निरंजन टकलेंचा व्हिडीओ खूप दिवसांनी बघितला. ते काँग्रेसमन आहेत. त्यामुळे ते जे सांगतात त्याची फॅक्ट चेक करावी लागते.
त्यांनी इराणी प्रेसचं एक ट्वीट शेअर केलं आहे ज्यात असे म्हटले आहे कि अमेरिका इस्त्राएलला साथ देणार्या राष्ट्रांना विशेषतः भारताला, ज्याने नुकताच इराणला धोका दिला, खाडीतून तेल नेता येणार नाही. त्यांनी असंही सांगितलं कि भारतात गोदी मीडीया जे सांगतोय ते म्हणजे इराणने भारटाला दोस्त म्हटलेय आणि तेल न्या म्हटलेय हे सगळे बकवास आहे. तसेच एलपीजी सिलेंडरचा तुटवडा आणि इराण युद्धाचा काही संबंध नाही. कारण एलपीजी आपण आयात करत नाही. हा काळाबाजार आहे.
हे सर्व दावे गंभीर असल्याने फॅक्ट चेक केली. तर इराणी प्रेसचं हँडल इराणचं अधिकृत नसलं तरी ते बनावट नाही. म्हणजे इराणी प्रेस आहे हे स्पष्ट आहे. फॅक्ट चेक साठी जेमिनी, क्लाऊड एआय, ग्रोक आणि चॅटजीपीटीची मदत घेतली. त्यांनी चेक करताना ज्या ज्या साईटस रिफर केल्या त्या पाहिल्या.
सर्वच एआय ने भारत सरकारने ही न्यूज खोटी असल्याचे सांगितले आहे ही माहिती पुरवली. तेव्हां ए आय ला भारत सरकारच्या दाव्यांवर न जाता हे हँडल बनावट आहे का हे विचारले. तसेच इराणने अधिकृतरित्या भारत दोस्त आहे, त्यांना तेल नेऊ देऊ असा दावा केला आहे का हे विचारले.
तर असे दावे इराणकडून केलेले नाहीत. उलट भारताच्या दाव्यांवर इराणने अजून काहीही अधि़कृतपणे म्हटलेले नाही असे म्हटले आहे. इराणी प्रेस हा अधिकृत मीडीया नाही पण इराणमधे राजवटीच्या संमतीशिवाय भारताबद्दल असे काही म्हटले जाण्याची शक्यता नाही. म्हणजे टकलेंचा एक दावा कि इराणमधे भारताने धोका दिला ही भावना आहे हे सत्य साबीत झालं.
बाकी एलपीजी भारतात बनतो का हे मला माहीत नाही. सगळेच दावे तपासत बसण्याइतका वेळ नाही. इराणकडून भारताकडे खरोखर जहाजे निघालीत या दाव्याच्या पुष्ट्यर्थ रॉयटर, बीबीसी किंवा अन्य न्यूज एजन्सीकडून काही समजले नाही. भारतात अनेक बनावट न्यूज एजन्सी असल्याने त्यावर विश्वास ठेवत नाही. बाकीच्या एकतर या बाजूला किंवा त्या बाजूला आहेत. खर्या बातम्या मिळण्याचा हक्क केव्हांच संपुष्टात आलेला आहे.
या सर्व पास्र्ह्वभूमीवर एक गोष्ट मात्र वारंवार मनात येते.
आंतरराष्ट्रीय संबंध हे काही " ये दोस्ती हम नही तोडेंगे" " मेरे दोस्त , तुम्हारी मौत का बदला लूंगा. मै आ रहा हूं गब्बर" असे नसतात. भारताचे धोरण हे अलिप्तवादाचे आहे. व्यापार कुणाशीही करा. पण इस्त्राएलला जाऊन जर मोदींनी " आम्ही इस्त्राएलच्या सोबत आहोत, इस्त्राएल आमची पितृभूमी आहे " असे दावे केल्याचे जे वृत्त आहे ते खरे असेल तर याची गरज होती का ?
अमेरिकेचे पिच्छलागू देशही आता आमेरिकेसोबत नाहीत. इतकेच काय अमेरिकेतही ट्रंपच्या या युद्धाबद्दल अनुकूल मत नाही. कुठल्याही देशाने इस्त्राएलचा दौरा या ताणतणावाच्या काळात केलेला नसताना मोदींनी अशा वेळेत इस्त्राएलला भेट दिली आणि युद्ध सुरू झाले. असे समजू कि इस्त्राएलने मोदींचा गेम केला.
