दंगलींचे घाणेरडे राजकारण

Submitted by राज अज्ञानी on 13 December, 2025 - 08:42

या आधीचा धागा खालील लिंकवर पाहू शकता.
https://www.maayboli.com/node/87501

१९८० च्या दशकाच्या उत्तरार्धात आणि १९९० च्या सुरुवातीला भारतीय राजकारणात एक महत्त्वपूर्ण बदल घडला: उच्चवर्णियांच्या राजकारणातील वर्चस्वाला आव्हान देण्यासाठी जातीय (मंडल) तर बहुजनांच्या राजकीय आकांक्षांना आव्हान देण्यासाठी धार्मिक (कमंडल) ध्रुवीकरणाची रणनीती अवलंबली गेली.

कमंडल रणनीती ही एकतर्फी नव्हती. यासाठी दोन दलांची गरज होती जी भाजप आणि काँग्रेसने पूर्ण केली. भाजपने अयोध्या प्रकरण तापवायला सुरूवात केली. त्याच बरोबर काशी, मथुरा इथेही मंदीर विरूद्ध मशिद वाद उकरायला सुरूवात केली. या वादाला ठिणगी मिळण्यासाठी राजीव गांधी यांची कृती महत्वाची ठरली. राजीव गांधी यांनी याच काळात शाहबानो प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा निकाल पलटवण्यासाठी घटनेत संशोधन केले. ही गोष्ट एका बाजूला मुस्लीमांना खूष करणारी ठरली, पण त्याच वेळी भाजपला हिंदूंमधे अन्यायाची भावना पेरणारी ठरली. याच घटनेमुळे लांगुलचालन हा शब्द खरा वाटू लागला.

Mohd. Ahmed Khan v. Shah Bano Begum, १९८५
https://www.alec.co.in/judgement-page/shah-bano-case
https://en.wikipedia.org/wiki/Mohd._Ahmed_Khan_v._Shah_Bano_Begum
https://frontline.thehindu.com/the-nation/india-at-75-epochal-moments-19...
https://indianexpress.com/article/what-is/what-is-shah-bano-case-4809632/

राजीव गांधी यांनी शाहबानो प्रकरणामधे झालेले डॅमेज कंट्रोल करण्यासाठी अयोध्या इथे रामलल्लाची पूजा केली. प्रदक्षिणा केली आणि ताळे उघडले. ताळे उघडल्याबरोबर १९४८ पासून बाटलीत बंद असलेला राक्षस बाहेर आला. याचाही फायदा अर्थातच भाजपने उचलला. इथून पुढे मंडलचा मुद्दा मागे टाकण्यासाठी भाजपने हिंदू आणि काँग्रेसने अल्पसंख्यांक व सेक्युलर हा जप जपायला सुरूवात केली.

बहुजन नेत्यांनी याला 'हिंदू-मुस्लिम बायनरी' चे राजकारण म्हणून टीका केली, ज्यात कॉंग्रेस आणि भाजप एकमेकांना पूरक ठरले. हे आरोप यांनी एकट्याने केले का ?
नाही पत्रकार आणि विश्लेषकांनीही (जसे प्रणय रॉय, शेखर कपूर) याला 'डिव्हाईड अँड रूल' ची आधुनिक आवृत्ती म्हटले.
मी हे विश्लेषण संदर्भांसह करतोय . आपण ऐतिहासिक संदर्भ तपासून घ्यावेत.

१९८० च्या शेवटी कॉंग्रेसमधील बहुजन नेत्यांचे विभाजन आणि प्रादेशिक नेत्यांचा उदय

१९८० च्या दशकात कॉंग्रेसवर भ्रष्टाचार (बोफोर्स घोटाळा), आर्थिक संकट आणि 'मुस्लिम तुष्टीकरण' (शाह बानो कायदा, १९८६) चे आरोप झाले. यामुळे बहुजन नेते (OBC, दलित) पक्षाबाहेर पडू लागले.

