आधीच्या धाग्यावर बर्याच अंशी मुद्देसूद चर्चा झाली आहे.
यात एका सदस्याने हा प्रतिसाद दिला आहे. त्या वर उत्तर देताना धागा भरकटू नये असे उत्तर द्यावे लागले आहे. मात्र विवेकवादी माणसाला पडणारा हा प्रश्न आहे. हा प्रश्न बामियान इथे तालिबानने फोडलेल्या मूर्त्यांसंदर्भात आहे.
मूर्ती फोडणे हे फाटे फोडणे वगैरे नाही. थेट विषयाशी संबंधित आहे.
एक सुंदर मूर्ती कुणाला दिसली तर ती फोडून नष्ट करावी अशी प्रेरणा कोण देतो? अर्थातच धर्म देतो. नाहीतर उगीच असे कोण करेल?
इस्लाम असे मानतो की कुराण हा देवाचा अखेरचा शब्द आहे. हो, देवाचा. जो आहे की नाही ज्याविषयी ही चर्चा आहे.
त्या कुराणातच देवाने असे सांगितले आहे की मूर्ती पूजन हे महापाप आहे . ते थांबवेल तो पुण्यवान.
तुम्ही जो पूजत आहात तो खोटा देव आहे. माझा देव अमूर्त आहे आणि तोच खरा देव आहे म्हणून मी मूर्ती तोडणार. असे म्हणणार्या मुस्लिम धर्मीयावर
देव आहे का हे सिद्ध करण्याची जबाबदारी आहे. इतका विध्वंस करू इच्छितो तो कुठल्या पुराव्यावर आधारित आहे? असे विचारण्याचा हक्क अन्य धर्मीयाला आहे , नास्तिकालाही आहे. नास्तिकाला कुठल्या मूर्तीबद्दल आक्षेप असायचे कारण नाही.
हा तो प्रतिसाद आहे.
आधीच्या प्रतिसादातला या ला धरून अंश असा आहे.
खुद्द महंमदाने आपल्या हाताने मक्केतील देवळांतील मूर्ती फोडल्या असे इतिहास सांगतो. आता खरोखर मूर्ती पूजणे हा खून, बलात्कार किंवा चोरी यासारखा भयानक अपराध आहे का? नाही. त्यातून कुठल्या व्यक्तीच्या स्वातंत्र्याचा भंग होतो का? नाही. अन्य धर्मात ह्या क्रियेला अपराध मानतात का? नाही.
अजून एक उदाहरण. लग्न न करता लैंगिक संबंध ठेवणे हा इस्लाममधील शरिया कायद्यानुसार मृत्युदंड देण्याच्या लायकीचा गुन्हा आहे. दगड मारून मारून अशा लोकांना जाहीर रित्या ठार मारावे असे शरिया सांगतो. दोन जाणत्या व्यक्ती परस्पर संमतीने लैंगिक संबंध ठेवत असतील तर बहुतेक प्रगत समाजात ह्याला गुन्हा मानत नाहीत. ह्याला इतकी भयंकर शिक्षा देणे हे असंस्कृत, रानटीपणाचे समजले जाते. पण इस्लाम तसे मानत नाही.
ह्या मुफ्तीला इस्लामशी निगडित विषय घेऊन प्रश्न विचारायला हवे होते. पण मुफ्ती अशा विषयांवर चर्चा करू धजला नसता. आणि कदाचित जावेद अख्तरही बिचकले असते. लल्लन टॉप वालेही इतका ज्वालाग्राही विषय चर्चेत आणू धजले नसते.
धर्म अशी शिकवण देतो का हा प्रश्न उपस्थित होतो. मात्र त्या आधीचा प्रतिसाद विचारात घेतला तर त्यात धर्मच अशी शिकवण देतो असा क्लेम केला आहे. स्वत: प्रेषिताने मूर्त्या फोडायला शिकवले आहे असेही म्हटले आहे.
हे खरे आहे का ? असेल तर विवेकवादी व्यक्ती यावर प्रश्न उपस्थित करणारच.
नसेल तर तथ्ये काय आहेत ? यावरची चर्चा या इथे होऊ शकते. इथे देव आहे कि नाही ही चर्चा करू नये. त्यासाठी आधीचा धागा आहे.
मुद्दे वेगवेगळे काढायला आपण सुरूवात केली पाहीजे.
मूळ धर्म काय ? धर्म म्हणजे काय ? धर्मात दुसर्या धर्मावर हल्ला करा अशी शिकवणूक आहे का हे सर्व या चर्चेचा विषय आणि उपविषय होऊ शकतात.
राहवत नाही. रोखू शकत नाही
राहवत नाही. रोखू शकत नाही स्वतःला.
मला धर्म गरजेचा वाटत नाही. माझ्या आई वडीलांनी आपण हा धर्म का स्विकारला हा प्रश्न त्यांच्या आईवडलांना विचारला नाही. त्यांनी त्यांच्या. असंच चालत आलं आहे. पर्यटनाची आवड आहे, पण ती धर्मासाठी नाही.
तरी पण एखाद्या ठिकाणी प्रसिद्ध असलेलं तीर्थस्थळ, धार्मिक स्थळ याला नक्की भेट देते. कारण इतके लोक वर्षानुवर्षे भेट देत आहेत. तो मानवी इतिहास आहे. त्याचं कौतुक वाटतं.
माझा अभ्यास नाही, पण कुठलाही धर्म इतरांचा नाश करा अशी शिकवण देत नसणार. मूळचा धर्म हा वे ऑफ लाईफ असणार. समाजात रहायचे नियम, कर्तव्य म्हणजे धर्म असं मला वाटतं. त्यात बलवान लोकांनी कमजोर लोकांचं दमन करू नये म्हणून त्याच्या पेक्षा शक्तीमान किंवा सर्वशक्तीमान अशा एण्टिटीची भीती घातली असावी. ही भीती घालणारेच जेव्हां नियम पाळत नसतील तेव्हां मग त्या धर्माचं रूपांतर झुंडशाहीत झाले असेल.
धर्म असो कि कायदा, शक्तीमान लोकांकडे सत्ता आली कि त्यांच्या दयेवर धार्मिक नियम / कायदे पाळायचे कि नाही हे ठरते. ते म्हणतील तोच धर्म /कायदा बनतो. दोष मूळ धर्माला / कायद्याला का द्यायचा ?
मला धर्म गरजेचा वाटत नाही
मला धर्म गरजेचा वाटत नाही
>>>
+७८६
मी सुद्धा स्वतःला कुठल्या धर्माचा समजत नाही. मला तो जन्माने आलेला कुठलाही टॅग नको वाटतो.
कागदोपत्री जे काही असेल ते उगाच कष्ट घेऊन बदला किंवा रद्द करा वगैरे करत नाही कारण त्याचीही गरज वाटत नाही. असे करता येते का याचीही कल्पना नाही.