पण इराणचे सर्वेसर्वा अमेरिकेकडून मारले गेले ( असे म्हणतात) हे वृत्त असतानाही भारताने अधि़कृत प्रतिक्रिया दिलेली नाही. इराणचं जहाज भारता जवळ हिंदी महासागरात डुबवलं. तरीही भारताची प्रतिक्रिया तत्काळ आली नाही. काही दिवसांनी नौदलाने प्रतिक्रिया दिली. पण वरिष्ठ पातळीवर कुणीच काही बोलले नाही.
थायलंडचे जहाज बुडवल्यावर मात्र भारताने प्रतिक्रिया तत्काळ दिली. या पास्र्ह्वभूमीवर भारत जुने मित्र गमावतोय का ? भारताचे अलिप्ततावादाचे धोरण जगाला मान्य आहे. आमच्या बाजूने नाही तर त्यांच्याही नाही हे स्विकारार्ह आहे. खरे तर तो शहाणपणा आहे. त्या धोरणाला तिलांजली दिली आहे का ?
इस्त्राएल आणि अमेरिका या देशांच्या प्रगतीचे कौतुक असले तरी या देशांची धोरणे कधीच आवडली नाहीत. सोशल मीडीयात अमेरिकाप्रेमी लोक लगेच खवळतात. पण आता सिद्धच झालेले आहे कि अमेरिका बदमाष देश आहे. तेल आखाती देशांचे, जमीन त्यांची पण तिथे ब्रिटन आणि अमेरिकेची दादागिरी आहे. इराणमधे अमेरिकाद्वेष का आहे ? कारण इराणच्या शहाने ब्रिटनच्या कंपन्यांना तेलाचा मुक्त परवाना दिला होता. ब्रिटनने तेल काढावे आणि विकावे. दुसर्या महायुद्धानंतर अमेरिका सर्वेसर्वा झाला. इराणमधे थोडा काळ लोकनियुक्त सरकार आले. शहा परागंदा झाला. त्या सरकारने छोट्याशा काळात तेलाचे राष्ट्रीयीकरण केले. त्या सरकारविरोधात बंडाळी घडवून पुन्हा शहाला बसवले. त्याने पुन्हा ब्रिटन आणि अमेरिकेला परवानगी दिली. इथून अमेरिकेची एण्ट्री झाली.
अमेरिकेने आखातातल्या तेलाचा व्यापार डॉलर मधे व्हावा अशी अट घातली. इथून पुढे डॉलरचा पेट्रोडॉलर झाला. डॉलर हे जागतिक चलन झाले ते याच गोष्टीमुळे. अयातुल्ला खोमेनी यांनी या विरोधात भाषणे दिली. इराणी जनतेतल्या असंतोषाला वाट दिली. खोमेनी लोकप्रिय झाल्यावर त्यांना देशाबाहेर काढले. ते इराकमधे गेले. तिथून भाषणे देत. त्यांच्या भाषणाच्या कॅसेटस इराणमधे येत. त्यांच्या नेतृत्वाखाली शहाची राजवट उलथली. खोमेनी यांनी सत्तेत येताच इस्लामिक कायदा लागू केला.
अमेरिकेने मग सद्दाम हुसेनला इराणच्या विरोधात उभे केले. सद्दाम हुसेनने दहा वर्षे युद्ध केले. त्यानंतर ही माझी चूक होती असे म्हटले. त्यानेही इराणकडून धडा घेत तेलाचे राष्ट्रीयीकरण केले. त्यामुले खवळलेल्या बुश पितापुत्रांनी इराकवर तेच आरोप ठेवले जे आज इराणवर ठेवलेत. त्या आरोपात तथ्य नव्हते हे यथावकाश सिद्ध झाले. मधल्या काळात इराक बेचिराख झाला. आता इराण बेचिराख होईल. सिरीया बेचिराख झाला आहे. हा प्रदेश इस्त्राएलच्या ग्रेटर इस्त्राएलचा भाग आहे हे विशेष.
आता व्हेनेझुएलात पण अमेरिकेने कारवाई केली. अजूनही काही लॅटिन अमेरिकन देश अमेरिकेच्या निशाण्यावर आहेत. व्हेनेझुएलात तर सरळ सरळ तेलासाठीच कारवाई झाली.
आता जर इराणने आखाती देशातून अमेरिकेला पळवून लावले आणि त्यांनी घातलेल्या अटींप्रमाणे आखातातून तेल घेण्यासाठी चिनी चलन द्यावे लागले तर चिनी चलन जागतिक चलन होईल. देशांना चीनचं चलन रिझर्व म्हणून बाळगावं लागेल. आज डॉलरचा जो फायदा अमेरिकेला मिळतो तो चीनला मिळेल. ते भारताला परवडणारे नाही. कारण मग चीन वाटेल ते निर्बंध घालू शकेल. या शक्यता आहेत. भविष्यवाणी नाही.
