निरंजन टकलेंचा व्हिडीओ खूप दिवसांनी बघितला. ते काँग्रेसमन आहेत. त्यामुळे ते जे सांगतात त्याची फॅक्ट चेक करावी लागते.
त्यांनी इराणी प्रेसचं एक ट्वीट शेअर केलं आहे ज्यात असे म्हटले आहे कि अमेरिका इस्त्राएलला साथ देणार्या राष्ट्रांना विशेषतः भारताला, ज्याने नुकताच इराणला धोका दिला, खाडीतून तेल नेता येणार नाही. त्यांनी असंही सांगितलं कि भारतात गोदी मीडीया जे सांगतोय ते म्हणजे इराणने भारटाला दोस्त म्हटलेय आणि तेल न्या म्हटलेय हे सगळे बकवास आहे. तसेच एलपीजी सिलेंडरचा तुटवडा आणि इराण युद्धाचा काही संबंध नाही. कारण एलपीजी आपण आयात करत नाही. हा काळाबाजार आहे.
हे सर्व दावे गंभीर असल्याने फॅक्ट चेक केली. तर इराणी प्रेसचं हँडल इराणचं अधिकृत नसलं तरी ते बनावट नाही. म्हणजे इराणी प्रेस आहे हे स्पष्ट आहे. फॅक्ट चेक साठी जेमिनी, क्लाऊड एआय, ग्रोक आणि चॅटजीपीटीची मदत घेतली. त्यांनी चेक करताना ज्या ज्या साईटस रिफर केल्या त्या पाहिल्या.
सर्वच एआय ने भारत सरकारने ही न्यूज खोटी असल्याचे सांगितले आहे ही माहिती पुरवली. तेव्हां ए आय ला भारत सरकारच्या दाव्यांवर न जाता हे हँडल बनावट आहे का हे विचारले. तसेच इराणने अधिकृतरित्या भारत दोस्त आहे, त्यांना तेल नेऊ देऊ असा दावा केला आहे का हे विचारले.
तर असे दावे इराणकडून केलेले नाहीत. उलट भारताच्या दाव्यांवर इराणने अजून काहीही अधि़कृतपणे म्हटलेले नाही असे म्हटले आहे. इराणी प्रेस हा अधिकृत मीडीया नाही पण इराणमधे राजवटीच्या संमतीशिवाय भारताबद्दल असे काही म्हटले जाण्याची शक्यता नाही. म्हणजे टकलेंचा एक दावा कि इराणमधे भारताने धोका दिला ही भावना आहे हे सत्य साबीत झालं.
बाकी एलपीजी भारतात बनतो का हे मला माहीत नाही. सगळेच दावे तपासत बसण्याइतका वेळ नाही. इराणकडून भारताकडे खरोखर जहाजे निघालीत या दाव्याच्या पुष्ट्यर्थ रॉयटर, बीबीसी किंवा अन्य न्यूज एजन्सीकडून काही समजले नाही. भारतात अनेक बनावट न्यूज एजन्सी असल्याने त्यावर विश्वास ठेवत नाही. बाकीच्या एकतर या बाजूला किंवा त्या बाजूला आहेत. खर्या बातम्या मिळण्याचा हक्क केव्हांच संपुष्टात आलेला आहे.
या सर्व पास्र्ह्वभूमीवर एक गोष्ट मात्र वारंवार मनात येते.
आंतरराष्ट्रीय संबंध हे काही " ये दोस्ती हम नही तोडेंगे" " मेरे दोस्त , तुम्हारी मौत का बदला लूंगा. मै आ रहा हूं गब्बर" असे नसतात. भारताचे धोरण हे अलिप्तवादाचे आहे. व्यापार कुणाशीही करा. पण इस्त्राएलला जाऊन जर मोदींनी " आम्ही इस्त्राएलच्या सोबत आहोत, इस्त्राएल आमची पितृभूमी आहे " असे दावे केल्याचे जे वृत्त आहे ते खरे असेल तर याची गरज होती का ?
अमेरिकेचे पिच्छलागू देशही आता आमेरिकेसोबत नाहीत. इतकेच काय अमेरिकेतही ट्रंपच्या या युद्धाबद्दल अनुकूल मत नाही. कुठल्याही देशाने इस्त्राएलचा दौरा या ताणतणावाच्या काळात केलेला नसताना मोदींनी अशा वेळेत इस्त्राएलला भेट दिली आणि युद्ध सुरू झाले. असे समजू कि इस्त्राएलने मोदींचा गेम केला.
पण इराणचे सर्वेसर्वा अमेरिकेकडून मारले गेले ( असे म्हणतात) हे वृत्त असतानाही भारताने अधि़कृत प्रतिक्रिया दिलेली नाही. इराणचं जहाज भारता जवळ हिंदी महासागरात डुबवलं. तरीही भारताची प्रतिक्रिया तत्काळ आली नाही. काही दिवसांनी नौदलाने प्रतिक्रिया दिली. पण वरिष्ठ पातळीवर कुणीच काही बोलले नाही.
