'धुरंधर' - आरंभ तो प्रचंड है!

Submitted by संजय भावे on 11 December, 2025 - 12:49


सुमारे दीड वर्षांपूर्वी निर्मितीची आणि वर्षभरापूर्वी शीर्षकाची घोषणा झाल्यापासूनच चित्रपट रसिकांमध्ये बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित असा 'धुरंधर' हा चित्रपट शुक्रवार दिनांक ५ डिसेंबर २०२५ रोजी प्रकाशित झाला.

एकतर हेरकथा वाचणे आणि हेरगिरीवर आधारित चित्रपट पाहणे हा माझा आवडता छंद, त्यात आर. माधवन, संजय दत्त, रणवीर सिंग, अक्षय खन्ना, अर्जुन रामपाल अशी माझी आवडती कलाकार मंडळी आणि पदार्पणातच 'उरी : द सर्जिकल स्ट्राईक' सारखा चांगला चित्रपट देणारा 'आदित्य धर' हा दमदार लेखक / दिग्दर्शक पुन्हा त्याच दुहेरी भूमिकेत म्हंटल्यावर मला हा चित्रपट पाहण्याची उत्सुकता लागली नसती तरच नवल होते!

काही दिवसांपूर्वी ह्या चित्रपटाचा ट्रेलर बघितल्यावर तर ती उत्सुकता अगदी शिगेला पोचल्याने प्रदर्शित झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे शनिवारी संध्याकाळी लगेच तो पाहूनही आलो.

आपल्याकडे अ‍ॅक्शन, क्राईम थ्रिलर, कॉमेडी, हॉरर चित्रपटांच्या अनेक मालिका आल्या आणि त्या व्यावसायिकदृष्ट्या यशस्वीही झाल्या. परंतु हेरगिरीवर आधारित चांगल्या चित्रपटांची मालिका मात्र अद्याप निर्माण होऊ शकली नव्हती. नाही म्हणायला YRF स्पाय युनिव्हर्स म्हणून ओळखली जाणारी आठ चित्रपटांची एक सर्वात यशस्वी मालिका आहे आणि त्यातले बरेच चित्रपट मनोरंजक/करमणूकप्रधान असल्याने पॉपकॉर्न खात आवडीने पाहिलेही आहेत, पण 'त्यांच्या दर्जाविषयी काही न बोललेलेच बरे' म्हणावे अशा प्रकारचेच ते वाटले असल्याने मनात त्याविषयी एक प्रकारची खंतही होती आणि दर्जेदार हेरपटांची एखादी मालिका यावी अशी खूप इच्छाही होती.

'धुरंधर' हा दर्जेदार चित्रपट पाहिल्यावर ही खंत बऱ्यापैकी कमी झाली आहे आणि भविष्यात येऊ घातलेल्या ह्या मालिकेच्या आगामी भाग/भागांविषयी अतीव उत्सुकता निर्माण करण्यात हा चित्रपट यशस्वी ठरला आहे. सदर मालिकेच्या शुभारंभाचा हा पहिला भाग मलातरी 'आरंभ तो प्रचंड है!' असा वाटल्याने आत्तापर्यंत अपूर्ण राहिलेली वरील 'इच्छा' लवकरच पूर्ण होण्याची आशाही पल्लवित झाली आहे.

असो, चित्रपटाचे परीक्षण किंवा त्याचे समीक्षण करणे हा माझा प्रांत नसल्याने त्या भानगडीत न पडता हा चित्रपट पाहिल्यावर 'एक प्रेक्षक' म्हणून मला काय वाटले, त्याचे सादरीकरण, मला तो का आवडला हे सांगण्याचा आणि ह्या चित्रपटाचा परिचय करून देताना त्यातल्या काही महत्वाच्या व्यक्तिरेखा/पात्रांची ओळख करून देण्याचा 'रसग्रहणात्मक' प्रयत्न ह्या लेखाच्या माध्यमातून करत आहे. ज्यांना हा चित्रपट पाहायची इच्छा असेल त्यांचा तो पाहताना रसभंग होऊ नये म्हणून 'स्पॉईलर्स' टाळण्याची काळजी घेईनच, परंतु 'अविश्वसनीय सत्यघटनांवर आधारित असा हा काल्पनिक' चित्रपट असल्याने आणि त्या 'सत्यघटना' आपणा सर्व भारतीयांच्या परिचयाच्या व भारतीय समाजमनाला खोलवर जखमा देऊन गेलेल्या असल्याने त्यांचा उल्लेख, त्यावरचे भाष्य आणि ट्रेलरमध्ये आलेली दृष्ये, संवाद अशा गोष्टी 'स्पॉईलर्स' वाटणार नाहीत अशी अपेक्षा आहे, पण तरी कोणाला ते तसे वाटलेच किंवा लिहिण्याच्या ओघात अनवधानाने एखाद-दुसरा उल्लेख आला तर त्यासाठी (आगाऊ) क्षमस्व!

-----

सादरीकरण आणि पात्र परिचय :

'हरकत-उल-मुजाहिद्दीन' ह्या दहशतवादी संघटनेच्या पाच दहशतवाद्यांनी २४ डिसेंबर १९९९ रोजी काठमांडूहून दिल्लीला जाणाऱ्या इंडियन एअरलाईन्सच्या (IC 814) विमानाचे अपहरण करून अमृतसर-लाहोर-दुबई असा प्रवास करत २५ डिसेंबर १९९९ रोजी हे विमान अफगाणिस्तानमधील कंदहार विमानतळावर उतरवले होते.