या पास्र्ह्वभूमीवर प्रो इस्त्राएल भूमिका योग्य वाटते का ?
( कुणीच प्रतिसाद देणार नाही ही भविष्यवाणी मागच्या धाग्यावर खरी ठरली. असा प्रतिसाद माझ्या वाट्याला आला हे भाग्यच. ज्यांचे या देशात वैयक्तिक इंटरेस्ट नाहीत, ज्यांच्या तेलाच्या खाणी नाहीत, पेट्रोकेमिकल्सच्या रिफायनईज नाहीत, अमेरिकेत ३०० बिलियन डॉलरची गुंतवणूक नाही, ज्यांना इराण, इस्त्राएल, अमेरिका खाऊ पिऊ घालत नाही अशा स्वतंत्र बुद्धीच्या भारतियांनी प्रतिसाद दिले तर काय हरकत आहे ?
)
By the way, आपल्या IFS
By the way, आपल्या IFS Officer. ex diplomat असलेल्या laser eyes परराष्ट्र व्यवहारमंत्र्यांना इराणच्या परराष्ट्रमंत्र्याकडून बरंच काही शिकण्यासारखं आहे.
मोदी या नावाने प्रॉब्लेम
मोदी या नावाने प्रॉब्लेम झालाय. चांदणे हा ट्रोल सोयीची वाक्ये कोट करून लोक मूर्ख आहेत अशा समजुतीने त्यांना अधिक मूर्ख बनवू बघत आहे. खर तर यामुळेच इतरांना या भानगडीत पडावेसे वाटत नाही. प्रशिक्षित ट्रोलशी वाद घालणे हे आमचे काम नाही. फिरून फिरून तेच तेच लिहिणे हा यांचा व्यवसाय धंदा आहे. आमचा नाही.
या ट्रोल ने माझे प्रतिसाद ओलांडत असा काही बनाव रचलाय की अधून मधून वाचणाऱ्यास वाटेल कि का गरीबाला छळतात.
गंमत म्हणजे नेमके प्रतिसाद स्कीप करून ट्रोल शी सहमत होणारे नग आणि नगी पण असतात.
सांगा बरं मी तुम्हाला कुठं
सांगा बरं मी तुम्हाला कुठं ट्रोल केलंय ते?
तुम्ही मला खेमेनीच्या भारतीय मुस्लिमांबद्दल काळजी असणारे संदर्भ मागितले, मी ते दिले. पण
इराणणे काश्मीर भरातपासून जाण्यापासून वाचवले, इराणणे UN मध्ये पाकिस्तानच्या विरोधात मतदान केले. याचे संदर्भ दिलेच नाहीत.
उलट आपली बहुतेक मत जुळतच आहेत. महिला अत्याचारचा मुद्दा तुम्ही पण मान्य केलंय. इराण विरोधात विनाकारण युद्ध चालू आहे हे मी पण लिहिलं आहे. तुमचं पण तेच मत दिसतय.
खेमेनी आणि शाळेवर झालेल्या हल्ल्यात भारताने प्रतिक्रिया द्यायलाच पाहिजे होती हे पण मी लिहिलं आहे. तुमचं पण तेच मत आहे.
फरक एक दोन ठिकाणी आहे. जसी की
मी मोदींची इस्राएल भेट चुकीची ठरवत नाही (कारण इस्राएल आपला दोस्त आणि खेमेणी ची भारत विरोधी ट्विट्स ) वेळ मात्र चुकीची आहे म्हणतोय. दुसरं म्हणजे इराणला आपण दगा वगैरे दिला नाही आणि नाही इराण मुळे काश्मीर वाचलं वगैरे.
एक दोन मुद्द्यावर तरी असहमती असणारच ना. नाही तर मग चर्चाच कशी होणार? मोदींच्या मन की बात सारखं होईल, ते म्हणतील तेच फक्त ऐकून घायच, उलट काही विचारायची सोय नाही.
मिस्टर ट्रोल, तुम्ही मला का
मिस्टर ट्रोल, तुम्ही मला का कोट करताय?
तुम्ही कोणते प्रतिसाद स्किप केले हे पाहिले तर कुणाला ही समजेल ना? तुम्हाला ते आयुष्यभर समजणार नाही. त्यावर वेळ का घालवायचा?
