
याबायका - गोफ मैत्रीचा
काय आहे हे? तर हे आहे आमचे युट्युब चॅनल. आणि काय करणार आहोत आम्ही या चॅनल अंतर्गत? सध्या एक डिजिटल अंक - "कॅलिडोस्कोप" घेऊन येतोय. येत्या १४ तारखेला मकर संक्रातीला 'तिळगूळा सोबत आमचा अंकही गोड मानून घ्या' अशी हक्काची विनंती करायला मी "याबायकांच्या" वतीने आज इथे आलेय
"याबायका", नाव विचित्र वाटतंय की ओळखीचं वाटतंय? काहींना विचित्र वाटेल, काहींना ओळखीचे वाटेल. मला आठवतंय त्याप्रमाणे इथे 'य' वर्षांपुर्वी एका उपक्रमात मी, मंजुडी, अश्विनी के आणखी एक दोन जणींच्या गृपने मिळून एक प्रवेशिका दिली होती, त्या प्रवेशिकेच्या नावात 'याबायका' शब्दाचा वापर मंजुडीच्या कल्पकतेतून झाला होता. त्यानंतर माबोवरच मैत्र जुळलेल्या काही 'याबायकांनी' एक व्हॉट्स ॲप गृप करुन संपर्कात रहाण्यासाठी अजून एक दालन स्वत:साठी उघडले होते. या दालनाला यंदा एक तप पुर्ण होईल. या एका तपामधे गृपने बरेच काही बघितले, अनुभवले. प्रेम, काळजी, मैत्री, रुसवे फुगवे, दिलजमाईचे बरेच आंबट तिखट कडू गोड अनुभव घेत गृप नुसताच टिकून नाही राहिला तर परिपक्व होत गेला (वयाचा भाग आहे असे कोण म्हणाले काय हळूच
? )
आजवर गृपमधे गप्पा, गटग, एकमेकींचे लाड करणे या जोडीने टूम निघाल्या सारखे एकत्र काही नवे शिकणे, पुस्तके शेअर करणे, ध्यानधारणा, संकल्प, मॅनिफेस्टेशन अफर्मेशन आणि असेच अजून काहीना काही करणे हे ही सुरुच होते. यावेळी 'डिजिटल अंक' आणि 'युट्युब चॅनल' ची संकल्पना एका मैत्रीणीने समोर मांडली. ती दुसऱ्या मैत्रिणीने पुढे नेऊन आकारास आणायला आवश्यक अशी लिडरशीप पेलली आणि त्याला बाकी मैत्रीणींनी प्रत्यक्ष कामाची जोड देत साथ दिली. या सगळ्या एकत्रीत टिमवर्कचा रिझल्ट म्हणजे आमचे हे चॅनल आणि हा पहिला वहिला अंक.
पहिल्या वहिल्या गोष्टीचे अपृप कायमच असते आणि हा पहिला प्रयत्न घरातल्यांसमोर मांडून त्यांच्याकडून कौतुक (थोडे प्रेमळ सल्ले देखील) करुन घ्यायला कोणाला नाही आवडणार?
याच हेतूने हा लेख प्रपंच, पहिल्या प्रयत्नाची ओळख करुन द्यायला. मायबोलीतूनच जमलेलं हे मैत्र आणि त्यामुळे या प्लॅटफॉर्मचे आम्ही सदैव ऋणी आहोत. हे घर आहे आमच्यासाठी. म्हणून हक्काने विनंती करतोय - चॅनलला भेट द्या, भले चूका असतील पण प्रयत्न प्रामाणिक आहेत. त्याची दखल घेत एक कौतुकाचे 'क्लिक' करुन चॅनल सबस्क्राईब करा आणि आवडल्यास शेअर करा. कान पकडलात तर खाजगीत पकडा
अगदी दोन्ही कान पकडा
चॅनलची लिंक इथे देत आहे. सोबत आमच्या टिझर व्हिडीओची देखील लिंक देत आहे. मायबोली प्रशासक तुमचे आभार कारण इथूनच हे मैत्रही जमले आणि प्रेरणाही मिळत गेली, यापुढेही मिळत राहील. प्रशासकांच्या बरोबरच तुम्हा सर्वांचेही मनापासून आभार. कळावे लोभ असावा ही विनंती.
युट्युब चॅनल - "याबायका - गोफ मैत्रीचा "

-अंकाचे मुखपृष्ठ
१) झलक
२) अजून एक झलक
>>>>कविता वाचन थोडे अधिक
.