हरियाणात जाट काँग्रेसमधून बाहेर पडले. शीख अकाली दलासोबत राहिले. अकाली दलात फूट पाडण्याकरता इंदिरा गांधींनी भिंद्रानवालेंना उभे केले होते. मात्र ओसामा बिन लादेन अमेरिकेवर उलटला त्याच प्रमाणे भिंद्रानवाले नियंत्रणात राहिले नाहीत. त्यांनी दहशतवादाचा सहारा घेतल्यानंतर मीडीयाने सर्वच शीखांना दहशतवादी असे लेबल लावले. इंदिरा गांधींनी या काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मदत घेतली. यामुळे संघाने शीखांना दहशतवादी म्हटले. बाळासाहेब ठाकरे यांनीही धमक्या दिल्या होत्या. काही function at() { [native code] }इरेकी कारवायांमुळे संपूर्ण शीख समाजाला बदनाम केले गेले. आणि बदनामीचा कळस गाठल्यावर सुवर्ण मंदीरावर कारवाई केली गेली. याचा परिणाम म्हणून सैन्यातून शीखांनी बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या बद्दल मीडीयाने भगौडा अशी टर्म वापरल्याने सीख समाज संतप्त झाला होता. यातूनच इंदिरा गांधींची हत्या झाली. या हत्येनंतर दिल्ली व उत्तर भारतात शीखांची अमानुष कत्तल झाली. याला दंगल असे म्हटले तरी ही थंड डोक्याने केलेली कत्तल होती. या दंगलीनंतर भाजपने शीखांची बाजू घेतली. मात्र काँग्रेसला अमानुष बहुमत मिळाले. जे त्यांना सांभाळता आले नाही. ते दंगलीमुळे मिळाले होते आणि पुन्हा निवडून येण्यासाठी शाहबानो प्रकरण खेळले गेले.

मात्र भ्रष्टाचार, बहुजन नेत्यांना डावलणे यामुळे काँग्रेस कमकुवत झाली होती. बहुजन नेत्यांना रोखण्यासाठी काँग्रेसने भाजपशी हातमिळवणी करून हिंदू मुसलमान दंगलींचे राजकारण खेळले. याचे संदर्भ वर दिले आहेत. हे पुरेसे नसतील तर आणखीही देता येतील.

काँग्रेस कशी कमकुवत झाली ?

हरियाणा
देवीलाल (जनता दल), भजनलाल (कॉंग्रेसमधून बाहेर), बन्सीलाल – OBC शेतकरी मतदारांना आकर्षित केले.
उत्तर प्रदेश
मुलायम सिंग यादव (समाजवादी पक्ष, १९९२) आणि कांशीराम (BSP, १९८४) – मंडल आयोगाच्या पार्श्वभूमीवर OBC-दलित आघाडी.
बिहार
लालू प्रसाद यादव (जनता दल, नंतर RJD) – १९९० मध्ये मंडल लाटेत CM झाले.
दक्षिण भारत
दक्षिण भारताचे राजकारण हे नेहमीच उत्तरेच्या उलट राहिले आहे. इथे द्रवीड राजकारण राज्यात प्रभावी असते. तर केंद्रात जो पक्ष प्रभावी असेल त्याच्याशी युती केली जाते.
आंध्रात एन टी रामाराव यांचे जावई चंद्राबाबू नायडू यांनी पकड मिळवली. तमिळनाडू मधे करूणानिधी आनि जयललिता यांच्या पैकी जयललिता या काँग्रेस सोबत होत्या मात्र करूणानिधी यांनी सत्ता मिळवल्याने त्या भाजपसोबत गेल्या.

उत्तरेतली बिहार आणि उत्तर प्रदेश ही राज्ये निसटल्याने काँग्रेस पुढे जिवंत राहण्याचा पेच निर्माण झाला.

