जर तुमच्या बाबतीत असे घडले तर ?

Submitted by एक लेखक on 16 February, 2026 - 12:23

एक नवीन खेळ खेळूयात. एक सिच्युएशन असेल आणि त्या सिच्युएशन मधे तुम्ही काय कराल किंवा तुमची प्रतिक्रिया काय असेल ? असा प्रश्न विचारायचा. त्याच्या वर उत्तरे येऊ द्यायची. जेव्हां तो प्रश्न जुना होईल तेव्हां कुणीही तसाच प्रश्न विचारायचा. असा खेळ चालू ठेवायचा.

पहिला प्रश्न : समजा तुम्ही जंगलात फसला आहात , तुमचा ड्रायव्हर तुम्हाला सोडून गेला आहे. तुम्ही काही मदत मिळते का म्हणून गाडी पासून लांब आला आहात. अशा वेळी जर तुमच्या समोर एक बिबळ्या , एक चित्ता, एक गेंडा, एक वाघ , एक सिंह आणि एक अजगर आला तर..

अ) तुम्हाला जास्त भीती कुणाची वाटेल ?
ब) तुम्ही काय कराल ?

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एक व्यक्ती एका खूप मोठ्या कापड निर्माण उद्योगाची मालक आहे. दर सोमवारी ती व्यक्ती आपल्या कारखान्याला भेट द्यायला जाते. एके सोमवारी गाडीतून उतरल्याबरोबर एक बाई व तिची तीन लहान मुले त्या मालकाच्या पायांवर लोळण घेतात व गयावया करू लागतात. हा काय प्रकार आहे याची मालक मॅनेजरकडे चौकशी करतो. मॅनेजर सांगतो की - “त्या बाई व मुले हे आपल्याच मिलमधल्या एका कामगाराची पत्नी व मुले आहेत. तो कामगार खूप कामचुकार आहे. अनेकदा समज देऊनही तो ऐकत नाही, म्हणून त्याला कामावरून काढून टाकले आहे. त्याला पुन्हा कामावर घ्यावे म्हणून तो आपल्या बायको व मुलांना तुमच्याकडे गयावया करण्यासाठी घेऊन आला आहे. तुम्ही कृपया त्याला पुन्हा कामावर घेऊ नका.”
तो कामगार मात्र माझी मुले रस्त्यावर येतील म्हणून गयावया करत असतो.
समजा, त्या मालकाच्या जागी तुम्ही असाल तर त्या कामगाराला परत कामावर घ्याल कि काढून टाकण्याचा निर्णय कायम ठेवाल? व का?
(हा प्रसंग मी एका पुस्तकात वाचला आहे. त्यात तो मालक त्या कामगाराला परत कामावर घेतो. एवढ्या लोकांना आपण पोसतो, त्यात अजून एक असे काहीतरी आहे.)

Ultimatum Game नावाने प्रसिद्ध असलेल्या खेळात तुम्ही कसे वागाल?

समजा, तुम्हाला एक कोटी रुपये दिले व एक अट घातली. त्या एक कोटीमधली हवी तितकी रक्कम तुम्ही “क्ष” या पूर्णपणे अनोळखी व्यक्तीला देऊ (ऑफर) करायची आहे. जर तुम्ही दिलेली रक्कम क्ष ने स्वीकारली. तर दोघांकडे असलेली रक्कम दोघांकडेच राहील व खेळ संपेल. पण जर क्ष ने ती रक्कम कमी आहे म्हणून स्वीकारायला नकार दिला तर, ते एक कोटी रुपये परत द्यावे लागतील व खेळ संपेल. क्ष शी खेळापुर्वी किंवा खेळताना कोणताही संवाद करता येणार नाही. तसेच ऑफर एकदाच करायची आहे. क्ष फक्त स्वीकारेल किंवा नाकारेल.

तर तुम्ही क्ष ला किती रक्कम ऑफर कराल? व का?

१.खेळापुर्वी किंवा खेळताना कोणताही संवाद करता येणार नाही>> मग ऑफर कशी करणार?

२. क्ष ला माहीत आहे का की तो खेळतोय, की रस्त्यात, पब्लिक प्लेमध्ये जाऊन रँडमली कोणाला तरी ऑफर करायची आहे?