प्रत्येक धर्माची वेगळी शिकवण, आचार विचार, जीवनपद्धती असते.
मी माझ्या विचारांनी माझी जीवनपद्धती ठरवली आहे. म्हटले तर मी माझा स्वतःचा एकट्याचा वेगळा धर्म बनवला आहे. ज्याचा मला वैयक्तिक आयुष्यात फार फायदा होतो.
उदाहरणार्थ मी वर्षाचे 365 दिवस हवे तेव्हा मांसाहार करतो, दाढी करतो, केस नखे कापतो. मला कुठला सणवार किंवा मुहूर्त बघावा लागत नाही. झोप आली की हवे त्या दिशेला तंगड्या पसरून झोपतो. स्थळ काळ वेळ काही न बघता आयुष्य आपल्या मनाने जगता येते. जी गोष्ट करायची इच्छा असते ती करू शकतो आणि जी करायची नसते तिला नकारही देता येतो.
धर्म हा मानवनिर्मित असल्याने
धर्म हा मानवनिर्मित असल्याने तो मानणे न मानणे व्यक्तीसापेक्ष
आहे.
सनातन धर्म अस्तित्वात आला तेव्हा इतर धर्म नव्हते, त्यामुळे इतर धर्मियांना कसे वागवायचे याचे मार्गदर्शन त्यात नाही. जगभर पसरलेले इतर धर्म हे पंथ आहेत किंवा विशिष्ट विचारसरणी असलेले पॉवरफुल समुह. पंथात असलेल्यानी कसे वागायचे, पंथात येऊ न इच्छिणार्या किंवा इतर पंथाशी निष्ठा राखणार्या लोकांशी कसे वागायचे याचे मार्गदर्शन त्या त्या पंथात आहे. पंथाच्या झेंड्याखाली जास्तित जास्त लोक यावेत यासाठी प्रयत्न करण्याचे आदेशही पंथात दिलेले आहेत.
जे लोक सर्व धर्म प्रेमाची शिकवणी देतात असे मानतात त्यांना अर्धसत्य माहित असते. अर्थातच हे मानणारे लोक केवळ सनातन धर्मातच आढळतात. कारण ह्या धर्मात इतर धर्मियांबद्दल अवाक्षरही नसल्यामुळे इतर धर्मिय वर्ज्य नसावेत असे अनुमान हा धर्म पाळणारे लोक काढतात आणि सगळे जग ह्या चष्म्यातुन पाहतात.
सर्व धर्म उर्फ पंथ स्वधर्मियांसाठी गोडच आहेत, प्रेमभावनेने निथळणारेच आहेत. पण पंथ न मानणार्या इतरांना, दुसर्या पंथावर विश्वास ठेवणार्या ह्या पहिल्या पंथाकडुन प्रेम वगैरे काहीही मिळत नाही. तसे करायचे नसतेच असे पंथाच्या जाहिरनाम्यातच किंवा पवित्र पुस्तकातच लिहिलेय त्याला काय करणार.
सनातन धर्मालाही पंथ म्हणा, नो प्रॉब्लेम. फक्त यात व इतर पंथात फरक हाच की इतर पंथांना मानणारे नरकात जळणार हे यात लिहिलेले नाही किंवा या नरकात जळण्याची शंभर टक्के खात्री असणार्या लोकांना सामदामदम्ड भेद वापरुन सनातन धर्मात आणा असा आदेश दिलेला नाही हा फरक आहे. ह्या छोट्याश्या फरकामुळे यात व इतर पंथात खुप मोठा फरक पडलेला आहे
सनातन धर्म म्हणजे काय ?
सनातन धर्म म्हणजे काय ? त्याचा धर्मग्रंथ कोणता ? संस्थापक कोण ?
(हे प्रश्न असंबद्ध नसतील ही अपेक्षा. नाहीतर ओलांडून जाऊ शकता ).
सनातन धर्म म्हणजे काय ?
सनातन धर्म म्हणजे काय ? त्याचा धर्मग्रंथ कोणता ? संस्थापक कोण>>>
तसे काहीच नाहीये. बाकी सगळ्या पंथांचे धर्मग्रंथ व संस्थापक आहेत. तुम्हाला वाटत असेल तर सनातन धर्म अस्तित्वातच नाही असेही तुम्ही समजु शकता. सनातन धर्माला काही फरक पडत नाही. तो तुमच्यावर मारेकरी घालणार नाही.
रच्याकने, मुर्तीचे अनेकवचन
रच्याकने, मुर्तीचे अनेकवचन मुर्त्या नाही तर मुर्ती हाच शब्द अनेकवचनातही वापरतात.
तुम्हाला वाटत असेल तर सनातन
तुम्हाला वाटत असेल तर सनातन धर्म अस्तित्वातच नाही असेही तुम्ही समजु शकता. सनातन धर्माला काही फरक पडत नाही. तो तुमच्यावर मारेकरी घालणार नाही. >> असंबद्ध आहे हे.
मला काय वाटते ते इमॅजिन करण्यापेक्षा तुम्ही सनातन धर्म सांगत आहात त्याची माहीती द्या. तेव्हढी पुरेशी आहे.
इतके कोण लिहित बसणार.. रस
इतके कोण लिहित बसणार.. रस असेल नेट्वर शोधा, मिळेल.
असंबद्ध वाटत असेल तर सोडुन द्या.
तुम्ही सांगताय सनातन धर्म.
तुम्ही सांगताय सनातन धर्म. त्याचा संस्थापक, धर्मग्रंथ तुम्हाला माहीती नाही किंवा सांगता येत नाही का ? नसेल तर तसे सांगा.
जे लोक सर्व धर्म प्रेमाची शिकवणी देतात असे मानतात त्यांना अर्धसत्य माहित असते. अर्थातच हे मानणारे लोक केवळ सनातन धर्मातच आढळतात. कारण ह्या धर्मात इतर धर्मियांबद्दल अवाक्षरही नसल्यामुळे इतर धर्मिय वर्ज्य नसावेत असे अनुमान हा धर्म पाळणारे लोक काढतात आणि सगळे जग ह्या चष्म्यातुन पाहतात. >>> असे दावे केल्यानंतर प्रश्न विचारले जाणारच. त्यापासून पळ का काढायचा ? पूर्णसत्य सांगूनच श्वास घ्यावा. आधीच एव्हढे टाईप केले नसते तर बरे झाले असते.
@धागा. शेंडेनक्षत्र यांचा
@धागा. शेंडेनक्षत्र यांचा प्रतिसाद
इतिहासाच्या दृष्टीने पाहिलं तर, मक्का विजयाच्या वेळी काबामधील मूर्ती काढून टाकल्या गेल्या ही घटना इस्लामी परंपरेतच मान्य आहे. हदीस व पैगंबरांच्या चरित्रग्रंथांमध्ये तिचा उल्लेख येतो. त्यामुळे हे घडलं का नाही? या प्रश्नावर फारसा वाद नाही. इस्लाममध्ये मूर्तिपूजा ही शिर्क मानली जाते, आणि त्या धार्मिक चौकटीत मूर्ती नष्ट करणे हे श्रद्धेचे शुद्धीकरण समजले गेले.