ह्या सत्यघटनेची पार्श्वभूमी असलेल्या ओपनिंग सीनमध्ये टारमॅकवर उभे राहून ह्या विमानाकडे बघणाऱ्या 'अजय सन्याल' (ही अजित डोवाल सदृश्य) व्यक्तिरेखा साकारणाऱ्या आर.माधवनच्या क्लोज-अप शॉटने वेब सीरिजच्या धर्तीवर आठ अध्यायांच्या स्वरूपात सादर केलेल्या 'धुरंधर' चित्रपटाच्या मुख्य कथानकाची प्रस्तावना म्हणता येईल अशा पहिल्या अध्यायाची सुरुवात होते आणि पुढच्या पाच अध्यायातून आपल्याला नवनवीन पात्रांची ओळख होत जाते...

चॅप्टर - १ : 'द प्राईस ऑफ पीस'

३० डिसेंबर १९९९ रोजी भारताचे परराष्ट्रमंत्री (तत्कालीन परराष्ट्रमंत्री जसवंत सिंग सदृश्य) 'देवव्रत कपूर' नावाचे एक पात्र विमानाजवळ येऊन पोचल्यावर 'ओलीसांना सोडण्यासाठी दहशतवाद्यांनी केलेल्या मागण्या भारत सरकारने मान्य केल्याचा' त्यांनी आणलेला निरोप विमानातल्या पाच दहशतवाद्यांपर्यंत पोचवण्यासाठी ते दोघे विमानात प्रवेश करतात हा प्रसंग आणि त्यानंतर १३ डिसेंबर २००१ रोजी 'जैश-ए-मोहम्मद' ह्या दहशतवादी संघटनेच्या पाच दहशतवाद्यांनी भारताच्या संसदेवर केलेल्या हल्ल्याचा प्रसंग अशा दोन सत्यघटनांचा समावेश काही ओरिजनल फुटेजेससह ह्या पहिल्या अध्यायात आहेत.

ह्या दोन्ही घटनांदरम्यान आणि त्यानंतरही सत्ताधाऱ्यांच्या निर्णय क्षमतेविषयीची नाराजी, सामर्थ्य असूनही दहशतवाद्यांसमोर झुकण्याबद्दलचा राग/विषण्णता, त्याची पुढच्या काळात मोजावी लागलेली किंमत आणि अधिकारपदावर असूनही आपण काहीच करू शकत नसल्याबद्दलचे वैषम्य, हतबलता अशा भावना आय.बी. चीफ अजय सन्यालची भूमिका साकारणाऱ्या आर. माधवन ह्या गुणी कलाकाराने काहीप्रसंगी बोलून तर काही प्रसंगी केवळ चेहऱ्यावरील आणि डोळ्यांतील हाव-भावांतून खूप छानप्रकारे व्यक्त केल्या आहेत.

"सर मुहं तोडने के लिये मुठ्ठी बंद करना जरुरी हैं... We must infiltrate the very core of terrorism in Pakistan... ताकी वो भारत के खिलाफ अगर निंद मे भी सोचें ना, तो उनके ख्वाब में भी हम बैठे नजर आने चाहिये" - अजय सन्याल

ह्या अध्यायाबद्दल मुद्दाम अजून काही लिहीत नाही, फक्त पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाचे निर्दालन करण्यासाठी त्याने सरकारला लिखित स्वरूपात दिलेल्या सूचना, योजना, आराखडा, मागण्या ह्यापैकी केवळ 'धुरंधर' नामक एक योजना मान्य झाल्याचे कळते आणि इथूनच चित्रपटाची 'खरी' सुरुवात होते एवढेच सांगून पुढच्या अध्यायाकडे वळतो.

चॅप्टर - २ : 'स्ट्रेंजर इन द लँड ऑफ शॅडोज'

"२००४ साली ईशान्य अफगाणिस्तानच्या 'बार्ग-ए-मतल' प्रांतातून पिकअप ट्रक आणि हेलिकॉप्टरने प्रवास करत तोरखम ह्या पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवरील इमिग्रेशन चेक पोस्टवरच्या भ्रष्ट अधिकाऱ्याला पासपोर्टमधे ठेवलेल्या पैशांची लाच देऊन पाकिस्तानच्या हद्दीत प्रवेश करत तिथून बसने प्रवास करून कराचीला पोचलेला 'हमझा अली मझारी' कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन रेहमान बलोच उर्फ 'रेहमान डकैत' ह्याच्या टोळीत शिरकाव करण्याच्या उद्देशाने कराचीच्या 'लयारी टाऊन' मध्ये दाखल होतो."

रणवीर सिंगला त्याच्या अभिनय कारकिर्दीतील सर्वात सशक्त अशी 'हमझा अली मझारी' ही व्यक्तिरेखा साकारण्याची संधी ह्या चित्रपट मालिकेतून मिळाली आहे असे म्हंटले तर ती अतिशयोक्ती ठरणार नाही अशाप्रकारे त्याने ती वठवली आहे! ट्रेलर पाहताना त्याचा सुरुवातीचा 'रॉ अँड रस्टीक' लूक चांगला वाटला असला तरी डोळ्यांचा बदललेला रंग मला काहीसा खटकला होता पण चित्रपटात बलोच तरुणाच्या रूपात त्याला पाहताना ते नैसर्गिक वाटले.

