जर तुमच्या बाबतीत असे घडले तर ?

Submitted by एक लेखक on 16 February, 2026 - 12:23

एक नवीन खेळ खेळूयात. एक सिच्युएशन असेल आणि त्या सिच्युएशन मधे तुम्ही काय कराल किंवा तुमची प्रतिक्रिया काय असेल ? असा प्रश्न विचारायचा. त्याच्या वर उत्तरे येऊ द्यायची. जेव्हां तो प्रश्न जुना होईल तेव्हां कुणीही तसाच प्रश्न विचारायचा. असा खेळ चालू ठेवायचा.

पहिला प्रश्न : समजा तुम्ही जंगलात फसला आहात , तुमचा ड्रायव्हर तुम्हाला सोडून गेला आहे. तुम्ही काही मदत मिळते का म्हणून गाडी पासून लांब आला आहात. अशा वेळी जर तुमच्या समोर एक बिबळ्या , एक चित्ता, एक गेंडा, एक वाघ , एक सिंह आणि एक अजगर आला तर..

अ) तुम्हाला जास्त भीती कुणाची वाटेल ?
ब) तुम्ही काय कराल ?

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अ) तुम्हाला जास्त भीती कुणाची वाटेल ?
अजगराची.

ब) तुम्ही काय कराल ?
बिबट्या , वाघ, चिता, गेंडा असे प्राणी एकत्र येणे शक्य नाही म्हणजे त्यांच्या वेशात (कातडे पांघरून) कुणी प्रॅंक करायला आलेत हे उघड आहे.
सगळी सोंग आणता येतात पण अजगराचं सोंग नाही आणता येत तेव्हा तो खराच आहे. मी त्यांना ओरडून सांगेन "तुमच्या मागुन अजगर येतो पळा लेकांनो" आणि सगळे अजगरा पासून दूर पळू.

सगळी सोंग आणता येतात पण अजगराचं सोंग नाही आणता येत ---- १
सगळी सोंग आणता येतात पण पैशाचं सोंग नाही आणता येत ---- २

equating 1 and 2 we get

अजगर = पैसा

अ) तुम्हाला जास्त भीती कुणाची वाटेल? - मरणाची

ब) तुम्ही काय कराल? - मरणाची भीती वाटली तरी त्या भीतीने हातपाय न गाळता जीवाच्या आकांताने गाडीच्या दिशेने पळत सुटेल. त्यांना काही समजायच्या आतच त्यांच्या नजरेसमोरून गायब होईल. माझा धावण्याचा वेग अफाट आहे. त्यावर आणि नशिबावर विश्वास ठेवेन. एवढी जनावरे एकाच दिशेने आणि एकजुटीने माझ्या मागे धावतील असे वाटत नाही. थोडी गोंधळूनच जातील. आता काय करावे हा प्रश्न त्यांनाच पडेल Happy आणि या सिच्युएशन मध्ये त्यांना कसली मरणाची वगैरे भीती नसल्याने ते सुद्धा आपल्या मनातील गोंधळ दूर सारून जीव जाळत माझ्या मागे पळतील याची शक्यता कमीच. उलट एकमेकांची तोंडे बघत बसतील याचीच शक्यता जास्त. आणि त्यातही कोणी शहाणपणा करत एकटाच मागे आला तर कोपच्यात घेऊन बुकलून काढेल साल्याला..

अ) तुम्हाला जास्त भीती कुणाची वाटेल ?
माझ्या मनातल्या भीतीची..

ब) तुम्ही काय कराल

चित्ता, वाघ आणि सिंह एकमेकांसमोर जर खरच आले तर ते पहिल्यांदी आपापसात भांडतील.
अजगर भल्यामोठ्या गेंड्याकडे कुछ करेल.
तोपर्यंत मी पळत जाऊन गाडीत बसेन, दर बाद करून घेईन.
आणि बंदुकीचा आवाज काढेन जमल तर गाडीतले पेट्रोल काढू न आग तयार करेन . हे सगळे प्राणी आगीला घाबरतात.

