शरद गेला
वसंतात वाट पाहिली तुझी
कोकिळेच्या नाही गं
सकाळी सकाळी खारीय्य च्या आवाजाने जागा होऊन
बेकरीवाल्या भैय्यांना ओलांडत
दूधवाल्यांची लगबग बघत
फूटपाथवर पेपरच्या पुरवण्या लावत बसलेल्या मुलांकडे बघत
रिक्षावाल्यांना टाळत टाळत
रेल्वे स्टेशनला जाऊन पहिली लोकल पकडत होतो
जम्मूतावी से मुंबई आनेवाली ट्रेन अपने निर्धारीत समय पर चल रही है
हे ऐकत ऐकत कितीदा तरी चहा पिलो असेन
त्याने सिगरेट विचारल्यावर माफ करो भैया म्हणालो
तुझी खूप वाट बघितली
कारण मग उन्हाळा कडक होतो
इथे थंडीही कडक नाही आणि उन्हाळाही
पण घामाच्या धारा लागतात
त्या तुला सोसवणार नाहीत
तुझे सफरचंदासारखे गाल कोमेजून जातील
खुर्मानीच्या फळासारखा तुझा गोडवा आक्रसून जाईल
मेंदीच्या सुकल्या देठांवर झुलणारे गाणं ऐकलेलं नाही
मला चाललं असतं..
पण तू या उन्हाळ्याला भिऊन पुन्हा निघून गेली असती
मुंबई से जम्मूतावी जानेवाली ट्रेन सही समय पर प्लॅटफॉर्म नंबर सात से जा रही है
ही अनाउन्समेंट कायमच्या ताटातुटीची डेथ सेन्टेन्स बनली असती
म्हणून उन्हाळ्यात तू येऊ नकोस हे सांगत होतो मनातल्या मनात
उघड कसं सांगणार ?
हिमंत तर पाहीजे ना ?
मग पावसाळ्यात स्टेशनच्या बाहेर साचलेल्या पाण्यातून
फदक फदक स्लीपर्सचा आवाज करत
प्लॅटफॉर्मवर तासन तास तुझी वाट बघताना
नेहमी मनात यायचं
नको येऊस तू यंदा
मुंबईचा पाऊस थांबायचं नाव घेत नाही.
तू भिजशील, कदाचित तुला पाऊस आवडेल
पण घराचं छत गळतंय
ते दुरूस्त करायचंय
रात्री तुझ्या पाठीवर पाणी टपकलं असतं
तर तू दचकून उठली असतीस
आणि घराची अवकळा बघून सकाळी बॅग भरली असतीस
कदाचित कायमची निघून जाण्यासाठी
मग जम्मूतावीला जाणारी ट्रेन निघून गेल्यावर
समोरच्या प्लॅटफॉर्मवरचा चहावाला माझ्याकदे बघून हसला असता
एव्हांना इथे किती जण ओळखू लागलेत गं
जणू काही टॉम हँक्सचा पिक्चर आलाय नवा
प्लॅटफॉर्म नावाचा...
पावसाळा यंदा खूप लांबला
रोजच मी म्हणत होतो
नको येऊस यंदा आणि आता
हिवाळा आलाय
इथे कधी थंडी पडत नाही
पण यंदा कडाक्याची थंडी पडलीय
पुण्याची लोकं नावं ठेवतात आम्हाला
एव्हढीशी तर थंडी म्हणतात
तुला तर काहीच वाटणार नाही कदाचित
पण जर नाहीच सहन झाली तर ?
तर ना
माझ्याकडे गरम कपडे नाहीत
ब्लँकेट जीर्ण झालेले तुला द्यायची हिंमत होत नाही
तू आत्ता येऊ नकोस
कारण जम्मूतावी से आनेवाली ट्रेन १४ घंटे लेट चल रही है
ही घोषणा मी रोज ऐकतोय
मला सर्वच उद्घोषणा पाठ झाल्यात
सगळे आवाज पाठ झालेत
तुझी ट्रेन यावी असं खूप वाटतंय
एक रजई बघून ठेवलीये तुझ्यासारख्या हिमगौरीसाठी
तू येशील तेव्हां घेईन
पण आत्ता आलीस तर कसा घेईन ?