क्लोज-अप्स, लॉंग शॉट्स, ड्रोन कॅमेरा आणि 'इश्क जलाकर' ह्या १९६० सालच्या "ना तों कारवां की तलाश हैं" जुन्या गाण्याच्या फ्युजन/रिमिक्स्ड व्हर्जनचा पार्श्वसंगीत म्हणून चपखल वापर केल्याने त्याचा उपरोल्लिखित एंट्री सीन चांगला उठावदार झाला आहे.

चॅप्टर - ३ : 'द बास्टर्ड किंग ऑफ लयारी'

नव्वदच्या दशकात वयाच्या १३व्या वर्षी 'लयारी' मधून गुन्हेगारी क्षेत्रात प्रवेश करून पुढे कराचीचा अंडरवर्ल्ड डॉन बनलेला रेहमान बलोच उर्फ 'रेहमान डकैत' ह्याने स्वतःच्या आईचीही हत्या केली होती. गुन्हेगारी जगतात एकही क्षेत्र असे नसेल ज्यात ह्या रेहमान डकैतचा सक्रिय सहभाग नव्हता. सडपातळ शरीरयष्टीचा आणि वरकरणी शांत वाटणारा हा रेहमान बलोच प्रत्यक्षात अत्यंत क्रूर आणि निर्दयी होता.

आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी बलोच लोकांच्या हक्कांसाठी लढणारा, त्यांना वेळोवेळी मदत करणारा त्यांचा 'मसीहा' अशी आपली ओळख निर्माण करण्यात यशस्वी झालेल्या ह्या अट्टल गुन्हेगाराला पाकिस्तानातल्या राजकारण्यांचा वरदहस्तही लाभला होता आणि तो स्वतः राजकारणात सक्रियही होता!

प्रत्यक्ष जीवनात होऊन गेलेल्या 'रेहमान डकैत'ची व्यक्तिरेखा अक्षय खन्नाने साकारली असून ह्याा भूमिकेचे त्याने अक्षरशः सोने केले आहे.

ह्या अध्यायात अजून एक महत्वाचे पात्र आपल्या समोर येते ते म्हणजे 'पाकिस्तान अवामी पार्टी' (PAP) चा आमदार 'जमील जमाली'. अतिशय बेरकी, वारा वाहील त्याप्रमाणे दिशा बदलणाऱ्या ह्या आमदाराच्या भूमिकेत राकेश बेदीने कमाल केली आहे. आजपर्यंत मुखतः विनोदी भूमिका करणारा कलाकार अशी जी त्याची ओळख होती तीला छेद देत त्याने आपल्या अभिनय क्षमतेचा एक नवा पैलू दाखवून प्रेक्षकांना थक्क केले आहे.

अक्षय खन्ना आणि राकेश बेदी बरोबरच रेहमान डकैतचा उजवा हात असलेला 'उझैर बलोच उर्फ उझैर डकैत' आणि त्याचे अन्य दोन साथीदार 'डोंगा' आणि 'सियाही' अशा भूमिका अनुक्रमे दानिश पंडोर, नवीन कौशिक आणि रौहल्ला गाझी ह्या कलाकारांनी छान वठवल्या आहेत.

उषा उत्तप ह्यांनी गायलेले 'रंबा हो हो हो ... ' हे ऐशीच्या दशकात प्रचंड गाजलेले गाणे आणि अन्यही 'रेट्रो' गाण्यांचा ह्या अध्यायात पार्श्वसंगीत म्हणून खुबीने केलेला वापर प्रेक्षकांना नॉस्टॅल्जीक करून जातो.

चॅप्टर - ४ : 'बुलेट्स अँड रोझेस'

अध्यायाच्या शीर्षकात 'गुलाब' दिसल्यावर प्रेक्षकांना आता 'हिरोईनची' एंट्री होणार असा आलेला अंदाज खरा ठरतो.

बालकलाकार म्हणून ज्यांनी 'सारा अर्जुन'ला पाहिले असेल त्यांना 'त्या कळीचे एवढ्या सुंदर फुलात' रूपांतर झालेले पाहून आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही!

आमदार जमील जमालीची मुलगी, 'यलीना जमाली'ची भूमिका सारा अर्जुनच्या वाट्याला आली आहे. हे पात्र तसे महत्वाचे असले तरी तिला अभिनयाची चुणूक दाखवण्यासाठी फार काही वाव ह्या पहिल्या भागात मिळालेला नाही, पण दिसली मात्र खूप छान आहे.

नायिकेच्या बरोबरीने ह्या अध्यायात आणखीन एका खलनायकाचीही एंट्री होते.

ओसामा बिन लादेनच्या हयातीतच त्याचा संभाव्य उत्तराधिकारी मानला गेलेल्या आणि २६/११ च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड असलेल्या 'इलियास कश्मिरी' ह्या अत्यंत क्रूर अशा कुख्यात दहशतवाद्यावर बेतलेली आय.एस.आय. अधिकारी 'मेजर इकबाल' ही व्यक्तिरेखा अर्जुन रामपालने ज्या ताकदीने साकारली आहे त्याला तोड नाही!

