एकूणच सोशल मीडियावर आणि मायबोलीवर सध्या रेस्टॉरंटमध्ये कुठे बसावे, कसे वागावे, काय घालावे याची घमासान चर्चा चालू आहे.
दूर कुठेतरी दिल्लीत एक शर्मा आडनावाची हिंदीभाषिक महिला आपली मराठमोळी कोल्हापुरी चप्पल घालते याचा अभिमान बाळगायचा सोडून...
आणि जेव्हा ती खुर्चीवर मांडी घालून बसते तेव्हा "दिल्लीचेही तख्त (पक्षी– खुर्ची) राखते कोल्हापुरी चप्पल माझी" असे गर्वाने म्हणायचे सोडून..
आपली मराठी माणसे इंडियन पीनल सेक्शन कोड घेऊन तिलाच नियम शिकवत आहेत.
त्याचवेळी परंपरा बचावपक्षाचे वकील सुद्धा एआय वापरून नवनवीन कायद्याची कलमे हुडकून आणत आहेत.
अश्यात कोणीतरी म्हणतेय की तुम्ही इथे भांडत आहात आणि तिथे त्या बाईने मूव्ह ऑन सुद्धा केले असेल (कसे करतात लोकं देव जाणे, इथे पाचवीतले पहिले प्रेम विसरले जात नाहीये)
आणि अजून कोणीतरी म्हणतेय की धागाकर्ता मोघम लिहून धागा काढतो, लोकांना चर्चेला लावतो.. (आता यात काय वाईट आहे समजत नाही, उगाच ते "धंद्याला लावतो" अश्या टोनमध्ये का लोकं लिहितात खरेच कळत नाही) ..
आणि स्वतः मात्र मजा बघतो. खरेच त्याला काही पडली असेल तर त्याने कंझ्युमर कोर्ट किंवा तत्सम अथॉरिटिकडे तक्रार करावी..
पण जिथे माझ्या स्वतःच्या घरचे लाईट बिल, मेंटेनन्स, माझ्या मोबाईलचे बिल, अगदी माझा इन्कम टॅक्स रिटर्न सुद्धा जिथे माझी बायको भरते तिथे दुसऱ्या बाईला त्रासात बघून मी तक्रार करायला धावलो तर घरी किती मार पडेल विचार करा..
म्हणून म्हटले ते करूया जे मला जमते.
आपण धागा काढुया आणि भारतातील मॉल, रेस्टॉरंट, पब, बार, डान्सबार, डिस्को, अम्युजमेंट पार्क, थिएटर, मल्टीप्लेक्स सारख्या पब्लिकप्लेस मध्ये असलेल्या खाजगी जागातील जाचक नियमांचे संकलन करूया.... आणि मग बघूया सर्वानुमते किंवा बहुमते पुढे काय करता येईल ते.
सुरुवातीचे चार आणे मी टाकतो.
पहिले गाऱ्हाणे माझे मांडतो.
१) इंग्लिश विंग्लिश
मला आजकालच्या या उच्चभ्रू पंचतारांकित, फाईन डाईन रेस्टॉरंट आणि मॉल अश्या सर्वच जागी एक मोठा प्रॉब्लेम जाणवतो. तो म्हणजे तिथले वेटर, मॅनेजर, सेल्समन, सेल्सगर्ल, टेलिफोन ऑपरेटर, सर्विस प्रोव्हायडर, रिसेप्शनिस्ट, डोअरकिपर, सिक्युरिटी गार्ड म्हणजे तिथला कुठल्याही श्रेणीचा कर्मचारी गरज नसताना इंग्लिश फाडायला सुरुवात करतो. आणि मग माझ्यासारखे ज्यांना चांगले इंग्लिश जमत नाही त्यांचा प्रॉब्लेम होतो.
खरे तर आपण पैसे मोजत असतो. म्हणून आपण त्यांच्यापेक्षा स्मार्ट दिसणे अपेक्षित असते. पण त्यांना तितक्याच उत्स्फूर्तपणे इंग्लिशमध्ये उत्तर देता आले नाही तर आपण बावळट ठरतो. म्हणजे मी तरी ठरतो. या कारणामुळे मी बरेचदा बायकोला पुढे ढकलतो. आणि ती सुद्धा या संधीचा फायदा उचलत दुप्पट पैसे खर्च करून मोकळी होते.