मात्र इथे लक्षात घ्यायची गोष्ट अशी की, ऐतिहासिक घटना मान्य करणं आणि आजच्या काळात तिचं नैतिक मूल्यमापन करणं या दोन वेगळ्या पातळ्या आहेत. त्या काळातील धार्मिक-सांस्कृतिक संदर्भ, राजकीय संघर्ष आणि श्रद्धा यांचा प्रभाव वेगळा होता. आजच्या काळात धार्मिक सहअस्तित्व, परस्पर आदर आणि सांस्कृतिक विविधता या मूल्यांवर चर्चा होताना त्या घटनांचा थेट आदर्श म्हणून वापर करणं किंवा त्यावरून आजच्या समाजांवर सरसकट निष्कर्ष काढणं योग्य ठरणार नाही.
म्हणूनच, हा विषय एक धर्म चांगला - वाईट असा न करता, इतिहास कसा घडला, तो कसा समजून घ्यायचा आणि आज आपण त्यातून काय शिकतो या दृष्टीने चर्चिला तर संवाद अधिक अर्थपूर्ण आणि शांत राहील.
बामियान मधल्या मूर्तीभंजनाचा मुद्दा हा एका विशिष्ट संघटनेचे लोक सातत्याने चर्चेला घेतात. पण त्यांना बुद्धमूर्ती बद्दल प्रेम आहे का ? बुद्ध किंवा त्याच्या धर्माबद्दल प्रेम आहे का ? ते ज्या सावरकरांना मानतात, त्यांच्या लिखाणाला मानतात त्या लिखाणात बौद्ध धर्माबद्दल काय उल्लेख आहेत हे सुद्धा पहावे लागेल. ते कधी ते सांगत नाहीत.
बामियान चा संदर्भ सातत्याने देणे हे पाहुण्याच्या काठीने विंचू मारण्यासारखे आहे. इस्लामने मूर्तीभंजन केले, या विरोधात जर कुणी तीव्र प्रतिक्रिया दिली तर मग भारतात मंदीर मशीद वाद काय चुकीचा होता हा प्रश्न उपस्थित करण्यासाठी हा खटाटोप असतो.
पण अयोध्येत सुद्धा बौद्ध मठ पाडूनच त्यावर मंदीरं उभारली यावर अवाक्षर उच्चारले जात नाही. अनेक मंदीरांच्या खाली स्तूप, विहार यांचे अवशेष मिळतात.
सनातन धर्म याबद्दल सर्च
सनातन धर्म याबद्दल सर्च दिल्यावर अशी माहिती मिळते.
सनातन धर्म हा शब्द आणि हिंदू धर्म ही ओळख या दोन्हींचा विचार इतिहास, भाषा आणि समाजरचना या तिन्ही पातळ्यांवर वेगळा करून करायला हवा.
इतिहासात पाहिलं तर सनातन धर्म नावाचा एकसंध, संस्थापक असलेला, ठराविक धर्म प्राचीन भारतात होता असे स्पष्ट पुरावे नाहीत. हा शब्द संस्कृत साहित्यात आढळतो, पण तो एखाद्या विशिष्ट धर्मसंस्थेचे नाव म्हणून नव्हे, तर शाश्वत कर्तव्य, नैतिक नियम, जीवनपद्धती अशा अर्थाने वापरलेला दिसतो. महाभारत, गीता, धर्मसूत्रे इ. ग्रंथांमध्ये सनातन हा विशेषणासारखा येतो. धर्माला शाश्वत म्हणण्यासाठी.
त्याच वेळी हिंदू हा शब्द धार्मिक नव्हे, भौगोलिक ओळख म्हणून वापरात आला. सिंधू नदीच्या पलीकडील लोक असा त्याचा मूळ अर्थ होता. भारतातील विविध पंथ, परंपरा, देवता, कर्मकांड यांना एकत्र करून हिंदू धर्म अशी एक छत्री-ओळख मुख्यतः १९व्या शतकात वसाहतकालीन प्रशासन, जनगणना आणि आधुनिक राजकारणाच्या संदर्भात रूढ झाली, हे अनेक इतिहासकार मान्य करतात.
आज जेव्हा हिंदू धर्म म्हणजे नेमकं काय? असा प्रश्न उभा राहतो, तेव्हा गोंधळ होण्याचं कारणही तेच आहे.
हिंदू समाजात
एक संस्थापक नाही
एक धर्मग्रंथ नाही
एकसमान चालीरीती नाहीत
श्रद्धा, आचार, देवता, तत्त्वज्ञान यांत मोठी विविधता आहे
ब्राह्मण, ब्राह्मणेतर, शैव, वैष्णव, शाक्त, लोकधर्म, भक्तीपरंपरा या सगळ्या प्रवाहांमध्ये एकरूपता नाही, हे वास्तव आहे.
सनातन धर्म हा शब्द आजच्या चर्चेत अनेकदा या विविधतेतून निर्माण होणाऱ्या प्रश्नांना टाळण्यासाठी वापरला जातो, अशी टीका केली जाते. कारण जर सनातन धर्म स्वतंत्र, प्राचीन धर्म मानायचा असेल तर ,
त्याचा संस्थापक कोण?
त्याचे मूलभूत धर्मग्रंथ कोणते?
त्याच्या अनिवार्य श्रद्धा आणि नियम कोणते?
यांची स्पष्ट, सर्वमान्य उत्तरं मिळत नाहीत.
म्हणूनच, अनेक अभ्यासकांच्या मते सनातन धर्म ही संकल्पना इतिहासात धार्मिक ओळख म्हणून नव्हे, तर नैतिक तत्त्वज्ञानात्मक कल्पना म्हणून अस्तित्वात होती; आणि आधुनिक काळात तिला धर्माची ओळख देण्याचा प्रयत्न झाला.
सनातन धर्म हा उल्लेख करणारेच जर हिंदुत्व, हिंदू राष्ट्र असा जयघोष करत असतील तर सनातन म्हणजेच हिंदू का ? जर नसेल तर मग सनातनत्व, सनातन राष्ट्र असे का नाही म्हणत ? हा गोंधळ कोण निस्तरणार ?
धर्माला संस्थापक पाहिजेचं का?
धर्माला संस्थापक पाहिजेचं का? धर्म ग्रंथ पण पाहिजेच का?
का बाकी धर्माला आहेत म्हणून सनातन ला पण पाहिजे असं तर नाही ना.
बरं मग सनातन धर्म वाले
बरं मग सनातन धर्म वाले हिंदूराष्ट्र हवे कि नको यावर काय म्हणतात ? हिंदुत्वाबद्दल काय म्हणतात ? यावर मार्गदर्शन करावे ही नर्म विनंती.