पाकिस्तानात छापलेल्या ५०० आणि १००० रुपयांच्या बनावट नोटा राजकीय नेत्यांच्या सहभाग/कृपादृष्टीने नेपाळमार्गे भारतात (उत्तर प्रदेशमध्ये) कशाप्रकारे पोहोचत होत्या ह्यावरही या अध्यायात थोडा प्रकाश टाकण्यात आला आहे.

चॅप्टर - ५ : 'द जिन्न'

ट्रेलरमध्ये नवीन कौशिक रणवीर सिंगला, "बहोत साल पहले ना... एक शैतान और एक जिन्न में जबरदस्त सेक्स हुवा, नौ महिने बाद जो पैदा हुवा उसका नाम पडा चौधरी अस्लम"
अशी ज्याची ओळख सांगतो त्या 'जिन्न उर्फ एस.पी. चौधरी अस्लम'ची भूमिका संजय दत्तने साकारली आहे. नव्वदच्या दशकात पाकिस्तान आणि भारतात ज्या 'हवा हवा ऐ हवा खुशबू लुटा दे' गाण्याने अक्षरशः धुमाकूळ घातला होता त्या गाण्याचा वापर पार्श्वसंगीत म्हणून केल्याने सुंजूबाबाचा एंट्री सीनही झकास झाला आहे!

खोट्या चकमकी, राजकारण्यांशी साटे-लोटे अशा अनेक कारणांनी कारकीर्द वादग्रस्त ठरलेला 'चौधरी अस्लम' नावाचा एक खराखुरा पोलीस अधिकारी पाकिस्तानात प्रत्यक्षात होता. संजूबाबाला ही भूमिका वठवण्यासाठी कुठलेही वेगळे कष्ट घ्यावे लागले नाहीयेत. त्याने अशा प्रकारच्या अनेक भूमिका आपल्या अभिनय कारकिर्दीत आधी करून झाल्या असल्याने तो ड्रेसिंग रूममध्येच 'सेट' होऊन आलेल्या बॅट्समन सारखा वाटला आहे.

चित्रपट सुरु झाल्यापासून तब्बल दोन तासांनी होणाऱ्या मध्यंतरापूर्वी संपणाऱ्या ह्या पाचव्या अध्यायात आणखीन बऱ्याच रोचक घटना पाहायला मिळतात.

पहिल्या पाच अध्यायांमधून सर्व प्रमुख पात्रांची ओळख झाल्यानंतर पुढच्या चॅप्टर - ६ : 'द डेव्हील्स गार्डियन', चॅप्टर - ७ : 'द बटरफ्लाय इफेक्ट' आणि शेवटच्या चॅप्टर - ८ : 'एट टू ब्रुटस' ह्या तीन अध्यायांमध्ये घडणाऱ्या थरारक घटना/प्रसंग अधिक वेगवान होऊन चित्रपट क्लायमॅक्स पर्यंत पोचतो. अर्थात चित्रपटाचा पुढचा भाग १९ मार्च २०२६ ला प्रदर्शित होणार असल्याची पाटी दिसते त्यामुळे 'क्लायमॅक्स' म्हणणे योग्य ठरणार नाही, त्याला 'चित्रपटाचा हा पहिला भाग संपतो' असे म्हणू शकतो.

असो... जवळपास साडेतीन तासांचा हा पहिला भाग कुठेही कंटाळवाणा वाटला नसून खूपच आवडला आहे आणि त्याच्या पुढच्या भाग/भागांबद्दल चांगलीच उत्कंठा निर्माण झाली आहे. पार्शवसंगीतात जुन्या गाण्यांचा केलेला वापर मजा आणतो. 'कास्टिंग' तर इतके परफेक्ट वाटले की कुठलीही व्यक्तिरेखा साकारणाऱ्या कलाकाराच्या जागी अन्य कोणी कलाकार असायला पाहिजे होता असा विचारही मनात आला नाही.

संगीताबद्दल बोलायचे तर 'इश्क जलाकर' हे एक गाणे सोडले तर बाकी कुठलेच गाणे लक्षातही राहिले नाही. अर्थात जी काही अन्य गाणी आहेत ती बघताना वैतागवाणीही वाटली नाहीत हे विशेष.

सत्यघटना आणि प्रत्यक्ष जीवनातल्या व्यक्तिरेखांना सिनेमॅटिक लिबर्टी घेत काल्पनिक घटना आणि पात्रांची जोड देऊन प्रेक्षकांना खिळवून ठेवणारी छान कथा/पटकथा लिहिता येऊ शकते, आणि आपल्या दिग्दर्शकीय प्रतिभेचा वापर करून त्यावर एक छान व्यावसायिक कलाकृती कशी निर्माण करता येऊ शकते याचे आदर्श उदाहरण लेखक/दिग्दर्शक आदित्य धर ह्याने या चित्रपटाच्या रूपाने चित्रपट रसिकांसमोर पेश केले आहे!

_____

एक विशेष सूचना : चित्रपटात हिंसा आणि रक्तपाताची अनेक दृश्ये असल्याने सेन्सॉर बोर्डाने त्याला (A) प्रमाणपत्र दिलेले आहे. अशी बहुसंख्य दृष्ये CGI/VFX तंत्रज्ञानाने निर्माण केली असली तरी आजच्या काळातल्या OTT प्लॅटफॉर्म्सवरच्या वेब सिरीज पाहून आणि रक्तरंजित व्हिडीओ गेम्स खेळूनही ज्यांची नजर अशाप्रकारच्या दृष्यांना सरावली नसेल त्यांनी हा चित्रपट बघू नये आणि ज्यांना अशा गोष्टींचे वावडे नसेल त्यांनी हा चित्रपट शक्यतो मोठ्या पडद्यावरच पाहावा.

