मराठीसाठी स्वतंत्र लिपी असावी का?

Submitted by केअशु on 19 December, 2025 - 21:17

मित्रहो बऱ्याचदा मराठीला गृहीत धरले जाते. बरचसे उत्तर भारतीय लोक मराठीला हिंदीची बोलीभाषा समजतात. भारतातल्या कितीतरी राज्यांना त्यांची त्यांची स्वतंत्र लिपी आहे. मग तशाच प्रकारे जर मराठीसाठी स्वतंत्र लिपी निर्माण केली तर काय हरकत आहे? आपण आपल्या भाषेचे वेगळेपण लिपीद्वारे का दाखवू नये? मोडी ही स्वतंत्र लिपी नव्हे. ती ऐतिहासिक काळामध्ये लिहिली जाणारी धावती देवनागरीच आहे. त्यामुळे मोडी लिपी व्यवहारात वापरणे पुन्हा सुरू करा हे म्हणणे चुकीचे आहे. मोडीला बऱ्याच मर्यादाही आहेत.

तुम्हाला काय वाटतं? मराठीसाठी स्वतंत्र लिपी असावी का? नसावी का? कृपया व्यक्त व्हा!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

मायबोलीवर आधी रोमनमधेच लिहिले जायचे - मराठी, इंग्लिश, संस्कृत, जे काही असेल ते रोमनमधेच असे.
>>>>

म्हणूनच बहुधा म्हणतात,
जुने ते सोने

मागे एक सिंधी मैत्रीण सिंधीत दोन अंकासाठी 'ब' असा उच्चार आहे. पण "आम्ही हा शब्द जसा म्हणतो तसा म्हणणं तुम्हाला (मराठी लोकांना) जन्मात जमणार नाही" असं म्हणाली होती.
>>>>>>

मग हम हे राही प्यार के चित्रपटासारखे अंडी फेकायची तिच्यावर

>>>>>>>>>ळ साठी चिन्ह आहे जे देवनागरीत नाही, पर्यायाने तामिळ न बोलता येणारे मराठी लोक त्याचा उच्चार करु शकत नाहीत
होय ललिता या नावा मधला लि ते विचित्र बोलतात. जो उच्चार मराठीत नाही.

असा काय उच्चार आहे जो देवनागरीत लिहिता येणार नाही सांगा बघू>>>>

तो उच्चार मी कसा इथे लिहु?? तो देवनागरीत येत नाही असे मी म्हणतेय ना.. तो उच्चार देवनागरीत ळ असे लिहुन दाखवतात आणि एन्ग्रजीत zh. मैयाळगनचा शेवटचा सिन बघ म्हणजे कदाचित कल्पना येईल.

कित्येक हिंदीभाषिकांना ळ उच्चारता येत नाही, हे व्यंजन हिंदीत नाही. ते ड कडे झुकणारा काहीतरी उच्चार करतात.

*मायबोलीवर आधी रोमनमधेच लिहिले जायचे - मराठी, इंग्लिश, संस्कृत,.....>>>जुने ते सोने* -
मायबोलीवर आधी लिहिले जायचे तें जुने, की कित्येक शतके ज्या लिपीत लिहिले जायचे तें जुने व सोने ? Wink

की कित्येक शतके ज्या लिपीत लिहिले जायचे तें जुने व सोने ?
>>>>

ते कालबाह्य Happy

ती लिपी टिकली असती तर नक्कीच सोने म्हटले असते अन्यथा कालबाह्य हाच योग्य शब्द आहे.
जसे आपण आज संस्कृतचा किती अभिमान बाळगला, कौतुक केले, तरी ती वापरत कोणी नाही..

रोमन लिपीत मराठी लिहिणे आपणच वापरायचे सोडले अन्यथा इतर जगासाठी ती लिपी अस्तित्वात आहे. नव्हे जगाच्या अंतापर्यंत राहील अशी आहे. मग का वापरू नये?

आमच्या घरात हिंदी मराठी ट्युशन घेतात. आजकालच्या मुलांना अभ्यासाच्या पुस्तकपलीकडे देवनागरी लिपी फार वाचता येत नाही. वाचायला कष्ट पडतात. येत्या काळात ते एकवेळ मराठी बोलतील पण वाचन सोडतील अशी स्थिती आहे.
जसे मला उर्दूचे काही शब्द वाक्य बोलता येतात. मात्र वाचता बिलकुल येत नाही.