Delhi: Former Chief of Army
Delhi: Former Chief of Army Staff, Gen Manoj Pande (Retd.) says, "You know the biggest loss of supporting Israel? Our Indian army had always been trained to be a ethical force, the current situation is causing it to become an ethnic force. Mark my words, this situation is going towards a complete mutiny. We have all seen what is happening in Assam
पुढचं व्हिडियोत पहा
https://x.com/GlobalIJournal/status/2033264027279691956
General Manoj Pande (Retd.)
General Manoj Pande (Retd.) did not make these statements. The video you are referring to is an AI-generated deepfake.
The Press Information Bureau (PIB) Fact Check Unit and various news outlets have confirmed that the video was digitally manipulated to falsely attribute these remarks to the former Chief of Army Staff. The original footage was taken from an event in New Delhi on March 14, 2026, where General Pande was actually discussing the need for the Indian armed forces to be "future-ready" to handle modern security challenges
मी राजकारणावर येथे टिप्पणी
मी राजकारणावर येथे टिप्पणी करत नाही
पण पूर्व लष्करप्रमुखांना यात ओढण्यात आले आहे त्यास्तव वस्तुस्थिती निदर्शनास आणण्यासाठी लिहिले आहे.
सर्जन कमांडर सुबोध खरे ( निवृत्त)
ओह. माहितीबद्दल धन्यवाद
ओह. माहितीबद्दल धन्यवाद सुबोध खरे. ए आय पुढे काही खरं नाही.
आजच्या घडामोडी
आजच्या घडामोडी
एकट्या पडलेल्या ट्रंप यांना सहकार्य करण्यास ऑस्ट्रेलिया, जपानसहीत चार बड्या राष्ट्रांचा नकार.
नाटो देशांनी अमेरिकन दादागिरीपासून स्वतःला वेगळे ठेवले.
ट्रंप यांनी नाटो सदस्यांना धमकी दिल्यानंतर अमेरिकेतूनच ट्रंप यांना घरचा आहेर " सर तुम्ही काहीच दिवसांपूर्वी नाटो देशांशी युद्ध पुकारले होते (ग्रीन लँड)
चीनला इराणकडून एक लाख बॅरल एव्हढे तेल निर्यात
भारताच्या दोन जहाजांना इराणने मोदींच्या हस्तक्षेपानंतर जाऊ दिले. यावरून भारताच्या कूटनीतीची चर्चा पाश्चात्य मीडीया, अल जझिरा आणि अल अरेबिया (?) अशा माध्यमात रंगली आहे.
भारताने एकाच वेळी अमेरिका, इस्त्राएल आणि इराणशी संबंध सुधारले. यावर अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनी भारताने काय डील केली हे आम्हाला माहीत नाही असे सांगितले.
याबद्दलच्या बातम्या येतीलच. त्यानंतर हे कसे झाले हे समजेल. मात्र मोदींना हस्तक्षेप करावा लागला आहे हे सूचक आहे.
No ‘blanket arrangement’ with
No ‘blanket arrangement’ with Iran for Indian vessels to pass through Strait of Hormuz: Jaishankar to FT
https://www.livemint.com/news/india/india-hasnt-reached-a-blanket-arrang...
As India seeks Hormuz safe passage, Tehran asks for return of seized tankers, sources say
https://www.reuters.com/world/india/india-seeks-hormuz-safe-passage-tehr...
अमेरिकेच्या नावाने चांगभलं
अमेरिकेच्या नावाने चांगभलं म्हणणार्यांसाठी चांगली बातमी
https://www.hindustantimes.com/india-news/us-religious-freedom-panel-rec...
https://www.tv9marathi.com
https://www.tv9marathi.com/international/india-has-condemned-pakistan-ai...
पाकिस्तान ने अफगाणिस्तान वर हल्ला चढवला त्याचा भारताने तत्काळ निषेध केला.
ही तत्परता इराण वर हल्ला झाला तेव्हा कुठे गेली होती?
अफगाणिस्तान हल्ल्यात, शत्रूचा
अफगाणिस्तान हल्ल्यात, शत्रूचा शत्रू तो आपला मित्र. त्यामुळे निषेध करायला काहीच अडचण नाही.
इस्राएल इराण युद्धात मात्र अडचण आहे. एकीकडे इस्राएल मित्र देश तर इराण बरोबरचे आपले संबंध जुने आहेत त्यात तो पाकिस्तानचा शेजारी.
पण शाळेवरच्या हल्ल्याचा निषेध मात्र करायला पाहिजे होता.
किनई तालिबान तिथल्या
किनई तालिबान तिथल्या स्त्रियांवर खूप अन्याय करतं. तिथल्या स्त्रियांना तालिबानच्या जाचातून सोडवण्यासाठी आम्ही अफघाणिस्तानवर बाँब टाकले असं पाकिस्तानने सांगितलं नाही, ते बरं झालं ना? नाहीतर केवढी पंचाइत झाली असती आपली?