तोपर्यंत सकाळ झाली असेल ... एकतर मी झोपेतून उठेन आणि लक्षात येईल की ते स्वप्न होतं. Lol

आणि बंदुकीचा आवाज काढेन
>>> >>>>

बंदूक वगैरे शस्त्रे अललाऊड असतील तर मी RDX वापरून उडवूनच टाकेन जंगल.. सुक्यासोबत ओले सुद्धा जळेल. पण आपला जीव महत्वाचा. जंगलात असल्याने जंगलाचा कानून.. जहा हर ताकदवर अपनेसे कमजोर को मारता है!

पुढचा प्रश्न मी दिला तर चालेल का?

दुसरा प्रश्न :
समजा तुम्हाला शंभर कोटी रुपये कोणी देत असेल
पण एक अटीवर की तुम्ही तुमच्या कुटुंबापासून (मुलं-बाळ, बायको-नवरा, आई-वडील, भाऊ-बहीण, प्रियकर-प्रेयसी मित्र मैत्रिणी , आप्तस्वकीय) यांच्या पासून पूर्ण वेगळे अलिप्त व्हावे..म्हणजे ते तुमच्या या जगात कोणत्याही प्रकारे नसणार - स्मृती, डिजिटल, आवाज कोणत्याही प्रकारे...

तर तुम्ही काय निवडलं ? का?

शस्त्र अलाऊड असतील तर सिंहाच्या डोक्यावर पिस्तुल रोखायची आणि सिंहाला सांगायचे या वाघाला सांग हरिणाची शिकार करून घेऊन ये, बिबट्याला सांग रान कोंबंडीची शिकार करून घेऊन ये.
अजगराला सांग वाळली लाकडं तोडून गेंडायच्या पाठीला लपेटून बसून आण.
मग लाकडाचा जाळ पेटवून सगळ्यांना सोडून द्यायचे. आगीला भिऊन ते निघुन जातील.
मग त्यावर हरीण , रानकोंबडी शिजवून मेजवानी करायची.

अ) तुम्हाला जास्त भीती कुणाची वाटेल ?
मला स्वतःची भिती वाटेल. अशा परिस्थितीत मला भिती वाटू नये किंवा त्या प्राण्यांवर हल्ला करायची इच्छा होऊ नये.

ब) तुम्ही काय कराल ?
त्यांना अहिंसेचे, शाकाहाराचे महत्त्व समजावून सांगेन.

ते ऐकण्याच्या मनस्थितीत असतील का?>>>>

हो. असतील की. नसायला काय झाले?

प्रेमाने सगळे जग जिंकता येते हे तीन चार प्राणी तर सहजच येतील.

समजा तुम्हाला दहा कोटी रुपये कोणी देत असेल
पण एक अटीवर की तुम्ही तुमच्या कुटुंबापासून (मित्र मैत्रिणी , आप्तस्वकीय) यांच्या पासून पूर्ण वेगळे अलिप्त व्हावे..
>>>>>>>>>>

दहा कोटी फारच छोटी रक्कम आहे.
मुले कितीही पैसे दिले तरी सोडणे अशक्य.
बायको सोडू शकतो किमान पन्नास कोटी मिळाले तर.. तिला त्यातलेच दहा दिले तर तीच निघून जाईल आनंदाने. फक्त हे मुलांना समजायला नको.

त्यांना अहिंसेचे, शाकाहाराचे महत्त्व समजावून सांगेन.
>>>>

त्यापेक्षा आपणच हिंसेचे आणि मांसाहाराचे महत्त्व समजून घेतले तर उलट त्याच प्राण्यांना खाता येईल Happy
आणि तेच आपल्याकडे गयावया करतील.. नका खाऊ नका खाऊ Happy

जर तुमच्या बाबतीत असे घडले तर?

तुम्ही सकाळी उठलात आणि डोळे उघडल्यावर सुद्धा तुम्हाला काहीच दिसेनासे झाले.

आपण आंधळे झालो आहोत हे लक्षात येताच तुम्ही घाबरून ओरडायचा प्रयत्न केलात पण तोंडातून आवाज फुटत नसल्याने तुम्हाला आपण मुके सुद्धा झालो आहोत हे समजले.