जय हिंद! जय महाराष्ट्र!

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

सरांनी सांगितलं की बाबा वाक्य प्रमाणम म्हणायचं.

उंदीर मारण्याच्या खात्यात असलं तरी समोरच्याची अक्कल काढायला काय लागतं?

Indian security agencies have identified suspected, indirect tactical linkages between Maoist insurgents (CPI-Maoist) and Pakistan's Inter-Services Intelligence (ISI). While Maoist groups historically deny direct collusion, intelligence reports suggest the ISI has attempted to funnel funds and weapons to Maoists through overground radicals and North East insurgent outfits.

Rather than engaging directly, the ISI allegedly channels support through proxy groups operating in India's Northeast and neighboring countries. The CPI-Maoist has historically sought to forge United Front alliances with like-minded, armed insurgent groups (such as factions of ULFA in Assam), some of which have received logistical and financial backing from the ISI.

Intelligence indicates that the ISI has used overground operatives and members of banned organizations, such as SIMI, to bridge the gap and act as go-betweens with Maoist leadership.

हेही वाचून पहा.

उगाच लष्करी गुप्तहेरखात्याने काय करायचं आणि काय करायचं नाही याबद्दल आपल्या वातानुकूलित खोलीत बसून पिचक्या टाकणं बंद करा.

चित्रपटाचा धागा आहे लोकहो नोटबंदीवर गेल्याने राजकीय झाला.

धुरंदर मधील सारेच मेन व्हिलन प्रत्यक्षात काँग्रेस काळात मारले गेले होते हा चित्रपट दरम्यान आलेला मुद्दा सुद्धा घ्या परत चर्चेला..

आणि मला अजून एका प्रश्नाचे उत्तर द्या दाऊदला ठार न मारता आपण फक्त विषप्रयोग करून जिवंत का सोडले?

"लष्करी हेरखाते" म्हणजे नेमके डायरेक्टरेट ऑफ नेवल इंटेलिजन्स का डायरेक्टरेट ऑफ मिलिटरी इंटेलिजन्स का ऑफिस ऑफ दी डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन्स.

डायरेक्टर जनरल मिलिटरी ऑपरेशन्स याला तुम्ही हेरखात्यात गणताय?

आपल्या एकंदर लष्कराच्या ज्ञानाबद्दल कीव करावी कि हसावं हे कळत नाही,

असो

इतके मूलभूत अज्ञान असेल तर यापुढे आपल्या प्रश्नांना उत्तर देण्यात कालापव्यय करण्यात मला अजिबात रस नाही.

दाऊदला ठार न मारता आपण फक्त विषप्रयोग करून जिवंत का सोडले?

आपल्याला असं वाटतंय का कि भारतीय सुरक्षा संस्थांनी असे प्रयत्न केले नसतील?

पाकिस्तानने उगाच का त्याला आय एस आय च्या संरक्षणात ठेवलेले आहे

आपल्या भाबडेपणाचे आश्चर्य वाटते.

प्रश्न समजून घ्या.
तुम्ही धुरंदर पाहिला नाही का?

जर त्याला विषप्रयोग करून ठार मारू शकत होते तर असे विष का दिले ज्याने तो मरणार नाही आणि फक्त बेडवर पडून राहील. त्या अवस्थेत सुद्धा तो भारतविरोधी कारवाई करत होता.

शेवटी ते म्हणतात की मारण्यापेक्षा जास्त मजा तडफडवत ठेवण्यात येते.
मारूनच टाकणे योग्य ठरले नसते का?

Indian security agencies have identified suspected, indirect tactical linkages between Maoist insurgents (CPI-Maoist) and Pakistan's Inter-Services Intelligence (ISI). While Maoist groups historically deny direct collusion, intelligence reports suggest the ISI has attempted to funnel funds and weapons to Maoists through overground radicals and North East insurgent outfits.

Rather than engaging directly, the ISI allegedly channels support through proxy groups operating in India's Northeast and neighboring countries. The CPI-Maoist has historically sought to forge United Front alliances with like-minded, armed insurgent groups (such as factions of ULFA in Assam), some of which have received logistical and financial backing from the ISI.

Intelligence indicates that the ISI has used overground operatives and members of banned organizations, such as SIMI, to bridge the gap and act as go-betweens with Maoist leadership.

ह्यात इंटेलिजन्स म्हणजे मिलिटरी इंटेलिजन्स समजता आहात का तुम्ही ? मग रॉ आणि आयबी काय करते ?

डी जी एम आय लिहायचे होते चुकून ओ लिहिले. आता मुद्द्यावर बोला ! डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी इंटेलिजन्स असे वाचा अन् कामाचे बोला, लोकांच्या अकला काढण्यापेक्षा आपण उस्फूर्तपणे स्वतःची पाजळलेली justify करा.

Indian Security Agencies - आयबी, रॉ आणि स्टेट इंटेल mechanism प्लस SMAC सहकारी संघटना, SMAC बद्दल माहिती आहे ना ? असावी अशी अपेक्षा नाही तरीही.