इराणच्या नेत्याचा खून केल्याबद्दल निषेध करायची गरज अजूनही नाही. मुळात त्याचा खून झाला असं अजून लिहिलेलं नाही.
अमेरिकेने व्हेनेझुएलाच्या अध्यक्षाला उचलून नेलं. इस्रायलने इराणच्या सर्वोच्च धार्मिक नेत्याची हत्या केली.
उद्या आपण ट्रंपच्या मनासारखी ट्रेड डील केली नाही आणि ट्रंपला इथून कोणाला उचलून न्यावंसं वाटलं तर?
आजची बातमी आहे की अमेरिकेशी ट्रेड डील इतक्यात फायनल होत नाही. यासाठी इराणचे आभार मानायला हवेत खरं तर.
काय वेळ आली आहे इस्राएल
काय वेळ आली आहे इस्राएल पंतप्रधानांवर.
मी जिवंत आहे पटवून द्यायला 3 3 व्हिडिओ शेअर करावे लागत आहेत
मागच्या पानावर कोणीतरी
मागच्या पानावर कोणीतरी "इस्राएल अमेरिकेच्या जीवावर उड्या मारते "म्हटल्यावर offend झाले होते
होर्मुझ ची समुद्रधुनी वाहती करण्यासाठी ट्रम्प दुनियाभरच्या देशांना भरीस घालत आहे. हे तेच देश आहेत ज्यांना ट्रम्प ने विविध प्रसंगी शिव्या घातल्या होत्या. त्या ऐवजी ट्रम्प, ज्याच्यासाठी युद्ध छेडले त्या इस्राएलच्या नेव्हीस या कामासाठी का वापरत नाही?
1) इस्राएल चे नौदल कमकुवत आहे?
2) इस्रायलला स्वतःचे नुकसान टाळायचे आहे?
3) इस्राएल चे नौदल उध्वस्त झाले आहे?
4) इस्राएल घाबरले आहे?
उलट आहे. ट्रंप नेतान्याहूच्या
उलट आहे. ट्रंप नेतान्याहूच्या अधीन आहे. इराणवर हल्ला करा, संपवा असं तो अमेरिकेला २०-२५ वर्षे सांगतो आहे. ट्रंपच त्याच्या गळाला लागला असं अमेरिकन सिनेटर म्हणालाय. इराकवर हल्ला ,९/११ च्या वेळची इस्रायलची भूमिका इंटरेस्टिंग आहे.
ग्रेटर इस्रायल प्रोजेक्ट.
त्याच्याकडून प्रेरणा घेऊन आपले ते अखंड भारत करतील का?
हे मात्र अगदी खरे हो, इस्राएल
हे मात्र अगदी खरे हो, इस्राएल करे तो रासलीला, कोई और करे तो कॅरेक्टर ढिला.
भारताला स्वतःला सिन्दुर वेळी, देशोदेशी शिष्टमंडळ पाठवून आम्हीच कसे बरोबर ते पटवून द्यावे लागले होते.
जनरल जी डी बक्षी हे सातत्याने
जनरल जी डी बक्षी हे सातत्याने गोदी मीडीयात दिसायचे. अनेक गोदी अँकर्स आणि भक्तांप्रमाणे त्यांच्या मतांमधेही फरक दिसून येतो. हे विश्लेषण अगदीच न्युट्रल आहे.
https://www.youtube.com/watch?v=E3MAC0BMvg0
युद्ध सुरू झाल्यापासून सरकारचं नरेटिव्ह एकीकडे, गोदी मीडीयाचं दुसरीकडे आणि भक्तांचं तिसरीकडे चालू आहे. विरोधकांचं नरेटिव्ह चौथ्या दिशेने आहे. हा Narrative Gap कुठे जाईल ? Legitimacy Crisis कडे वाटचाल चालू आहे असे म्हणायचे कि आपण ऑलरेडी त्या स्टेटला जाऊन पोहोचलो आहोत ?
सरकार कुणाचेही असो, लोकशाही देशात ही स्थिती चांगली नाही. कारण त्याचे परिणाम पुढे गंभीर होतात. भारत ब्रोकन स्टेट होऊ शकत नाही. पण होणारच नाही असे ठामपणे म्हणता येत नाही. यासाठी सरकार, गोदी मीडीया, विरोधकांचा मीडीया, अंधभक्त आणि अंध विरोधक यांच्या जंजाळातून सत्य परिस्थिती शोधणे हे प्रामाणिक नागरिकांचे काम आहे. चुका होतील त्या मान्य करत राहणे हे योग्य असते.