सनातन हा वेगळा धर्म आहे का?
सनातन हा वेगळा धर्म आहे का?
मला वाटायचे जे हिंदू कट्टर असतात ते स्वतःला सनातन धर्माचे म्हणतात.
हो ना.
हो ना.
हिंदू धर्माचे संस्थापक भगवान श्रीकृष्ण आणि धर्मग्रंथ भगवद्गीता असे सांगणारेच
वैदीक धर्माचा धर्मग्रंथ म्हणून वेद सांगतात, शास्त्रे म्हणून उपनिषदे, ब्राह्मणे, अरण्यके सांगतात.
आणि आता तेच सनातन धर्माचा धर्मग्रंथ नाही, संस्थापक नाही असेही सांगतात.
मग आदि शंकराचार्यांना काय म्हणायचे ? ते कुठल्या धर्माचे संस्थापक होते ?
>>
>>
इतिहासाच्या दृष्टीने पाहिलं तर, मक्का विजयाच्या वेळी काबामधील मूर्ती काढून टाकल्या गेल्या ही घटना इस्लामी परंपरेतच मान्य आहे. हदीस व पैगंबरांच्या चरित्रग्रंथांमध्ये तिचा उल्लेख येतो. त्यामुळे हे घडलं का नाही? या प्रश्नावर फारसा वाद नाही. इस्लाममध्ये मूर्तिपूजा ही शिर्क मानली जाते, आणि त्या धार्मिक चौकटीत मूर्ती नष्ट करणे हे श्रद्धेचे शुद्धीकरण समजले गेले.
<<
उगीच शर्करावगुंठित करू नये. महंमदाने स्वहस्ते मक्केतील अनेक मूर्ती नष्ट केल्या आपल्या अनुयायांना उरलेल्या मूर्ती नष्ट करण्याचे आदेश दिले.
खुद्द महंमदाने ३०० हून अधिक दगडी मूर्ती नष्ट केल्या. काढून टाकल्या, इतरत्र हलवल्या वगैरे काही़ खरे नाही.
दुसरे असे की महंमदाचे आयुष्य, त्याचे वागणे, त्याचे विचार हे समस्त मानवजातीसाठी अनंत कालासाठी आदर्श मानावेत अशी इस्लामी श्रद्धा आहे. त्यालाच सुन्नत असे म्हटले जाते. कुराण, हदिस व सुन्नत ह्या तीन इस्लामचा पाया आहे. मूलभूत घटक आहेत.
इस्लाम असे शिकवतो की आमच्या धर्माचा कुणी अपमान केला तर त्याला मृत्युदंड दिला जावा. आता दुसर्यां धर्माच्या मूर्ती नष्ट करणे हे त्या धर्माचा अपमान नाही का? मग आपल्या धर्माचा अपमान सहन होत नाही त्यांनी दुसर्या धर्माचा अपमान का करावा?
हा दुटप्पीपणा का?
नंतर अनेक इस्लामी आक्रमकांनी हेच उदाहरण घेऊन अनेक लोकांची देवळे, चर्च नष्ट केले. भारतात अनेक भव्य, प्रसिद्ध, अनेक हिंदूंसाठी पवित्र अशी मंदिरे आणि त्यातील मूर्ती नष्ट केल्या. अनेक मूर्तींची विटंबना केली हा इतिहास आहे.
(हिंदूंनी ही बुद्धाची मंदिरे नष्ट केली म्हणणार्यानी पुरावे द्या. मुस्लिम आक्रमकांनी हे आम्ही केले ह्याची त्यांनीच मोठ्या अभिमानाने नोंद करून ठेवली आहे.)
हिंदूंनी ही बुद्धाची मंदिरे
हिंदूंनी ही बुद्धाची मंदिरे नष्ट केली म्हणणार्यानी पुरावे द्या >>
एक तर हिंदूंनी पाडली असे म्हटले नाही. बौद्धांची मंदीरे असेही म्हटलेले नाही. पोस्ट नीट वाचा. मी तुम्हाला इस्लाम्ला मानणार्यांनी अन्य धर्माच्या मूर्ती हटवल्या याचे पुरावे मागणार नाही. त्याची गरज वाटत नाही. तसेच तुमच्या प्रमाणे तीव्र भाषेतच लिहीले पाहीजे असे मला वाटत नाही.
तुम्हाला मंदीराच्या खाली बौद्ध वास्तूंचे अवशेष सापडत असल्याच्या बातम्या सर्च केल्या तर मिळतील. पण तरी देतो.
१. Chebrolu (आंध्र प्रदेश)
https://www.newindianexpress.com/states/andhra-pradesh/2014/Aug/23/archa...
२. Gudiwada Dibba
https://en.wikipedia.org/wiki/Gudiwada_Dibba%2C_Vizianagaram
३. अन्य ठिकाणे
https://cjp.org.in/were-hindu-temples-originally-buddhist-structures/
https://en.wikipedia.org/wiki/Ghorawadi_Caves
अवशेष खाली सापडले ह्याचा अर्थ
अवशेष खाली सापडले ह्याचा अर्थ हिंदूंनी आक्रमण करून बौद्ध लोकांच्या कत्तली करून त्यांच्या धर्माचा अपमान करून मूर्ती पाडून देवळे बांधली असे सिद्ध होत नाही. कदाचित बौद्ध धर्माचे महत्त्व कमी झाल्याने अशा वास्तू पडिक झाल्या असतील आणि अनेक वर्षे वापरात नसतील आणि अशा जागी हिंंदूनी देवळे बांधली असतील.
उलट धर्मपिसाट इस्लामी आक्रमकांनी आपल्या दरबारी लेखकांकरवी आपल्या "पराक्रमाच्या गाथा" रसभरित पद्धतीने नोंदवल्या आहेत.
हिंदूही इस्लामी आक्रमकांसारखेच वाईट्ट आहेत हे दाखवायचा प्रयत्न अप्रामाणिक आणि दयनीय आहे.
हिंदूंनी पारशी लोकांना आश्रय दिला. हे पारशी इस्लामी आक्रमणामुळे आपला देश सोडून भारतात आले. इथे त्यांना आपला धर्म पाळण्याची पूर्ण मुभा दिली गेली. अनेक शतके पारशी लोक भारतात वसले आहेत.
अशी अन्य उदाहरणे आहेत. तेव्हा हिंदू मुस्लिमांसारखेच असहिष्णू आहेत हा दावा हास्यास्पद आहे.
तुम्हाला हवे तसे निष्कर्ष
तुम्हाला हवे तसे निष्कर्ष काढा. पण माझ्या पोस्टमधे तुमच्या तोंडचे शब्द घुसडू नयेत ही नम्र विनंती. बाकी आपण सूज्ञ आहात.