सॉरी मी चुकुन हसलेले. माझा काहीतरी गैरसमज झाला होता
नाही हो धनश्री, प्रामाणिक
नाही हो धनश्री, प्रामाणिक फीडबॅक उपयोगी पडतील असे मला वाटले.
छान उपक्रम..!
छान उपक्रम..!
अभिनंदन आणि खूप शुभेच्छा..!
धन्यवाद प्रत्येक शुभेच्छा आणि
धन्यवाद प्रत्येक शुभेच्छा आणि प्रतिसादासाठी
छान उपक्रम..!
छान उपक्रम..!
सबस्क्राईब केले आहे
आज अंक प्रकाशित झाला आहे.
आज अंक प्रकाशित झाला आहे. थोडे थोडे करत व्हिडीओ इथे प्रकाशित केले जातील. आज काही व्हिडीओ प्रकाशीत झाले आहेत.
प्रकाशन सोहळा
कॅलिडोस्कोप
जिएसटी वर बोलू काही
आणि बरच काही...
छान सुरवात झाली आहे अंकाची.
छान सुरवात झाली आहे अंकाची.
तुमची कस्तुरमोगरी कविता आवडली.
जीएसटी माहिती म्हणजे व्यवसायाबद्दल मार्गदर्शन.
मैत्री, कला, साहित्य, व्यवसाय असे विविध क्षेत्र यात असणार आहे असे दिसते.
पुढील वाटचाली करता शुभेच्छा.
धन्यवाद मानव
धन्यवाद मानव
छान उपक्रम!
छान उपक्रम!
संगीत आणि व्हिडिओ दोन्ही आवडलं.
अनुक्रमणिकेत खाली लिंक दिल्या आहेत हे ही आवडले.
बाकीचा अंक अजून पहायचा आहे
याबायका टीमला अनेक शुभेच्छा!
Subscribed.. खूप शुभेच्छा.
Subscribed.. खूप शुभेच्छा.
मस्तच. कॅलिडोस्कोप पाहून आले.
मस्तच. कॅलिडोस्कोप पाहून आले. शुभेच्छा आणि अभिनंदन कविन.
खूप खूप शुभेच्छा सर्व
खूप खूप शुभेच्छा सर्व मैत्रिणींना! याबायका चॅनल वर छान छान कंटेंट येऊ देत. ४१४ वी सबस्क्रायबर झाले.
मायबोलीवर सापडलेल्या मैत्रीच्या छोट्या छोट्या रोपांचे आता वृक्षांमध्ये रूपांतर झाले आहे. याबायका वर जास्त करून मुंबईच्या आणि सखे ग वर पुण्यातल्या मैत्रिणी व्हॉट्सॲप वर जोडलेल्या आहेत. दोन्ही ग्रुप्स ना यंदा बारा वर्ष पूर्ण झाली. जोरदार सेलिब्रेशन झाले मात्र या सगळ्याच्या मागे मायबोली आहे याचा कधीच विसर पडत नाही. आता व्हॉट्सॲप युट्यूब आणि इतर सोशल मीडिया मध्ये आपणच कनेक्ट होत असल्याने अनेक वृक्षांची एक मोठी बाग झाल्यासारखे वाटते आहे.
मी स्वच्छंदी, सान्वी, अस्मिता
मी स्वच्छंदी, सान्वी, अस्मिता, आशुडी धन्यवाद
दोन्ही ग्रुप्स ना यंदा बारा वर्ष पूर्ण झाली. जोरदार सेलिब्रेशन झाले मात्र या सगळ्याच्या मागे मायबोली आहे याचा कधीच विसर पडत नाही. आता व्हॉट्सॲप युट्यूब आणि इतर सोशल मीडिया मध्ये आपणच कनेक्ट होत असल्याने अनेक वृक्षांची एक मोठी बाग झाल्यासारखे वाटते आहे.>>>+१०००
लवकरच म्हणजे १४ फेब्रूवारी रोजी "याबायका" स्पेशल एक गाणे घेऊन येणार आहोत (काम सुरु आहे. शब्द माझे, व्हिडिओ निर्मिती निलू तै आणि बाकी मदत सगळ्या याबांची. ) हे आणि कॅलीडोस्कोप शिर्षक गीत दोन्हीसाठी संगीत द्यायला मात्र suno.ai ची मदत घेतलेय.
याबयका स्पेशल गाणे आवडेल अशी आशा आहे (इथे फिन्गर्स क्रॉसवाली व्हॉट्स अॅप स्मायली इमॅजीन करा
)
Pages