एकाच एका बाजूशी प्रामाणिक राहून सत्य डोळ्यासमोर असताना हेकटपणे वाद घालणारे या प्रक्रियेतून बाद करावे लागतात.
काल पाकिस्तानने
काल पाकिस्तानने अफगाणिस्तानातल्या एका शाळेवर हल्ला केल्यानंतर अंधभक्तांच्या फॅक्टरीतून बॅनर्स निघाले.
"इराणच्या खामेनीसाठी छाती पिटणार्यांनो, या हल्ल्याचा निषेध करणार कि नाही ?"
हे हेकट लोक आहेत. इराणमधेही मुलींच्या शाळेवर हल्ला झालाच ना ? शिवाय इराणमधे स्रियांवर अत्याचार होतो म्हणून त्या हल्ल्याबाबत तुम्हाला बोलायचे नव्हते. त्या हल्ल्याचा निषेध न करता आता तुम्ही यंव केलं का असा प्रश्न कसा विचारता ? जर इराण महिलांवर अ त्याचार करतो म्हणुन तुम्ही इराणमधे झालेल्या मुलींच्या खूनाला मूक संमती देत असाल तर तालिबान प्रगत आहेत का ? तालिबान मधे महिलांना स्वातंत्र्य आहे का ?
याच तालिबानला तुम्ही इस्लामी कट्टरपंथी दहशतवादी म्हणायचे हे विसरलात का ? यामुळेच तर तुम्ही दहशतवादाला धर्म नसतो याची टिंगल उडवत होतात. आज तालिबान तुमचे आदर्श झाले का ? तुम्हाला भगवे तालिबानी म्हटले कि तुम्ही खवळत होतात.
आज पाकिस्तान आणि अफगाणिस्तान हे युद्ध दुय्यम आहे. मुख्य लक्ष वेधून घेणारे युद्ध खाडीतले आहे कारण यामुळे भारताला मोठा फटका बसतोय. भारत आज कात्रीत अडकला आहे. एकीकडे तेल उत्पादक ओपेक संघटनांच्या देशांशी भारताची मैत्री असल्याने सरकारला उघडपणे मुस्लीम द्वेष दाखवता येत नाही. सरकारने इराणशी बोलणी करताना भारतातल्या २५ करोड मुस्लिमांचा उल्लेख केला असे अनधिकृत सूत्र सांगतात. दुसरीकडे इराण मित्र होता ज्यामुळे काश्मीर प्रश्न युनोत बारगळला. त्या देशाचे तीन टँकर्स आपण अमेरिकेच्या सांगण्यावरून जप्त केले आहेत. अर्थात ते जसविंदसिंग ब्रार या भारतीय माणसाचे आहेत जो घोस्ट फ्लीट घेऊन जगभरात इराणच्या तेलाचा काळाबाजार करत असतो. हा सुद्धा भाजपेयीच आहे. अमेरिकेच्या धमकीमुळे आपण त्याच्या शेकडो जहाजांपैकी तीन जहाजं पकडली आहेत.
दुसरीकडे विरोधकांचे नरेटिव्हज आहेत.
इराणने भारतियांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून तेल पाठवले. याची फॅक्ट चेक केल्यावर असं डायरेक्ट रिलेशन असलेलं विधान इराणच्या कोणत्याही अधिकृत सोर्स ने केलेलं नाही. इराणच्या भारतातल्या राजदूताने नक्कीच भारतातल्या नागरिकांचे आभार मानलेले आहेत. त्यांच्या प्रेमामुळे नैतिक धैर्य उंचावले असे त्याने म्हटलेले आहे. पण यामुळे तेल पाठवतो असे इराणचे परराष्ट्रमंत्री किंवा अन्य जबाबदार सरकारी गोटातून वक्तव्य आल्याचे सापडत नाही. कुणाकडे असेल तर द्यावे.
दुसरा नरेटिव - रशियाने मैत्री तोडली. भारताला बाजारभावाप्रमाणे तेल दिले.
याचा मैत्री तोडण्याशी काहीच संबंध नाही. ज्या वेळी रशिया निर्बंधांमुळे त्रस्त होता तेव्हां भारताने बाजारभावापेक्षा पाडून तेल घेतले. त्यात अर्थातच समुद्रमार्गे पडणारा वळसा हे कारण होते. तसेच रूपयात व्यापार करायला भाग पाडले. या रूपयाला उठाव नसल्याने रशियापुढे आर्थिक संकट उभे राहील्यानंतर भारताने आपल्या व्यापार्यांचे हित बघितले आणि त्या रूपयांच्या बदल्यात भारतीय वस्तू निर्यात केल्या. परिस्थितीचा फायदा भारताने घेतला. आज रशिया घेतो आहे. आज जगाला रशियाच्या तेलाशिवाय पर्याय नाही. त्यामुळे रशिया बाजारभावाप्रमाणे देतोय, काळाबाजार करत नाहीये अजून.
