द गर्लफ्रेंड..

Submitted by प्रथमेश काटे on 10 February, 2026 - 23:43

भाग १ - अनपेक्षित भेट (Chance Reunion)

त्या रम्य सायंकाळच्या वेळी, नीरज आपल्या मित्रांसोबत गप्पा मारत एका कॅफे मध्ये बसला होता.

"काय रे, आज खूप आनंदी दिसत आहेस." त्याचा मित्र रविने थट्टेच्या सुरात विचारलं.

"आठवडाभर ऑफिसमध्ये राब राब राबल्यानंतर, आज मित्रांसोबत एन्जॉय करायला मिळतंय, मग आनंद तर होणारच.

"हं. बरं मित्रांनो... आज आपल्यासोबत कोणीतरी सामील होणार आहे. कुणीतरी खास" रवि ने एकदम जाहीर केलं.

"खास? कोण?" नीरज ने आश्चर्याने विचारलं.

"पहा, ती आलीच ती." कॅफेच्या एन्ट्रन्स कडे पाहत रवि म्हणाला.

सगळ्यांनी त्या दिशेला मान वळवली. एक नाजूक आणि सुंदर तरुणी - आयशा - हसत पुढे येत होती. तिच्याकडे पाहता पाहता नीरजच्या चेहऱ्यावर स्वप्नाळू भाव उमटले.

ती टेबलापाशी आली आणि सर्वांना अभिवादन केलं.

मीराने चटकन उठून तिला मिठी मारली

"कसं वाटलं सरप्राईज?" रवि ने विचारलं

"हे काय विचारणं झालं? खूप आवडलं सरप्राइज!" मीरा उत्तरली.

मग आयेशावर सर्वांनी प्रश्नांची सरबत्ती केली. इतके दिवस कुठे होतीस ? कुणाशी कॉन्टॅक्ट का नाही ठेवलास ? वैगेरे. फक्त नीरज मात्र गप्पच होता. का कोण जाणे? तो जरासा भावनिक झाला होता.

गप्पा गोष्टी सुरू असताना तो नकळत तिच्याकडे चोरट्या नजरेने पाहत होता. एकदम तिचं लक्ष गेलं. त्यानं नजर चोरण्याचा प्रयत्न केला ; तिच्या लक्षात आलंही असेल. तिच्या ओठांवर हलकसं स्मित उमटलं.

कॅफेच्या बाहेर - थोड्या वेळाने..

"काही बोलावंसं वाटतंय तर बोलत का नाहीस ? त्यासाठीच मुद्दाम मागे राहिलास ना?" त्याच्याकडे एकटक पाहत, हळूवार आवाजात आयेशा म्हणाली. जणू ती त्याच्या मनाचा वेध घेऊ पाहत होती.

"कसं आणि काय बोलू, समजत नाहीये." नीरज.

"समजू शकते. पण इतक्या दिवसांनंतर आपली पुन्हा भेट झाली, तर Awkwardness बाजूला सारून आपल्या मैत्रीला एक नवीन सुरुवात देऊया ना."

"बरोबर आहे तुझे."

"मग, कसा आहेस? लग्न केलंस की नाही?"

"मी ठिक आहे. आणि अजून लग्न नाही केलं. तुझे काय चालले आहे? तू तर आजही तितकीच सुंदर दिसतेस. कोणीही तुला पाहून प्रेमात पडेल."

"Thanks for the compliment. पण मी सुद्धा अजून unmarried आहे."

हळूहळू त्यांच्या बोलण्यात त मोकळेपणा येत गेला.

"पुन्हा भेटू शकतो का? फक्त आपण दोघेच?" त्याला मिठीत घेत हळुवार स्वरात आयेशानं विचारलं.

"हो. भेटूया." तिच्या स्पर्शाने उठणारे रोमांच अनुभवत नीरज म्हणाला.

*******

दोन दिवसांनंतर, त्याच कॅफे मध्ये..

सध्या फारशी वर्दळ नव्हती. आणि काहीतरी महत्त्वाचं बोलायचं म्हणून, आयेशाने एका कोपऱ्यातल्या टेबलावर बसायचं सुचवलं.

"मला माफ कर. मी अशी तुला काहीही न सांगता, दूर निघून गेले." खाली मान घालून, आयेशा म्हणाली.

"तो विचार करू नकोस. आता तर आपण सोबत आहोत ना." तिचा हात हातात घेत नीरज म्हणाला. क्षणभर ते एकमेकांच्या डोळ्यांत पाहत राहिले. त्यांचे चेहरे जवळ येऊन, त्यांचे ओठ कधी एकमेकांना भिडले ते त्यांनि समजायला काही सेकंद जावे लागले."

क्रमशः
© प्रथमेश काटे

Group content visibility: 
Use group defaults

Hug करण्याबाबत बोलायचं तर ते एकमेकांचे चांगले आहेत, rather पूर्वी रिलेशनशिप मध्येही होते. दुसऱ्या गोष्टीसाठी ही explanation दिले आहे.