धाग्याचे कारण - अज्ञान
उद्देश - कारण दूर करणे
नवीन वर्षाचे स्वागत करण्याची सुरूवात कधी झाली ? पन्नाशीच्या पुढची पिढी सांगू शकेल. आताच्या पिढीला हे परंपरागत आहे असे वाटेल. शीर्षकात विचारलेल्य प्रश्नाचे उत्तर वेगवेगळ्या पातळ्यांवर अपेक्षित आहे.
उदा.
तत्वज्ञान - आपण नेमके कशाचे स्वागत करतो ? नवीन वर्षे असे काही असते का ? एका भ्रमाचे आपण स्वागत करत असतो.
सांस्कृतिक - भारतीय संस्कृतीत नवीन वर्ष हे एक जानेवारी नाही. आपल्याकडे नवीन वर्ष हे सीझन प्रमाणे सुरू होते आणि त्यासाठी सण साजरा केला जातो. पण ते नवीन वर्षाचे स्वागत नसते. सीझन प्रमाणे येणारा सण हा पूर्वीच्या काळात लोकांच्या मनोरंजनासाठी आणि सांस्कृतिक गरजांसाठी होता. आता त्या सणांना नववर्षाशी जोडणे हे अनुकरण आहे.
धार्मिक - हा काही आमचा सण नाही. तर आम्ही का साजरा करावा ?
चंगळवाद - नव वर्षाचे स्वागत कुठल्याही रिती परंपरेने करण्याशी वावडे नाही. करतोच. पण चांगल्या कामाच्या सुरूवातीला दारू, मटण याच्या आहारी का जायचे ? नवीन वर्षाची सुरूवात ही नशेत झोपून का करावी ?
संकल्प - संकल्पासाठी कॅलेंडर हा मुहूर्त का असावा ? प्रत्येक क्षण हा नवीन असतो. इत्यादी.
आणखीही काही कंगोरे असतील तर येऊ द्या.
पण चांगल्या कामाच्या
पण चांगल्या कामाच्या सुरूवातीला दारू, मटण याच्या आहारी का जायचे ? नवीन वर्षाची सुरूवात ही नशेत झोपून का करावी ?
>>>>>>>>>>
हो, मद्यपान करणारे वीट आणतात. म्हणून या दिवशी (खरे तर रात्री/संध्याकाळी) घराबाहेर पडावे वाटत नाही.
बरेच दिवसांनी पायंडा हा शब्द
बरेच दिवसांनी पायंडा हा शब्द ऐकला.
स्वागत करावे कि नाही ते नंतर. त्याची पद्धत इतरांना त्रास देणारी नसावी. पण एवढी मूलभूत अपेक्षा सुद्धा पूर्ण होताना दिसत नाही. काल रात्री १-२ वाजेपर्यंत फटाक्यांचे आणि चित्कारांचे आवाज येत होते. झोपमोड झाली.