थायलंडचे जहाज बुडवल्यावर मात्र भारताने प्रतिक्रिया तत्काळ दिली. या पास्र्ह्वभूमीवर भारत जुने मित्र गमावतोय का ? भारताचे अलिप्ततावादाचे धोरण जगाला मान्य आहे. आमच्या बाजूने नाही तर त्यांच्याही नाही हे स्विकारार्ह आहे. खरे तर तो शहाणपणा आहे. त्या धोरणाला तिलांजली दिली आहे का ?
इस्त्राएल आणि अमेरिका या देशांच्या प्रगतीचे कौतुक असले तरी या देशांची धोरणे कधीच आवडली नाहीत. सोशल मीडीयात अमेरिकाप्रेमी लोक लगेच खवळतात. पण आता सिद्धच झालेले आहे कि अमेरिका बदमाष देश आहे. तेल आखाती देशांचे, जमीन त्यांची पण तिथे ब्रिटन आणि अमेरिकेची दादागिरी आहे. इराणमधे अमेरिकाद्वेष का आहे ? कारण इराणच्या शहाने ब्रिटनच्या कंपन्यांना तेलाचा मुक्त परवाना दिला होता. ब्रिटनने तेल काढावे आणि विकावे. दुसर्या महायुद्धानंतर अमेरिका सर्वेसर्वा झाला. इराणमधे थोडा काळ लोकनियुक्त सरकार आले. शहा परागंदा झाला. त्या सरकारने छोट्याशा काळात तेलाचे राष्ट्रीयीकरण केले. त्या सरकारविरोधात बंडाळी घडवून पुन्हा शहाला बसवले. त्याने पुन्हा ब्रिटन आणि अमेरिकेला परवानगी दिली. इथून अमेरिकेची एण्ट्री झाली.
अमेरिकेने आखातातल्या तेलाचा व्यापार डॉलर मधे व्हावा अशी अट घातली. इथून पुढे डॉलरचा पेट्रोडॉलर झाला. डॉलर हे जागतिक चलन झाले ते याच गोष्टीमुळे. अयातुल्ला खोमेनी यांनी या विरोधात भाषणे दिली. इराणी जनतेतल्या असंतोषाला वाट दिली. खोमेनी लोकप्रिय झाल्यावर त्यांना देशाबाहेर काढले. ते इराकमधे गेले. तिथून भाषणे देत. त्यांच्या भाषणाच्या कॅसेटस इराणमधे येत. त्यांच्या नेतृत्वाखाली शहाची राजवट उलथली. खोमेनी यांनी सत्तेत येताच इस्लामिक कायदा लागू केला.
अमेरिकेने मग सद्दाम हुसेनला इराणच्या विरोधात उभे केले. सद्दाम हुसेनने दहा वर्षे युद्ध केले. त्यानंतर ही माझी चूक होती असे म्हटले. त्यानेही इराणकडून धडा घेत तेलाचे राष्ट्रीयीकरण केले. त्यामुले खवळलेल्या बुश पितापुत्रांनी इराकवर तेच आरोप ठेवले जे आज इराणवर ठेवलेत. त्या आरोपात तथ्य नव्हते हे यथावकाश सिद्ध झाले. मधल्या काळात इराक बेचिराख झाला. आता इराण बेचिराख होईल. सिरीया बेचिराख झाला आहे. हा प्रदेश इस्त्राएलच्या ग्रेटर इस्त्राएलचा भाग आहे हे विशेष.
आता व्हेनेझुएलात पण अमेरिकेने कारवाई केली. अजूनही काही लॅटिन अमेरिकन देश अमेरिकेच्या निशाण्यावर आहेत. व्हेनेझुएलात तर सरळ सरळ तेलासाठीच कारवाई झाली.
आता जर इराणने आखाती देशातून अमेरिकेला पळवून लावले आणि त्यांनी घातलेल्या अटींप्रमाणे आखातातून तेल घेण्यासाठी चिनी चलन द्यावे लागले तर चिनी चलन जागतिक चलन होईल. देशांना चीनचं चलन रिझर्व म्हणून बाळगावं लागेल. आज डॉलरचा जो फायदा अमेरिकेला मिळतो तो चीनला मिळेल. ते भारताला परवडणारे नाही. कारण मग चीन वाटेल ते निर्बंध घालू शकेल. या शक्यता आहेत. भविष्यवाणी नाही.
या पास्र्ह्वभूमीवर प्रो इस्त्राएल भूमिका योग्य वाटते का ?
( कुणीच प्रतिसाद देणार नाही ही भविष्यवाणी मागच्या धाग्यावर खरी ठरली. असा प्रतिसाद माझ्या वाट्याला आला हे भाग्यच. ज्यांचे या देशात वैयक्तिक इंटरेस्ट नाहीत, ज्यांच्या तेलाच्या खाणी नाहीत, पेट्रोकेमिकल्सच्या रिफायनईज नाहीत, अमेरिकेत ३०० बिलियन डॉलरची गुंतवणूक नाही, ज्यांना इराण, इस्त्राएल, अमेरिका खाऊ पिऊ घालत नाही अशा स्वतंत्र बुद्धीच्या भारतियांनी प्रतिसाद दिले तर काय हरकत आहे ?
)
माहितीपूर्ण लेख.