बरे आपण चेहऱ्याने काही गोरेचिट्टे फॉरेनर दिसतो अशातला भाग नाही. हे लोकं बस्स कपडे बघून एखाद्याशी इंग्लिशच बोलायचे हा अंदाज लावतात. म्हणजे पारंपरिक कपडे घातले तर यांचे ड्रेस कोडचे संकेत तुटणार, आधुनिक घातले तर हे इंग्लिश झाडणार.
थोडक्यात इकडे अपमान तर तिकडे घोर अपमान. माझ्यासारख्याने करावे तरी काय?
२) माय जेवण माय स्टाईल!
हा मुद्दा समजून घ्यायला जरा भूतकाळात फेरी मारून वर्तमानात येऊया.
पिझ्झा मी कॉलेजला असताना पहिल्यांदा खाल्ला. तेव्हा भारतात नव्यानेच आला होता. म्हणजे आमच्या मध्यमवर्गीय घरात तरी इतका पोहोचला नव्हता. पिझ्झा म्हणजे चीझ लावलेली भाकरी असले विनोद सुद्धा मार्केटमध्ये आले नव्हते तेव्हाचा तो काळ. आम्ही चार मित्र वर्गणी काढून एका मोठ्या रेस्टॉरंटमध्ये पिझ्झा खायला गेलो होतो.
कशाची चव काय असेल याची सुतराम कल्पना नसल्याने आणि आम्ही मेनूकार्ड चारदा वाचूनही त्यात ओळखीचे काही न दिसल्याने आम्ही चार प्रकारचे चार पिझ्झे मागवून प्रत्येकाची एकेक फोड खायचे ठरवले. हो, नवीन नवीन असताना आम्ही पेरूची फोड सारखे पिझ्याची फोडच म्हणायचो. इतके ते नवखे प्रकरण होते. पण इथे ते महत्वाचे नाही. तर जिथे आमची पटापट नावे वाचायची बोंब होती. तिथे वेटरने फाडफाड इंग्लिश झाडत आमची ऑर्डर सर्व्ह केली. आणि सोबत काटासुरी ठेवले.
झाली का पंचाईत! मेडिकलला गेले की चाकूने बेडके कापावी लागतात जे आवडत नसल्याने आम्ही इंजीनियरिंगला आलो असे लोकांना फुशारक्या मारून सांगणारी हुशार पोरे आम्ही.. या लौकिकाला बट्टा लागतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. काटा कुठल्या हातात धरायचा, आणि सुरी कुठल्या दिशेने चालवायची इथपासून सुरुवात होती. पण सुदैवाने आमच्यात एक अमोल पालेकर निघाला त्यामुळे आम्हा बाकी तिघांचा असरानी होता होता वाचला.
त्या दिवशी कष्टाने आम्ही तो पिझ्झा संपवला खरा, पण खाण्यातली मजा काही आली नाही. कष्ट करून कमवा आणि त्या पैश्याचे खातानाही पुन्हा कष्टच करा. रोज इतके कष्ट करावे लागले तर एक दिवस आपणच नष्ट होऊ असे वाटले.
पण ॲम्बियन्स बॉस ॲम्बियन्स!
यासाठीच तर खर्च केला जातो हे लक्षात आले. तसे अगदी युरेका युरेका झाले. त्यानंतर ज्या कोणी रेखा सुरेखा माझ्या आयुष्यात आल्या त्यांना घेऊन एकदातरी मी तिथे जायचोच. ऍक्च्युली एकदाच जायचो. तेवढेच बजेट असायचे. गर्लफ्रेंडच्या सहवासाचा आनंद पुरेपूर लुटायचो पण खाण्यातली मजा शून्य व्हायची. अन्नावरची वासना उडून जाणे हा शब्दप्रयोग कुठून आला असावा हे तेव्हा मला उमगले. कारण एक वासना पूर्ण व्हायची तर दुसरी उडून जायची.
मग कधीतरी कॉलेज संपल्यावर जॉब लागला. आठवड्याला पिझ्झा खाणे परवडायच्या वयात पोहोचलो. पण काटासुरी मेहनतीची भीती कायम असल्याने खायचो मात्र नाही. अश्यात आईने तिच्या मैत्रिणीसोबत रेस्टॉरंटमध्ये भेटीचा प्लान बनवला. सोबत मैत्रिणीची मुलगी सुद्धा होती. जिला माझी मैत्रीण बनवायचा या दोन मैत्रिणींचा प्लान होता. ती मुलगी अमेरिकेत शिक्षण घेऊन आलेली होती. त्यामुळे त्यांनी भेटीचे रेस्टॉरंट तिच्या शिक्षणाला साजेसेच ठरवले होते.