तुम्ही आणखी घाबरून ताडकन उठायचा प्रयत्न केला पण तुमच्या हातापायातली शक्ती गेली आहे असे तुम्हाला जाणवले.

त्या जागच्या जागी केलेल्या धडपडीत बेडवरील पाण्याची बाटली खाली पडून आढळली पण काहीच आवाज न आल्याने तुम्हाला समजले की तुम्ही बहिरे सुद्धा झाला आहात.

आपल्याशीच असे का झाले आणि आपण असे काय पाप केले आहे असा विचार करता तुम्हाला जाणवले की तुम्हाला स्वतःचे नाव देखील आठवत नाहीये. तुमची सारी मेमरी डिलीट झाली आहे.

एवढे सगळे वाईट घडत असतानाच कोणीतरी व्यक्ती येऊन तुम्हाला स्पर्श करते आणि तुम्हाला याचाच आनंद होतो की चला एक तरी संवेदना जिवंत आहे, एक तरी इंद्रिय काम करत आहे..

पण या आनंदावर विरजण पडावे तसे ती व्यक्ती तुम्हाला कळवळेपर्यंत मारू लागते. आणि तेच वरदान तुम्हाला शाप वाटू लागते.

अश्यावेळी तुम्ही काय कराल?
स्वतःला कसे वाचवाल?

दहा कोटी फारच छोटी रक्कम आहे. >>> मान्य आहे.

आकडे बदलले. प्रश्न अधिक सविस्तर केला आहे.‌

दुसरा प्रश्न :
समजा तुम्हाला शंभर कोटी रुपये कोणी देत असेल
पण एक अटीवर की तुम्ही तुमच्या कुटुंबापासून (मुलं-बाळ, बायको-नवरा, आई-वडील, भाऊ-बहीण, प्रियकर-प्रेयसी मित्र मैत्रिणी , आप्तस्वकीय) यांच्या पासून पूर्ण वेगळे अलिप्त व्हावे..म्हणजे ते तुमच्या या जगात कोणत्याही प्रकारे नसणार - स्मृती, डिजिटल, आवाज कोणत्याही प्रकारे...

तर तुम्ही काय निवडलं ? का?

ण या आनंदावर विरजण पडावे तसे ती व्यक्ती तुम्हाला कळवळेपर्यंत मारू लागते. आणि तेच वरदान तुम्हाला शाप वाटू लागते.
अश्यावेळी तुम्ही काय कराल?
स्वतःला कसे वाचवाल?>>> मी खरोखरच डोळे उघडेन
आणि वाईट स्वप्न संपलं म्हणून आनंदात नवीन दिवसाला सुरुवात करेल.

तुम्ही मित्र आणि फॅमिली घेऊन बसला आहात..
मी तर पैश्यासाठी माझे दुश्मन सुद्धा नाही सोडणार..
जर मला चिक्कार पैसा मिळाला आहे त्या आनंदात सहभागी व्हायला जवळचे नसतील.. आणि जळायला शत्रू नसतील.. तर कसा मिळणार त्या पैशातून आनंद Happy

तुम्ही मित्र आणि फॅमिली घेऊन बसला आहात..
मी तर पैश्यासाठी माझे दुश्मन सुद्धा नाही सोडणार..
जर मला चिक्कार पैसा मिळाला आहे त्या आनंदात सहभागी व्हायला जवळचे नसतील.. आणि जळायला शत्रू नसतील.. तर कसा मिळणार त्या पैशातून आनंद Happy>>>> +10000000 खरा आनंद लोकांना जळवण्यात असतो. स्पेशली कुजकट नातेवाईकांना आणि टोमणे मारणाऱ्या लोकांना Lol

मला १०० कोटी मिळाले तर मी ते घेऊन बायको, मुले, सगळ्या मित्रांना वाटून टाकेन आणि त्या पहिल्या प्रश्नातल्या प्राण्यांकडे जाईन. त्यांना अहिंसा व शाकाहाराचे महत्त्व समजावून सांगायला.