माहितीपूर्ण लेख.
मला आंतरराष्ट्रीय राजकारणाची फारशी माहिती नाही.
मात्र इस्राएलची ससेहोलपट पाहून गार गार वाटते आहे.
अगदी "बरं झालं, छान झालं म्हातारीचं काम झालं"
दुसरे कोणी विध्वंसाच्या खाईत सापडलेले असताना असे वाटणे सुसंकृतपणाचे लक्षण नाही असे लोक म्हणतील, पण इस्राएल doesn't deserve that सुसंकृतपना.
Palestine मधले हल्ले हा देश बीअर पित एन्जॉय करत होता, कर्मा is a bitch,
तसाही इस्राएल अमेरिकेच्या
तसाही इस्राएल अमेरिकेच्या पाठिंब्यावर फुगलेली बेडकी आहे.
या आधीची युद्धे, सिरिया, इजिप्त अशा तुलनेने दुबळ्या सैन्याबरोबर जिंकून त्यांनी आपण अजेय योद्धा असल्याची प्रतिमा बनवली होती.
इराण सारखा देश पुरेशा तयारीने युद्धात उतरल्यावर यांचे पितळ उघडे पडले. बहुचर्चित iron डोम वगैरे गोष्टी कधीच उध्वस्त झाल्या. त्यांचे so called laser weapon एकही मिसाईल पाडू शकत नाही आणि ही बोगस सिस्टीम आता भारताला दिली आहे.
जी सिस्टिम इराण विरुद्ध काम करू शकली नाही, ती चीन विरुद्धच करू शकेल काय?
आपले मोदी समर्थक उगाच टीऱ्या बडवत नाचत आहेत.
जर भारतीय जहांजे त्या खाडीतून
जर भारतीय जहांजे त्या खाडीतून येत असतील कोणत्या प्रेसचं हँडल कांय म्हणतोय ह्याला काही अर्थ राहत नाही. अजून दोन भारतीय जाहजाला परवानगी दिल्याच्या बातम्या आहेत. ती १७ आणि १८ मार्चला भारतात पोहचणार आहेत. अजून थोडे दिवस जाऊन द्यावे लागतील.
Mohammad Fathali, जो की इराणचा भारतातील Ambassador आहे ह्याने भारत आमचा दोस्त आहे म्हटलेल आहे.आणि त्याची statement रेकॉर्डेड आहेत.
एकूण गरजेच्या पन्नास ते साठ टक्के एलपीजी आपण आयात करतोय. त्यामुळे आदीच कमी झालेला पुरवठा आणि घाबरून होत असलेलं बुकिंगमूळ तुटवडा नक्कीच जाणवेल.
मोदी इस्राएलला जाऊन समर्थांनाथ काही बोलले असतील तर त्यात काही चुकीचं नाही. करगील असो, op सिंदूर असो हा असा एकच देश आहे की आपल्या पाठीशी खंबीर पणे उभा राहिलेला आहे. कोणत्याही अटी न ठेवता इस्राएल आपल्याला सपोर्ट करतोय. पण मोदींची भेटीची वेळ नक्कीच चुकली आहे.
इराण काही अमेरिकेला आखाती देशातून पळवून लाऊ शकत नाही. जेवढं नुकसान इस्राएल अमेरिकेचे झालाय त्याच्या कमीत कमी हजार पटीने इराणच झालं असेल. पण त्यांचा दृष्टीने जगलो हेच जिंकलं असेल. तर अमेरिकेसाठी हा पराजय असेल.
आयर्न डोम कुठं उध्वस्त झालीय? जगात अशी कोणती मिसाईल डिफेन्स सिस्टिम आहे जी होणारे हल्ले १००% थांबवेल. अव्वल मानली जाणरी S-400 किंवा S-500 पण रशिया मध्ये होणारे हल्ले १००% थांबवू शकाली नाही. पण तिला बोगस म्हणता येणार नाही. आणि आयर्न डोम इस्राएलने आपल्याला दिलेली नाही.
मी कधी लिहिले त्यांनी iron
मी कधी लिहिले त्यांनी iron dome भारताला दिली आहे?
मी लिहिले
" बहुचर्चित iron डोम वगैरे गोष्टी कधीच उध्वस्त झाल्या*. *(पूर्णविराम, नवीन वाक्य सुरू) त्यांचे so called laser weapon एकही मिसाईल पाडू शकत नाही आणि ही बोगस सिस्टीम आता भारताला दिली आहे."
वरच्या 20 ओळींचा प्रतिसाद नीट इंटरप्रिट करता येत नाही, आणि आंतरराष्ट्रीय राजकारणावर बोलताय. Should I really counter your understanding?? Is it worth it?
धाग्याचे नाव "आंतरराष्ट्रीय
धाग्याचे नाव "आंतरराष्ट्रीय धोरण" असल्याने केवळ इराण इस्राएल बद्दल बोलायचे आहे की बाकी देशांबद्दल इथेच बोललेले चालेल?