मिलिटरी इंटेलिजन्सचे चार्टर काय आहे ते माहिती करून घ्या मग बोला, कशाला हसे करून घेता स्वतःचे ?

intelligence reports suggest the ISI has attempted to funnel funds and weapons to Maoists through overground radicals and North East insurgent outfits.

ह्यातले इंटेलिजन्स म्हणजे मिलिटरी इंटेलिजन्स समजून उगाच मी कसा बरोबर हा देखावा निर्माण करणे बंद करा तुम्ही पण.

The charter of Military Intelligence (MI) in India is to provide actionable, synchronized, and predictive intelligence support to the tactical, operational, and strategic needs of the Indian Armed Forces . It operates primarily to safeguard national security, monitor adversary capabilities, and neutralize espionage or terrorist threats within the military .The MI framework is structured across two primary branches within the Ministry of Defence: the individual service branches and the centralized strategic agency.1. Directorate of Military Intelligence (DMI)The intelligence arm of the Indian Army, operating under the motto Sada Satark (Ever Alert). Its core duties include:Tactical Intelligence: Collecting intelligence across borders and the Line of Control (LoC) to facilitate immediate battlefield decisions .Counter-Intelligence: Identifying, detecting, and neutralizing adversarial espionage threats and saboteurs within military ranks .Border Surveillance: Monitoring developments, troop movements, and sub-conventional threats in areas adjacent to India.2. Defence Intelligence Agency (DIA)Established in 2002 post-Kargil reforms, the DIA serves as the central coordinating body for the intelligence directorates of the Army, Navy, and Air Force . Its charter includes:Strategic Military Intelligence: Handling strategic intelligence assessments and providing the principal military advisory to the Defence Minister and the Chiefs of Staff Committee .Technical & Signals Intelligence: Consolidating specialized Signals Intelligence (SIGINT) and technical acquisition assets.Cross-Border Operations: Conducting operations for broader tactical intelligence coverage in neighboring regions of strategic concern .

हे पण वाचून घ्या, लावलेला चष्मा काढून अन् खराखुरा लावून.

खरे साहेब, सत्ताहीन मायावतीचा फ्लॅट पैशांनी भरला होता हे खरेच असेल. तर त्या स्केल ने सध्याच्या शिवसेना शिंदे गट, आणि भाजप च्या नेत्यांचे फ्लॅट्स केवढे मोठे आणि किती पैशानी भरले असावेत असे वाटते?

नुकताच कोल्हापुरातल्या शिंदे गटाच्या राजेश क्षीरसागर नावाच्या आमदाराचा वीडियो पाहिला : २ टक्के कमिशन का काहीतरी हा टक्केवारी भ्रष्टाचार करत होता. ती रक्कम होती चाळीस लाख रुपये. आता एका माणसाकडून एवढे गोळा केले. हा तर सामान्य वकूबाचा आमदार आहे, मुंबईच्या आसपासचे, पुण्याचे आमदार किती माया गोळा करत असतील?

शिंदे पॉवरफुल झाले त्या मागे खरोखर किती पैशाचा हात होता? बिल्डर्स कडून हजारो कोटी उकळवल्याचा आरोप कोणत्यातरी गुळवणी नावाच्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्याने केलेला होता यूट्यूब वर, शिंदेवर. त्यात किती तथ्य असावे मग?

@
डायरेक्टरेट ऑफ मिलिटरी इंटेलिजन्स का ऑफिस ऑफ दी डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन्स

हे आपले वाक्य

त्यावर डी जी एम आय लिहायचे होते चुकून ओ लिहिले. आता मुद्द्यावर बोला ! डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी इंटेलिजन्स असे वाचा

हि आपली मल्लिनाथी

The Directorate General of Military Intelligence (DGMI) in India is headed by Lieutenant General R. S. Raman. He assumed office as the Director General of Military Intelligence (DGMI) and Colonel of the Regiment for the Intelligence Corps.

कशाला या बोटावरची थुंकी त्या बोटावर करताय?

कोणत्याही डायरेक्टोरेट चा मुख्य डायरेक्टर जनरल असतो एवढी मूलभूत माहिती आपल्याला नसावी यायचे आश्चर्य वाटते.

उदा डायरेक्टोरेट ऑफ हायड्रोकार्बन चा मुख्य डायरेक्टर जनरल हायड्रोकार्बन आहे

सर्व गुप्तहेर खाती कशी काम करतात हे आपल्याला अजिबात माहिती नाही हे आपल्या इतर प्रतिसादांवरुन दिसतंच आहे.

असो

आपण आपली पातळी दाखवलीत

यापुढे आपल्याशी कोणताही वाद घालून केवळ कालापव्यय करण्यात मला अजिबात रस नाही.

you are persona non grata

आपलं चालू द्या

हा तर सामान्य वकूबाचा आमदार आहे, मुंबईच्या आसपासचे, पुण्याचे आमदार किती माया गोळा करत असतील?

रॉय साहेब

१) टी एन शेषन यांच्या आत्म चरित्रात लिहिलेले आहे कि १९९२ साली तेलगू देसम च्या एका साधारण खासदाराला त्यांनी विचारले कि आपण निवडणुकी साठी किती खर्च केला? त्याने उत्तर दिले २ कोटी.