अरे हो, उगाच निराशावादी सस्पेन्स ताणायला नको म्हणून आधीच क्लिअर करतो, आमचे काही जमले नाही. आणि जमणार नाही हे दोघांनाही तेव्हाच समजले जेव्हा मी मेनूकार्ड वाचायलाच पंधरा मिनिटे घेतली. (ती मुलगी सुंदरही कमालीची होती ते ही एक कारण होते म्हणा)
पण पंधरा मिनिटे खर्चून मी तेच केले जे मी दर दुसऱ्या उडुपी हॉटेलमध्ये पूर्ण मेनूकार्ड नजरेखालून घातल्यावर करतो. म्हणजे तिथे मसाला डोसा मागवतो. इथे पिझ्झा मागवला. इंग्लिश का येत नसेना, पोरगी का पटत नसेना, पण सन्मान वाचवणे सुद्धा गरजेचे असते. म्हणूनच मालिका २-० ने हरल्यावर देखील आपला रोहीत शर्मा व्हाईटवॉश वाचवत शतक मारतो तेव्हा आनंद होतो.
आपल्याला काटासुरीने पिझ्झा खाता येतो हे दाखवून द्यायची हीच ती वेळ होती. पण मी काटासुरी साफसूफ करून, व्यवस्थित पोजिशन घेत, पहिलाच घास तोडायला घेणार, इतक्यात समोर पाहिले तर दोन्ही मायलेकी तोंडाचा मोठा आ वासून हातानेच वदनी कवळ घेऊन सुरू झाल्या होत्या. माझ्या हातात असलेली सुरी उंचावून तशीच स्वतःच्या छातीत खुपसून घ्यावीशी वाटली. ती अमेरिका रिटर्न मुलगी मस्त आपल्या आईसोबत हातानेच मचमच करत पिझ्झा खात होती. आणि मी मात्र दिखाव्याच्या आधुनिक संस्कारात गुरफटलो होतो.
ज्याला पूर्ण इंजिनिअरिंगमध्ये कधी एकही एटीकेटी लागली नव्हती त्याला त्या दिवशी एटीकेट्सचा घोडा लागला होता.
एक तो दिवस आणि एक आजचा दिवस. जगात ज्या ज्या गोष्टी हाताने खाणे शक्य आहेत त्या त्या मी आता हातानेच खातो.
पुढे मग कधीतरी कुठेतरी वाचले. की आपण अन्नग्रहण करताना आपल्या जास्तीत जास्त इंद्रियांना अन्नाचे सुख मिळायला हवे तरच खाण्याची मजा वाढते. जसे डोळ्यांनी आपण खाद्यपदार्थांच्या सजावटीचा आनंद लुटतो, नाकाने त्याचा छान वास घेतो, कानाने तळलेल्या पदार्थाचा चरचर आवाज ऐकतो, तोंडाने अर्थातच चव घेतो. राहता राहिले पाचवे इंद्रिय म्हणजेच स्पर्श! पण हाताने खायचे टाळून आपण त्या आनंदाला मुकतो.
स्पेशली गरमागरम वरणभात हाताने खाणाऱ्यांची तर किव करावी तितके कमी. असे मी आता इथे लिहिताच निम्म्याहून अधिक जणांना ते पटेल. पण आमच्या ऑफिसमध्ये एक मी वगळता मला अपवादाने सुद्धा कोणी असा दिसला नाही जो लंचला राईसप्लेट मधील डाळभात हाताने खातो. माझ्यासोबत जेवायला बसणाऱ्यांना सुद्धा हा मोह कधी होत नाही याचे आश्चर्य वाटते. चपाती भाजी हाताने संपवतात, पण नंतर डाळभातासोबत चमच्याने सुरू होतात. त्यांना खरेच हाताने डाळभात खाण्यातला आनंद कळत नाही की ऑफिसमध्ये कुठेही लिखित स्वरूपात नसलेले अदृश्य नियम ते पाळत असतात कल्पना नाही. पण नशीब माझ्या हाताने डाळभात खाण्यावर कोणी ऑब्जेक्शन घेत नाही. ज्या दिवशी घेतील त्या दिवशीच मी रिजाईन करून नवीन जॉब शोधायला घेईन.