*रोमन लिपीत मराठी लिहिणे आपणच वापरायचे सोडले* - कुणी, कधी व किती वेळ हे सोडण्यापूर्वी वापरले होते ? असंख्य लोकांप्रमाणे मी तर आयुष्यभर मराठी देवनागरीतच वाचतो, लिहितो आहे !

असामी यांनी म्हटल्याप्रमाणे,
<<मायबोलीवर आधी रोमनमधेच लिहिले जायचे - मराठी, इंग्लिश, संस्कृत, जे काही असेल ते रोमनमधेच असे.>>

तेव्हा मी ऑर्कुटवर होतो आणि तिथे देखील आम्ही हेच करायचो.

मी पटकन वाचले काही रोमात असायचे आणि काही लॅटरीन मध्ये लिहायचे.. ते भिंतीवर बदामात बाण काढून लिहितात तसे.. गोट्या लव पिंकी

ती लिपी टिकली असती तर नक्कीच सोने म्हटले असते अन्यथा कालबाह्य हाच योग्य शब्द आहे.

रोमन लिपीत मराठी लिहिणे आपणच वापरायचे सोडले >> ही दोन वाक्ये एकत्र केली तर मराठी वापरणार्‍यांनी रोमन लिपीत मराठी लिहिणे सोडले म्हणजे रोमन लिपीचा मराठी लिहिण्यासाठी वापर कालबाह्य झाला असा होतो ना ? Wink

नाही
पूर्ण जगाने रोमन लिपी सोडली असती तर ती कालबाह्य झाली असती
मराठी माणसांनी स्वतःच हा आगाऊपणा केला आहे. इतर जगात तिला डिमांड आहे.
हे म्हणजे मी उद्या स्मार्टफोन वापरायचे सोडून पेजर वापरायला सुरुवात केली तर त्याने स्मार्टफोन कालबाह्य होत नाही. जग वापरते तो. माझ्यातच मस्ती..

"रोमन लिपीचा मराठी लिहिण्यासाठी वापर कालबाह्य झाला" ह्या वाक्याकडे लक्ष वेधू इच्छितो.

Lol

Biggrin

अलीबाबा एकच मिळाला ना शेवटी? शिवाय हा शिलालेख तरी पूर्णपणे कसा म्हणावा? कारण बऱ्याचदा शिलालेख हे मंदिर किंवा किल्ले यांच्या भिंतीवर कोरलेल्या असतात. ही तर सरळ सरळ शिळा आहे. ज्याच्या एका बाजूला मोडीमध्ये आणि दुसऱ्या बाजूला तमिळमध्ये कोरलेल आहे. तरीही वादापुरता तुमचा मुद्दा मान्य की एक तरी मोडी शिलालेख सापडला आहे. पण एकच शिलालेख मोडी लिपीमध्ये मिळणे यातूनच काय ते समजून घ्या.

*मराठीतील सर्व लेखन मोडीत - असं कुणी म्हणू नये म्हणून ...*-
मराठीची लिपी मोडीत - असं कुणी म्हणू नये म्हणून तरी तिची लिपी बदलू नये ! Wink

माझं मराठी भाषेवर प्रेम आहे असं जेव्हा हा म्हणला होता ना, तेव्हाच मला वाटलेलं- मराठीत काहीतरी प्रॉब्लेम आहे

लिपीचं फिक्सिंग होईना धड. अजूनही अनेक असतील.

बरचसे उत्तर भारतीय लोक मराठीला हिंदीची बोलीभाषा समजतात. >>

हे बहुतेक लिपीमुळे नसावे. बरेच शब्द दोन्हीत कॉमन आहेत आणि काहींत फक्त ण - न चा फरक आहे. त्यामुळे लिपी बदलली तरी उच्चार तर तेच राहतील. मग लिपी बदलुनही परत हिंदीचीच बोली भाषा आहे म्हणतील.

त्यापेक्षा उच्चार बदलायचे. जे शब्द दोन्हीत कॉमन आहेत, किंवा अर्थ वेगळा असला तरी उच्चार सारखे आहेत (उदा. चेष्टा, घड्याळ - घडियाल) अशा सगळ्या शब्दांतील अक्षरांचा उच्चारच बदलायचा. मग पूर्ण शब्दांचा उच्चार हिंदीतील साम्य असलेल्या शब्दांपेक्षा पेक्षा वेगळा होईल. ती अक्षरे असलेल्या इतर शब्दांचेही उच्चार बदलतील, पण तेवढे चालुन घ्यावे. मग ते म्हणुच शकत नाही की ही हिंदीची बोली भाषा आहे.

