नको, प्लीज....नको..

Submitted by भाऊ नमसकर on 29 August, 2009 - 23:42

नको, प्लीज,.. नको
तुझ्या दु:खाचे उमाळे
खरंच नको
ओवाळू माझ्यासमोर
आणि नको मलाही
फंदात त्या पाडूस
माझ्याही जखमा
उरकून काढून
मांडायला तुझ्यासमोर
कारण त्या आहेत
अंतरंगात माझ्या
इतक्या खोलवर
कीं त्या काढताना
खणूनच निघेल
अस्तित्वच माझं पूरं
आणि मग
म्हणायला माझं असं
कांहीच उरणार नाही
माझ्याकडे,.. तुझ्याशिवाय !

गुलमोहर: 

आता कुठेसा जरा धीर आला. धन्यवाद .
शीर्षक : उमेश, गिरीश, - मलाही आतां तसंच वाटतंय.
[ ता.क.- कविता वाचल्यावर मायबोलीकर उत्स्फुर्तपणे मला जें सांगणार,
तें आधीच शीर्षकात घालणं, म्हणजे माझा आगाऊपणाच ! ]
- भाऊ.

मस्त. रफीचे" बा होशो हवास में दीवाना" नावाचे एक अफलातून गाणे आहे. त्यात हीच भावना आहे. जरूर ऐका ते.
आवडेल तुम्हाला.

मलाच इतकं "छान", "मस्त" वाटतंय. केवळ तुमच्यामुळें. धन्यवाद.
अश्विनिमामी, मला जलन व्हावं इतका रफी माझ्या बायकोचा आवडता आहे. माझ्यामुळे कुणाला
रफीची याद यावी, यामुळे माझा भाव घरी वधारला आहे. माझ्या तुटपुंज्या संग्रहात ते गाणं नसलं,
तरी तें मी मिळवणारच. धन्यवाद.

भाऊ Happy
आवडली कविता. लिहा अजून.