हे बहुजन नेते कॉंग्रेसच्या 'सॉफ्ट हिंदुत्व' (जसे अयोध्या लॉक उघडणे, १९८६) मुळे उदयास आले. कांशीराम यांनी १९९२ मध्ये मुलायमसोबत आघाडी केली, ज्याने 'मिले मुलायम-कांशीराम, हवा में उड़ जाए जय श्री राम' हे घोषवाक्य दिले.
संदर्भ . 'द शूद्रा रेव्होल्यूशन' लेख आणि RSS ची भूमिका

'द शूद्रा रेव्होल्यूशन' हा लेख RSS च्या मुखपत्र 'ऑर्गनायझर' मध्ये १९९१-९३ मध्ये प्रकाशित झाला. कांचा इलैयाह शेफर्ड यांच्या 'द शूद्रा रिव्होल्यूशन' (२०२४ पुस्तक) आणि 'द शूद्रास: व्हिजन फॉर अ न्यू पाथ' (२०२१) मध्ये याचा उल्लेख आहे. यात म्हटले आहे की १९९० च्या दशकात शूद्र (OBC) नेत्यांचा उदय (मंडल) हा ब्राह्मणवादी व्यवस्थेला आव्हान होता. १९९१ च्या ऑर्गेनायझरच्या अंकात याला आव्हान म्हणून पाहिले गेले. त्यात विविध कंगोरे तपासले गेले. यातच मंडल (बहुजन नेते) ला शह म्हणून कमंडल ( काँग्रेस - भाजप) यांच्या राजकारणाला बळ दिले पाहिजे असा सूर होता.
या अंकात काही लेखकांनी शूद्र रेव्होल्यूशनला उघड विरोध न करता त्याला हिंदू सक्षमीकरणाचे रूप दिले पाहिजे असाही सूर होता. संघाने सपा - बसपाच्या सत्तेनंतर या दृष्टीने ताबड्तोब आ़खणी केली आणि एकीकडे कमंडल आणि दुसरीकडे मंडल अशा दोन्हीही डगरींवर हात ठेवला.

संदर्भ: 'इंडियन एक्सप्रेस' (१९९१) मध्ये RSS ने 'शूद्र रेव्होल्यूशन' ला 'हिंदू राष्ट्रासाठी संधी' म्हटले.

मंडल आयोग आणि बोफोर्स: VP सिंह ची भूमिका
१९८० च्या दशकात बोफोर्स घोटाळ्याने (१९८७) राजीव गांधींच्या कॉंग्रेसला धक्का बसला. लोकांनी VP सिंह (जनता दल) ला पसंती दिली, ज्याने १९८९ मध्ये सरकार स्थापन केले (भाजप आणि लेफ्टच्या बाहेरील पाठिंब्याने). ७ ऑगस्ट १९९० ला VP सिंह यांनी मंडल आयोग लागू केला (OBC साठी २७% आरक्षण). हे SC/ST च्या २२.५% वर अतिरिक्त होते, ज्यामुळे ७५% लोकांना आरक्षण मिळणार होते.

OBC च्या सक्षमीकरणासाठी (लालू, मुलायम यांना फायदा).
पण उच्चवर्णिय जातींमध्ये (ब्राह्मण, क्षत्रिय) आंदोलन झाले. एका युवकाने जाळून घेतले. (स्वसफर प्रयत्न, १९९०).
कॉंग्रेसने विरोध केला नाही, पण राजीव गांधींनी 'डिव्हाईड अँड रूल' म्हटले.

संदर्भ: 'टाइम्स ऑफ इंडिया' (१९९०) मध्ये VP सिंह च्या निर्णयाला 'जातीय क्रांती' म्हटले, पण कॉंग्रेस-भाजप दोघांनीही 'हिंदू एकत्रीकरण' साठी वापरले.

भाजप-कॉंग्रेसची भूमिका - मंडलला उत्तर म्हणून राम जन्मभूमी वाद
मंडलने OBC ची सत्ता वाढवली, ज्यामुळे हिंदू एकता धोक्यात आली.
भाजपने (LK अडवाणींच्या नेतृत्वात) १९८९ पासून राम जन्मभूमी वाद उकरला.
कॉंग्रेस सरकारने (वीर बहादूर सिंह) अयोध्या लॉक उघडले, ज्याने VHP ला चालना मिळाली. भाजपने १९९० मध्ये रथयात्रा काढली (सोमनाथ ते अयोध्या), ज्याने दंगली भडकावल्या (३० ऑक्टोबर १९९० ला मुलायम यांनी कारसेवकांवर गोळीबार).