स्पेशली कुजकट नातेवाईकांना आणि टोमणे मारणाऱ्या लोकांना Lol
>>>>

हो ना.. म्हणून मी स्वतः कधी माझ्या कट्टर शत्रूला देखील टोमणे मारत नाही. जेणेकरून भविष्यात त्याला हा मला जळवण्याचा आनंद मिळू नये Proud

रोचक विषय.
अ) तुम्हाला जास्त भीती कुणाची वाटेल ? - गेंडा सोडून सर्वांची जवळपास सारखीच भीती वाटेल. गेंडा शाकाहारी असतो त्यामुळे त्याला त्रास नाही दिला तर स्वतःहून तो काही करणार नाही. बाकीच्यांचे तसे नाही.
ब) तुम्ही काय कराल ? - गाडीकडे जोरात पळत सुटेल. जर अजगराच्या तावडीत सापडलो तर सुटणे कठीण. तो आवळून ठार मारतो. आणि बाकी कोणी मध्ये पडणार नाही. पण पळून जाऊन अजगराला चुकवणे सहज शक्य आहे. सिंह शक्यतो पाठलाग करणार नाही, कारण तो खूप लवकर दमतो. आणि तसेही एक मनुष्य हे त्याला पुरेसे खाद्य नाही. तो कदाचित गेंड्याच्या मागे लागेल. वाघ, चित्ता, बिबट्या पाठलाग करतील ज्यांना चुकवणे जवळपास अशक्य आहे. पण ते एकमेकांचे प्रतिस्पर्धी सुद्धा आहेत. त्यामुळे वाचण्याची शक्यता आहे.

दुसरा प्रश्न :
समजा तुम्हाला शंभर कोटी रुपये कोणी देत असेल >>>> ऑफर स्वीकारणार नाही. सध्याची आर्थिक स्थिती बरी आहे. त्यामुळे अधिकच्या पैशातून मिळणारे सुख हे कुटुंबवियोगाच्या दुःखापेक्षा कमी असेल. पण यापेक्षाही खूप कमी पैशात बरेच लोक अशी ऑफर स्वीकारतात. जसे कि परदेशात बराच काळ नोकरीसाठी एकटे जाणे. अर्थात ते तात्कालिक असते म्हणा.

जर तुमच्या जोडीदाराबरोबर तुम्हाला संशय असेल तर तुमची त्या व्यक्तीसोबत रहायची लायकी नाही.

संशय आला तर तात्काळ divorce द्यावा. U don’t deserve him/her.

संवाद साधा
संशय मिटवा
आयुष्य सिंपल ठेवा.
कॉम्प्लिकेटेड करू नका.

पण जर संशय खरा निघाला, जोडीदाराने कबुली दिली, तर मग तो व्यापक विषय आहे.

पण विवाहबाह्य संबंध शारीरिक गरज आणि भावनिक गरज अश्या दोन प्रकारात येतात. त्यामुळे कुठलाही निर्णय घेण्याआधी आपला जोडीदार कुठल्या प्रकारे गुंतला आहे हे सर्वात आधी जाणून घेणे गरजेचे.

या विषयावर तो इरफान खानचा ब्लॅकमेल चित्रपट धमाल होता.

बायकोचे अफेअर आहे हे समजताच आपल्याला समजले आहे हे उघड न करता गपचूप तिलाच ब्लॅकमेल करायला सुरुवात करतो.

एक बिबळ्या , एक चित्ता, एक गेंडा, एक वाघ , एक सिंह आणि एक अजगर आला तर.. >> पार्सल टंग नाही का इथे कोणी?
ॠन्म्या तू तरी फिस्स्स्स्स्स, हुस्स्स्स्स्स्स्स, टुस नुस फ्य्स स्स धुसस्स्स असं काही सांगशील की नाही त्या अजगराला!

अशा वेळी जर तुमच्या समोर एक बिबळ्या , एक चित्ता, एक गेंडा, एक वाघ , एक सिंह आणि एक अजगर आला
ब) तुम्ही काय कराल

>> सगळ्या मांसाहारी प्राण्यांना एक श्लोक शिकवेन -

वदनी कवळ घेता

त्या शंभर कोटींच्या प्रश्नाबद्दल :

अर्थातच कोटी निवडेन. शंभरच्या जागी एक कोटी घातले तरी चालतील.

