
(चिकवा वर लिहून पोस्टचं बटण दाबायचाच अवकाश होता, पण मग तिथे अधिक चर्चा नको म्हणूनत स्वतंत्र धागा सादर करत आहे. )
दोन असे सिनेमे जे सतत डोक्यात घोळत असतात. ज्यांची तुलना होऊ शकत नाही, पण केल्याशिवाय राहवत नाही.
दोन असे दिग्दर्शक ज्यांनी हिंदी चित्रपटजगतावर राज्य केलं. दोन असे अभिनेते ज्यांच्या मागे रसिक वेडे होते.
दोन असे ड्रीम प्रोजेक्टस ज्यांची आजही चर्चा होते आणो दोन्हीही कितीही वेळा पाहिले तरी काहीतरी नवं गवसलं असं वाटतं.
या दोन्हींची तुलना करू नये पण आज या वैयक्तिक संघर्षात समविचारी आणि विषमविचारी सर्वांनाच सामील करून घ्यायचे आहे.
प्रश्न आहे या दोन्हीत उजवा सिनेमा कुठला ?
(तुलनाच होऊ शकत नाही हे मान्य आहे. पण जसं एखाद्या ठिकाणी प्रश्न देतात कि या दोन्हीची तुलना करा, तर करावीच लागते ना ? तसं समजा )
सिनेसृष्टीत अनेक महत्वाकांक्षी निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते येऊन गेले. त्यांनी आपापले महत्वाकांक्षी सिनेमे सादर केले. ज्याला ड्रीम प्रोजेक्ट्स म्हटले गेले.
यात सर्वात महत्वाचे नाव म्हणजे राज कपूर. राज कपूरला ग्रेटेस्ट शोमन ऑफ इंडीया म्हटले जाते. राज कपूरचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणजे मेरा नाम जोकर. (नंतर बॉबी आणि सत्यम शिवम सुंदरम ला पण ड्रीम प्रोजेक्ट म्हटले गेले, पण मेरा नाम जोकर हा त्याचा सर्वाधिक चर्चा असलेला सिनेमा आहे). शोमनची व्याख्या काय ? जर व्याख्याच पहायची तर गुरूदत्त सुद्धा या स्पर्धेत कमी नाही.
एखाद्या शो चे असे थेट्रिकल प्रेझेंटेशन ज्यात ड्रामा जास्त असतो (शुद्ध मराठीबद्दल क्षमा असावी).
पण काही काही टर्म्स या अंदाजाने वापरल्या जातात आणि त्याचा तोच अर्थ असतो. उदा राज कपूर सिनेमा ज्या स्केलला घेऊन जातो, त्या काळात ते कुणाला जमलं नाही. चार्ली चॅप्लीनचं कॅरी केचर असलेलं पात्र आणि त्याच्या माध्यमातून सामाजिक व्यंग टिपत कला, संगीत यांचा सोहळा म्हणजे राज कपूरचा सिनेमा. आज भन्साळी मला शोमन म्हणा म्हणून झपाटल्यासारखे सिनेमे काढतो. पण व्यंग टिपण्यात तो खूप मागे आहे.
(गुरूदत्तचे सिनेमे ही वेगळी कॅटेगरी आहे. त्यावर नंतर कधीतरी बोलूयात. उलट मायबोलीवर अनेक जाणते आहेत त्यांनी गुरूदत्त वर लिहायला हवे. )
दुसरा अभिनेता , निर्माता म्हणजे देव आनंद. खरे तर देव आनंद आणि विजय आनंद ही जोडीच म्हणायला पाहीजे. कारण देव आनंद दिग्दर्शक म्हणून किती वाईट आहे हे सांगायला नकोच. पण विजय आनंद !
एक से एक चित्रपट. विजय आनंद आणि राज कपूर या दोघांनाही संगीताची उत्तम जाण होती. अर्थातच देव आनंदलाही.
देवने जेव्हां गाईड कादंबरी वाचली तेव्हां तो झपाटून गेला. त्याने यात एक आंतरराष्ट्रीय सिनेमा पहायला सुरूवात केली. त्याला अनेकांनी वेड्यात काढलं. काहींनी सांगितलं कि आर के नारायण यांनी यात एव्हढी भारतीय मूल्ये दाखवली आहेत कि आंतरराष्ट्रीय सिनेमा बनवण्याचा वेडाचार तू करूच नकोस. यावर देव आनंदचं म्हणणं होतं कि एखादी कलाकृती जेव्हढी मातीतली असती तेव्हढीच ती आंतरराष्ट्रीय होते. उदा ताजमहाल, अजंठा वेरूळ, खजुराहो. आपण भारतीय कथा जर आंतरराष्ट्रीय मंचावर मांडलीच नाही तर ती कलाकृती आंतरराष्ट्रीय होणारच नाही.
