मराठीसाठी स्वतंत्र लिपी असावी का?

Submitted by केअशु on 19 December, 2025 - 21:17

मित्रहो बऱ्याचदा मराठीला गृहीत धरले जाते. बरचसे उत्तर भारतीय लोक मराठीला हिंदीची बोलीभाषा समजतात. भारतातल्या कितीतरी राज्यांना त्यांची त्यांची स्वतंत्र लिपी आहे. मग तशाच प्रकारे जर मराठीसाठी स्वतंत्र लिपी निर्माण केली तर काय हरकत आहे? आपण आपल्या भाषेचे वेगळेपण लिपीद्वारे का दाखवू नये? मोडी ही स्वतंत्र लिपी नव्हे. ती ऐतिहासिक काळामध्ये लिहिली जाणारी धावती देवनागरीच आहे. त्यामुळे मोडी लिपी व्यवहारात वापरणे पुन्हा सुरू करा हे म्हणणे चुकीचे आहे. मोडीला बऱ्याच मर्यादाही आहेत.

तुम्हाला काय वाटतं? मराठीसाठी स्वतंत्र लिपी असावी का? नसावी का? कृपया व्यक्त व्हा!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

नसावी. म्हणजे हिंदी पेक्षा वेगळी लिपी असायला विरोध नाही, पण त्यासाठी नवीन लिपी तयार करायला आहे.
काही अपवाद वगळता (बहुदा तुर्किश भाषा) इतर सर्व लिप्या या नैसर्गिकपणे तयार झाल्या आहेत.
तोटे - जुनी लिपी माहित असलेल्यांना नवीन लिपी शिकावी लागेल, जे कष्टप्रद असल्याने समाजातून विरोध होईल. आणि आपल्या लोकशाही देशात याची सक्ती करण्याचे धाडस कोणी करणार नाही.
मुलांना काही पिढ्या दोन्ही लिप्या शिकाव्या लागतील कारण जुने लिखित देवनागरीत असेल. मग त्यात पुस्तके, इंटरनेट वरील मजकूर, सरकारी कागदपत्रे इत्यादी सर्व आले. या सर्व जुन्या लिपीतल्या लेखनाचे नवीन लिपीत पुनर्लेखन करावे लागेल ज्याचा खर्च हजारो कोटींमध्ये येईल. व त्याला काही दशके लागू शकतील, अगदी AI वापरून सुद्धा.
अगोदरच निरक्षरता असलेल्या राज्यात अजून खूप मोठ्या नवीन निरक्षरतेची भर पडेल.

धाग्याचे कारण व हा नवीन लिपीचा उपाय हे हास्यास्पद आहे. पण कविकल्पना म्हणून असे झाले तर किंवा करायचे झाले तर काय काय होईल किंवा कसे करता येईल याची विचारप्रक्रिया रोचक आहे.
या विषयावर एक वेब सिरीज होऊ शकते. म्हणजे सरकार जबरदस्तीने नवीन लिपी आणते, आणि मग काय काय होते त्यावर. प्लुरिबस सारखी. Happy

Navin lipi tayaar n karata ashi Roman Lipi vaparata yeil Happy

याचा फायदा म्हणजे,
१) जुन्या पिढीला काही नवीन शिकावे लागणार नाही
२) नवीन पिढी रोमन लिपी मराठी फास्ट वाचेल
३) जुने साहित्य कॉपी पेस्ट ट्रान्सलेटर वापरून रोमन लिपीत करता येईल
४) आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळेल. अतिरिक्त महत्व मिळेल.

*आपण आपल्या भाषेचे वेगळेपण लिपीद्वारे का दाखवू नये? * याचा व *Navin lipi tayaar n karata ashi Roman Lipi vaparata yeil *. याचा मेळ कसा घालणार ? हिंदी व आपली लिपी एक नको म्हणून हे इंग्लिश व आपली लिपी एक करायची, हे नाही पटत. शिवाय, मराठीची नाळ संस्कृतशी जुळलेली असताना तिला रोमन लीपीशी मारून मुटकून कां जोडायचं? आणि, मुळात केवळ हिंदी भाषिक मराठीला गृहीत धरतात असल्या समजुतीने आपण स्वतःच्या भाषेची लिपीच बदलणं हेच तर्क विसंगत वाटतं !

