
ज्वारीचे पीठ - २ वाट्या
रवा - एक वाटी
....
दही - मध्यम घट्ट, फार आंबट नसावे
पिण्यायोग्य पाणी
( हे मोजले नाही अंदाजे घातले,
बॅटर उत्तपा घालता येईल असे होईल इतपत पाणी,
अंतरात्म्याचा बास पुरे असा आवाज येईपर्यंत चे प्रमाण )
...
कांद्याची कोवळी पात, टोमॅटो, कोथिंबीर बारीक चिरून
(ह्यात creativity आणि स्वातंत्र्य भरपूर आहे, उधळा हवे तेवढे आणि हवे ते टॉपिंग, आपण कुणाला कशाचे बंधन घालत नसतो)
..
मीठ अंदाजे (कॉल अंतरात्मा)
खाण्याचा सोडा चिमूटभर
(चिमूटभर म्हणजे कुणाची चिमूट विचारू नका, पण म्हणून मुंगीची किंवा हत्तीची चिमूट नका वापरू, एक टी स्पून घाला काही नाही जमलं तर)
तेल ( इथे पण घ्या स्वातंत्र्य, वर्ल्ड कप आल्यामुळे फार आनंद झालाय, कशाला कोणत्या प्रमाणाच्या अंधश्रद्धा पाळायच्या, मनाला येईल तसे वागायचे)
..
सर्वप्रथम इच्छाशक्ती आणि कंटाळा असे जबरदस्त कॉम्बिनेशन घेऊन रविवारी सकाळी काहीतरी छान खायचे आहे, पूर्वतयारी नाहीये, मेहनत कमी करायचीय, healthy पाकृ हवी असे नखरे करावेत.
कंटाळा येऊ नये म्हणून सकाळी ९ वाजता कांदेपोहे करून /करवून /मागवून खावेत म्हणजे जरा energy येते. रील्स बघायला घ्याव्यात. जरासं पहुडावं, २ तास सहज जातात.
मग ११ वाजता अचानक इच्छाशक्ती जागृत झाल्यासारखे उठावे, पाणी प्यावे आणि मिक्सर च्या जार मध्ये वर दिलेल्या प्रमाणानुरूप ज्वारीचे पीठ, रवा, दही, मीठ घालून घुर्रर्र करून घ्यावे.
झाकण उघडून बघावे, तर त्यात अपेक्षे प्रमाणे बॅटर दिसणार नाही कोरडे पीठ दिसेल, अरेच्चा पाणी राहीलच की!
असे म्हणून बेताने पाणी घालावे.
झाकण लावून अजून एकदा घुर्रर्र करावे.
हे घट्ट मिश्रण एका बोलमध्ये काढून, मिक्सर जार मध्ये पाणी घालून तो चांगला विसळून ते पीठाचे पाणी त्या बोल मध्ये ओतावे.
छान व्हिस्क करून घ्यावे.
आता ह्या स्टेप ला तुमचा किंवा ai चा intelligence वापरून consistency योग्य आहे की नाही हे ठरवावे.
साधारण पळीने बॅटर तव्यावर टाकल्याअंतर आपणहून जरासे पसरले पाहिजे, पण सैरावैरा पळून नाही गेले पाहिजे.
( नाही कळलं तर जीपट्या ला prompt द्या, u need to upgrade cooking techniques guys )
.... आता खाण्याचा सोडा घाला, गरज वाटत असेल तर मीठ घाला, हलक्या हाताने मिक्स करून ह्या मिश्रणाला १ तास आराम द्या. खरे तर १५ मिनिटे रेस्ट दिली तरी चालेल, पण रविवार आहे मिश्रणबरोबर तुम्ही सुद्धा एखादी वामकुक्षी घेऊन टाका.
..
आता १२ वाजता उठा, सिंडारेला च्या थाटात आवडत्या भाज्या किंवा वरती दिलेल्या भाज्या घ्या त्यात किंचित मीठ किंवा चाट मसाला घालू शकता मिसळून ठेवा किंवा हवे तसे उचलून sprinkle करू शकता.
..
नॉन स्टिक चा तवा तापायला ठेवा.
मिश्रण बघा कसे झालेय , त्यात एक पळी type चमचा बुडवा आणि अंदाजे दीड पळी मिश्रण घेऊन तव्यावर घाला. जास्त पसरवायचं नाही, किंचित जरासं पसरून गोलाकार द्यायचा.
गॅस मध्यम आचेवर हवा.
आता त्यावर टॉपिंग च्या भाज्या घाला किंचित तेल आजूबाजूने सोडा आणि थोडे हवे असेल तर वरती घालू शकता. इथे दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या, उलथणे लाकडी वापरायचे आणि परतयच्या आधी भाज्या जरा प्रेस करायच्या म्हणजे त्या सुटणार नाहीत आणि दोन्ही बाजू नी व्यवस्थित भाजलं जाईल.
अल्टी पलटी करून छान भाजून घ्या.
कुठल्याही चटणी सोबत सर्व्ह करा 
परत एकदा करावा लागेल
परत एकदा करावा लागेल
❤️
❤️
आणि मग मोजते पाणी
लोकांना नंबर्स पाहिजेत बाई.
.
ज्वारीचे पीठ असल्यामुळे फार भारी चव नसते ती साध्य करायला बाह्य साधनाची अवशक्यकता असते, एखादी भन्नाट चटणी करून बघते.
.
धन्यवाद तुम्ही करून बघितला पदार्थ..
सिमरन आणि स्वानंदी
शिळे पीठ असले तरी चालेल
छान पौष्टीक पाककृती ..!
छान पौष्टीक पाककृती ..!
इन्टरेस्टिंग रेसिपी! लिहिलीही
इन्टरेस्टिंग रेसिपी! लिहिलीही मस्त.
करून बघेन.
सोडा घालून मग तासभर रेस्ट करायची बॅटर? सहसा सोडा अगदी शेवटी घालतात ना?
१५ मिनिटे rest केली तरी चालते
धन्यवाद
१५ मिनिटे rest केली तरी चालते
Batter रेस्ट ला ठेवून भाज्या चिरायला घ्यायच्या
सोडा घालून मग तासभर रेस्ट करायची बॅटर?>> हो मी तसं केलं होतं
Pages