देव आनंदने गाईड साठी दोन टीम बनवल्या. एक हिंदी आणि एक इंग्रजी.
हिंदीची जबाबदारी त्याने विजय आनंदला दिली. इंग्रजी चा विचार आपण इथे नको करायला. इंग्रजी सिनेमा पडला आणि विस्मरणात गेला. पण २००७ च्या कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात तो प्रदर्शित झाला आणि त्याने अनेक पुरस्कार मिळवले. देवचं स्वप्नं पूर्ण झालं. त्याचे बोल खरे झाले. इंग्रजी चित्रपट कादंबरीहुकूम होता.
पण विजय आनंदने पूर्ण स्वातंत्र्य घेतलं. इतकं कि आर के नारायण एकदा मिस्किल होऊन म्हणाले कि बहुतेक यांनी माझं नाव चुकून वापरलं. अर्थात थीम तीच आहे. गाईड हिट झाला.
गाईड बघताना अनेकदा मागच्या वेळी या सीनचा हा अर्थ लक्षात आला नव्हता असं वाटतं. मेरा नाम जोकर पहिल्यांदा पाहिला तेव्हां काय बंडल पिक्चर असं वाटलं होतं. पण कळत्या वयात पारायणं झाली तेव्हां राज कपूर मधला थोर दिग्दर्शक समजत गेला.
अशा या दोन सिनेमांची तुलना करावी का ?
कारण विजय आनंदला कधीच शोमन म्हटलेलं नाही. हीच तर माझ्या आतल्या भांडणाची सुरूवात आहे. व्याख्येप्रमाणे तर विजय आनंद गाईडच्या बाबतीत मेरा नाम जोकर पेक्षा जास्त ड्रामा दाखवतो. इतकंच नाही तर नृत्य संगीताच्या बाबतीत मेरा नाम जोकरच नाही तर आरकेच्या कोणत्याही सिनेमापेक्षा भारी पडतो. पण तो एका स्वप्नील दुनियेत नेत नाही. सामाजिक व्यंग दोन्हीही सिनेमे टिपतात. तरी विजय आनंदला फक्त स्पेशालिस्ट डायरेक्टर हेच टायटल राहीलं. तो शोमन होऊ शकला नाही. का नाही ? या विचारातून मग ही तुलना करण्याचं साहस केलंय.
मेरा नाम जोकर एका कलाकाराची तीन स्तित्यंतरं दाखवतो. हा वैयक्तिक आणि भावनाप्रधान चित्रपट आहे. तो त्याच्या भावविश्वात आपल्याला घेऊन जातो. त्या कलाकाराच्या स्वप्नांची सफर घडवून आणतो.
गाईड हा राजू गाईडच्या जेलमधून सुटल्यानंतर आपल्याला फ्लॅशबॅकमधून उलगडत जातो. यात रोझीची कथा येते. रोझी चं कॅरेक्टर हिंदी चित्रपटसृष्टीसाठी धाडसच होतं. यासाठी सुद्धा देव आनंदला सल्ले मिळाले होते. ते धुडकावून त्याने स्वतंत्र विचाराचं एक स्त्री पात्र दाखवलं आणि तिला नायकाइतकंच महत्व दिलं. गाईड मधे नायकच कसा बरोबर हे दाखवलेलं नाही. त्याचं अधःपतन, त्याचा इगो ठळक केला आहे. ती स्वतंत्र होऊ पाहणारी नायिका आहे. अष्टनायिकेच्या व्याख्येत न बसणारी. तिचा नवरा एक ख्यातनाम पुरातत्त्वशास्त्री आहे. पण तिला त्याच्या सावलीत रमायचं नाही. तिच्यात टॅलंट आहे. तिच्या इच्छा आकांक्षा आहेत. छोटी छोटी स्वप्नं आहेत. ती राजू गाईड ओळखतो. तो तिच्या स्वप्नांना पंख देतो. इथे नवरा बायकोच्या वयातलं अंतरच नाही तर अनेक बाबतीतलं अंतर हे पुन्हा पुन्हा पाहताना लक्षात येतं.