हिंदी व आपली लिपी एक नको म्हणून हे इंग्लिश व आपली लिपी एक करायची, हे नाही पटत.
>>>>>

पण आपण आताही असेच करतो.
मराठी लिहिताना एखादादुसरा हिंदी शब्द वापरला की वाचनात खडा आला अश्या प्रतिक्रिया येतात. पण तेच इंग्लिश शब्दांना आपण स्वीकारले आहे. त्यामुळे हिंदी आपली आणि इंग्लिश परकीय असे आपण वरवर म्हणत असलो तरी प्रत्यक्षात हिंदी आपल्याला जास्त परकी वाटते.

*एखादादुसरा हिंदी शब्द वापरला की* - एखादाशब्द वापरणं व संपूर्ण लिपी वापरणं, यात जमीन - अस्मानाचा फरक आहे, निदान मला तरी तसा जाणवतो. भाषेची विशेष ओळख व श्रेष्ठता तिच्या शब्द व साहित्य संपन्नतेवर ठरत असावी; लिपी बदलून ते साध्य होईल असं नाही वाटत.

शब्द व लिपी यात फरक आहे.

भाषेची लिपी त्या भाषेतील सर्व अक्षरांना सामाऊन घेते. देवनागरीत ळ आहे जो हिंदीत नसला तरी मराठीत आहे. तामिळ भाषा ज्या लिपीत लिहिली जाते त्यात मैयाळगन मधल्या ळ साठी चिन्ह आहे जे देवनागरीत नाही, पर्यायाने तामिळ न बोलता येणारे मराठी लोक त्याचा उच्चार करु शकत नाहीत. रोमन लिपीला तर खुपच मर्यादा आहेत. त्यांचे स्वर फक्त ५ आहेत आणि एकाच स्वराचे शब्दाप्रमाणे वेगवेगळे उच्चार होतात.. मैयाळगनमधल्या ळ साठी रोमनमध्ये zh च आधार घेतलाय. देवनागरी व रोमन दोन्ही लिप्या इथे फेल जातात. मराठीसाठी रोमन तर हास्यास्पद आहे. गोव्यात कोकणीसाठी मुद्दाम रोमन निवडली आणि ती फेल गेली. बहुतेक गोवन आता देवनागरीच वापरतात.

त्यामुळे वेगळेपण दाखवायला दुसरी लिपी निवडली तर त्या भाषेला शुन्य फायदा होईल.

तुम्ही नवी लिपी निर्माण करुन ती प्रचलीत करु शकलात तर तुम्हाला अपेक्षित काहीतरी वेगळेपण निर्माण होईल. बाकी एक मराठीभाषिक म्हणुन मला देवनागरीत काहीही न्युन दिसत नाही.

(रच्याकने, मल्याळी भाषेत जोडाक्षरातला य किंवा र दाखवायला रोमन लिपीत j वापरतात. त्याचा उच्चार कितीहीदा ऐकला तरी कळत नाही कारण मल्याळममध्ये जो उच्चार करतात तो रोमनमध्ये बसवता येत नाही)

या अशा निरूपयोगी धाग्यावर वेळ जातो खरा. धागे काढणार्‍यांना माहिती असतं कि धागा कशा पद्धतीने अर्धवट विणला कि लोक मधले मधले धागे जोडायला उड्या घेऊ शकतात. ज्या धाग्यावर जास्त अचूक माहिती असते तिच्यावर लोकांना काही काम उरत नाही. शिवाय आपलेच काही प्रोफाईल कामाला लावून पुश पण देता येतो. लोक अशाच धाग्यांना प्रतिसाद देत असतात. जिथे जास्त माहिती दिलेली असते तिथे मग धागाकर्ता नक्की कोण ? त्याचं धाग्याचं प्रयोजन काय, प्रतिसाद देणारे कोण असे प्रश्न विचारतात. म्हणजे क्वालिटीला महत्व असते हे खोटं आहे.