लेखकाने कृपया सांगावे
रविवारच्या दिवशी एकादशीचा
रविवारच्या दिवशी एकादशीचा मुहूर्त साधून हा धागा काढल्यावद्दल आभार. एकादशी नसती तर मस्त मटण वड्यांचा बेत करून सोबतीला कोल्ड्रिंकचा घोट पीत पीत कमेंट वाचत दुपारी पाचवर फॅन करून झोपलो असतो. खरं सुख हेच.
माझा प्रतिसाद worth वाटत नसेल
माझा प्रतिसाद worth वाटत नसेल तर सरळ दुर्लक्षित करायचा. त्यात कांय एवढं, आता हे पण मीच सांगू का?
मायबोलीवर आंतरराष्ट्रीय राजकारणावर बोलायला कांय कोणाची परवानगी पाहिजे का? हिथं एवढी वर्ष कामं करूनपण लोकं जयशंकर ला सोडत नाहीत.
माझी type आयर्न डोम आणि आयर्न बीम ह्यात नक्कीच घपलत झाली.
पण तरी थोडं सुधारूणा करून परत विचारतोय. worth वाटत असेल तरच उत्तर द्या.
बहुचर्चित iron डोम वगैरे गोष्टी कधीच उध्वस्त झाल्यात? (शेवटी प्रश्नचिन्ह) आणि
laser weapon system म्हणजेच आयर्न बीम,त्यांनी कधी भाताला दिली आहे?
दिली आहे = देऊ केली आहे,
दिली आहे= देऊ केली आहे,बाकीचा प्रतिसाद नंतर लिहीन
मामबोलीवरचा एक क्षुद्र जीव मी
मामबोलीवरचा एक क्षुद्र जीव मी
काय कोणास समजावू या जगी
परवानगी कुणा देऊ ऐशी टाप नाही
ऎसा उद्दाम होता जणी जाईन झणी मी ढगी
"इस्राएल" नाव घेतल्यावर संघी
"इस्राएल" नाव घेतल्यावर संघी काहीतरी भयंकर ग्लॅमर असल्यासारखे वागतात. वाळवंटात नंदनवन, सक्तीची सैन्य भरती, आपल्यावर झालेल्या अत्याचाराचा ( तो झालाच, यात वाद नाहीच) बदला घेण्याची प्रवृत्ती यासाठीचे त्यांना ओबसेशन म्हणावे इतके आकर्षण असते.
पण या आकर्षणात ते ग्राउंड रिॲलिटी कडे दुर्लक्ष करतात.
जसे मी वरती लिहिले, इस्राएल लढले ते सगळी युद्धे दुबळ्या राष्ट्रांबरोबर होती. त्यात इस्राएलला अमेरिकेचे भक्कम पाठबळ होते. त्यामुळे इस्राएल त्यात यशस्वी झाली. परत युद्ध क्षेत्र क्वचितच खुद्द तेलअविव सारखी शहरे होती.
त्यामुळे युद्धः करून सुद्धा इस्रायलचे औद्योगिक नुकसान फारसे झालेले दिसले नाही.
या सगळ्यामुळे इस्रायल invincible आहे अशी प्रतिमा जनमानसात तयार झाली.
साहजिकच त्यांनी विकसित केलेल्या प्रणाली सुधा अजेय अभेद्य आहेत अशी प्रतिमा तयार झाली.
पण छोट्या चकमकीत /दहशतवादी गटाकडून डागली गेलेली मोजकी क्षेपणास्त्रे भेदणे वेगळे, आणि पूर्ण क्षमतेने युद्ध करणाऱ्या देशाची क्षेपणास्त्राची बरसात रोखने वेगळे. एखाद्या प्रणालीने दुसऱ्या परिस्थितीत क्षमता सिद्ध केली असेल तर त्याला अभेद्य म्हणणे उचित राहील.
पण इस्राएल ने लुटुपुटूचे हल्ले परतवल्यानंतर लगेच आपल्या सिस्टीम चा उदोउदो सुरू केला. गेल्या वर्षी हमास ने आपली लो कॉस्ट मिसाईल जास्त संख्येने डागल्यावर यांचे पितळ लगेच उघडे पडले.
थोडक्यात एकाच वेळी जास्त संख्येने आलेली मिसाईल ही सिस्टीम हॅण्डल करू शकत नाही.
तसेच आलेले क्षेपणास्त्र छोटे की मोठे (ड्रोन की मिसाइल) याचा फरक न करता एकच महागडे उत्तर देते.
आज इंटरसेप्टर मिसाईल जवळजवळ संपली आहेत, येणाऱ्या मिसाईल ची warning देणारी रडार आंधळी झाली आहेत. जी वॉर्निंग 20 min आधी मिळायची ती आता काही सेकंद आधी मिळते. आणि राजधानीवर कधीही मिसाईल चा पाऊस पडतो. एका रात्रीत लोकांना 3 4 वेळ बंकरचा आसरा घ्यावा लागतो.
ही सगळी परिस्थिती iron dome असमर्थ असल्याचे दर्शवत नाही काय?
तुमची अपेक्षा काय आहे? नेत्यानाहु नी पुढे येऊन प्रेस कॉन्फरन्स घेऊन कबुली द्यावी का?