मराठी आणि हिंदी उच्चार अनेक ठिकाणी वेगवेगळे आहेत.
मराठीत च चा उच्चार दोन प्रकारे होतो. चतुर आणि चमचा ह्या दोन शब्दात च वेगळ्या पद्धतीने उच्चारला जातो. हिंदीत तसे नाही.
ज च्या बाबतीतही तेच. मराठीत जनता आणि जहाज ह्यातील ज वेगळे उच्चारले जातात. हिंदीत एकच आहे. कदाचित नुक्ता देऊन वेगळ्या उच्चाराचा ज लिहिला जात असेल.
ऐ चा उच्चार मराठीत अ+इ ह्या दोन स्वरांचे मिश्रण आहे. हिंदीत ऐ चा उच्चार अ+ए ह्या दोन स्वरांच्या मिश्रणासारखा वाटतो.
औ चा उच्चार मराठीत अ+उ ह्या दोन स्वरांचे मिश्रण आहे. तर हिंदीत अ+ओ ह्या दोन स्वरांचे मिश्रण आहे.
ज्ञ चा उच्चार मराठीत द्+न्+य असे मिश्रण आहे तर हिंदीत ग्+य.

<<<< त्यापेक्षा उच्चार बदलायचे. जे शब्द दोन्हीत कॉमन आहेत, किंवा अर्थ वेगळा असला तरी उच्चार सारखे आहेत
>>>>>

अश्याने अर्धा मराठी शब्दकोश बदलून जाईल.

यूपीएससी परीक्षेत आपल्यावर प्रश्न विचारले जातील. मराठी भाषेत गाढवाला माकड म्हणतात, माकडाला बोकड म्हणतात, बोकडाला कोंबडी म्हणतात आणि कोंबडीला कुत्रा म्हणतात,
तर कोंबडी दिवाळीला कोणाला तळून पितात?

छे! लिपीच बदलूया.

बरचसे उत्तर भारतीय लोक मराठीला हिंदीची बोलीभाषा समजतात >>> त्यांची फिकीर आपण कशाला करायची? त्यातून प्रत्युत्तर द्यायचेच असेल तर त्यांना आपले अफाट मराठी अ‍ॅक्सेण्ट वाले व भरपूर मराठी शब्द असलेले हिंदी त्यांच्यावर मारून "घ्या हिंदीची एक बोलीभाषा" असे सांगायचे.

बाकी मराठी लोक मराठीच्या जाहीर वापराबाबत इतके उदासीन आहेत की वेगळी लिपी काढून त्यात काही बदलेल असे वाटत नाही. कालनिर्णय च्या ऑक्टोबरच्या पानावर महिना हा शब्द दोनदा "महीना" असा लिहीलेला आहे सहज दिसेल इतक्या मोठ्या अक्षरांत. ही जाहिरात कोणातरी स्थानिक मराठी उत्पादनांचीच आहे.

माझी मदत, माझ्या सोबत असे का वागतात, तुमचे धन्यवाद वगैरे तर खूप कॉमन झाले, "तू माझे मेलेले तोंड पाहशील", "माझ्या दरवाज्यात उभे राहून" सारखी आळशी भाषांतरित मराठी आजकाल सर्रास सिरीयल्स मधे ऐकू येते.

*त्यांची फिकीर आपण कशाला करायची? *. -
100% सहमत ! आपण तुच्छ लेखलं म्हणून ते त्यांची भोजपुरी बदलतील ? आणि, बदलू नयेच ! जो जे वांछील तें तो लाहो ! ज्या भाषा, बोलीभाषा सहजपणे अस्तित्वात आल्या व बहरल्या, त्या तशाच सहजपणे टिकाव्या किंवा संपाव्या; त्या नैसर्गिक प्रक्रियेत आपण उगीचच ढवळाढवळ करावीच कां !!!

भांडू नका. काही वर्षात अधि़कृत भाषा हिंदी आणि लिपी गुजराथी होईलच. सगळे वाद संपतील.

Pages