मराठी अभ्यास केंद्रातर्फे मराठी नववर्ष स्वागतयात्रा

Submitted by भरत. on 18 March, 2026 - 03:22
ठिकाण/पत्ता: 
संयुक्त महाराष्ट्र दालन, दादर ते कामगार मैदान, परळ यात्रेत सहभागी होण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर जाऊन अर्ज भरा. अर्जाची लिंक : tinyurl.com/mt4ds6cb https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfS3qsbR8EcjW5CkzqD1QLa24Ppel3uMl5F6i4OxbWeP27WaQ/viewform

मराठी शाळा, रोजगार आणि घरांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी ‘मराठी नववर्ष स्वागतयात्रा’
महाराष्ट्रधर्म आणि मराठीकारणासाठी मराठी अभ्यास केंद्राचे नवे पाऊल, गुढीपाडव्याच्या निमित्ताने खास आयोजन
मुंबई : गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर निघणाऱ्या पारंपरिक स्वागतयात्रांना केवळ एकधार्मिक स्वरूप न राहता त्या ‘मराठी नववर्ष’ म्हणून सर्वसमावेशक पद्धतीने साजऱ्या व्हाव्यात, या उद्देशाने मराठी अभ्यास केंद्राने ‘मराठी नववर्ष स्वागतयात्रा’ आयोजित केली आहेत. गुरुवार दिनांक १९ मार्च रोजी सकाळी ८ वाजता निघणारी ही स्वागतयात्रा केवळ शोभायात्रा नसून मराठी माणसाच्या कळीच्या प्रश्नांचे प्रतिनिधित्व करणारी एक ‘अभिव्यक्ती’ असेल. ही यात्रा कोणत्याही एका धर्माची नसून ‘मराठी नववर्ष स्वागतयात्रा’ आहे. सर्व जाती-धर्मातील मराठी भाषिकांनी आपापले बॅनर घेऊन यात सहभागी व्हावे आणि आपण मराठी आहोत हे अभिमानाने सांगावे, हेच आमचे आवाहन आहे, अशी माहिती केंद्राचे अध्यक्ष डॉ. दीपक पवार यांनी दिली. या पत्रकार परिषदेला ज्येष्ठ भाषाभ्यासक आणि भाषा सल्लागार समितीचे सदस्य डॉ. प्रकाश परब हे ही उपस्थित होते.

यंदाच्या स्वागत यात्रेमध्ये मराठी अभ्यास केंद्राने तीन महत्त्वाच्या विषयांवर विशेष भर दिला आहे. त्यामध्ये बंद पडत चाललेल्या मराठी शाळा, नोकरी-व्यवसायात मराठी माणसाला मिळणारे दुय्यम स्थान आणि रोजगाराच्या संधी, तसेच मुंबईसारख्या शहरात घरांच्या बाबतीत मराठी माणसाची होत असलेली कोंडी या मुद्द्यांचा समावेश आहे. या तीनही विषयांचे दर्शन घडवणारा एक विशेष ‘चित्ररथ’ यात्रेचे प्रमुख आकर्षण असणार आहे.
स्वागत यात्रेचा मार्ग
ही स्वागत यात्रा दादर येथील संयुक्त महाराष्ट्र दालन (शिवाजी पार्क) येथून सुरू होणार आहे. त्यानंतर मीनाताई ठाकरे पुतळा, सेना भवन, प्लाझा, टिळक पूल, दादर टी टी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गे हिंदमाता आणि आर. एम. भट कॉलेजमार्गे ही यात्रा कामगार मैदान येथे पोहचेल. संयुक्त महाराष्ट्र दालन आणि कामगार मैदान या महाराष्ट्राच्या दोन मानचिन्हांना वंदन करणारी ही स्वागतयात्रा आहे. यात्रेच्या शेवटी कामगार मैदानावर मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष डॉ. दीपक पवार यांचे मार्गदर्शनपर भाषण होणार आहे.

माहितीचा स्रोत: 
मराठी अभ्यास केंद्र https://www.facebook.com/marathiabhyaskendra
विषय: 
प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
Wednesday, March 18, 2026 - 22:30 to Thursday, March 19, 2026 - 00:30
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

या नववर्ष स्वागतयात्रेची क्षणचित्रे मराठी अभ्यास केंद्राच्या फेसबुक पेजवर दिसतील.
https://www.facebook.com/marathiabhyaskendra

कोणत्याही संघटनेचे वा राजकीय पक्षाचे पाठ बळ नसताना या स्वागतयात्रेला ज्या संख्येने लोक आले होते, ते पाहून बरे वाटले. यात तरुणांचे प्रमाण अधिक होते, हे विशेष.
कामगार मैदानात केलेली खुर्च्यांची व्यवस्था चांगलीच अपुरी पडली.

परत येताना गोरेगावात अखिल हिंदू समाजातर्फे एका शोभायात्रेचा बॅनर / फ्लेक दिसला. त्यावर विक्रम संवत २०८३ साठी शुभेच्छा दिलेल्या दिसल्या. कालनिर्णयानुसार विक्रम संवत २०८३ यंदाच्या दिवाळी पाडव्याला सुरू होईल. पण हिंदी भाषेतील अनेक संकेतस्थळे , ज्योतिषी, अगदी आजतक आजपासून विक्रम संवत २०८३ सुरू झाल्याचे सांगत आहेत.

मी मराठी अभ्यास केंद्राच्या युट्यूब चॅनलवरचे बहुतेक व्हिडिओ पाहिले आहेत.
डॉ. दीपक पवार यांच्या विचारांचा प्रचार/प्रसार होतो आहे हे वाचून आनंद झाला!

मस्तच उपक्रम / यात्रा! फेसबुक बघून आले, डोनेशन साठी क्यू आर कोड आहे हे बरं आहे. गर्दी भरपूर होती, म्हणजे सहभाग चांगला दिसतोय. हातातल्या पोस्टर वर जे लिहिलेय ते उलटे दिसतेय फोटोत, मिरर इमेज आली आहे. गंमत! Happy
शुभेच्छा!