मुळ धाग्यात ज्या बोटीण्चा
मुळ धाग्यात ज्या बोटीण्चा उल्लेख झालाय त्या होर्मुझ मधुन निघाल्या का पुढे??? सगळ्या मोदीप्रेमी व विरोधी न्युज निघाल्या म्हणताहेत… खखो मायबोलीचे जाणकारच जाणोत. सांगा काय ते लवकर. एलपिजी नसेल तर मी चुलीसाठी लाकडे तरी गोळा करायला लागेन. चुल आहे माझ्याकडे.
ही बोगस सिस्टीम आता भारताला दिली आहे>>>>
आता दिली???? मग पहलगामच्या वेळी वापरली ती कोणी
दिलेली? ती तर चांगलीच चालली त्यावेळेस.
सुरज सामंत यांची पोस्ट,
सुरज सामंत यांची पोस्ट,
या अशा इस्राएल चे कोणी समर्थन करत असेल तर त्याने तत्काळ इस्राएलला निघून जावे.
****""
***"""
इज्राएल मधील डॉक्टर योएल डोंचीन यांनी त्यांच्या एका पेशंट बाबत केलेले वर्णन.
गुदद्वार पूर्णपणे फाटलेले होते,
एखादी कठीण वस्तू घुसवल्यामुळे गुदद्वाराच्या आतील बाजूस अनेक जखमा होत्या,
फुफ्फुस फाटलेले होते,
सात बरगड्या तुटल्या होत्या, पोटात आणि छातीवर भयंकर प्रहार झाल्याची चिन्ह होती, आपत्कालीन शस्त्रक्रियेची गरज असताना, अंतर्वस्त्र रक्ताने माखलेल्या अवस्थेत या व्यक्तीला चालवत आणले गेले.
हे वर्णन कोणाचे ?
तर पॅलेस्टाईन मधून पकडलेल्या एका पुरुषाचे, ज्याच्यावर इज्राएली सैनिकांनी सामूहिक बलात्कार केला आणि त्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग सुद्धा केले....
त्याच्यावर बलात्कार करत असताना चाकू आणि टीजर गन (विजेचा झटका देणारे यंत्र) याचा देखील वापर झाला होता.
या बलात्कारी सैनिकांवर गुन्हा दाखल झाला तेव्हा त्यांच्या "समर्थनार्थ" बरीच निदर्शने झाली, इज्राएल मध्ये मोर्चे निघाले.
यात इज्राएली सरकारमधील मोठ्या पदावरील व्यक्ती सुद्धा सहभागी होत्या.
इज्राएल मधील टीव्ही चॅनेल्स वर त्यांना जणू हिरो असल्यासारखे दाखवले गेले, गेम शो मध्ये आमंत्रित करण्यात आले.
त्यांनीच बनवलेला व्हिडिओ लीक करण्याच्या आरोपावरून तक्रारकर्त्या महिला वकिलाला दबाव आणत राजीनामा देण्यास भाग पाडले.
आणि आता इज्राएल मध्ये सरकारने त्या बलात्कारी सैनिकांवरील आरोप मागे घेतले....
इज्राएली नागरिकांनी जल्लोष करत त्यांचे स्वागत केले.
आणि ही काही अपवादात्मक घटना नाही.
जगभरातील अनेक मीडियामध्ये इज्राएल मधील या टॉर्चरच्या स्वरूपाचे अनेकदा वर्णन केले आहे.
संयुक्त राष्ट्र संघाने म्हटले आहे की IDF/ इजरायली डिफेन्स फोर्स कडून बलात्कार केले जाणे हे अतिशय कॉमन आहे जणू बलात्कार हा त्यांच्या युद्धनीतीचा भाग असावा.
इज्राएल मध्ये बहुतांशी लोकं बलात्काराचं समर्थन करतात.
हॅरिट्झ, या आघाडीच्या इज्राएली वर्तमानपत्राने जाहीर केलेल्या अभ्यासानुसार,
६१% इज्राएलीनी परिचित व्यक्तीवर बलात्कार करणे याला काही गैर समजले नाही,
९३% इज्राएली पत्नीवर बलात्कार करणे योग्य समजतात,
६५% इज्राएली IDF सैनिकांनी पॅलेस्टिनी व्यक्तींवर केलेल्या बलात्काराला योग्य समजतात.
आणि हे सर्व त्यांच्या रेशियल सुपिरियॉरिटी / वांशिक श्रेष्ठता आणि मिसोजीनी / लैंगिक श्रेष्ठत्व ... या स्वभाव वैशिष्ट्यामधून येते.
आणि हे फक्त मुस्लिम विरोधात नाही तर ख्रिश्चन, हिंदू, बौद्ध.... सर्व प्रकारच्या लोकांच्या विरोधात असेच वागत असताना दिसतात त्या सर्वाना कनिष्ठ वा तुच्छ समजतात.
भारतीयांना दुय्यम वागणूक दिली जाते हे अनेक वेळा दिसून आले आहे.
आणि हे प्रिय कोणाला आहेत ? का ?
सरसकटीकरण वाटू शकते, पण कधीकधी प्रश्न पडतो पीजी वूडहाऊस हे बघून I Do Not Hate In Plural असं म्हणू शकला असता का ?