पती पत्नी पूरक असू शकतात. त्यांनी एकमेकांना कॉम्प्लिमेंटरी असायला हवं हे स्वतःच्या महानतेत गर्क असलेल्या नवर्याच्या गावीही नाही. भारतात हे कॉमन आहे. त्याच्या सामाजिक स्थानाच्या दबावापोटी अनेक स्त्रिया कसंबसं आयुष्य कंठत राहतात. ते खूप बोरिंग असतं असंही नाही. बस, स्वतंत्र ओळख हवी असणारीला ते अशक्य असतं. हे पात्र विजय आनंदने पूर्ण ताकदीने उभं केलं आहे. एव्हढ्या ताकदीने राज कपूर सुद्धा कधीही त्याची नायिका उभी करत नाही. त्याची थीम ही कॅरेक्टरच्या वर असते (मतभेदांचे स्वागत).
गाईड मधे देव आनंदचा राजू गाईड हा तिच्यासाठी गाईडच राहतो. तो तिचा ताबा घेत नाही. म्हणजे सिनेमा तसं सांगत नाही. नायक मात्र तिने धोका दिला या समजात राहतो. त्याच्या या समजात दिग्दर्शक प्रेक्षकाला सामील करून घेत नाही. त्याच्या चुका स्पष्ट दाखवतो.
मेरा नाम जोकर मधे राजू तीन स्त्रियांच्या प्रेमात पडतो. दुसर्या आणि तिसर्या प्रेमात त्या त्याचा वापर करतात. इथे सहानुभूती नायकाला दिली जाते. त्याच्या नायिका कुठल्या कुठे पोहोचतात पण हा आहे तिथेच राहतो. इथे राजकपूरने पडद्यावर चार्ली चॅप्लीनच्या ट्रँपच्या भूमिकेतल्या कलाकाराचेच पडद्यावरचे चरित्र पडद्यावर उभे केले आहे. हे आत्मचरित्र नक्कीच नाही. त्यामुळं हा चित्रपट वेगळा आहे. यात बालवयातलं प्रेम यावर पहिल्यांदा भाष्य केलं आहे. आज सर्रास क्रश म्हणून टीचर होते असं बोललं जातं. त्या वेळी असं बोलायची चोरी होती.
गाईड मधे प्रेमात विफल झालेला नायक गुन्हेगारीमुळे तुरूंगात जातो. तिथून बाहेर पडल्यावर "वहां कौन है तेरा, जायेगा कहा" असं म्हणत थंडीने कुडकुडत असताना एक साधू त्याच्या अंगावर त्याची भगवी शाल घालतो. त्यावरच्या मजकुरामुळे हा ही साधू असावा म्हणून लोक त्याला हात जोडू लागतात. इथे सिनेमा वेगळाच ट्रॅक पकडतोय असे वाटते. इथे अनेक सामाजिका व्यंगांवर सिनेमा भाष्य करतो.
लोकांचा देवभोळेपणा. दगडालाही हात जोडायची वृत्ती, भगव्या कपड्यातल्या कुणावरही विश्वास ठेवणे हे दाखवले आहे.
गाईड मधे एक function at() { [native code] }इशय महत्वाचे भाष्य केलेले आहे ज्यावर प्रोफेसर पुरूषोत्तम अगरवाल नेहमी दाखले देतात.
राजू गाईड लोकांना सल्ले देत असतो. ते अर्थात त्याने धक्के खाल्ल्याने आलेल्या शहाणपणातून दिलेले असतात. पूर्वी गाईडच्या धंद्यात लोकांचा अंदाज घेत बोलायची त्याची कला इथे उपयोगी पडते. पण यामुळे स्थानिक पुजारी वर्गाचा आपला धंदा बुडेल या भीतीने संताप होतो. या ढोंगीला उघडे केले पाहीजे म्हणून ते त्याला संस्कृतमधे वाद विवादाचे आव्हान देतात. त्यांच्या प्रश्नाला देव आनंद उत्तर देऊ शकत नाही. इथे ते म्हणतात "ये क्या बोलेगा ? संस्कृत आती हो तब ना ?" मग देव आनंद अस्खलित इंग्रजीत एक छोटेखानी भाषण करतो. त्या पुजार्यांची तोंडं बघण्यासारखी होतात. मग देव आनंद म्हणतो " ये क्या बोलेंगे, अंग्रेजी आती हो तब ना ?"
इथे सामान्य लोक अगदीच हेल्पलेस दाखवलेत. त्यांना दोन्हीही भाषा येत नसतात. प्रोफेसर अगरवाल म्हणतात कि आपल्याला न येणार्या भाषेत सांगितलं कि ते भारी असा लोकांचा समज आहे. आणि या भाषा येणारे महापंडीत असे लोक समजतात.