इस्लाम सगळीकडे सारखाच असता तर भारतात एकही मंदीर शिल्लक राहीले नसते. जगभरात एकही अन्य धर्माची वास्तू शिल्लक नसती. पोस्ट नीट वाचा. पुन्हा कोट करत नाही.
काही मंदिरे मुस्लिमांनी टिकू
काही मंदिरे मुस्लिमांनी टिकू दिली म्हणून बाकी मंदिरे नष्ट करण्याचे पाप कमी होत नाही. केवळ हिंदू धर्माची विटंबना हा उद्देश ठेवून सोमनाथ, काशी, मथुरा अयोध्या अशी महत्त्वाची स्थाने मुस्लिम आक्रमकांनी नष्ट करण्याचा प्रयत्न केला. भाविक हिंदूंनी आपल्या परीने पुन्हा ते देवस्थान निर्माण करायचा प्रयत्न केला.
दक्षिणेत हंपी, विरुपाक्ष अशा अनेक जागी मूर्तींची नाके तोडणे, मुंडकी उडवणे असले प्रकार इस्लामी आक्रमकांनी केलेले आजही दिसतात.
मुस्लिम आक्रमकानी असा विचार केला की आपली संख्या कमी आहे. समस्त देवळे नष्ट करायला घेतली तर प्रत्येक ठिकाणी हिंदू प्रतिकार करतील आणि ते आपल्याला महाग पडेल म्हणून फक्त महत्त्वाची, जास्तीत जास्त जिव्हाळ्याची असणारी देवळे नष्ट करावीत असा विचार केला असणार. जिथे सर्व शक्ती एकवटून प्रतिकार करता येईल. आणि आपल्या ताकदीचे उत्तम प्रदर्शन होईल.
अफझलखानानेही पंढरपूर , तुळजापूर अशा महत्त्वाच्या स्थळांची विटंबना केली. प्रत्येक खेडोपाडी जाऊन तिथली देवळे नष्ट करण्याच्या भानगडीत पडला नाही.
>>
तुम्हाला हवे तसे निष्कर्ष काढा. पण माझ्या पोस्टमधे तुमच्या तोंडचे शब्द घुसडू नयेत ही नम्र विनंती. बाकी आपण सूज्ञ आहात.
<<
आपण आडवळणाने इस्लामी आक्रमणाची तीव्रता सौम्य करू पहात आहात. आडवळणाने हिदूनीही इतर धर्माची पवित्र स्थळे नष्ट केली असे सुचवू पहात आहात. तसे म्हटले नाही तरी ते सुचवत आहात हे उघड आहे. वेड पांघरून पेडगावला जाऊ नये. असे सोंग फार टिकत नाही.
इस्लामी आक्रमणाच्या तीव्रतेचे
इस्लामी आक्रमणाच्या तीव्रतेचे पुरावे तुम्ही तर दिलेच नाहीत. तुमच्याच लॉजिकने बाबरी पाडली याचे पुरावे तरी कुठे आहेत ?
कारण काही अवशेष सापडले म्हणजे ............ असे तुमचे लॉजिक आहे. तेच काशी, मथुरा, अयोध्या इथेही लावा. नाही का ?
बाकीच्या प्रतिसादातल्या तुमच्या आरोपांची दखल घ्यावी असे मला वाटत नाही. शुभरात्री.
अमिर खुस्रो ह्याने आपल्या
अमिर खुस्रो ह्याने आपल्या साहित्यात सोमनाथाची विटंबना लिहिलेली आहे.
सोमनाथाचे मंदिर काब्याला शरण गेले असे नोंदलेले आहे.
आता अयोध्येतील रामाबद्दल. एक म्हणजे अयोध्या हे रामाचे जन्मस्थान आहे आणि ते आदरणीय आहे ही श्रद्धा कधीच नष्ट झालेली नव्हती. रामाचे भक्त पिढ्यान पिढ्या अयोध्येत जात असत. त्यामुळे बाबराला कुठेतरी पडिक वापरात नसलेले रामाचे देवस्थान सापडले आणि तिथे त्याने मशिद बांधली हे खोटे आहे.
बाबराने मशिद बांधल्यावरही तिथल्या आवारात रामभक्त रामाची पूजा करतच होते. काही भक्तांनी जीवही गमावले असतील.
खुद्द बाबराने आपण जिहाद करत आहोत. मूर्ती आणि मूर्तीपूजकांना नष्ट करणारे गाझी आहोत असे आपल्या बाबरनामा ह्या पुस्तकात लिहून ठेवले आहे. राणा संगाशी केलेल्या लढाईत असा स्पष्ट उल्लेख आहे. अशा धार्मिक लढाईत सामील होणारे गाझी थेट स्वर्गात स्थान मिळवतील वगैरे.
असा माणूस अयोध्येत तोडफोड करून मशिद बांधणे अशक्य वाटत नाही. बाबर ह्या इस्लामी आक्रमकाची हिंदू धर्माबद्दलची असहिष्णू वृत्ती पुरेशी ठळक दिसते.
बौद्ध धर्माचे महात्म्य काही काळाने कमी झालेले होते हा इतिहास आहे. लोक पुन्हा हिंदू धर्माकडे वळले. रक्तरंजित आक्रमणे होऊन, बौध्द लोकांच्या कत्तली होऊन असे झाल्याचे कोणतेही पुरावे नाहीत. तसे असतील तर द्या. कुठल्या हिंदू राजाने मी बौद्ध धर्मियांचे रक्त सांडून तिथे पुन्हा हिंदू धर्म स्थापन करणार आहे. ह्या युद्धात जे धर्मवीर सहभागी होतील ते निश्चितच स्वर्गात जातील असा कुठे उल्लेख केला असेल तर जरूर सांगा.
नंतर अनेक इस्लामी आक्रमकांनी
नंतर अनेक इस्लामी आक्रमकांनी हेच उदाहरण घेऊन अनेक लोकांची देवळे, चर्च नष्ट केले. भारतात अनेक भव्य, प्रसिद्ध, अनेक हिंदूंसाठी पवित्र अशी मंदिरे आणि त्यातील मूर्ती नष्ट केल्या. अनेक मूर्तींची विटंबना केली हा इतिहास आहे. >>> याचा पुरावा दिलेला नाही.
(हिंदूंनी ही बुद्धाची मंदिरे नष्ट केली म्हणणार्यानी पुरावे द्या. मुस्लिम आक्रमकांनी हे आम्ही केले ह्याची त्यांनीच मोठ्या अभिमानाने नोंद करून ठेवली आहे.) >>> किती विरोधाभास आहे तुमच्या लिखाणात ? वाचता कि नाही काय लिहीलंय ते ?