की त्याने नियमाला अपवाद समजले असते ?
अर्थात या सगळ्याला विरोध करणारे, त्याविरोधात आवाज उठावाने अल्पसंख्य का असेना .... इज्राएली आहेत म्हणून या घटना समोर येत आहेत हे देखील तेवढेच खरे.
15/03/26
Sooraj Samant यांची पोस्ट.
<मोदी इस्राएलला जाऊन
<मोदी इस्राएलला जाऊन समर्थांनाथ काही बोलले असतील तर त्यात काही चुकीचं नाही.> रात्रीचं चांदणं दिवसा पडलं तरी त्यात मोदींनी काही चुकीचं केल्याचं दिसतच नाही. मोदींच्या परराष्ट्र धोरणाबद्दल बोलताना ते इराणचा राजदूत काय म्हणाला ते का सांगताहेत?
मोदी इस्रायलला कसला तरी अवॉर्ड घ्यायला गेले. याआधी तो अवॉर्ड कोणाला मिळाला नव्हता. यापुढेही मिळेल का हे सांगता येत नाही.
पण इस्रायल, अमेरिकेने इराणवर हल्ला केल्यावर, त्यां च्या सर्वोच्च धार्मिक नेत्याला मारल्यावर, तिथल्या शाळेवर क्षेप णास्त्र टाकून दीडशे लहान मुलींना (राइट विंगर्सच्या मते भावी जिहादी दहशतवाद्यांच्या आया ) मारल्यावर त्याबद्दल काही बोलले नाहीत.
इराणी दूतावासात जाऊन दुखवटा संदेश लिहिला परराष्ट्र सचिवांनी. त्यासाठी पेन शोधायला त्यांना ७-८ दिवस लागले. तोवर इराणने होर्मूझ बंद केल्याने आपली तेल आयात थंडावली याचा त्याच्याशी काही संबंध नाही.
दुसरीकडे इराणने इतर आखाती देशांवर हल्ला केल्यावर भारताने त्याचा लागलीच निषेध केला.
दरम्यान जयशंकर आणि मोदींची इराणी नेत्यांना मस्काबाजी सुरू झाली. त्यातही जयशंकरनी मोदींना आरतीही ओवाळली. पण ते तबक त्यांच्या हातून पडलं आणि त्यांचंच तोंड भाजलं.
S.Jayashankar
@jaypanicker
The @narendramodi government has once again proven its might as the strongest voice of Independent India, the world has ever seen. While all other countries are running from pillar to post to secure a safe passage through Strait of Hormuz, all it takes for PM Modi's goodwill is a phone call. India has well and clearly reached the vishwaguru stage wherein all countries across the globe respect its interests
Iran has dismissed reports claiming Tehran has allowed India-flagged tankers to pass through the Strait of Hormuz amid a worsening global energy crisis. The denial came after reports claimed Iran provided big relief to India following talks between External Affairs Minister (EAM) S Jaishankar and his Iranian counterpart Abbas Araghchi, with the aim of keeping the critical sea route open for the transportation of crude oil and natural gas.
Narendra Modi
@narendramodi
Had a conversation with Iranian President, Dr. Masoud Pezeshkian, to discuss the serious situation in the region.
Expressed deep concern over the escalation of tensions and the loss of civilian lives as well as damage to civilian infrastructure.
The safety and security of Indian nationals, along with the need for unhindered transit of goods and energy, remain India’s top priorities.
इराणच्या दूतावासाने भारतीय जनतेचे आभार मानले. भारत सरकारचे नाही.
Delhi: Iran’s Ambassador to India Mohammad Fathali, at the International Quds Day Conference, says, “Finally, I would like to express my gratitude to the people of India for the manner in which they conveyed their condolences and sympathies regarding the martyrdom of our leader. I am deeply thankful to all of you. Such messages and expressions from you serve as a testament to the depth of the historical and cultural ties that have long existed between India and Iran; the true extent of this profound bond can be gauged by the sentiments expressed by the people here.”
हिंदुत्ववाद्यांना इस्रायल आणि
हिंदुत्ववाद्यांना इस्रायल आणि झिऑनिस्ट्स बद्दल प्रेमाचं फार भरतं येतं. त्यांच्यासाठी हा रब्बी मूर्तीपूजकांबद्दल काय म्हणतोय बघा.
मूर्तीपूजकांना जगण्याचा अधिकार नाही. यात त्याने हिंदू आणि भारतीय हे शब्द अनेकदा उच्चारलेत.
https://www.instagram.com/reels/DVltNiskjPc/
व्हिडियो ए आय जनरेटेड वाटत असेल तर हे वाचा
https://www.myjewishlearning.com/article/idolatry-the-ultimate-betrayal-...
While Judaism has never been a proselytizing faith, the elimination of idolatry from the world was traditionally a central Jewish objective. In the seventh chapter of Deuteronomy, God declares that the idol worshipping nations resident in the land of Israel should be wiped out, no treaties should be signed with them and no Israelite sons or daughters offered up to them in marriage: “Instead, this is what you shall do to them: you shall tear down their altars, smash their pillars, cut down their sacred posts, and consign their images to the fire.”