संस्कृत येत असतानाही तुलसीदासांनी कधीही संस्कृत मधे लोकांशी संभाषण केले नाही. त्यांनी अवधी भाषेत रचना केल्या. कबीराला संस्कृत उत्तम येत असतानाही त्याने कधी संस्कृतचा वापर नाही केला. रहीम यांना फार्सी येत असताना त्यांनी उर्दू, फार्सीचा उपयोग केला नाही. कारण त्यांचे तत्त्वज्ञान साधे सोपे होते. आणि लोकांना कळण्यासारखे व पटण्यासारखे होते. ते लोकांच्याच भाषेत सांगायला हवे होते. म्हणून त्यांना जड भाषेचा वापर करून ते थोपवायची गरज पडली नाही.
आज अनेक बाबा, महाराज उगवले आहेत. त्यांचा इतिहास काही वेगळाच आहे. राजू गाईडचा महात्मा बनण्याची प्रोसेस अशीच व्यंगात्मक टिप्पणी आहे. पण पुढे सिनेमा खरोखरच वेगळ्या उंचीवर नेला आहे. उगीचच हाय पॉईण्ट हवा म्हणून ते केलेले नाही. किंवा आता सिनेमा कसा संपवावा , क्लायमॅक्स ला हाय पॉईण्टला नेल्याशिवाय तरणोपाय नाही या क्लिशेपायी केलेला अट्टाहासही नाही.
इथे राजू गाईड ची तुलना पिंजराच्या मास्तरसोबत करता येईल. पिंजराचा मास्तर जिवंतपणीच आपला पुतळा बघतो. त्याला त्या आदर्श मास्तरच्या गावकर्यांच्या मनातल्या प्रतिमेला तडा द्यायचा नसतो. आता त्याचे जे अधःपतन झाले आहे त्यामुळे गावकर्यांचा चांगुलपणावरचा विश्वास उडेल म्हणून मास्तर आपल्या प्रतिमेचे मरण स्विकारतो. राजू गाईडला आपला भूतकाळ जर समोर आला आणि जर आपण फ्रॉड आहोत हे समजले तर लोकांनी ज्या "गाईड" वर एव्हढा विश्वास टाकला त्याच्याकडून फसवणुक झाली असे वाटते. कुठेच पळून जायला मार्ग नसतो. हा क्लायमॅक्स नेमका आहे.
मेरा नाम जोकर मधे चार्ली चॅप्लीनच्या आयुष्यापासून प्रेरणा घेतली आहे. असे अनेक विनोदवीर होऊन गेले ज्यांनी आपलं दु:खं लपवलं पण लोकांना हसवलं. कारूण्याची झालर असलेला विनोद श्रेष्ठ या समजावर हा चित्रपट आहे. हा गाभा न समजल्याने लोकांना तो पचला नाही. न चालण्यामागे अन्य कहाण्या आहेत. राज कपूरने षडयंत्राचा आरोपही केला होता. त्याची थीम काळाच्या पुढे होती असे आता म्हटले जाते.
अशा पार्श्वभूमीवर तुलना केली तर दोन्हीत उजवा कुठला हे आता अवघड नाही. तरीही आपण अजून काही मुद्दे पाहूयात.
कथा आणि थीम
मेरा नाम जोकर : - (राजू) च्या जीवनाचे तीन अध्याय – प्रेम, अपयश, आणि कलाकाराचा संघर्ष. आत्मचरित्रात्मक, भावनिक, आणि व्यंग्यात्मक.
गाईड : - टूर गाईड राजूची कथा – प्रेम, महत्वाकांक्षा, आणि आध्यात्मिक मुक्ती. सामाजिक संदेश (महिलांचं स्वातंत्र्य, आत्मशोध).
तुलना - गाईड अधिक संतुलित आणि युनिवर्सल थीम.
कलाकार
मेरा नाम जोकर : - राज कपूर (मुख्य भूमिका), रिशी कपूर (डेब्यू), सिमी गारेवाल, धरमेंद्र. राज कपूरचा जोकर अविस्मरणीय.
गाईड : -देव आनंद (राजू), वहीदा रहमान (रोसी). देव आनंदची भूमिका क्रिटिकल आणि भावनिक.
तुलना - देव आनंद आणि वहीदा यांचा केमिस्ट्री अप्रतिम.
संगीत
मेरा नाम जोकर : - शंकर-जयकिशन, शैलेंद्र. गाणी जसे "जीना यहां मरना यहां" भावुक.