धागाकर्त्याला हिंदी भाषा किती जुनी आहे याची माहिती आहे कि नाही हे शपथेवर सांगावं.

गृहीत धरतात या कारणावरून नवीन लिपी कशाला ते कळलं नाही. ते करून कुणाचं गृहीत धरणं थांबणार नाही, उलट नवीन पिढी जितकी मराठी वापरत आहे, तितकीही वापरणं सोडून देईल.

एखादाशब्द वापरणं व संपूर्ण लिपी वापरणं, यात जमीन - अस्मानाचा फरक आहे
>>>>>

हो फरक आहेच.
आणि म्हणूनच मराठी भाषेच्या उद्धारासाठी आणि जगात टिकून राहायला रोमन लिपीमध्ये मराठी यायला हवी. अन्यथा येत्या काळात संपून जाईल. काही मोजक्या लोकांत बोलण्यापुरती उरेल.

बोंबलात हिथे लोकं मराठी तोंडातून बोलायला तयार न्हाईत आणि तुम्हाला दुसरी लिपी पाहिजे. कुठल्या जगात राहत आहात आपण?

रोमन लिपीत मराठी आपोआप उत्क्रांत होत आहे, होत जाईल. रोमन लिपी अधिकृतरित्या जाहीर केली तर रिकामटेकडे लोक विनाकारण विरोधाला विरोध करतील, सरकारे उलथवतील आणि ती उत्क्रांती उगाच लांबणीवर जाईल असे मला वाटते.

मधल्या काळात नविन लिपी आणली तर त्या उत्क्रांतीला नको तेवढा वेग मिळेल आणि भाषा नामशेष होण्याची शक्यता वाढेल. (अधिक माहितीसाठी "उत्क्रांती - एक दुधारी तलवार" हा सारा डायमंड यांचा चित्रपट नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ या संकेत स्थळावर पहाता येईल.)

उत्क्रांतीत व्हायचं तें होईलच - मराठीचेच नाहीं तर हिंदी, बंगाली इ. सर्वांचेच. इथे, मराठीला गृहीत धरले जाते,म्हणून लिपी बदलावी असं सुचवलंय, त्यावर माझे कॉमेंट आहेत.

:कपाळ बडवणारी बाहुली:

लोकहो, मोडी नावाची एक लिपी मराठीसाठी ऑलरेडी आहे. नवी बनवायची गरज नाही.
ज्याला हवं त्याने शिकावी. ज्याला नको त्याने देवनागरीत सुरु ठेवावे.

ज्याला हवं त्याने शिकावी. ज्याला नको त्याने देवनागरीत सुरु ठेवावे.
>>>>>>>>>

प्रमाण भाषा म्हणून मान्यता हवी असेल तर ज्याला जे हवे ते असे आपल्या मर्जीचे नाही चालणार. लाँग टर्मचा विचार करा. आपल्या कितीही भावना गुंतल्या असल्या तरी काळाची पावले ओळखावी लागणार. अन्यथा देवनागरी सुद्धा मोडी होऊन मराठीच बासनात गुंडाळली जाईल.

Rofl

काल झोपण्यापूर्वी बराच वेळ विचार केला.
मायबोली हे सध्याचे धडाडीचे मराठी संकेतस्थळ आहे. जे या उपक्रमात पुढाकार घेऊ शकते. इथे जर रोमन लिपीतच मराठी लिहा असा सक्तीचा नियम बनवला तर इथले सारे नवीन साहित्य रोमन लिपीत तयार होईलच, पण वेगाने या उपक्रमाचा प्रसार सुद्धा होईल.

प्रमाण भाषा म्हणून मान्यता हवी असेल >> कुणाची मान्यता?
ते अभिजात दर्जा वगैरे मिळालं होतं त्याचं काय झालं?

आपल्या कितीही भावना गुंतल्या असल्या >> म्हणजे काय?
'माझं मराठी भाषेवर प्रेम आहे' म्हणजे काय ते लिहून काढ- हा स्वाध्याय अजूनही पडून आहे.