पण बाहेर एखाद्या पंचतारांकित फाईन डाईनमध्ये मात्र तो आक्षेप घेतला जाणार नाही याची मला खात्री नाही. एखाद्याला माझ्या हाताने खाण्याची किळस वाटली तर त्याचा अधिकार कदाचित आधी जपला जाईल. डाळभात हा आपला भारतीय पदार्थ आहे आणि वर्षानुवर्षे तो आपण हातानेच खात आलोय हे विसरले जाईल. कारण आपण स्वतःला उच्चभ्रू म्हणवून घेण्यासाठी आता पाश्चात्य एटीकेट्स स्वीकारले आहेत.
ज्या गोष्टी आपल्याकडे एखाद्या झुडुपामागे किंवा बागेतील बंद पडलेल्या लाईटीखालील बाकड्यावर बसून छत्रीच्या आडोश्यात केल्या जातात त्या पाश्चात्य देशात चारचौघात कोणाची भीड न बाळगता होतात. तेव्हा ज्या लोकांना असे बिनधास्त तोंडात तोंड जाताना पाहून ते मॉडर्न आणि क्यूट वाटते त्यांनाच एखाद्याचा हात जेवताना तोंडात जाताना बघणे ऑकवर्ड वाटत असेल तर ते एटीकेट्स म्हणून स्वीकारावे लागते.
क्रिकेट हा मूळ गोऱ्यांचा, ब्रिटिशांचा खेळ आहे. जिथे चेंडूची लकाकी कायम राहावी म्हणून संघातले सारे जण आळीपाळीने त्याला थुंकी लाऊन चोळतात. पण ते म्हणे हायजिन पाळतात आणि आपल्या भारतीयांना त्याची काही पडली नसते...
अच्छा ऐका ना,
थांबू का इथेच..
झोप आली आहे
पुढचे प्रतिसादात लिहितो ना...
शुभ रात्री !
चप्पल काढून कि खुर्चीवर
चप्पल काढून कि खुर्चीवर ठेवून यावर मतदान घेण्यात यावे ही विनंती. कुणाकडे चप्पल टेबलवर ठेवल्या होत्या ही माहिती असेल तर तो हॉ ऑप्शन ठेवावा.
हॉटेलने मध्ये मेडिकल ऑफिसर
हॉटेलने मध्ये मेडिकल ऑफिसर असतीलच. एक पॅथ लॅब पण ठेवावी. कोल्हापुरी चप्पल घालुन फिरणाऱ्या कष्टमराने प्रवेश केला की मेडिकल ऑफिसर त्यांच्या हातापायाची नखे, दात, डोळे, कान, नाक, कोल्हापुरी चप्पल सगळे तपासुन स्किन सॅम्पल, CBC, CRP, WBC Differential, Antibody अशा काही जुजबी चाचण्या घेऊन रिझल्ट्स ये पर्यँत quarantine करतील. जे पास होतील त्यांनाच पुढच्या दालनात प्रवेश मिळेल. तिथे कष्टमर आपले कपडे लॉकर मध्ये ठेवून शॉवर घेऊन हॉटेलने दिलेला स्टरलाईझ्ड पोशाख घालुन भोजन दालनांत प्रवेश करू शकतील.
आता इथे पायाच्या नखांचा फोटो
आता इथे पायाच्या नखांचा फोटो डकवू नये इतका कॉमन सेन्स असेल असं धनश्री आणि विकु तुम्हाला वाटलं असेल ना? पण आता माबोवरही नियम करा की कारण नसताना फंगल नेलचा फोटो डकवलातर आयडी उडेल.
(No subject)
मानव

मानव, एवनसी आणि थायरॉईड पण अ
मानव, एवनसी आणि थायरॉईड पण अॅड करता का? एकात एक दोन कामं उरकुन जातील.
आधीच पाटी लावली असती तर ती
आधीच पाटी लावली असती तर ती बाई पाटी पाहुन परतली असती किंवा मांडी घालुन बसली नसती >>>म्हणूनच मला कितीही टोकदार आणि बोचणाऱ्या असल्या तरी पुण्यातल्या पाट्या आवडतात...सगळं कसं रोखठोक, पटलं तर घ्या, नाही पटलं तरी आहे हे हेच आहे......उगाच प्रत्येकाचे स्वतंत्र Assumptions उपटायचा प्रश्नच नाही.