यामागे कारणे वेगळी आहेत.
कालच ट्रंप म्हणाले कि इराणचे लोक बुद्धीमान आहेत. आमची गाठ सुपर आयक्यू असलेल्या लोकांशी पडलेली आहे ज्यआची आम्हाला कल्पना नव्हती. ते आखाती देशांवर हल्ला करतील असे वाटले नव्हते. ते आमच्याशी बुद्धीबळ खेळत आहेत. आता आम्हाला लक्षात आले आहे. आम्हाला अशा शत्रूशी सामना करायला मजा येईल.
ट्रंप यांची ही कबुली सांगते कि इराणने युद्धाचा अभ्यास किती आधी केला होता. त्यांनी तेल बंद केले हे त्यांचे ब्रह्मास्त्र आहे. तेलाची नाकेबंदी केली कि जगाचा श्वास अटकतो. आज नाटो देशही अमेरिकेसोबत नाहीत. या निमित्ताने अमेरिकेची एकाधिकारशाही संपावी असे खुद्द नाटो देशांना वाटते. ही अटकळ इराणने ( किंवा त्यांच्या वतीने रणनीती आखणार्या चीन व रशियाने ) बांधली असावी.
इराणने खाडी देशांमधे नागरी वस्त्यात हल्ले केलेले नाहीत. त्याने खाडी देशातल्या नाटो आणि अमेरिकन बेसेस वर हल्ले चढवले आहेत. खाडीतून अमेरिकेचे बेस हटवा ही मागणी इराण खाडी देशांकडे करतोय. अमेरिकेने संरक्षणाच्या बदल्यात पेट्रोलचा व्यापार आपल्या हाती घेतला होता. अमेरिका जर संरक्षण देऊ शकत नाही तर त्यांचे का ऐकायचे हा विचार खाडी देशात चालू आहे. अमेरिकेने हालचाल केली नाही तर खाडी देशातले अमेरिकेचे वर्चस्व संपुष्टात येणार. ती जागा नवीन चौधरी घेईल. कदाचित इराण, कदाचित चीन. पेट्रोयुआन हा शब्द ऐकू आला तर नवल नाही.
एकदा का डॉलर आणि पेट्रोलचं लग्न तुटलं तर अमेरिकन डॉलरचं वर्चस्व संपणार.
यामधे रशियाचा फायदा हा आहे कि आज नाक घासत नाटो देश रशियाकडून तेल खरेदी करणार आहेत. रशिया नाटो देशांनाही अटी घालू शकतो. त्याचाच एक भाग म्हणून रशियन तेल भारताला बाजारभावाने आणि नाटो देशांना मिळणार नाही असे वक्तव्य रशियाने केलेले आहे. जर त्यांना घ्यायचेच असेल तर रशिया आपल्या अटी घालेल.
हे आंतरराष्ट्रीय राजकारण आहे. भारतात प्रत्येकाचे आपापले इंटरेस्ट असल्यान तसे नरेटिव्हज पसरवले जातात. त्या त्या पक्षाचे अहानुभूतीदार आपल्याला अनुकूल नरेटिव्हकडे आपोआप खेचले जातात. यामुळे सत्य काय यापेक्षा सत्याचे आपल्याला अनुकूल रूप काय याप्रमाणे वेगवेगळे चित्र तयार होत असते.
इराणमध्ये गांधी हॉस्पिटलवर
इराणमध्ये गांधी हॉस्पिटलवर इस्रायलने हल्ला केला. गाझामध्ये तर एकही हॉस्पिटल शिल्लक ठेवले नसेल.
इराण मुस्लिम देश आहे. इराणवरचा हल्ला रमजान महिन्यातच झाला. त्यांच्या धर्मगुरूला मारलं (त्याचं निधन झालं म्हटल्याने ती हत्या होती हे बदलत नाही, उलट तुम्ही खुन्याच्या पाठीशी उभे राहिलेले दिसता)
अमेरिका इस्रायलने इराण व आता लेबॅनॉन वर केलेले हल्ले हे सार्वभौम देशांवर केलेले हल्ले नाहीत. ?
इराणमधल्या शाळेवर केलेल्या हल्ल्यासाठी भारताने वापरले ले शब्द पहा -We regret the precious lives lost and express our grief in that regard,
अशा प्रसंगांत मित्र , न मित्र असले नफानुकसानीचे निकष लावायचे की काही तत्त्व बित्त्व पाळायची? अशाने तुम्ही विश्वगुरू होणार? गांधी जाऊ दे. बुद्धाचा देश म्हणवता ना?
