गोळी होतेय का ते पहावे. ती झाली की गॅस बंद करावा.
थोडावेळ पॅन मध्येच ढवळत राहावे, मिश्रण साधारण घट्ट झाले की बटर पेपर वर काढून घेऊन वर दुसरा बटर पेपर ठेवून हाताने ते चांगले मळावे. मिश्रण गरम असल्याने जपून मळावे. चार पाच मिनटात काजू मधलं तेल रिलीज होऊन त्याचा मऊसर गोळा बनतो.
आता लाटण्याने ते गोळा लाटावा , चांदीचा वर्ख लावावा (मी लावला नाहीये ) आणि शंकरपाळ्याच्या आकारात वड्या कापाव्यात. वड्या सारख्या कापता याव्यात म्हणून पट्टीचा उपयोग करू शकता.
अर्ध्या एक तासात वड्या तयार होतात. बटर पेपर मुळे अगदी नीट सहज निघतात.
विकत मिळते तशी काजू कतली तयार.
हा फोटो
१) तुकडा काजू ही घेऊ शकता पण मी अख्खेच घेतले होते. ओलसर टॉवेलने पुसून घेऊन मग पंख्याखाली ठेवले होते कोरडे होण्यासाठी.
२) काजूची पूड मोकळी करायची आहे, एका वेळी थोडे काजू मिक्सर च्या भांड्यात घालून पल्स मोड वर फिरवावे म्हणजे तेल बाहेर येणार नाही काजू मधलं आणि पुड मोकळी होईल. तसेच पूड एक सारखी होण्यासाठी ती चाळून घेणं ही आवश्यक आहे.
३) ही मिठाई फार गोड नसते त्यामुळे निम्मी साखर ठीक्क होते, तरी आवडीनुसार साखर घालावी.
४) तो गोळा गरम असताना मळणे ही स्टेप स्किप करू नका. त्याने काजू मधलं तेल रिलीज होतं आणि तिला वडीच texture न येता काजू कतलीचं texture येतं म्हणून.
५) चांदीच्या वर्खाशिवाय काजू कतली च्या सजावटीला पूर्णत्व नाही खरं म्हणजे. पण काहीना वर्ख आवडतो , काही ना नाही. घरी केल्यास लावायचा की नाही आपल्या हातात असतं. आवडत असल्यास लावावा. .
६) मी पहिल्यांदाच करत होते , कशी होईल शंका होती म्हणून वर्ख आणला नव्हता, म्हणून मग केशराच्या दुधाचे दोन थेंब उडवले सजावट म्हणून.
मावानी केक सोडून बाकी पारसी
रेसिपी छान आहे. करून बघेन.
स्वस्ति, ललिता, स्वाती, मृ,
स्वस्ति, ललिता, स्वाती, मृ, अनया धन्यवाद...
निग्रह मोडायचा नाही >> ललिता,
स्वाती, तशी ही छानच होत असेल. कारण बदाम पेढे खूपच छान होतात.
बदाम बतली
बदाम बतली
बदाम बतली >>>
बदाम बतली >>>
एक नंबर!
एक नंबर!
काजूकतली स्वतः घरी कधी करायचा विचार केला नव्हता. आता यापद्धतीने करून बघेन. मूळ पाकृ व चर्चा आवडली. करताना नक्की उपयोग होईल.
बदाम बतली
बदाम बतली

वामन राव धन्यवाद..
सुरेख . प्रचंड आवडते काजू
सुरेख . प्रचंड आवडते काजू कतली आमच्या कडे सगळ्यांनाच. आता करणं आलं.
तुझ्या ६ व्या टीपेवर विश्वास नाही हं माझा. पहिल्यांदाच करताना एवढ्या सही झाल्यात.
मस्त अगदी सुरेख दिसताहेत काजु
मस्त अगदी सुरेख दिसताहेत काजु कतल्या. मला तर केशर काडीची सजावट वर्खापेक्षा जास्त आवडली. मी ही वापरीन पुढच्या वेळी. माझ्या दोन्ही मुलांना काजु कतली खुप आवडते त्यामुळे मी दरवर्षी दिवाळीत करते.
मनिमोहोर ही टीप शेअर करतेय पण ती तुमच्या साठी नाही. कारण तुमच्या कडे घरचे , क्वालिटी ची खात्री असलेले काजु असतात. आमच्या कडे ती सोय नाही. काजु बघुनच त्यांच्यावरील धुळीचा अंदाज येतो. ही परिस्थिती ज्यांच्या कडे आहे त्यांच्यासाठी ही टीप:
काजु कतली मध्ये तीन मुख्य घटक असतात ज्यांचे प्रमाण सांभाळणे आवश्यक असते काजुपुड , साखर आणि पाणी. त्यामुळे काजु धुवुन घेतले की पाण्याचे प्रमाण वाढुन टेक्शचर बिघडते. म्हणुन मी साखर + पाणी (पाक) आणि काजु ह्याऐवजी काजु + पाणी आणि नुसती साखर हे पर्म्युटेशन वापरते. काजु भिजवुन अगदी मउ झाले की तीन चार वेळा पाणी बदलुन स्वच्छ धुवून घ्यायचे आणि चाळणीवर ओतून पाणी निथळून घ्यायचे. मग काजु आणि साखर (पिठीसाखर नाही आपण रोज वापरतो ती साखर) डायरेक्ट मिक्सर मधून बारीक करायचे. साखरेचे क्रिस्टल्स काजु ची मऊ पेस्ट तयार करायला मदत करतात. मग हे मिश्रण कढईत घालून कडा सुटेपर्यंत आपले की जरा गार झाल्यावर त्यात चमचाभर तुप घालून चांगले तिंबायचे आणि मग लाटुन वड्या कापून घ्यायच्या. ह्या पद्धतीचा दुसरा फायदा असा की पाक करायचा नसल्याने चुकण्याचा स्कोप बराच कमी होतो.
सुंदर दिसत आहेत काजू कतल्या.
सुंदर दिसत आहेत काजू कतल्या. काजू भिजत घालून, पिठीसाखर वापरून केलेल्या खाल्ल्या आहेत.
पर्णीका
पर्णीका
कोडे सुटले !
काजू धुणे हे अहो आई करतात. मग मिक्सरला. त्यात क्रिस्टल साखर + काजू असे फिरवतात ( साखरेची पिठी करत आहेत असा चुकीचा समज होता माझा)
सेम टू सेम. 👍
धन्यवाद अनिंद्य. माझ्या
धन्यवाद अनिंद्य. माझ्या प्रयोगांत मला असे लक्षात आले की काजु वाटताना क्रिस्टल शुगर घातली तर अजीबात पाणी घालावे लागत नाही. मग वेळ आणि गॅस दोन्ही वाचतात.
पर्णीका,
पर्णीका,
धन्यवाद. बिनपाकाची पाकृ सांगितल्याबद्दल.
मग वेळ आणि गॅस दोन्ही वाचतात.>>>>>> सध्या गॅसबचत महत्त्वाची
@पर्णीका ,
@पर्णीका ,
नेहमीच्या साखरेच्या वापराची pro-tip आवडली..
पार्णिका, नवीन धागा काढून
पार्णिका, नवीन धागा काढून प्रमाण आणि फोटो युक्त सविस्तर पाकृ येऊ देत.
धनुडी, सहावी टिप नावाला नाही
धनुडी, सहावी टिप नावाला नाही. खरच खूपच सोपी आहे.
पर्णिका, मस्त आणि खूप सोपी वाटतेय रेसिपी पाकाची रिस्क नसल्यामुळे. मी पण एकदा अश्या करून बघीन.
Pages