तुमची आधीची पोस्ट आता पाहिली
तुमची आधीची पोस्ट आता पाहिली अमित, धन्यवाद
त्या चाचण्या इन्फेक्शनसाठी नसल्याने अतिरीक्त आकार लावतील बहुतेक.
हॉटेलात आपण खायला जातो तिथे
हॉटेलात आपण खायला जातो तिथे पादत्राणे खुर्चीवर ठेउन कोणी खात असेल तर हे अनहायजिनिकच आहे.
>>>>>
पादत्राणे नव्हती खुर्चीवर
पादत्राणे जमिनीवरच होती
पाय ते सुद्धा मांडी घातलेल्या स्थितीत होत्या खुर्चीवर
समारंभांना आपण खायला-प्यायला
समारंभांना आपण खायला-प्यायला जात नाही.
>>>>
पण दिले तर खातोच ना.. पाणी सरबत वेलकम ड्रिंक काहीतरी पितोच ना..
मग हायजीन काळजी अश्या सर्व जागी हवी असे मला वाटते.
मी खोर्याने पैसे कमावतो.
मी खोर्याने पैसे कमावतो. देईन की काय असेल तो आकार. काय समजता काय!
मी तर म्हणतो या टेस्टचे पैसे वीस पट लावावे. फक्त माझ्या सारखे खोर्याने कमावणारेच त्या करुन घेतील. ना रहेगी चप्पल ना कोई घालेगी मांडी!
<<<<
<<<<
तिच्या कंपनीची व्हॅल्यू २२६ कोटी आणि तिची स्वतःची संपत्ती १२५ ..............रतन टाटांनी त्यात गुंतवणूक केली आहे.
>>>>
अशी व्यक्ती स्टंट करेल असे वाटत नाही. >>>>>>>>>>>>>>>>>>>> ???? ऋन्मेष ...... सॉरी बॉस ---माझा नाईलाज आहे!!... 👇

मानव,
मानव,
तुम्ही उपरोधाने लिहिले आहे पण त्यातला कोल्हापुरी चपलेचा उल्लेख काढला तर अशा हॉटेल ला माझा नक्कीच पाठिंबा असेल. मी तिथे जाणार नाही, पण जे स्वखुशीने जाऊ इच्छितात त्यांना अडवू नये.
आमच्या खुर्च्यांचे सेंटर ऑफ
आमच्या खुर्च्यांचे सेंटर ऑफ मास मांडी घातल्यावर बदलते
>>>>>
ते का बदलेल.. eccentricity बदलू शकते with respect to मांडी.
पण मांडी घालणारा योग्य ती काळजी घेऊन दोघांचा CG मॅच करू शकतो.
यासाठी रेस्टॉरंट ने खुर्चीचा CG कुठे आहे याचे मार्किंग द्यावे. पण मांडी घालणाऱ्याचा अपमान करू नये..
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=yGAcJ3ZsRn8 या घटने वर अजून धागा आला नाही ?
फाविद,
फाविद,
?? ऋन्मेष ...... सॉरी बॉस ---माझा नाईलाज आहे!!..
>>>>>
असे म्हणून तुम्ही कोणाच्या पोस्टचा स्क्रीन शॉट दिला आहे?
बाकी माझे त्यावर मत म्हणाल तर,
त्या बाईशी जे झाले ते चुकीचे की योग्य हे ठरवताना नंतर त्या बाईने स्टंट केला की जेन्युइन बोलत होती याने फरक पडू नये. आपल्याला आधी तिच्याशी जे झाले त्यावरच मत व्यक्त करायचे आहे.
पण तरीही कोणाला ती बाई स्टंट करते आहे की नाही हे ठरवायचे असेल तर मात्र तिची पार्श्वभूमी बघू शकता.
दोन्ही वेगळे मुद्दे आहेत बघा.
अरे हो! आपण पृथ्वीवर,
अरे हो! आपण पृथ्वीवर, युनिफॉर्म ग्रॅव्हिटेशनल फील्ड मध्ये कायम असू असं नाही हे विसरुन गेलो.