अवशेष खाली सापडले ह्याचा अर्थ हिंदूंनी आक्रमण करून बौद्ध लोकांच्या कत्तली करून त्यांच्या धर्माचा अपमान करून मूर्ती पाडून देवळे बांधली असे सिद्ध होत नाही. कदाचित बौद्ध धर्माचे महत्त्व कमी झाल्याने अशा वास्तू पडिक झाल्या असतील आणि अनेक वर्षे वापरात नसतील आणि अशा जागी हिंंदूनी देवळे बांधली असतील. >>> आधीच्या म्हणण्याला पूर्णपणे विरोध करणारे. इस्लामने आक्रमण केलं, त्यांनी पाडलं याच्या नोंदी कुठेत ? अवशेष सापडले तर इस्लामी आक्रमकांनी ते पाडले. बौद्ध अवशेष सापडले तर आपोआप पाडले.
तुमचे म्हणणे आहे कि इस्लामने आदेश दिला कि प्रत्येक देऊळ, मूर्ती नष्ट करा. पण इतकी वर्षे इस्लामने राज्य करून जगभरात अन्य संस्कृतीच्या खुणा नष्ट का झाल्या नाहीत ? याला तुम्ही उत्तर काय देता ?
मुस्लिम आक्रमकानी असा विचार केला की आपली संख्या कमी आहे. समस्त देवळे नष्ट करायला घेतली तर प्रत्येक ठिकाणी हिंदू प्रतिकार करतील आणि ते आपल्याला महाग पडेल >>> ज्यांची संख्या कमी आहे त्यांनी देवळे नष्ट करताना बहुसंख्यांक बघत बसले ? काय पुरावा याचा ? तुम्ही बेताल वक्तव्ये करा , इतरांना पुरावे मागा. ये कैसे चलेगा ?
आता सर्वात कळस. मी असे म्हटले होते कि,
"मात्र इथे लक्षात घ्यायची गोष्ट अशी की, ऐतिहासिक घटना मान्य करणं आणि आजच्या काळात तिचं नैतिक मूल्यमापन करणं या दोन वेगळ्या पातळ्या आहेत. त्या काळातील धार्मिक-सांस्कृतिक संदर्भ, राजकीय संघर्ष आणि श्रद्धा यांचा प्रभाव वेगळा होता. आजच्या काळात धार्मिक सहअस्तित्व, परस्पर आदर आणि सांस्कृतिक विविधता या मूल्यांवर चर्चा होताना त्या घटनांचा थेट आदर्श म्हणून वापर करणं किंवा त्यावरून आजच्या समाजांवर सरसकट निष्कर्ष काढणं योग्य ठरणार नाही."
याला तुम्ही काय उत्तर दिलेय ?
उगीच शर्करावगुंठित करू नये नंतर अनेक इस्लामी आक्रमकांनी हेच उदाहरण घेऊन अनेक लोकांची देवळे, चर्च नष्ट केले. भारतात अनेक भव्य, प्रसिद्ध, अनेक हिंदूंसाठी पवित्र अशी मंदिरे आणि त्यातील मूर्ती नष्ट केल्या. अनेक मूर्तींची विटंबना केली हा इतिहास आहे. >>>> याचे पुरावे ?
तुम्हाला सांगितले कि राजकीय व अन्य कारणे आहेत तर शर्करावगुंठित करायचे नाही असा आदेश काढताय. जगभरात अन्य संस्कृतीचा वारसा इस्लामी राजवटीत का टिकून राहिला याचे उत्तर तुम्ही तुमच्या पोतडीतून हवे तसे काढता. मग ते राजकीय नाही ? त्याला पुरावा काहीच नाही.
अफजलखानाने मूर्ती, देवळे नष्ट केली. त्याच्या आधीपर्यंत कुणीच का नष्ट केली नाहीत. अफजलखानाने देवळे नष्ट करण्यामागे युद्धातले डावपेच होते.
शिवाजी महाराजांना प्लेन जमिनीवर समोरासमोर यायला लावण्यासाठी त्याने मंदीरांवर हल्ले केले. त्यामुळे या भागात असंतोष निर्माण होईल आणि ते राजाकडे तक्रारी करतील. जर राजाने काही हालचाल केली नाही तर राजाला पाठिंबा कमी होईल. लोकांचा विश्वास उडेल. आणि हे होऊ नये म्हणून राजा गड सोडून खाली आला तर युद्ध करणे सोपे जाईल.
अफजलखानाकडे प्रचंड सैन्य होते. शिवाजी महाराजांकडे सैन्य कमी होते याची त्याला माहीती होती. पण अफजलखानाचे सैन्य डोंगराळ भागात कुचकामी होतं. देवळं तोडूनही राजा समोरासमोर येत नाही हे पाहिल्यानंतर त्याने गडाला वेढा दिला.
हे राजकीय कारण नाही ?
काबाच्या लढाईला असाच संघर्ष आहे.
तुम्हाला आवडले नाही कि शर्करावगुंठीत. आणि हिंदूंच्या मंदीराखाली बौद्ध अवशेष सापडले कि ते आपोआप पडले. प्रश्न असा आहे कि तिथेच देवळे का बांधली ? बाबरी मशीद रामजन्मभूमी विवाद काय आहे मग ? मंदीरे आजूबाजूला पण बांधता आली असती कि नाही ? अयोध्या हा आणखी वेगळा प्रश्न आहे. मशिदीच्या खाली मंदीराचे अवशेष सापडले यावर हा विवाद आहे. पण मंदीराच्या खाली बौद्ध अवशेष सापडले कि आपोआप पडते होय ?
आजही कार्ला लेणी आणि अनेक लेण्यात हिंदू function at() { [native code] }इक्रमणे आहेत. बुद्धगयेत function at() { [native code] }इक्रमण आहे.
तुम्हाला हवं तसं लिहायचंय का सर्वांनी ?
प्रेषित महंमदाने स्वतःच्या
प्रेषित महंमदाने स्वतःच्या हाताने मूर्तीविध्वंस केला याचे पुरावे तुम्ही दिले नाहीत. मूर्ती हलवली अशी घटना घडली म्हणून पुरावे नकोत असे मी म्हटले होते. पण तुम्ही ते मान्य करत नाही. तुम्हाला तुमचे म्हणणे दामटायचे आहे ते ही बिनपुराव्याने. इतरांनी पुराव्याशिवाय बोलायचे नाही.
तुम्ही पुरावा देत नाही, मी द्यायचे. प्रेषिताने स्वतःच्या हाताने विध्वंस केला असे कुठेच म्हटलेले नाही. ते तुमचे म्हणणे आहे. त्याचे पुरावे द्या.
तसेच त्या युद्धात सर्वच धार्मिक स्थळे नष्ट केली याचे पुरावे द्या.
तसेच हा विध्वंसाचा आदेश कायमस्वरूपी होता याचे आदेश द्या.
तुम्ही जोपर्यंत पुरावे देत नाहीत तोपर्यंत इतरांना मागू नयेत.
मी काय घटना घडली ते सांगतो. तुम्ही आधी स्वतः पुरावे द्या मग चॅलेंज करा.
