आता काय करता येईल?

Submitted by केअशु on 1 November, 2025 - 11:40

ऑटोमेशन किंवा ए आय मुळे हजारोंच्या संख्येने लोकांच्या नोकऱ्या जात आहेत. आयटी किंवा बँकिंग या ठिकाणी वेतन बऱ्याचदा चांगले असते. या चांगल्या वेतनामुळे लोकांना एक चांगली लाइफस्टाइल जगता येते पण बदलत्या तंत्रज्ञानामुळे या नोकऱ्याच जर राहिल्या नाहीत तर मग यावर उपाय काय? या लोकांनी मॅन्युफॅक्चरिंग सारख्या तुलनेने कमी वेतन असणाऱ्या क्षेत्रात जावे का? पण मग आतापर्यंत जी चांगली लाईफ स्टाईल जगली त्या सवयीचं काय करायचं? काही व्यवसाय सुरू करायचा म्हटला तर किमान तीन वर्षे तो व्यवसाय नेटाने चालू ठेवल्यानंतर मग फायदा व्हायला सुरुवात होते. शिवाय व्यवसायात दर वेळेला लाभ होईल असं काही नसतं कधी लाभ कधी नुकसान हे होत राहतं. उत्पन्न अनियमित असतं. शिवाय प्रत्येक जण व्यावसायिक होण्यासाठी लागणाऱ्या गुणांनी समृद्ध असेलच असं काही नाही. त्यातही आयटी मधून ज्या लोकांना निरोप दिला गेला आहे त्यातले बहुसंख्य लोक हे वय वर्षे ४५ च्या पुढचे असावेत. हे पन्नाशीकडे निघालेले लोक मॅन्युफॅक्चरिंगवाल्या कंपन्या घेऊन काय करणार? किती जणांना नोकऱ्या देणार? हे तरुण नसल्यामुळे त्यांना कष्टाची कामेही झेपणार नाहीत. ऑफिस वर्क इतक्या लोकांसाठी उपलब्ध असणार नाही. आत्तापर्यंत केलेली सेव्हिंग्ज किती दिवस पुरणार? एकूण मार्ग काय?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

इथे उपाय वाचायलाआआवडतील. भारतात आयटी कंपन्यात हजारोनी नोकरकपात अपेक्षित आहे.

हे त्या क्षेत्रातील लोकांना आधी माहित नव्हते असे अजिबात नाही. त्यामुळे त्यांनी भविष्याचा काहितरी विचार केला असावा.

आइटीच काय इतरही क्षेत्रांत अशा लाटा येऊन गेल्या. कापड उद्योगानंतर औषधे, स्टील, केमिकल आणि आता आइटी उद्योग . त्यातील लोकांनी काय केले?

Upskill करत राहणे. आपल्या कामाशी निगडित काही कोर्सेस असतील तर करणे. तसेच Upwork सारख्या प्लॅटफॉर्म वर प्रोफाईल बनवून नवीन जॉब शोधत राहणे.
चांगली आर्थिक गुंतवणूक केली असेल तर तो पैसा + थोडा कमी पगारवाला जॉब + गरजा कमी + काटकसर = असे चालून जावे
IT मधले स्किल जरी AI करू शकला तरी तेथील कामामुळे ती व्यक्ती अनुभवसंपन्न झालेली असते. तो अनुभव इतर ठिकाणी वापरता येतो. जसे कि पीपल मॅनेजमेंट, business administration, business acumen, professionalism, वेब व संगणकावरची बरीच टूल्स, इत्यादी. यांचा वापर कोणत्याही क्षेत्रात होऊ शकतो.
लवचिकता, उद्यमशीलता, संयम हे गुण असतील तर माणूस तरुण जाऊ शकेल.

काही ना काही , नशीब हात देते, बळ देते, सावरते. थोडं फ्लेग्झिबल रहायचं.
मी बेरोजगार होते तेव्हा एच-मार्ट मध्ये जाउन कॅशिअरचे काम करण्याची माझी तयारी होती. तो इन्टर्व्ह्यु ज्या दिवशी होता त्याच्या काही आधी मला हा आताचा जॉब लागला.
महापुरे वृक्ष जाती, लव्हाळे वाचती.
.
जेव्हा खायचे वांधे होतात तेव्हा नक्की कसला अभिमान धरायचा?
.
पण एक सांगायचे राहीले, आय अप-स्किलड मायसेल्फ. त्या स्किलबेसवरच हा जॉब मिळाला.