खुर्चीची सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी हे तुमचा बॉडी मास इंडेक्स आणि त्या मासचा बॉडीत असलेला स्प्रेड याप्रमाणे बदलते. पण आम्ही बॉडी शेमिंग करत नसल्याने त्याचे मार्किंग/ प्रमाण/ गुणोत्तर देणे शक्य नाही. तरी तुम्ही आमच्या फिनटेस क्लबची पाच वर्षांची रिकरिंग मेंबरशिप घेतलेली असेल तर तो ढळलेला सेंटर ऑफ मास आम्ही तीन वर्षांत करेक्ट करतो. मग मात्र तुम्ही आमच्या स्पेषल खुर्चीवर मांडी घालुन क्लब मध्ये १ महिन्यासाठी मोफत सबस्क्राईब होता. त्याची वार्षिक २० लाख वर्गणी भरतील तर मग मांडी घातलेल्या सेक्शन मधील अरगोनॉमिक सेल्फ करेक्टिंग खुर्च्यांवर तुम्हाला बसायची मुभा असेल.
अश्वथाथामाजी यांची पण
अश्वथाथामाजी यांची पण एण्ट्री झाली

आता विषय सोडून त्वेषाने स्क्रीनशॉट्सची लयलूट होणार. मनोरंजनाचा हुकमी एक्का.
कपिल शर्मा शो मधे भांगडा चालू आहे तिकडे
अब तुम्हारे हवाले धागा साथियों !
मांडी नको, चपला नको असे नियम
मांडी नको, चपला नको असे नियम करण्यापेक्षा त्या एक्सक्ल्युझिव्ह करा...आणि पैसे कमवा. ही माझी आयड्या आहे तेव्हा दोन पैसे पाठवलेत तर नाही म्हणणार नाही. नाही पाठवलेत तर केस करण्याइतका मी रिकामटेकडा नाही. यंजॉय माडी!
>>>>>तर आयडी उडेल.
>>>>>तर आयडी उडेल.
अर्रे मी वन ऑफ मोस्ट निरुपद्रवी आय डीज आहे. मला कशाला उडवताय?
असे म्हणून तुम्ही कोणाच्या
असे म्हणून तुम्ही कोणाच्या पोस्टचा स्क्रीन शॉट दिला आहे?>>> मागचा धागा, तो ही तुमचाच...चर्चा देखील तिथलीच......स्वतःचे धागे तरी नीट वाचत चला.... निदान पेटवल्यावर, कितपत पेटलयं हे तरी काळजीपूर्वक बघा धाग्यावर.
पण तरीही कोणाला ती बाई स्टंट करते आहे की नाही हे ठरवायचे असेल तर मात्र तिची पार्श्वभूमी बघू शकता.>>> हेच मी केलं होतं...चला...निदान एका बाबीवर तरी आपल एकमत झालं...'त्या' धाग्यावर त्या वाक्याला पाठिंबा मिळाला असता तर प्रत्यक्ष धागाकर्त्याचा पाठिंबा मिळाला म्हणून हुरूप वाढला असता काहीसा... असो...
आता जर जगातला सर्वात श्रीमंत अभिनेता, आपले शा खा साहेब, मॅड फॅन फोल्लोइंग असणारे आपले सल्लू भाई ( हे पण काय कमी श्रीमंत आहेत??), या अशा महारथींना पीआर स्टंट्सच्या
कुबड्यासॉरी NOS सिलिंडर्स लागत असतील, तरया १२५ कोटींची मालकीण असलेल्या, आणिआपला हार्डअर्न पैसे खर्चणाऱ्या बापड्या मुलीने प्रसिद्धी स्टण्टच्या कुबड्या घेण्याचा यत्न केला, तर 'अजी म्या ब्रम्ह पाहिले' असे वाटण्या सारखे काय आहे बरे?>>>>मचमच करत पिझ्झा खात होती
>>>>मचमच करत पिझ्झा खात होती
ईईईईईईईईईई SSSSSS
फाविद
फाविद
शाहरुख फिल्मस्टार आहे. चित्रपट कलाकार स्टंट करतात तेव्हा त्यांना त्यातून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष आर्थिक फायदा होतो. बिजनेसवूमन करत असेल तर फायद्याची खात्री नाहीच उलट नुकसान होण्याची शक्यता जास्त.
अर्थात हा अंदाजच झाला.
पण मुळात तिने याचा फायदा उचलत स्टंट केला की नाही हा मुद्दाच मला इथे गौण वाटत असल्याने जे असेल ते...