प्रेषित मुहम्मद यांनी
प्रेषित मुहम्मद यांनी स्वतःच्या हाताने काब्यातील अन्य धर्मांची स्थळे उद्ध्वस्त केली हे विधान अचूक नाही.
मात्र काब्यातील मूर्ती हटवण्याची घटना घडली, आणि ती विशिष्ट ऐतिहासिक / सांस्कृतिक संदर्भात घडली.
1. काबा हे इस्लामपूर्व अरबांचे पवित्र स्थान होते. तिथे 360 पेक्षा जास्त मूर्ती होत्या. वेगवेगळ्या अरब जमाती त्यांची पूजा करत.
काही स्रोतांनुसार तिथे येशू–मरियम यांची चित्रेही होती. म्हणजे काबा हे बहुधार्मिक / बहुदेवतावादी उपासनेचे केंद्र होते.
2. मक्केचा विजय (Bloodless conquest) : इ.स. 630 मध्ये मुहम्मद आणि त्यांच्या अनुयायांनी मक्का जवळजवळ रक्तपात न करता ताब्यात घेतले. त्यावेळी मुहम्मद यांनी सर्वसाधारण माफी जाहीर केली. जुन्या शत्रूंनाही क्षमा दिली.
3. मूर्ती हटवण्याची घटना : काब्यातील मूर्ती काढून टाकण्यात आल्या
इस्लामिक परंपरेनुसार काही मूर्ती मुहम्मद यांच्या निर्देशाने, काही सहकाऱ्यांनी हटवल्या. सत्य आले, असत्य नष्ट झाले. अशी घोषणा केली गेली . हे कृत्य इस्लामिक एकेश्वरवाद (तौहीद) स्थापन करण्यासाठी होते.
स्वतःच्या हाताने उद्ध्वस्त केले” हे कितपत सत्य?
काही इस्लामी ग्रंथांत असे उल्लेख आहेत की त्यांनी काठी/दांडा वापरून काही मूर्ती पाडल्या. पण ,
संपूर्ण विध्वंस त्यांनी स्वतः केला किंवा इतर धर्मांच्या मंदिरांचा सार्वत्रिक नाश केला असे म्हणणे इतिहासदृष्ट्या अतिरंजित आहे.
इतर धर्मस्थळांबाबत काय?
हे महत्त्वाचे आहे .
मक्का जिंकल्यानंतर ख्रिश्चन चर्च, ज्यू उपासना स्थळे. इतर शहरांतील मंदिरे यांचा नाश करण्याचा कोणताही सार्वत्रिक आदेश दिला गेला नाही.
उलट नज्रानच्या ख्रिश्चनांना संरक्षणपत्र , ज्यूंशी करार (Medina Charter)
धर्मात बळजबरी नाही (कुराण 2:256) हे इस्लामिक परंपरेत नमूद आहे.
उद्ध्वस्त करा” हा आदेश कायमस्वरूपी होता का?
नाही. तो आदेश: विशेषतः काबा या स्थळापुरता आणि त्या घटनेपुरता (संघर्ष ) होता..
कारण काबा हे इस्लाममध्ये अब्राहमाचे एकेश्वरवादी पवित्र स्थान मानले जाते
इस्लामचा दावा: काबा मूळतः एकेश्वरवादी होते, नंतर मूर्तिपूजा आली.
त्यामुळे तो सार्वत्रिक मूर्ती-नाशाचा आदेश नव्हता.
संदर्भ :
१) मक्केचा विजय (इ.स. 630) – रक्तपात न होता
संदर्भ
इब्न इशाक (८वे शतक)
Sirat Rasul Allah – मक्केचा विजय जवळजवळ शांततेत झाला, सर्वसाधारण माफी जाहीर
इब्न हिशाम (इब्न इशाकचे संपादक) – As-Sirah an-Nabawiyyah, खंड 4
W. Montgomery Watt
Muhammad at Medina – आधुनिक पाश्चात्त्य इतिहासकार, रक्तपात टाळला गेला हे स्पष्ट
२) काब्यात 360 मूर्ती होत्या
संदर्भ
अल-अज्रकी
Akhbar Makkah – काब्यातील मूर्तींची संख्या व जमातींची माहिती
इब्न काथीर
Al-Bidaya wa’l-Nihaya – काब्यातील मूर्तिपूजा व तिचा अंत
Karen Armstrong
Muhammad: A Prophet for Our Time – काबा हे इस्लामपूर्व बहुदेवतावादी केंद्र होते
३) मुहम्मद यांनी मूर्ती हटवण्याचा आदेश दिला / काही स्वतः पाडल्या
संदर्भ
सहीह अल-बुखारी
हदीस क्र. 4287, 2478
“The Prophet entered the Kaaba and found images… and ordered that they be erased.”
सहीह मुस्लिम
हदीस 1781 – मूर्ती नष्ट करण्याचा उल्लेख
इब्न साद
Kitab al-Tabaqat al-Kubra – काही मूर्ती काठीने पाडल्याचा उल्लेख
येथे लक्षात घ्या: मूर्ती हटवणे # सर्व धर्मस्थळ उद्ध्वस्त करणे ( # बरोबर नाही)
४) येशू–मरियम यांची चित्रे काब्यात होती
संदर्भ
इब्न इशाक / इब्न हिशाम – काब्यात चित्रे होती, काही वगळता इतर काढून टाकली
Al-Azraqi – Akhbar Makkah – चित्रांचे तपशील
Grabar, Oleg -The Formation of Islamic Art – इस्लामपूर्व काब्यातील प्रतिमावाद
५) इतर धर्मस्थळे न उद्ध्वस्त करण्याचा आदेश
(अ) धर्मात बळजबरी नाही
कुराण 2:256
La ikraha fid-deen (धर्मात सक्ती नाही)
(ब) नज्रानच्या ख्रिश्चनांना संरक्षणपत्र
संदर्भ
इब्न साद – Tabaqat
Al-Tabari – Tarikh al-Rusul wa’l-Muluk
John L. Esposito
Islam: The Straight Path - चर्च, पुजारी, क्रॉस यांचे संरक्षण स्पष्ट नमूद
(क) मदीना सनद (Medina Charter)
संदर्भ
Al-Tabari
Watt – Muhammad at Medina
Fred Donner
Muhammad and the Believers ज्यूंना स्वतंत्र धर्मस्वातंत्र्य
६) “उद्ध्वस्त करा” हा कायमस्वरूपी आदेश नव्हता
संदर्भ
कुराण 22:40
“If God had not repelled some people by others, monasteries, churches, synagogues and mosques would have been destroyed.”
W. Montgomery Watt – मूर्तीविरोध विशिष्ट संदर्भापुरता होता
Patricia Crone
Meccan Trade and the Rise of Islam
७) नंतरच्या इस्लामी राजवटींच्या विध्वंसाचा मुहम्मद यांच्याशी फरक
संदर्भ
Richard Eaton
Temple Desecration and Muslim States in Medieval India – नंतरचे विध्वंस राजकीय होते, प्रेषितांच्या शिकवणीपेक्षा वेगळे
Romila Thapar – धार्मिक हिंसा = सत्ता संघर्ष
नंतरच्या इस्लामी आक्रमकांबद्दल पुन्हा बोलेन. तुम्ही आधी तुमचे दावे पुराव्याने सिद्ध करा.
