मायबोलीकर युट्युबर्स - आम्ही याबायका

Submitted by कविन on 7 January, 2026 - 02:27

याबायका - गोफ मैत्रीचा

काय आहे हे? तर हे आहे आमचे युट्युब चॅनल. आणि काय करणार आहोत आम्ही या चॅनल अंतर्गत? सध्या एक डिजिटल अंक - "कॅलिडोस्कोप" घेऊन येतोय. येत्या १४ तारखेला मकर संक्रातीला 'तिळगूळा सोबत आमचा अंकही गोड मानून घ्या' अशी हक्काची विनंती करायला मी "याबायकांच्या" वतीने आज इथे आलेय

"याबायका", नाव विचित्र वाटतंय की ओळखीचं वाटतंय? काहींना विचित्र वाटेल, काहींना ओळखीचे वाटेल. मला आठवतंय त्याप्रमाणे इथे 'य' वर्षांपुर्वी एका उपक्रमात मी, मंजुडी, अश्विनी के आणखी एक दोन जणींच्या गृपने मिळून एक प्रवेशिका दिली होती, त्या प्रवेशिकेच्या नावात 'याबायका' शब्दाचा वापर मंजुडीच्या कल्पकतेतून झाला होता. त्यानंतर माबोवरच मैत्र जुळलेल्या काही 'याबायकांनी' एक व्हॉट्स ॲप गृप करुन संपर्कात रहाण्यासाठी अजून एक दालन स्वत:साठी उघडले होते. या दालनाला यंदा एक तप पुर्ण होईल. या एका तपामधे गृपने बरेच काही बघितले, अनुभवले. प्रेम, काळजी, मैत्री, रुसवे फुगवे, दिलजमाईचे बरेच आंबट तिखट कडू गोड अनुभव घेत गृप नुसताच टिकून नाही राहिला तर परिपक्व होत गेला (वयाचा भाग आहे असे कोण म्हणाले काय हळूच Wink ? )

आजवर गृपमधे गप्पा, गटग, एकमेकींचे लाड करणे या जोडीने टूम निघाल्या सारखे एकत्र काही नवे शिकणे, पुस्तके शेअर करणे, ध्यानधारणा, संकल्प, मॅनिफेस्टेशन अफर्मेशन आणि असेच अजून काहीना काही करणे हे ही सुरुच होते. यावेळी 'डिजिटल अंक' आणि 'युट्युब चॅनल' ची संकल्पना एका मैत्रीणीने समोर मांडली. ती दुसऱ्या मैत्रिणीने पुढे नेऊन आकारास आणायला आवश्यक अशी लिडरशीप पेलली आणि त्याला बाकी मैत्रीणींनी प्रत्यक्ष कामाची जोड देत साथ दिली. या सगळ्या एकत्रीत टिमवर्कचा रिझल्ट म्हणजे आमचे हे चॅनल आणि हा पहिला वहिला अंक.

पहिल्या वहिल्या गोष्टीचे अपृप कायमच असते आणि हा पहिला प्रयत्न घरातल्यांसमोर मांडून त्यांच्याकडून कौतुक (थोडे प्रेमळ सल्ले देखील) करुन घ्यायला कोणाला नाही आवडणार?

याच हेतूने हा लेख प्रपंच, पहिल्या प्रयत्नाची ओळख करुन द्यायला. मायबोलीतूनच जमलेलं हे मैत्र आणि त्यामुळे या प्लॅटफॉर्मचे आम्ही सदैव ऋणी आहोत. हे घर आहे आमच्यासाठी. म्हणून हक्काने विनंती करतोय - चॅनलला भेट द्या, भले चूका असतील पण प्रयत्न प्रामाणिक आहेत. त्याची दखल घेत एक कौतुकाचे 'क्लिक' करुन चॅनल सबस्क्राईब करा आणि आवडल्यास शेअर करा. कान पकडलात तर खाजगीत पकडा Wink अगदी दोन्ही कान पकडा Proud

चॅनलची लिंक इथे देत आहे. सोबत आमच्या टिझर व्हिडीओची देखील लिंक देत आहे. मायबोली प्रशासक तुमचे आभार कारण इथूनच हे मैत्रही जमले आणि प्रेरणाही मिळत गेली, यापुढेही मिळत राहील. प्रशासकांच्या बरोबरच तुम्हा सर्वांचेही मनापासून आभार. कळावे लोभ असावा ही विनंती.