मचमच करत पिझ्झा खात होती
मचमच करत पिझ्झा खात होती
ईईईईईईईईईई SSSSSS
>>>>>>
देवाने प्रत्येकाच्या तोंडाची रचना एकसारखी केली नसते. काहींच्या मचाक मचाक आवाज येतो तर काहींच्या नाही. काही लोकांचा गरम चहा पिताना सुद्धा फुरर्र आवाज येतो. बरेच लोकं अश्या आवाजी लोकांना नावे ठेवतात. जे चुकीचे वाटते.
बिजनेसवूमन करत असेल तर
बिजनेसवूमन करत असेल तर फायद्याची खात्री नाहीच उलट नुकसान होण्याची शक्यता जास्त. >>> यात रेड सेल्स स्पाईक्स बद्दल काय बोलत आहेत ते काळजीपूर्वक ऐका..आणि त्यांच्या हसण्याला निर्लज्जपणा म्हणून आपल्या मुर्खपणाचे खापर उगाच त्यांच्या माथी फोडू नका.
https://www.instagram.com/reel/DMnVAFAPnmF/?utm_source=ig_web_copy_link
धाग्याचा मूड कडवटपणाकडे
धाग्याचा मूड कडवटपणाकडे झुकतोय. माझा यात हातभार असेल तर मनापासून माफी.
फाईव्ह स्टार हॉटेल्सच नाहीत तर एक्सल्युजिव्ह डायनिंग हॉल जिथे पैसे घेऊन सार्वजनिक सेवा दिली जाते तिथे बोर्ड लावणे मला आक्षेपार्ह वाटत नाही. विपर्यास करून चर्चा होणार नाही. चूळ भरणे, ताटात हात धुणे हे सगळीकडेच सार्वजनिक शिष्टाचार म्हणून निषिद्ध समजले जाते. जरी घरात करत असतील तरी. त्यामुळं लोक फाईव्ह स्टार हॉटेल मधे असे वागतील असे समजून तशी उदाहरणे देण्याने कधीच आपला मुद्दा पोहोचणार नाही.
आता पुन्हा तीच उदाहरणे देणं जिवावर आलंय पण..
राजस्थान मधे मोझडी ही तिथल्या कल्चरचा भाग समजली जाते. तिथे अगदी राजेवाड्यातल्या हॉटेलमधे मोझडी चालते. पण दुसरीकडे कुठेतरी मोझडीचा वाद झाला होता. कुठे हे लक्षात नाही. संदर्भ देऊ शकणार नाही. कोल्हापुरी चप्पल कोल्हापुरात आणि महाराष्ट्रात सर्वत्र अशा डायनिंग हॉलमधे चालते. पण जुहू मधे मराठी कलाकारांसोबत वाद झाला होता (सर्च दिला कि सापडेल).
सैन्य दलांच्या मेसमधे ठरलेले संकेत असतात आणि तिथे फक्त युनिफॉर्म मधे असलेल्यांनाच (किंवा गेस्ट ऑफ ऑनर) प्रवेश असतो. त्यामुळे इथे नियम सांगत बसत नाहीत. इथल्या नियमात भेदभाव नाहीत. इथे चुकून जरी तुम्ही चमचा आणि काटा क्रॉस करून ठेवलात कि तुमचे जेवण संपले आहे असे समजतात. इथे कुणी नवखा येण्याची शक्यता नाही. शूज असल्याशिवाय प्रवेश नाही या नियमात लेडीजला सूट आहे. आता बहुतेक मेस मधेही नियम बदलले आहेत असे वाटते (नक्की माहिती नाही), पण ड्रेसकोड मधे जोधपुरी कोट चालतो. (सैन्य दलातले लोक प्लीज करेक्ट मी).
क्लबचं नाव घेत नाही. इथे पुण्यातले एका बिझनेस कम्युनिटीचे लोक येतात. या क्लब मधे इतरांना प्रवेश नाही. इथेही नवख्या माणसाला प्रवेश असण्याचा संबंध नाही.
जर वेगवेगळ्या शहरात आणि देशात अशा डायनिंग हॉल्सचे नियम बदलत असतील तर नवश्रीमंतांसाठी बोर्ड लावल्याने आभाळ कोसळत नाही.