कुठे आहे ती सध्या?
Submitted by ऋन्मेऽऽष on 20 December, 2025 - 12:20
<<
x_0.jpg
फालतू टीआरपी साठी इथे लेख पडण्यापेक्षा जरा शोधाशोध करावी.

https://www.aksharamukha.com/converter

xx.jpg
लोकांनी मोडीच्या जतन अन संवर्धनासाठी भरपूर प्रयत्न्ही केलेले आहेत. युनिकोड फाँट्स उपलब्ध आहेत. कन्व्हर्टर्स आहेत. पण आम्हाला मराठी रोमन मधे नेउन हवी आहे.
गुजराती लिपी वापरत जा त्यापेक्षा, सगळ्या भाजपिल्ल्यांसाठी उपयोगी होईल.

@ वेमा,
प्रतिसाद तपासताना जर युनिकोड मोडी दिसते तर प्रतिसाद प्रसिद्ध करताना एरर का दाखवते??

<<< कुणाची मान्यता?
>>>
जगाची मान्यता.
मराठी भाषिकांच्या येत्या पिढीची मान्यता.
स्वीकारली जाईल तरच टिकेल.

<<<< ते अभिजात दर्जा वगैरे मिळालं होतं त्याचं काय झालं?
>>>>>
त्यावर धागा आहे आपल्याकडे.
तिथे अपडेट मिळतील.
आणि त्याची चर्चा तिथेच उत्तम.

<<< 'माझं मराठी भाषेवर प्रेम आहे' म्हणजे काय ते लिहून काढ- हा स्वाध्याय अजूनही पडून आहे.
>>>>
मराठी भाषेसाठी काय करू शकतो हा धागा काढलेला तेव्हा.
प्रेम म्हणजे काय असते हा फार व्यापक विषय आहे. तसेच प्रत्येकाची प्रेमाची व्याख्या वेगळी असते.

लोकांनी मोडीच्या जतन अन संवर्धनासाठी भरपूर प्रयत्न्ही केलेले आहेत.
>>>>

प्रयत्न केले. कौतुक आहे.
पण अयशस्वी झाले हे स्वीकारून पुढे जाऊया ना..
मोडी लिपी मुख्य लिपी म्हणून स्वीकारली जाणे अवघड नाही तर सध्या अशक्य आहे हे मान्य करायला काय हरकत आहे.

फालतू टीआरपी साठी इथे लेख पडण्यापेक्षा >> हा धागा ऋन्मेषजींचा नाही हे १००% .

माझं मत विचारलंच आहे तर, किंवा नसेल विचारलं तरी फक्त रोमन लिपी कंपल्सरी करण्यापेक्षा तेलगू, तमिळ, चायनीज अशा विविध लिपी कंपल्सरी कराव्यात. यामुळं मराठी मुलं जगाच्या कानाकोपर्‍यात जाऊन यशस्वी होऊ शकतील. तेलगू आणि तमिळ चित्रपटसृष्टीत मराठी नायक/ नायिका म्हणून करीयर करतील. अभिनयात मराठी लोक साऊथला भारी आहेत.
रजनीकांत, सयाजी शिंदे, शृती मराठे, नेहा पेंडसे, सोनाली कुलकर्णी, निक्की तांबोळी हे साऊथ मधे वाँटेड आहेत. चीन मधे इंग्रजी शिकवण्यासाठी भारतियांना पसंत करतात. जर आपण मराठी चायनीज मधून लिहीले तर मायबोलीचे वाचक चीन मधे सुद्धा तयार होतील. त्यामुळं मायबोली फेसबुकला मागे टाकेल. मग ते चायनीज मराठीचं भाषांतर करतील आणि मराठी बोलू लागतील. असेच सगळीकडे झाल्याने इंग्रजीला पर्यायी भाषा म्हणून मराठीचा विकास होईल.

नवीन Submitted by एक लेखक on 21 December, 2025 - 01:47
<<
अभ्यास वाढवा.
डुआयड्यांचा सम्राट आहे आमचा रुन्म्या.