आणि हे एवढं ढळढळीत दिसत असून कभी हाँ कभी ना समर्थक या युद्धात भारताने कोणाचीही बाजू घेतली नाही, असं म्हणणार!
आळीपाळीने सत्ता भोगल्यावर
आळीपाळीने सत्ता भोगल्यावर निर्माण झालेले इंटरेस्ट जपणाऱ्या पक्षाच्या समर्थकांआ या दोन्ही पक्षाचे समर्थन न करणारे गुन्हेगार वाटत असतील तर त्यांना त्यांचे नंदनवन मुबारक. किंवा या दोन पक्षांना तुम्ही मत देत नसाल तर कुणाला देता अशा प्रश्नांना उत्तर दिलं पाहिजे अशी अपेक्षा असणाऱ्यांना देखील ते नंदनवन मुबारक.
भारतीय राज्यघटनेने आपले राजकीय मत गुप्त ठेवण्याचा अधिकार दिलेला आहे. त्याचा आदर नसणारे प्रश्न फाट्यावर मारणे हे शहाणपण आहे. आम्हाला कुठलाही पक्ष खायला घालत नाही. तसेच ठराविक पक्ष किंवा नेताच राज्य करायला लायक आहे यावर विश्वास नसणाऱ्यांना देखील भारतात राहण्याचा संपूर्ण अधिकार आहे.
ज्यांना सोशल मीडियात ठराविक राजकीय पक्षांना हवे तेच मत मांडायचे काम दिलेले आहे किंवा स्वेच्छेने स्विकारले आहे त्यांना तसे करण्यावाचून जोपर्यंत रोखत नाही तोपर्यंत कुणी आमच्या पक्षाच्या बाजूनेच का मत देत नाही याबद्दल आकोश करणे, चिमटे काढणे हे अरण्यरूदना होय. ही सक्ती करणारे सुद्धा रद्द ठरतात.
Israel has committed genocide
Israel has committed genocide in Gaza, UN commission of inquiry says
दक्षिण आफ्रिका इस्रायलने गाझामध्ये चालवलेल्या वंशसहाराविरोधात आंत रराष्ट्रीय न्यायालयात गेली आहे.
Israel’s violations of international law that maintain the unlawful occupation of Palestine and deny Palestinians the most basic of human rights – including the right to self-determination – have been documented by multiple United Nations bodies and NGOs, and confirmed by the ICJ – as the UN’s principal judicial organ – as well as the resolutions of the UN’s political organs.
मोदींचं इस्रायलला भेट देण्यात काही चुकलं नाही. इस्रायल आपला फादरलँड आहे, असं म्हण ण्यात तर त्याहून काही चुकलं नाही.
गोदी मीडीया, काही भक्त हे
गोदी मीडीया, काही भक्त हे अचानक का आमेरिकेच्या विरोधात गेले हे प्रश्न पडलेले होते. ते अमेरिकेने गेल्या काही दिवसात कान पिरगाळले म्हणून देशप्रेमामुळे असेल असे वाटले होते. पण कालची बातमी आज निरंजन टकलेंनी तपशीलवार सांगितली. तेव्हां कुठे उलगडा झाला. हे खरे असेल तर या रिपोर्टव कारवाई झाली तर अमेरिकेतून संघ सदस्यांना परत पाठवणार का ? ( तिथे भारतातल्या प्रमाणे सदस्य आहे कि नाही हे सिद्ध करावे लागणार नाही बहुधा).
https://www.youtube.com/watch?v=2PDp-oL6c5I
टकले यावर मालिका बनवत आहेत. एकदा त्यांच्या शोधपत्रिकारितेला ऐकू. गरज पडल्यास क्रॉस व्हेरिफाय करू.
टकलेंची भाषा खूपच स्ट्राँग
टकलेंची भाषा खूपच स्ट्राँग आहे. पण ते सांगतात ते इग्नोर करता येत नाही.
https://www.youtube.com/watch?v=EDVZVgh64IY
या पेक्षा भयानक भाषा संघी लोक इतरांबद्दल वापरतात, तरीही क्षम्य नाहीच.
https://www.instagram.com
https://www.instagram.com/reel/DXdpyCZEZpD/?igsh=MWp1YWF6cHB3bng5Ng==
भारी गंमतच आहे आणि व्हिडिओला लाईक करणारे नाव तर भारतीय पण वाटत नाही फंडिंग कुठून होतं यांना..
Pages