गाईड : - एस. डी. बर्मन, शैलेंद्र. गाणी जयहांआज फिर जीने कि तमन्ना है" आणिहैपिया तोसे नैना लागे रे" कालातीत. शैलेंद्रच्या "दिन ढल जाये" या गाण्याला पुरस्कार मिळाले.
तुलना - Guide – बर्मनदांचे संगीत अधिक प्रभावी. पुरस्कारविजेते. ( एसजे आणि एसडी हे दोघेही अत्युच्च प्रतिभावान संगीतकार आहेत).
दिग्दर्शन
मेरा नाम जोकर : - राज कपूरचा परीस स्पर्श – लांबलचक (४ तास), तीन अध्याय.
गाईड : - विजय आनंदचे स्टायलिश दिग्दर्शन – सॉंग पिक्चरायझेशन आणि एडिटिंग उत्कृष्ट.
तुलना - Guide – अधिक संक्षिप्त आणि तांत्रिकदृष्ट्या भक्कम.
क्रिटिकल रिस्पॉन्स
मेरा नाम जोकर : - सुरुवातीला टीका (लांबलचक), नंतर मास्टरपीस
गाईड : -यशस्वी – फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट चित्रपट, दिग्दर्शक, अभिनेता, अभिनेत्री. म्हणून नावाजला गेला.
तुलना - Guide – क्रिटिकल रिव्ह्यूजमध्ये उजवा.
लिगसी (वारसा)
मेरा नाम जोकर : - कलात्मक धाडस, राज कपूरचे आत्मचरित्र (असा बोलबाला आहे).
गाईड : - आंतरराष्ट्रीय यश, सामाजिक संदेश.
तुलना : दोन्ही उत्तम, पण Guide अधिक प्रभावी.
निष्कर्ष
कोणता उजवा ठरतो?
गाईड उजवा ठरतो. कारण: व्यावसायिक यश, पुरस्कार (फिल्मफेअर स्वीप), आणि आंतरराष्ट्रीय मान्यता ( कान्स फेस्टिव्हल) यामुळे गाईड तुलनेने अधिक प्रभावी आहे. मेरा नाम जोकर वैयक्तिक आणि भावनिक आहे, पण त्याची लांबलचकता आणि सुरुवातेचे अपयश यामुळे गाईड पेक्षा कमी यशस्वी. दोन्ही चित्रपट बॉलीवूडचे मैलाचे दगड आहेत, पण गाईड ची कथा, संगीत, आणि दिग्दर्शन अधिक संतुलित आहे.
संदर्भ: विकिपीडिया, IMDB, The Hindu. ग्रोक
उगाच वाड-वडिलांच्या त्या
उगाच वाड-वडिलांच्या त्या काळातल्या आवडी-निवडीचे आता वाभाडे काढून काही सिद्ध होत नाही. आपल्या आताच्या आवडीच्या सिनेमांची काही वर्षांनी हीच गत होणार आहे. >>> फेफ - ही तेव्हाच्या लोकांच्या आवडीवर टीका नाही. माझ्या आईवडिलांनाही हे पिक्चर आवडायचे
त्यांना पुरवल्या गेलेल्या करमणुकीवर किंवा सटल मेसेजिंगवर रोख आहे.
तुलनेवरुन आठवलं. दिलिप्/राज्
तुलनेवरुन आठवलं. दिलिप्/राज्/देव यांचे तीन चित्रपट (गोपी/मेरा नाम जोकर/जॉनी मेरा नाम) एकाच आठवड्यात रिलीज झाले होते. तिन्हि चित्रपट आपापल्या जॉनरंवर चांगले होते पण तूफान चालला मात्र जॉनी मेरा नाम. मेरा नाम जोकर थोडा बायोपिकच्या मार्गाने गेल्यामुळे असेल कदाचित पण खूप लेंग्दि होता. त्या काळात दोन इंटरव्ल्सचा चित्रपट काढणं हे आर्थिक दृष्ट्या धाडसाचं होतं, आणि त्याचे परिणाम पुढे राज कपूरला भोगावे लागले.
गाईड इज ए मास्टरपिस. चित्रपटाची सगळी डिपार्टमेंट्स हार्मनाय्ज झाल्याचं उत्तम उदाहरण. चित्रपटाच्या नायकाचं ट्रांस्फॉर्मेशन (मामुली गाईड ते संतपद) यात आणि गांधीजींचा साउथ आफ्रिका ते महात्मा इथवरचा प्रवास यात विलक्षण साम्य आहे...
Pages