अजून एक लोच्या आहेच.
अजून एक लोच्या आहेच.
तो म्हणजे काही जण सनातनी धर्म म्हणतात, तर इथे शेंडेनक्षत्र हिंदूंनी तलवारी ठेवल्या नाहीत असे म्हणतात. म्हणजे स्वतःकडे दोष घ्यायचा नाही पण इतरांना द्यायचाय. हे करताना ते मनुस्मृती, विष्णूस्मृती आणि इतर शास्त्रात सांगितलेल्या अमानुष शिक्षांकडे काणाडोळा करतात. आपल्याच धर्माच्या लोकांना आपलेच धार्मिक साहित्य वाचले म्हणून डोळे काढणे,कानावर पडले म्हणून कानात गरमागरम शिसे ओतणे आणि शिकवले तर देहदंडाच्या शिक्षा यावर शेंडेनक्षत्र काहीच बोलत नाहीत.
अशा शिक्षा असताना बौद्ध मंदीरं आपोआप पडली, त्यांच्या कत्तली झाल्या नाहीत हे दावे ते करतात.
पण मुस्लीम राजवटीत हिंदू देवळे सगळीच का पाडली नाहीत याचे तर्कशुद्ध आणि संदर्भासहीत उत्तर ते देत नाहीत.
सनातनी कि हिंदू नेमके कोण ते एकदा तरी सांगा.
हा धागा वेगळा काढला ते बरं
हा धागा वेगळा काढला ते बरं झालं .
चर्चा चांगली सुरू आहे. इस्लाम संबंधी ही माहीती नसल्याने प्रपोगंडा खरा वाटतो.
>
>
तो म्हणजे काही जण सनातनी धर्म म्हणतात, तर इथे शेंडेनक्षत्र हिंदूंनी तलवारी ठेवल्या नाहीत असे म्हणतात. म्हणजे स्वतःकडे दोष घ्यायचा नाही पण इतरांना द्यायचाय. हे करताना ते मनुस्मृती, विष्णूस्मृती आणि इतर शास्त्रात सांगितलेल्या अमानुष शिक्षांकडे काणाडोळा करतात. आपल्याच धर्माच्या लोकांना आपलेच धार्मिक साहित्य वाचले म्हणून डोळे काढणे,कानावर पडले म्हणून कानात गरमागरम शिसे ओतणे आणि शिकवले तर देहदंडाच्या शिक्षा यावर शेंडेनक्षत्र काहीच बोलत नाहीत.
<<
ह्या अमानुष शिक्षा किती प्रमाणात दिल्याचे पुरावे आहेत?
कुराण हा इस्लामचा एकमेव अद्वितीय धर्मग्रंथ आहे. दुसरा कुठलाही ग्रंथ हा धर्मग्रंथ मानणे गैर इस्लामिक आहे.
हिंदूसाठी मनुस्मृती मानणे बंधन कारक आहे का? आजिबात नाही.
हिंदूसाठी विष्णूस्मृती, अमुक पुराण तमुक पुराण हे धर्मग्रंथ म्हणून स्वीकार करणे बंधनकारक आहे का? आजिबात नाही.
मी अमुक एका ग्रं थातील अमुक विधाने धुडकावून लावतो आणि तरीही मी स्वतःला हिंदू समजतो असे म्हणायला हिंदू धर्म आडकाठी करतो का? आजिबात नाही. उलट कुराण हे ईश्वराने सांगितलेले आहे. तो ईश्वराचा अखेरचा शब्द आहे. त्याचा चुकीचा अर्थ लावणे, त्यातील कुठल्या विधानाला चूक मानणे हे त्या धर्माचा अपमान समजला जातो.
हा प्रचंड फरक लक्षात न घेता जसा इस्लाम तसाच हिंदू. जसे इस्लाम असहिष्णू वागतो तसेच हिंदू धर्म असे हास्यास्पद मूर्ख दावे केले जातात.
हे ढोंगीपणातून येतात किंवा घोर अज्ञानातून.
आपल्याला सोयिस्कर संदर्भ घेऊन
आपल्याला सोयिस्कर संदर्भ घेऊन इस्लामी असहिष्णूपणावर साखरपेरणी करणे हे डाव्या लोकांचे आवडते उद्योग आहेत.
खुद्द गझनीचा मेहमूद, विविध खिलजी राजे यांनी स्वतः काफीरांच्या बुतखान्यावर, सनमखान्यावर हातोडे चालवून ते नष्ट केले. मारलेल्या बामणांच्या जानव्याचे मनोरे रचले वगैरे रसभरित वर्णने करतात तेव्हा अट्टाहासाने त्याला राजकीय आक्रमण म्हणणे त्यात धर्माचा अंशही नव्हता असा दावा करणे ढोंगीपणाचे आहे.
गझ नीच्या मेहमूदाला सोमनाथाच्या पुजार्यांनी मोठ्या प्रमाणात द्रव्य देऊ केले. पण त्याने ते धुडकावून लावले. त्याला मूर्तीपूजक आणि मूर्तीपूजा नष्ट करायचीच होती. कितीही धन दिले तरी त्याच्या ह्या इस्लामी महत्त्वाकांक्षेत तो बदल करू इच्छित नव्हता असे ऐतिहासिक नोंदीत लिहिलेले आहे.
अल उत्बी : प्राचीन पर्शियन नोंद
फरिश्ता : १५-१६ व्या शतकातील इतिहास लेखक ज्याने विविध इस्लामी आक्रमकांबद्दल लिहून ठेवले आहे.
रोमिला थापर, इरफान हबीब त्याचा बाप महंमद हबीब ह्या डाव्या इतिहासकारांनी असे पुरावे दुर्लक्षून ह्या मुस्लिम आक्रमकांचा उद्देश निव्वळ राजकीय होता असा निखालस खोटा दावा केला आहे. त्यासाठी अनेकदा ऐतिहासिक दस्तावेजांचे खोटे अनुवाद केले आहेत.
इतिहास तज्ञ मेहेंदळे यांनी सप्रमाण ह्या अप्रामाणिक इतिहासकारांचे बिंग फोडले आहे.
कुठलेही युद्ध चालू नसताना
कुठलेही युद्ध चालू नसताना प्रेषित महंमदाने मक्केतील मूर्ती फोडल्या, नष्ट केल्या. हे करत असताना त्या मूर्ती पवित्र मानणार्या लोकांच्या भावनांचा कुठलाही विचार केला नाही.
कितीही तथाकथित तज्ञांची साक्ष काढा, हे सत्य सत्यच राहणार.
Pages