पण अयशस्वी झाले हे स्वीकारून पुढे जाऊया ना..
<<
पुढे कुठे जायचंय? अन कशाला? त्यांच्या प्रयत्नांत मदत द्यायची सोडून हा स्वतःचा दीड तांदूळ वेगळा का शिजवायचा आहे नव्या लिपीचा?
बेसिकली गरज काय आहे असल्या भाकड मुद्द्यांची?

मोडी देवनागरीपेक्षा जुनी लिपी आहे मराठी भाषेची. अनेक जुने दस्तावेज मोडी मधे आहेत ऑलरेडी. रनिंग स्क्रिप्ट आहे कर्सिव्ह रोमन सारखी. पण फुस्कुलि "नवी लिपी हवी का"

गरजेच्या गोष्टीबद्दल तोंड उघडत नाही. उद्या उठून दारू महाग म्हणून पेट्रोल प्यायची वेळ येईल १००% शुद्ध एथेनोल युक्त याबद्द्ल बोला
गडकरींनी बेडरूम मधून ३ सेकंदात हॉल मधे जाता येईल असा हायवे बांधायला घेतला आहे, त्याबद्दल बोला
चाल्ले नवी लिपी तयार करायला.

आहे ती भाषा नीट लिहिता बोलता येत नाही इथे ९०% लोकांना..

त्यांच्या प्रयत्नांत मदत द्यायची सोडून हा स्वतःचा दीड तांदूळ वेगळा का शिजवायचा आहे नव्या लिपीचा?
>>>>>

जो मार्ग पटत नाही तिथे मदत का देऊ?

गांधीजींचा मार्ग ज्यांना पटला नाही त्यांनी क्रांतीचा मार्ग स्वीकारला. लक्ष्य सर्वांचे एकच होते, भारताचे स्वातंत्र्य.

लक्ष्य सर्वांचे एकच होते, भारताचे स्वातंत्र्य.
<<
नाई. भाजपिल्ल्यांचे लक्ष्य वेगळे होते अन आहे.

*नाई. भाजपिल्ल्यांचे लक्ष्य वेगळे होते अन आहे.* -
इथे मोडी लिपी बद्दल चाललंय की ' मोदी ' लिपी बद्दल ? Wink

आपल्या मुलांचं बालपण खराब केलंतच, आता निदान नातवंडं तरी वाचतील तुमच्या ऱ्हस्व - दीर्घच्या तडाख्यातून, मराठीची लिपी बदलली तर !!20191219_224951_1.jpg

साधा माणूस तुम्ही कट्टर भाजपवाले आहात का? चुकून मराठीसाठी स्वतंत्र लिपी बनवली आणि हिंदी भाषिकांची पंचाईत झाली तर काय करायचं? अशी तुम्हाला भीती वाटली का? :))

एक लेखक

तमिळ चित्रपटसृष्टीत मराठी नायक/ नायिका म्हणून करीयर करतील. अभिनयात मराठी लोक साऊथला भारी आहेत.
रजनीकांत, सयाजी शिंदे, शृती मराठे, नेहा पेंडसे, सोनाली कुलकर्णी, निक्की तांबोळी हे साऊथ मधे वाँटेड आहेत.

रजनीकांत आणि स्वतःचा स्टारडम ऐंशीच्या दशकात उभं केलं आहे सयाजी शिंदे हा अपवाद आहे सयाजी शिंदे तेलगू चित्रपट सृष्टीत देखील प्रसिद्ध आहे. बाकीच्या नट्यांची नावे लिहिले आहेत त्या केवळ गोऱ्या कातडीच्या म्हणून आय कॅंडी एवढ्यासाठीच घेतल्या जातात. तमिळ दिग्दर्शक सावळ्या कांतीच्या मूळ तमिळ नट्यांना फार कमी संधी देतात म्हणून नुकतेच एका पुरोगामी तमिळ दिग्दर्शकावर टीका झाली होती.