यावर शेषन साहेबानी विचारले आपला पक्ष सत्तेत नाही तरी एवढा खर्च का केला?

त्यावर त्याने उत्तर दिले पाच वर्षात मी निदान ५ कोटी तरी कमावेन अन्यथा खासदार होण्याचा फायदा काय?

१९९२ साली सोन्याचा भाव ३५०० होता म्हणजे आपण हिशेब करा.

२) मुंबई महापालिकेचे बजेट ८० हजार कोटी आहे. त्याच्या १० टक्के जरीमिळाले तरी ते ८ हजार कोटी होतात. आता तुमच्या लक्षात येते का?

a ) मुंबई महापालिकेची निवडणूक एवढी अटीतटीने का लढवली गेली? अमित शाह यांनी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत एवढा जोर का लावला? पोपटाचा प्राण कशात असतो ते त्यांना माहिती आहे.

b ) शिवसेनेचे खासदार आमदार नगरसेवक उद्धव ठाकरेंना सोडून शिंदे साहेबाना जाऊन का मिळाले? आणि राष्ट्रवादीचे खासदार आमदार नगरसेवक शरद पवार याना सोडून अजित पवार साहेबाना जाऊन का मिळाले?

पाच वर्षे नुसती जनतेची सेवा करायची? ज्या पक्षांना कोणतीही विचारसरणी नाही त्यांचे आमदार खासदार कसे टिकणार?

३) दोन वर्षांपूर्वी मुंबई आय आय टी च्या अभ्यासानुसार एक घनफूट खड्डा भरण्यासाठी किमान ७५० रुपये लागतील. पण महापालिकेत खड्डा भरण्याची मंजूर झालेली निविदा ३५० रुपयाची भरलेली होती. ३५० रुपयात तो स्था यी समिती, नगरसेवक याना काय देणार आणि स्वतः काय कमावणार?

नगरसेवकांच्या निवडणुकीत माणशी हजार ते दोन हजार रुपये घेऊन लोक मतदान करतात मग त्यांना खड्डेमुक्त मुंबई कशी मिळणार?

मेरा भारत महान

पळायचे असेल तर खुशाल पळून जावा, तुम्हाला persona non grata पण कळत नाही हे तुम्ही पण दाखवलेत.

मल्लिनाथी, थुंकी वगैरे कोण करतोय ते दिसले, बुडत्याला काडीचा आधार तसे तुम्ही फक्त एक टंकन चुकीचा आधार घेत पराचा कावळा करून मुख्य मुद्दा अन् स्वतःचा सर्वज्ञ असण्याचा अहंगंड कुरवाळण्याचा आपला हक्क मला सुद्धा नामंजूर नाही.

इंटेलिजन्स apparatus बद्दल तुमचे दिव्य ज्ञान किती obsolete आहे ते तुम्ही अर्थातच कबूल करणार नाही त्यामुळे

टाटा

आणि मला अजून एका प्रश्नाचे उत्तर द्या दाऊदला ठार न मारता आपण फक्त विषप्रयोग करून जिवंत का सोडले?>>>
कारण तो अजून जिवंत आहे. तो मेला की घेतील क्रेडिट देशी जेम्स बाँड आणि विश्वगुरु.
जस काँग्रेस काळात मारल्या गेलेल्या किंवा मेलेल्या पाकिस्तान्यांच घेतलं.

अमित शाह यांनी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत एवढा जोर का लावला? >>> आठ हजार कोटींसाठी. आता ते अमित शाह खाईल Happy

खरे सर तुम्ही इतके सर्वज्ञानी आहात, थेट हेरखात्याकडून तुम्हाला माहिती मिळते, मग तुम्ही माबोवर कसे काय इतका वेळ टाईमपास करता? तुम्हाला साजेसे काम विश्वागृनी द्यायला हवं होत आतापर्यंत

इतक्या हिरीरीने तर अमित शहा पण भांडत नसेल Happy

खरे सर, थोडा वेळ या धाग्यावरून निवृत्ती घ्या.

तुम्ही अनेक विषयांवर चांगले लिहिता. त्यात लक्ष घाला. मूड ठीक झाला कि मग तुम्हाला काय सांगायचे ते सांगा.

तुम्ही अनेक विषयांवर चांगले लिहिता. त्यात लक्ष घाला. मूड ठीक झाला कि मग तुम्हाला काय सांगायचे ते सांगा.

असेलही, पण हे पिचक्या टाकू नका, थुंकी इकडची तिकडे करणे, पातळी काढणे लोकांची हे तद्दन शेलकी भाषा वापरणे आहे, झाले.

जाऊ दे पालथ्या घड्यावर पाणी घालून काही साध्य होणार नाही ! त्यामुळे संपादित. विरोधात मत नोंदवलेल्या सगळ्या सभासदांवर हे महाशय काय काय बरळले आहेत ते पाहता आपले efforts अस्थानी लावण्यात काही पॉईंट वाटत नाही.

ही मा शे पो

धागा लेखक संजय भावे ह्यांची मात्र मनापासून क्षमा मागतो फुकट बांड्या पंचायती करत बसलो अन् तुमचा धागा पानिपत झाला ! ह्यापुढे लक्ष ठेवेन

त्यांनी मलाही दुसर्‍या धाग्यावर असेच शब्द वापरलेले आहेत. पण ते चांगल्या मूडमधे छान लिहीतात म्हणून आवाहन केले. सातत्याने ते चिडले आहेत, यासाठी ब्रेक घ्या म्हणालो.