'स्मृती' हे सर्वात महत्वाचं आहे. कुटुंब नाही, गोतावळा नाही, पण त्यांच्या स्मृती आहेत- ही भयंकर मोठी शिक्षा आहे. स्मृतीच नाहीत, पाश नाहीत, त्यांच्याबद्दलच्या जाणीवा नाहीत, आणि एकंदरच ती अख्खी भावनिक इकोसिस्टम नाही म्हणल्यावर प्रश्नच मिटला. हे सगळं मला नव्यने तयार करता येईलच की. (ते करायचं नाही, अशी प्रश्नात अट नाही, आणि ते शक्यही नाही. जिवंत माणूस म्हटल्यावर कुठेतरी पाश, गोतावळा, भावनिक गुंतवणूक तयार होईलच. मग ती झाडाखुडपांत, प्राण्यांत किंवा नद्या-डोंगरांत का असेना).

इव्हन, प्रश्नातली अट पुरी केली म्हणून मला पैसे मिळताहेत हेही माझ्या गावी नसणार. उगाच का कुणीतरी मला इतके पोतंभर पैसे देतंय, याचं नवल जरूर वाटेल. स्मृती नसली तरी व्यवहाराच्या जाणीवा आणि ज्ञान असल्याने मला पैशाची युटिलिटी नक्की कळेल, आणि मी ते पैसे घेईन.

ही सुद्धा शक्यता आहे, की कुठची तरी अट पुरी केली किंवा न केली, म्हणून आता सध्याचं आयुष्य मी माझ्या आताच्या गोतावळासोबत जगतो आहे. कोणता प्रश्न, कोणती अट- ते अर्थातच माझ्या गावीही नाही.

अशा वेळी जर तुमच्या समोर एक बिबळ्या , एक चित्ता, एक गेंडा, एक वाघ , एक सिंह आणि एक अजगर आला तर..

अ) तुम्हाला जास्त भीती कुणाची वाटेल ?
जे एकटे आलेत ते नवरे असतील तर अर्थातच भीती त्यांच्या अर्धांगिनी आल्यावर त्यांच्या आपपसात होणाऱ्या भांडण आदि मधुर वचनांचीच वाटेल आणि जर ते उलट असेल तर त्या सर्व महिला आघाडी एकत्र येऊन नक्की कुठल्या विषयावर विषयवार चर्चा करतील आणि कुठल्या विषयावर विषयवार नेऊन ठेवतील ह्याची जास्त वाटेल. आणि त्यांचे अहो त्यांच्या मागून तिकडे येई पर्यन्त काय काय गॉसिप्सचे धागे वाहती पाने विविध कट्टा आदि आदि हितगुज साधले जाईल त्याच्या भीतिला अंत नसेल.

ब) तुम्ही काय कराल ?
मायबोली लॉगआउट करेन.
(आणि एक Light 1 लेखक ह्यांना इतर प्रश्न सूचवायला मदतीसाठी धावून जाईन.)

एवढे प्राणी एकत्र येणे शक्य नाही, आले तरी मी त्यांच्या खिजगणतीतही नसेन, ते आपसात बघतील काय करायचं ते. भीती कुणाच्याही खिजगणतीत येण्याची वाटेल.
काय करेन: अगदी हळू हळू, त्यांच्याकडे न बघता गाडीकडे जाईन. प्राण्यामध्ये flight or fight instinct असते ते जागृत न होऊ देणे ही पहिली काळजी. हिंस्त्र प्राणी शक्यतो flight ऐवजी fight निवडतात, तर त्यांच्या डोळ्यात बघणार नाही. जोरात धावलो तर ते नक्की मागे येतील, आणि मी यातल्या कोणत्याच प्राण्याहून फास्ट पळू शकणार नाही

family first priority. पैसे गेले उडत

संशय बेस काही असेल तर संवाद साधेन, खरा ठरला तर तू तेरे रास्ते
खोटा असला तर आयुष्यभर माफी मागत राहीन, ती विसरणार नाही आणि विसरू देणार नाही

Pages