तू यायच्या आधी ती आली तर सगळे प्रश्न सुटतील
तुझा तिचं जमेल
ती सवत नाही तुझी
तिला रोज साद घालतो छोट्या जाहीरातीतून
आणि प्रत्येक छोट्या मोठ्या ऑफीसेसमधून
ती प्रतिसाद देईल तेव्हां
तुला बोलावून घेईन
पण ती मलाच प्रसन्न होत नाही
पाच दहा हजाराची का होईना
एक नोकरी चालली असती
छत दुरूस्त केलं असतं
रजई घेतली असती
घराला रंग केला असता
गॅस शेगडी घेतली असती
मग तुला बोलावून घेतलं असतं
तू हवी हवी असताना
नको येऊस असं मनाशी म्हणावं लागलं नसतं
तुझी वाट बघता बघता इथे
कपबशा विसळत ट्रेन मोजल्या नसत्या
आणि तरीही मन थार्यावर नाही
म्हणून मायबोलीवर
दिसेल त्या धाग्यावर लिहीत सुटतोय
पण मन हलकं होत नाही
तुला माहीत आहे का
इथे सगळे इग्नोर मारतात गं
मला नाही, एका आयडीला
त्यांच्यासाठी अस्तित्व महत्वाचं नाही
सगळे आयडी आहेत
काही इग्नोरेबल
तुला माझं अस्तित्व मान्य आहे ना ?
कि आयडीलाच सर्वस्व समजतेस ??
आयडीला भेटायला नको येऊस ..
मला माहीत आहे खूप धुकं पडलंय तुमच्याकडे
सर्वच ट्रेन्स लेट आहेत
वेळ साधणे जमत नाहीये
जेव्हां तुझ्या माझ्यातले धुके विरून
सगळं स्वच्छ होईल
तेव्हां नक्की ये
मला भेटायला !
येशील ना गं ?
- एले
..तरीही वाचली
..तरीही वाचली
... भिडली !
लिहिते रहा .
भिडली. इथे एस्टॅब्लिश व्हायला
भिडली. इथे एस्टॅब्लिश व्हायला वेळ लागतो. पण फार मस्त लोकं आहेत.
छान !!!
छान !!!!
छान . शीर्षक बदला आता.
छान .
शीर्षक बदला आता.
(अशाच शीर्षकाची कविता 2009
(अशाच शीर्षकाची कविता 2009 मध्ये मी इथे पोस्ट केली होती , तें आठवलं -https://www.maayboli.com/node/10429
)
त्यानंतर असला आगाऊपणा मी केल्याचं मात्र आठवत नाही
वाचली कविता..!
वाचली कविता..!
छान आहे.
व्याकुळता शब्दां- शब्दांतून जाणवते.
मस्तच
मस्तच
छान जमले आहे स्फुट.
छान जमले आहे स्फुट.
नाही वाचली.. वाचू का?
नाही वाचली..
वाचू का?
भाऊ धन्यवाद. रानभुली आभारी
भाऊ धन्यवाद. रानभुली आभारी आहे.
रूपाली विशे पाटील,मनापासून आभार आपले.
कॉमी आभारी आहे.
मानव पृथ्वीकर मनापासून धन्यवाद.
मृणाली , शीर्षकाचा मान राखल्याबद्दल टनभर आभार.
लोकहो, कुणी प्रतिसाद देणार नाही याची एव्हढी खात्री होती कि साफ विसरून गेलेलो. आता पाहिले तर धक्काच बसला.
तुम्ही सर्वांनी मला चुकीचे ठरवलेत. शब्दच नाहीत आभार मानायला.
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
पंचाक्षरी मंत्र जपता टळतो अनर्थ
भक्त संकटी असता धावता समर्थ
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
पाठीशी तुम्ही असता होते जीवन सार्थ
तू भिऊ नको ध्यानी येता जगण्या अर्थ
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
तुम्हामुळे लाभला हाच खरा परमार्थ
तुम्हाविना सुख समाधान सारे व्यर्थ
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
विनोद अष्टुळ पुणे
मी विसरून गेलो होतो हा धागा.
मी विसरून गेलो होतो हा धागा.
अष्टुळ सरांना चार दिवसात हा धागा सापडला आणि त्यांनी वर काढला याबद्दल धन्यवाद.
आता काही जणांना बंदूका ताणायला निमित्तच मिळेल
मी विसरून गेलो होतो हा धागा.
डबल पोस्ट.
तुमच्या कवितेत त्यांना स्वामी
तुमच्या कवितेत त्यांना स्वामी दिसले. अजून काय हवं तुम्हाला?
(आमच्या एका स्वामीभक्त परममित्राला भजीत दिसले होते. नशीब एकेका भजीचं)
नशीब एकेका भजीचं >>
नशीब एकेका भजीचं >>
स्फुट छान जमले आहे.
स्फुट छान जमले आहे.
भाऊ, कविता छानच आहे.