मुळात आपण मराठी माणसांनी आपली मराठी चित्रपटसृष्टी समृद्ध करायची की तामिळ तेलुगु चित्रपटसृष्टीत जाऊन काम करत बसायची? जास्त कौतुकास्पद काय?

अलीबाबा मोडी ही धावती देवनागरीच आहे. शिवाय मोडीचे जे नियम आहेत ते ठाम असे नाहीत. मोडी लिपीत एकही शिलालेख का नाही याचा जरा विचार करा म्हणजे कळेल.

नवी लिपी सिलेक्ट झाली की सांगा. शिलालेखांची ऑर्डर वेळेत गेली पाहिजे, त्याच्या डिलिवरीला वेळ लागतो.
परत सगळे जुने शिलालेख कनवर्ट करावे लागतील.

मोडी लिपी वाचणं अवघड जातं. कारण एकतर ती शब्द, वाक्य न तोडता सलग लिहिली जाते. शिवाय अक्षरांची वळणं एकमेकांपासून खूप स्पष्टपणे वेगळी नाहीत. त्यामुळे लिहिणाऱ्याने घाईत लिहिले तर एखादे अक्षर वेगळं वाटू शकतं.(ध चा मा होणे)

मोडी लिपीतले तपशील, त्यांची माहिती देणं गरजेचं वाटलं म्हणून लिहिलं.
बाकी चर्वित चर्वण चालू देत.

मोडी लिपी म्हणजे माझ्यासारखे कोंबडीचे पाय अक्षर असणाऱ्या लोकांची तर बल्ले बल्ले!

https://www.maayboli.com/node/73199

माझी आई म्हणायची की माझे मराठी अक्षर खराब आहे आणि इंग्लिश अक्षर चांगले आहे. मराठी रोमन लिपीत आली तर माझ्यासारखी खूप लोक खुश होतील.

माझे इंग्लिश अक्षर चांगले आहे कारण ते मला पटपट इंग्लिश सुचत नसल्याने मी स्लो लिहितो Proud
मराठी गरजेपेक्षा जास्त पटपट सुचते.. कुठलीही लिपी आणा मी अक्षराची वाटच लावणार Lol

पण माझा विचार करू नका मराठी जेन झी जेन अल्फा जनतेचा विचार करा. त्यांना दोन-दोन लिप्या शिकायला लावू नका.

मोडी लिपीत एकही शिलालेख का नाही याचा जरा विचार करा म्हणजे कळेल.
<<

मराठी म्हणी : उचलली जीभ, लावली टाळ्याला.

मायबोली हे सध्याचे धडाडीचे मराठी संकेतस्थळ आहे. जे या उपक्रमात पुढाकार घेऊ शकते. इथे जर रोमन लिपीतच मराठी लिहा असा सक्तीचा नियम बनवला तर इथले सारे नवीन साहित्य रोमन लिपीत तयार होईलच, पण वेगाने या उपक्रमाचा प्रसार सुद्धा होईल. >> मायबोलीवर आधी रोमनमधेच लिहिले जायचे - मराठी, इंग्लिश, संस्कृत, जे काही असेल ते रोमनमधेच असे. जुन्या मायबोलीवर शोधले तर सापडेल . ते वाचून मग पुढे हा वाद घालायचा का ते पुढे ठरव.

ळ साठी चिन्ह आहे जे देवनागरीत नाही, पर्यायाने तामिळ न बोलता येणारे मराठी लोक त्याचा उच्चार करु शकत नाहीत

>> ऑ?? देवनागरी ही जसा उच्चार तसे लिहिता येते म्हणून मला अभिमान होता. असा काय उच्चार आहे जो देवनागरीत लिहिता येणार नाही सांगा बघू? जेन्युईनली विचारतेय. मागे एक सिंधी मैत्रीण सिंधीत दोन अंकासाठी 'ब' असा उच्चार आहे. पण "आम्ही हा शब्द जसा म्हणतो तसा म्हणणं तुम्हाला (मराठी लोकांना) जन्मात जमणार नाही" असं म्हणाली होती. त्याची आठवण झाली यानिमित्ताने.

Pages