कॉंग्रेसची भूमिका: राजीव गांधींनी 'सॉफ्ट हिंदुत्व' खेळले (शिलान्यास, १९८९), पण मंडल विरोध केला नाही. VP सिंह सरकारला भाजपने पाठिंबा काढला (मंडलमुळे

घटना वर्ष मुख्य खेळाडू परिणाम
मंडल आयोग अंमलबजावणी -१९९०VP सिंह (जनता दल) OBC एकत्रीकरण;
उच्चजाती आंदोलन रथयात्रा - १९९०LK अडवाणी (भाजप) हिंदू ध्रुवीकरण; दंगली (उत्तर प्रदेश)अयोध्या
लॉक उघडणे - १९८६कॉंग्रेस (UP CM वीर बहादूर सिंह) VHP ला चालना; 'सॉफ्ट हिंदुत्व'

बाबरी विध्वंस आणि दंगली: गुजरात, मुंबई, भिवंडी
६ डिसेंबर १९९२ ला बाबरी मशीद पाडण्यात भाजप-VHP-RSS चा हात होता
संदर्भ - लिबरहान आयोग, २००९ . याने देशभर दंगली भडकल्या . २,०००+ मृत्यू, मुख्यतः मुस्लिम.

मुंबई दंगे (१९९२-९३): ९००+ मृत्यू (श्रीकृष्ण आयोग). पहिला टप्पा मुस्लिमांचा (बाबरीला प्रत्युत्तर) , दुसरा टप्पा शिवसेना-हिंदू (जनवरी १९९३). मालमत्तेचे नुकसान ₹९,००० कोटी.
संदर्भ: 'इंडियन एक्सप्रेस' (१९९३) मध्ये शिवसेना-कॉंग्रेस अपयश.
भिवंडी दंगे: १९८४ (शिवसेना), १९९२-९३ मध्ये पुनरावृत्ती ; २७८+ मृत्यू (मुख्यतः मुस्लिम).
गुजरात दंगे: १९९२ मध्ये प्रारंभ, २००२ मध्ये मोठे दंगे (१,०००+ मृत्यू). भाजप सरकारवर आरोप.

दंगलींनंतर बॉंबस्फोट (१९९३ मुंबई, २५०+ मृत्यू) – दाऊद इब्राहिमचा हात, ज्याने हिंदू-मुस्लिम द्वंद्व वाढवले.
संदर्भ: 'फ्रंटलाइन' (१९९३) मध्ये 'दंगली राजकारणासाठी वापरल्या असे म्हटले गेले.

मुस्लिम मतांचा प्रभाव: भाजप मजबूत होत असल्याने कॉंग्रेसकडे कल
बाबरी विध्वंसाने मुस्लिमांना धक्का बसला. १९९० मध्ये मुलायम यांनी कारसेवकांना रोखले, ज्याने मुस्लिम मत मिळवले (१९९३ मध्ये SP-BSP आघाडी). पण १९९६ मध्ये भाजपची मजबुती पाहून मुस्लिमांनी कॉंग्रेसकडे वळले (सेक्युलर इमेज). १९९१ निवडणुकीत कॉंग्रेसला फायदा (मुस्लिम वोट बँक).

निवडणूक/ मुस्लिम मतांचा कल / परिणाम

१९९१ (उत्तर प्रदेश)मुलायम/SP कडे SP-BSP आघाडी,
१९९६ (राष्ट्रीय)कॉंग्रेसकडे भाजपला १६१ जागा, पण अल्पमत
१९९८-९९ कॉंग्रेस/SP/RJD मुस्लीम मतदारांचा कल /NDA सरकार, पण मुस्लिम ध्रुवीकरण.