इराणचा प्रतिनिधी मोदी जयशंकर
इराणचा प्रतिनिधी मोदी जयशंकर यांचं तोंड भरून कौतुक करताना
Narendra Modi
Narendra Modi
@narendramodi
Spoke with President of the UAE, my brother Sheikh Mohamed bin Zayed Al Nahyan. Strongly condemned the attacks on the UAE and condoled the loss of lives in these attacks. India stands in solidarity with the UAE in these difficult times.
Thanked him for taking care of the Indian community living in the UAE. We support de-escalation, regional peace, security and stability.
11:26 PM · Mar 1, 2026
इराणवर हल्ला कधी झाला? २८ फेब्रुवारीला. मोदींनी त्या हल्ल्याचा अजूनपर्यंत निषेध केलाय का ?
मोदींनी त्या हल्ल्याचा
मोदींनी त्या हल्ल्याचा अजूनपर्यंत निषेध केलाय का ?
>>>>
मोदी का हल्ल्याचा निषेध करतील?
मोदी स्वतः ट्रम्प नेतनयाहू यांच्या टीम मध्ये आहेत. हल्ल्याआधी भेटून सुद्धा आले. किंबहुना हल्ला काय कसा करावा आणि मोदींनी काय स्टॅन्ड घ्यायचा हेच ठरवायला मोदींची इस्त्राईल भेट होती..
ज्या नेत्याला आपल्या देशातील
ज्या नेत्याला आपल्या देशातील राजकारण (?) नेहरु, हिन्दु-मुस्लिम, थापेबाजी,जुमलेबाजी ह्या पलिकडे कधीच नेता आलेले नाही, (तेवढी बैद्धीक कुवत नाहीये म्हणा) त्याला आतरराष्ट्रिय राजकारण किती समजत असेल आणी एका प्रचंड बाजारपेठेचा पंतप्रधान ह्या पलिकडे त्याला काय किंमत असेल ?
मोदींनी इराणवरील हल्ल्याचा
मोदींनी इराणवरील हल्ल्याचा निषेध केला नाही . या उलट इस्राएल ला आम्ही सर्वप्रकारच्या दहशतवादा विरुद्ध आहोत असे सांगणारे ट्विट केले.
खामानी मृत्युमुखी पडल्याबद्दल शोक व्यक्त केला नाही.
आपण पाहुणी बोललेली बोट बुडाल्याबद्दल भाष्य नाही
आणि या महाभागाला वाटते इराण आपल्याला फेवर करेल.
याच्या कर्माने पूर्ण भारत बुडणार आहे.
इस्त्रायलची तळी उचलणारे, त्याला idolize करणारे इस्रायल सारखेच गर्तेत जाणार आहेत.
आणि बाकीचे शहाणे लोक collateral damage म्हणून रसातळाला जाणार आहेत
आपल्या एकूण संरक्षण आयातीपैकी
आपल्या एकूण संरक्षण आयातीपैकी जवळपास १२–१४ टक्के आयात आपण इस्राएलकडून करतो. अनेक महत्त्वाच्या प्रसंगी इस्राएलने भारताला मदतही केलेली आहे.
कारगिलच्या युद्धाच्या वेळी तर आयत्यावेळी भारताने इस्राएलकडून लेझर-गाइडेड बॉम्ब, टेहळणीसाठी लागणारी ड्रोन आणि इतर अनेक उपकरणे घेतली होती. तीपण अतिशय कमी वेळात उपलब्ध करून देण्यात आली होती. नुकत्याच झालेल्या ऑपरेशन सिंदूरच्या वेळीही इस्राएलकडून भारताला केवळ राजनैतिक पाठिंबाच नव्हता तर बरीच इस्राएली ड्रोन आणि क्षेपणास्तही आपण वापरली होती.
म्हणून अशा मित्रदेशाला भेट देऊन पंतप्रधान मोदींनी काही चूक केलेली नाही. भारतालाही दहशतवादाच्या झळा बसल्या आहेत, त्यामुळे मोदींचे ट्विट योग्यच वाटते.
दुसरीकडे, गेल्या काही वर्षांत खेमेनी यांनी बऱ्याच वेळा भारताच्या अंतर्गत बाबींवर भाष्य केले आहे. उदाहरणार्थ, काश्मीरमधील कलम ३७० असो किंवा भारतीय मुस्लिमांची तुलना गाझाच्या मुस्लिमांबरोबर करणे असो. ह्यात खेमेणी ने लुडबुड करायची गरज नव्हती. स्वतः मात्र स्वतःच्या देशात महिलांवर अत्याचार करत राहिला.
तरी पण, पाकिस्तानचा शेजारी देश असल्यामुळे इराणशी भारताचे संबंधही महत्त्वाचे आहेत. त्यामुळे मोदींच्या भेटीची वेळ मात्र चुकीची आहे. त्याचबरोबर खेमेनी यांच्या निधनानंतर दुःख व्यक्त करणारा औपचारिक संदेश दिला असता तर बरं झालं असते.
इराण मध्ये महिलांवर काय
इराण मध्ये महिलांवर काय अत्याचार होत आहेत? खोमेणी यांच्या कारकिर्दीमध्ये मागील दहा वर्षात काय आणि किती अत्याचार झालेत?