असा बोर्ड लावणे म्हणजे आक्रीत आहे असे वाटत असेल तर अशांनी रोममधेच रहायला जावं ( व्हेन इन रोम ) कारण हा भारत आहे. जे कधीही अशा हॉटेल मधे गेले नाहीत त्यांच्यासाठी ट्युशन्स असाव्यात का ? उलट चोराची उंडवडी इथेही ताजची शाखा निघावी, तिथल्या ही लोकांना एटीकेट्स शिकवावेत. नवखे नको असतील तर सरळ क्लब प्रमाणे सदस्यता सुरू करावी. हॉटेलचे स्टॅण्डर्ड मेन्टेन करणार्यांनाच ती द्यावी. नोंदणीही तशीच करावी.
पन तुम्ही सार्वजनिक सेवा द्यायचा वायदा करून नोंदणी करत असाल तर नियम भारतीय कायद्यांचं उल्लंघन करणार नाहीत याची दक्षता घ्या. एखाद्याला अपमानास्पद वाटले तर त्याला जसे कायद्याची मदत घेण्याची मुभा असेल तसेच एखाद्याला त्या व्यक्तीमुळे त्रास असेल तर तिलाही कायद्याची मुभा घेता येणारच आहे. कायदा मोडून आक्षेप घेणं चुकीचं आहे हे मात्र ठाम आहे.
असं म्हटलं कि वाटेल ती उदाहरणे दिली जात आहेत. ते असो. या मुद्द्यावर एव्हढी चर्चा होतेय. हायजिनचा उल्लेख होतोय. सगळं ठीक.
काल कि परवा एका पुजार्याचे पाय धुवून एका भक्ताला त्याचे पाणी जबरदस्तीने प्यायला लावले. त्यावर मात्र ट्रोलर्स चिडीचूप आहेत. हे हायजेनिक असेल कदाचित. हा मुद्दा अस्थानी वाटेल . वाटला तर रिस्पेक्ट आहे. ट्रोलर्स म्हणजे काल व्हिडीओ पाहिल्यापासून असे जे व्हिडीओ फीड मधे सुरू झालेत त्यावर कमेंट्स करणारे लोक. एव्हढ्या खालच्या पातळीच्या कमेण्ट्स आहेत कि आपण कोणत्या जगात आहोत असे वाटावे. हेच का ते फाईव्ह स्टार मधल्या एटीकेट्ससाठी लढणारे ? ( काही आयडीज सेम आढळले).
जेव्हां सिरीयस चर्चेचा मूड असेल ती आता अशा ट्रोलिंग मुळे, तिरकस कमेण्ट्स मुळे आणि अनहायजेनिक ह्युमर मुळे शक्य नाही हेच खरे आहे.
मला कळला नाही तो व्हिडिओ. मला
फाविद,
मला कळला नाही तो व्हिडिओ. मला यातले फार कळत नाही. थोडे elaborate करता का. थोडी ज्ञानात भर पडू शकते.
मला कळला नाही तो व्हिडिओ. मला
मला कळला नाही तो व्हिडिओ. मला यातले फार कळत नाही. थोडे elaborate करता का. थोडी ज्ञानात भर पडू शकते.>>> तो टकलू फ्रेंच दाढी वाला(सॉरी आजून कशी ओळख सांगणार कोणता ते नाही सुचलं) द बॉंम्बे शेविंग कंपनिचा सीईओ आहे. तिच कंपनी जिच्यावरुन १८ कामाच्या तासांची कॉंट्रोवर्सी झालेली. त्याच्या आधी देखील त्यांनी एक कॉंट्रोवर्शीअल जाहीरात केलेली. तो त्यांचा सेल्स चार्ट(रेड लाईन) जिलेट च्या सेल्स ( ब्लू लाईन) सोबत कंपेर करुन दाखवतो आहे. त्या मधे तो स्पष्टपणे (with a wicked laugh) दोन्ही कॉंट्रोवर्सीज नंतर सेल्स मधे ह्यूज स्पाईक्स,( विक्रीत भरघोस वाढ) कसे आले ते सांगत आहे.
ओके
ओके
म्हणजे व्यवसायाला सुद्धा फायदा होऊ शकतो
Novelty items are objects
Novelty items are objects that are new, unusual, or humorous and often serve little to no practical purpose. >> आज उपहास परत वारला
पण समोरच्याला मराठी येतच नसेल तर हिंदी मध्ये बोलायला मला काही प्रॉब्लेम नाही. पण इंग्लिश आवरा.. >> मग तुला इंग्लिश येत नाही हे समोरच्याला सांगून बघ. कदाचित फरक पडेल
पकडे रहना, छोड़ना नहीं.....
पकडे रहना, छोड़ना नहीं.....
Pages