मग ऑफर कशी करणार? >>>> रकमेचा आकडा सांगण्या व्यतिरिक्त इतर कोणताही संवाद करायचा नाही
क्ष ला माहीत आहे का की तो खेळतोय, की रस्त्यात, पब्लिक प्लेमध्ये जाऊन रँडमली कोणाला तरी ऑफर करायची आहे? >>>> प्रत्यक्ष काही करायचे नाही, हा विचार प्रयोग आहे. म्हणजे क्ष पैसे घेऊन पळून जाईल वगैरे असे काही नाही. क्ष म्हणजे कोणीही सर्वसाधारण काल्पनिक व्यक्ती असू शकतो.

अल्टिमेटम गेम पुढील प्रकारे काम करतो
समजा दोन लोक आहेत – व्यक्ती A आणि व्यक्ती B.
1️⃣ संशोधक व्यक्ती A ला ₹100 देतो.
2️⃣ व्यक्ती A ला सांगितले जाते की, या पैशांपैकी किती पैसे व्यक्ती B ला द्यायचे ते ठरवा.
3️⃣ व्यक्ती B कडे दोनच पर्याय असतात:
स्वीकारणे
नाकारणे
काय होते पुढे?
जर व्यक्ती B ने स्वीकारले, तर दोघांना पैसे मिळतात.
उदाहरण: A ने ₹70 ठेवले आणि B ला ₹30 दिले → B ने स्वीकारले → A ला ₹70, B ला ₹30.
जर व्यक्ती B ने नाकारले, तर दोघांनाही एकही पैसा मिळत नाही.

सध्या गाजत असलेल्या NEET परीक्षा पेपरफुटीमुळे या धाग्यावर मी याच विषयासंबंधात पूर्वी विचारलेला प्रश्न आठवला. खाली पुन्हा देत आहे.

समजा तुमचा मुलगा / मुलगी दहावीला आहे व बोर्डाच्या परीक्षा चालू आहेत. पाल्याने चांगला अभ्यास केला आहे व त्याला इच्छित कॉलेजमध्ये प्रवेश मिळेल असे वाटते. अचानक बातमी येते कि एक पेपर (प्रश्नपत्रिका) फुटलेला आहे व जवळपास सर्वांना मिळाला आहे. तुमच्या पाल्याला सुद्धा तो मिळाला आहे. तुमचा पाल्य तुम्हाला विचारतो कि, ती प्रश्नपत्रिका पाहू का? आता जर तुमच्या पाल्याने ती पाहिली नाही, तर अशी दाट शक्यता आहे कि, इतरांच्या तुलनेने त्याला कमी गुण मिळून त्याला इच्छित कॉलेजमध्ये प्रवेश मिळणार नाही. त्याचा परिणाम त्याच्या करिअर वरती होईल.
तुम्ही काय कराल? व का?

आता दहावीच्या जागी NEET परीक्षा असेल तर काय होईल?

प्रश्न द्रष्टा आहे. पण उत्तर देणं कठीण आहे.

प्रामाणिकपणे परीक्षा दिलेल्या २२ लाख विद्यार्थ्यांचे नुकसान झालेले आहे. २०१६ पासून पेपरफुटी चालू आहे. जे जे पॅटर्न्स अल्पावधीत प्रसिद्ध झाले त्या सर्व पॅटर्न्सची चौकशी होणार आहे. कोटा पॅटर्नची अद्याप चौकशी झालेली नाही, पण इथेच सर्वात जास्त धांदली आहे असे म्हणतात.

हा प्रश्न आता काल्पनिक राहिलेला नाही आणि प्रामाणिकपणाचे रिझल्टसही दिसले आहेत. मनात आक्रोश आहे, व्यक्त करता येत नाही. प्रामाणिकपणे जर प्रवेश मिळाला नसता तर त्या विद्यार्थ्यांबद्दल एव्हढं वाईट वाटलं नसतं. पण आता या विद्यार्थांच्या मनात येणारच कि जर धांदली झाली नसती तर माझा नंबर लागला असता. डॉक्टरकीचं स्वप्नं धुळीला मिळालं तरी मनाची समजूत काढून दुसर्‍या मार्गाला लागले असतील.

Pages