एप्स्टीन फाइल्समध्ये असेल
एप्स्टीन फाइल्समध्ये असेल त्याबद्दल.
अमेरिका आणि इस्त्राएलने
अमेरिका आणि इस्त्राएलने महिलांच्या स्वातंत्र्यासाठी आणि नागरिकांच्या स्वातंत्र्यासाठी हे युद्ध आरंभले होते. त्याचाच एक भाग म्हणून मुलींच्या शाळेवर बाँब टाकले. खामेनी यांच्या राजवटीत झालेल्या महिला अत्याचारांबद्दल अमेरिका आणि इस्राएल यांनी अभिनव पद्धतीने आवाज उठवला.
खामेनींचं आजारपणामुळे निधन
खामेनींचं आजारपणामुळे निधन नाही झालं. हत्या केली इस्रायलने.
इस्रायल आपल्याला फुकट शस्त्रास्त्र देतो का ? मग त्याबदल्यात आपल्या बजरंग दल, गोरक्षकांना इराणमध्ये लढायला पाठवायला हवं.
बांग्लादेशात हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारांबद्दल भारताने बोलणं ही त्यांच्या अंतर्गत कारभारात लुडबूड ठरेल ना?
साधना,
साधना,
तुमचा reply
>>>>>ही बोगस सिस्टीम आता भारताला दिली आहे>>>>
आता दिली???? मग पहलगामच्या वेळी वापरली ती कोणी
दिलेली? ती तर चांगलीच चालली त्यावेळेस.>>>>
आणि मी हे लिहिलेले,
>>>laser weapon एकही मिसाईल पाडू शकत नाही आणि ही बोगस सिस्टीम आता भारताला दिली आहे.>>>
लेसर बीम ने क्षेपणास्त्रे नष्ट करणे, = iron beam
ही यंत्रणा पहेलगाम अटॅक वेळी वापरली गेली का?.
आत्ता तेल अविव इराणच्या माऱ्याखालील भाजून निघत आहे, Iron beam पर शॉट 2 USD किमतीत क्षेपणास्त्र पाडेल असे सांगितले गेले होते. जर ही सिस्टीम effective आहे तर आज तेलअविव का उध्वस्त होत आहे?
तुम्ही माझ्या लिखाणातील selective भाग quote करून गैरसमज का निर्माण करत आहात?
Is it done by mistake? Or intentionally?
तुमच्या प्रिय इस्रायलला टोचून बोलल्याने विचलित होत आहात का?
बजरंग दल , गोरक्षक कशाला?
बजरंग दल , गोरक्षक कशाला?
आपले संघ स्वयंसेवक आहेत की,
दीड दिवसात फौज उभी राहील पितृभूमी रक्षणासाठी
धाग्यात ज्या बोटीण्चा उल्लेख
धाग्यात ज्या बोटीण्चा उल्लेख झालाय त्या होर्मुझ मधुन निघाल्या का पुढे??? सगळ्या मोदीप्रेमी व विरोधी न्युज निघाल्या म्हणताहेत…>>>>>>
किती दिवस त्या बोटींचे कौतुक सांगणार? येतील त्या उद्या पर्यंत.
दरम्यात,
कांडला बंदराकडे येणाऱ्या बोटीला पेटवून दिले (बोट भारतीय नव्हती, पण भारताचा माल घेऊन येत होती)
आजच जग लाडकी नावाच्या भारतीय बोटीवर हल्ला झालाय
मायबोली experts सांगतीलच खरे खोटे काय ते.
Epstein n his wife is jew.
Epstein n his wife is jew.
त्यांच्या मते त्यांनी काहीच अत्याचार केले नाहीत.
आता पितृभूमीला वाचवायचेच आहे आपल्याला. इजराइल ने अत्याचार बाकीच्या जगावर केलेत.
ड्रेस कोड म्हणजे बंधनं , अत्याचार नव्हे.
त्याचं नियमात रूपांतर करून, नियम मोडल्यास सजा देणे म्हणजे अत्याचार.?
रात्रीचे चांदणे.. iran स्त्रियांवर झालेल्या अत्याचारांची लिस्ट पाठवा जे त्यांच्या राज्यकर्त्याने केलेत.
इराणने महिलांवर अ त्याचार
इराणने महिलांवर अ त्याचार केले यात दुमत नाही.
पण अमेरिका आणि इराणने युद्ध आरंभ केले आहे त्याच्या मागचे महान उद्दीष्ट तेल आहे. महिला आणि इराणी नागरिकांचे स्वातंत्र्य हे नाही. प्रत्येक वेळी अमेरिकेची मानवतावादी कारणे दर वेळी चालतीलच असे नाही. आता डॉटस जोडायचीही आवश्यकता नाही. ट्रंप यांनी अती केल्याने माती झाली आहे.
इरणमधली जनता म्हणते आहे,
इरणमधली जनता म्हणते आहे, आम्हांला खामेनीच्या जुलुमाचा कंटाळा आला. इस्रायल गाझा, वेस्ट बॅंकमध्ये करतो तसे अत्याचार आम्हांला हवेत
Pages