पत्रकार आणि इतरांचे आरोप ( वर उल्लेख आला आहे)

लोकप्रिय पत्रकार:
प्रणय रॉय (NDTV): १९९० च्या दशकात 'मंडल vs कमंडल' ला 'कॉंग्रेस-भाजपाची संयुक्त खेळी' म्हटले.
शेखर कपूर: 'द टाइम्स ऑफ इंडिया' (१९९३) मध्ये 'दंगली राजकीय फायद्यासाठी'.
रामचंद्र गुहा: 'इंडिया आफ्टर गांधी' (२००७) मध्ये 'कॉंग्रेसने सॉफ्ट हिंदुत्व खेळले, भाजपने हार्ड'.

संदर्भ - प्रणय रॉय (NDTV): १९९० च्या दशकात 'मंडल vs कमंडल' ला 'कॉंग्रेस-भाजपाची संयुक्त खेळी' म्हटले.
The Ram Janambhoomi Movement
Kumud Ranjan https://ebooks.inflibnet.ac.in/socp12/chapter/the-ram-janambhoomi-movement/

शेखर कपूर: 'द टाइम्स ऑफ इंडिया' (१९९३) मध्ये 'दंगली राजकीय फायद्यासाठी'

रामचंद्र गुहा: 'इंडिया आफ्टर गांधी' (२००७) मध्ये 'कॉंग्रेसने सॉफ्ट हिंदुत्व खेळले, भाजपने हार्ड

पूरक राजकारणाचे वारसे

कॉंग्रेसने 'सेक्युलर' इमेज ठेवून मुस्लिम वोट बँक जपली, तर भाजपने हिंदुत्वाने हिंदू एकत्र केले – हे द्वंद्व मंडल-कमंडल ने सुरू झाले. बहुजन नेत्यांनी याला 'बहुजनांच्या फसवणुकीचे राजकारण' म्हटले. आजही (२०२४-२५) UCC, CAA सारख्या मुद्द्यांमध्ये हे दिसते.
संदर्भ - 'कास्ट अँड कम्युनलिझम' (पॉल ब्रास, १९९०); 'मंडल vs मंदिर' (इंडियन एक्सप्रेस, २०१९).

आपण कुठल्याही आजी माजी सत्ताधारी पक्षाचा दुस्वास करणार नाही आहोत.

या पक्षांच्या उघड भूमिका कुठल्या आहेत ? त्या खर्‍या आहेत कि खोट्या हे कोण सांगणार ?
पत्रकार जे आधीच या किंवा त्या गोटात विभागले गेले आहेत.

बुद्धीजीवी / साहित्यिक / विचारवंत
हे सुद्धा या ना त्या गटाचे लाभार्थी असतात. तटस्थ असे दुर्मिळ असतात. २०१४ नंतर अचानक सत्तांतर झाले आणि सत्तांतरानंतर भाजपच्या बाजूने असणार्‍या गोदी मीडीया आणि निष्ठावान विचारवंताचा उदय झाला. हे लोक इतके कट्टर होते कि त्यांच्या भूमिका या एकतर्फी आहेत हे सांगायची वेगळी गरज पडली नाही. नवीन नवीन सत्ता आणि आधीच्यांनी जे जे केले ते ते सर्व करण्याचा अट्टाहास हे भाजपच्या नव्या सत्ताधार्‍यांचे उद्दीष्ट असल्याचे दिसते. पण यातही त्यांच्याकडे काही धूर्त पावले आहेत. जी सांगण्यासाठी मोठा रीसर्च करून लिहावे लागेल. नाही तर समजणे कठीण आहे. आपण आता क्रमा क्रमाने एक एक सत्ताधारी घुसळायला घेत आहोत. सोशल मीडीयात जसे यांचे पेड समर्थक धावून येतात तसे इथेही येतील. काही लोडेड प्रश्न विचारून मुख्य विषयावरून भलतीकडे ध्यान भटकवण्याचे उद्योग करतील. काही पर्सनल अ‍ॅटॅक करतील. पण ते पेड लोक आहेत. त्यांचे कामच ते आहे असे समजून दुर्लक्ष करूयात असे आवाहन करत आहे.