युट्युब चॅनल - "याबायका - गोफ मैत्रीचा "

टिझर १

टिझर २

kaelidoscope.jpg
-अंकाचे मुखपृष्ठ

१) झलक

२) अजून एक झलक

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कविन,
छान लिहिलंय आणि टीझर मस्तच आहे.
याबायका उपक्रमास शुभेच्छा!!
डिजिटल अंक नक्की वाचणार

नावाचा इतिहास भूगोल माहीत नाही पण बायकांना या म्हणायचा विचारच मनाला गुदगुल्या करून जाणारा आहे Happy
नेटवर्क मिळाले की चॅनेल टीजर चेक करून नक्की काय प्रकरण आहे बघतो पण काल काही बायकांच्या स्टेटसला पाहिले तेच प्रकरण असावे

बायकांकडून चालवलेले पण सगळ्यांसाठी असलेले Rearest of the Rearest गोष्ट. (फक्त चॅनलच्या बाबतीत नाही). Proud

तरी पण "सगळ्यांना" समजेल असं असेल ही आशा. कारण लहान पणा पासून "तुला नाही समजणार" हे ऐकत आलो आणि आता "तुम्हाला काही नाही समजत" हे ऐकतोय.

मागच्या आठवड्यातच केलं सबस्क्राईब. टीझर छानच आहेत त्यामुळे आता उत्सुकता आहे अंक वाचण्याची.

धन्यवाद Happy

चानेलसाठी सामायिक जीमेल कसा वापरतात? म्हणजे सर्वजणी तो ठरवून आलटून पालटून लॉगिन करतात?>>> मायबोलीच्या उपक्रमात संयोजक म्हणून सहभाग घेतल्यावर हे प्रशिक्षण मिळतच Proud टीमची आखणी त्यांच्यात कामे विभागणी, बाहेरुन सपोर्ट करणाऱ्यांकडून कसे कधी कोणते काम करुन घ्यायचे, टाईमलाईन आखणी याचेही कळत नकळत संस्कार अशासारख्या सगळ्याच (माबो / ऑफीस/ शाळा कॉलेज गृप्स/सोसायटी इत्यादी) उपक्रमात काम करुन झालेले असते त्यासगळ्याचा फायदा झालाच.

>>टीमची आखणी त्यांच्यात कामे विभागणी, बाहेरुन सपोर्ट करणाऱ्यांकडून कसे कधी कोणते काम करुन घ्यायचे, टाईमलाईन आखणी याचेही कळत नकळत संस्कार अशासारख्या सगळ्याच (माबो / ऑफीस/ शाळा कॉलेज गृप्स/सोसायटी इत्यादी) उपक्रमात काम करुन झालेले असते त्यासगळ्याचा फायदा झालाच.>>>
- यावर एक नाटक लिहिता येईल.

अतिशय छान उपक्रम. सबस्क्राईब केले आहे. अंकाची वाट पाहत आहोत. Happy

रच्याकने : यासाठी काही मदत लागली तरी हक्काने सांग. बरे वाईट बरेच अनुभव आहेत युट्युब चे !

यावर एक नाटक लिहिता येईल.>> अगदी Lol

रच्याकने : यासाठी काही मदत लागली तरी हक्काने सांग. बरे वाईट बरेच अनुभव आहेत युट्युब चे !>> थॅंक्स केदार. तुझी मदत घेऊच गरज लागली तर Happy

छान उपक्रम
रतीब लावला चॅनेलचा
उत्सुकतेने अंकाची वाट बघतोय

टीम वर्कचा काय फायदा होतो युट्यूब चॅनलला?
समजा तुम्ही एकटीने केलं असतं तर अशक्य असेल का?>> उपक्रम टीमचा आहे म्हणून चॅनल देखील टीमचे. अशक्य असेल का नसेल का हे या चॅनल साठी लागू नाही कारण हे चॅनल मुळातच एकत्र येऊन नवीन (आमच्यासाठी नवीन) काही करुन बघूया या कल्पनेतून साकार झालेय.

Pages