चला बरं, खूप विषयांतर झालं, सिनेमाच्या मुद्द्यावर या.

कच्ची कली सड्डा मासूम चेहरा निरखून पाहायचं सोडून हे काय लावलंय ?

राज अज्ञानी सर,

तुमची संयत विचारसरणी आणि समन्वयवादी भूमिका आवडली, त्यामुळे तुमच्या या प्रयत्नांचा आदर राखत सहमती. राजकीय आचारविचार विरोधी असू शकतात किंबहुना जालीय विश्वात ते एक्स्प्रेस करायला बंधने जास्त नसल्याने ते गडद छटा जास्त असणारे असूच शकतात, पण त्या धुरळ्यात माफक समन्वयी असणाऱ्या माणसाचे चरित्र नीट समजते. मी तरी हे शिकण्यासारखे मानतो, उद्या कदाचित तुमची माझी मते पण विरोधी टोकावर असू शकतील स्पेक्ट्रमच्या पण त्यात भाषेचा, सुसंकृतपणाचा आणि सभ्यतेचा मुलामा माझ्याकडून तरी कधीच खरवडला जाणार नाही इतके बोलून रजा घेतो धाग्यावरून.

राज अज्ञानी सर,

तुमची संयत विचारसरणी आणि समन्वयवादी भूमिका आवडली,>>>>>>>> तुम्ही त्यांनी ऋन्मेऽऽष या id ला अत्यंत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केलेली वाचलेली दिसत नाही.. ते लकी आहेत त्यांचा id अजून सक्रिय आहे

त्यांनी कोणाला काय शिवीगाळ केली होती/ आहे ते मी कशाला पाहायला जाऊ ? माझ्यासमोर, जे बोलतायत तितके मी बघतोय, माबोवर एखाद माणसाला धरून त्याची पुढची मागची इतिहास युक्त मराठी आंतरजाल कुंडली बनवण्या इतका न माझ्यात धीर न मला गरज.

जो माझ्याशी सरळ बोलला तो आवडणार जो वाकडा बोलणार त्याला मी शाब्दिक बाण मारणार, पळभर थोडी मराठी आंतरजाल मुशाफिरी करणार अन् घरी नेमक्या आयुष्यात परत जाणार,

तुम्ही त्यांचा इतिहास खोदून मला देताय उद्या तुमचा कोणी तिसरा मला खोदून देईल ! मी असे नीर-क्षीर करत बसलो तर लोकांशी मनसोक्त बोलू कधी ? अभिव्यक्त कधी होऊ ? अगदी जालीय भांडण तरी कधी करू किंवा पोटभर हसू तरी कधी ?

त्यामुळे , राज अज्ञानी, ह्याच्यापुढे ऋन्मेषला काही बोलू नका हं

असा मेसेज त्यांना तुमचाही मान राखून देऊन टाकतो, ऐकणे न ऐकणे त्यांच्यावर आहे एकंदरीत.

बाकी माबो काही अगदी शेंडी तुटो वा पारंबी सेक्युलर असेल असे काही माबो मालक, ॲडमिन, वेब मास्तर कोणीच म्हणत नाहीत, उद्या चालून मूड लागला तर मला पण लाथ घालतील ! त्यांची खासगी प्रॉपर्टी आहे माबो सिंपल.

काही लोकांचं जीवनच मायबोली आहे, मी ऋन्मेषला कधीच शिवीगाळ केलेली नाही.
आयडी विसरला असेल बहुतेक. Happy

तुमची संयत विचारसरणी आणि समन्वयवादी भूमिका आवडली <<<< फारच विनोदी
राज मदन अज्ञानी आचार्यांनी परवाच कोणाचे आई बाप काढलेले वाचले नाही वाटतं ...

@राज अज्ञानी

सर्वात प्रथम सुरुवात आपण केलेली आहे.

जबरदस्त मनोरंजन चालू आहे.
खरे सर म्हणजेच डोवाल सर हे समजले. त्यांना इंटेलिजन्सचे लोक रिपोर्ट करतात हे समजले. आदर वाटला.

भाजपच्या केंद्र सरकारमधील लोक सुद्धा त्यांना गुप्त बातम्या देतात. असे व्यक्तिमत्व मायबोलीवर आपल्याशी संवाद साधतं. आपल्याला त्याचं मोल नाही.

हे आपले शब्द येथे कॉपी करत आहे!

मी कोणावरही व्यक्तिगत टीका न करता माझे प्रतिसाद लिहिलेले होते.आणि मी सुरुवातही केलेली नव्हती.
केवळ मी भाजपला सहानुभूती असलेला आहे म्हणून ही टीका झाली हेही स्वच्छ दिसते आहे.

यानंतर त्याच लोकांनी माझ्याबद्दल काय काय लिहिलेले आहे ते सर्वांना वाचण्यासाठी उपलब्ध आहे.
माझे स्रोत काय आहेत याबद्दल पण अत्यंत वाईट शब्दात टीका झाली आणि ज्यांना लष्कराबद्दल माँहिती नाही त्यांनी शहाजोग पणा केला.
त्यांना त्यांच्याच शब्दात उत्तर दिलेले आहे आणि त्याबद्दल मला मुळीच खंत नाही.

असो

Pages