जो लेख मांडत आहे त्यात त्रुटी असतील तर सामान्य वाचकांनी दाखवल्या तर त्या दुरूस्त करता येतील.

आजचा विषय आहे दंगलींचा. पूर्वी राजे रजवाड्यांच्या काळात हिंसेतून गादीचा मार्ग प्रशस्त होत होता. आधुनिक लोकशाही ही लोकांनी लोकांसाठी राबवायची गोष्ट आहे. मात्र देश स्वतंत्र झाला तरी जातीजातीत आणि धर्माधर्मात दंगली घडल्या आणि त्याचा परिणाम तख्त टिकवण्यात किंवा पलटवण्यात झाला आहे.

या दंगली ही लोकशाहीला लागलेली कीड आहे. त्या मागच्या शक्ती कधीच उघड झालेल्या नाहीत. उघड उघड माणसं मारून दंगलखोर फरार होतात हे पोलीस प्रशासनाचे अपयश आहे. पण कधीही त्यांच्यावर कारवाई झालेली नाही. का ?

अनेकदा दंगली घडूनही दंगली रोखायला अपयशी ठरलेल्या पोलीस अधिकार्‍यांना बढती मिळणे किंवा हवं ते पोस्टिंग मिळणे असे प्रकार झाले आहेत , होत आहेत.

मग अशा पोलीस अधिकार्‍यांवर वचक कसा राहणार ? जर पोलीस खाते राजकीय गुंडांचे ऐकून दंगली रोखण्यात अपयशी ठरले तर पोलीस मनमानी करतील तिच्यावर लोकप्रतिनिधी चाप कसे लावणार ?

आणि जर असे लोकप्रतिनिधी तुम्हाला वंदे मातरम म्हणत नाही मग तू देशद्रोही सांगत असतील तर यांना जोड्याने का हाणू नये ?
जर असे लोकप्रतिनिधी सांगत असतील कि आमच्या पक्षाचे तीन पिढ्यांच्या मागचे नेते थोर होते तर त्यांच्या थोरवी आडून माणसं मारण्याचा धंदा काढलेल्या या लोकांची खेटराने पूजा का घालू नये ?

त्या वेळी स्वातंत्र्य संग्रामात भाग घेतला. मग आजचे नेते तेव्हढे पवित्र आहेत का ? यांची पार्श्वभूमी बघा. निवडणूक घोषणापत्रात यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यांचे स्वरूप बघा. दोन घोषणापत्रात वाढलेल्या संपत्तीचे तपशील पहा. उघड कुणी बोलत नसले तरी सर्वसामान्य पणे माहिती असलेल्या यांच्या फ्रंट मॅनच्या नावावर असलेली संपत्ती बघा.

समजा कोकणातून एका मतदार संघात अ नावाचे स्वातंत्र्यसेनानी होते, ज्यांचा क्ष नावाचा पक्ष आहे. ते निवर्तले. मग आज त्या क्ष नावाच्या पक्षाचे जे अ नावाच्या स्वातंत्र्यसेनानीशी दुरूनही संबंधित नाहीत सर्व लोक तेव्हढेच पवित्र कसे काय ? ते ही त्यांच्या नावावर दंगली असताना. दारूचे धंदे असताना. मटका , जुगाराचे धंदे असताना. शिक्षण संस्थेच्या नावाने लुटमार करत असताना. सहकारात बक्कळ पैसा खाल्लेला असताना. विविध योजनांचा पैसा वाटून खाल्लेला असताना.

त्या थोर अ चे नाव घेऊन यावर बोलायचे नाही ?
कि हिंदू मुसलमान करून या सर्वावर पडदा टाकायचा ? कि असेच करणे अपेक्षित आहे ?

(या धाग्यात संपादन करून दंगलीबाबतचे तपशील समाविष्ट केले आहेत. त्यामुळे थोडा विस्कळीत झाला आहे.) मात्र दंगलींचे आणखी संदर्भ हवे असतील तर पुढे कमेण्ट मधे देऊ शकेन.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users