Submitted by माबो वाचक on 1 September, 2025 - 03:40
कॉलेजच्या कट्ट्यावर बसून, तोंडाचा चंबू करून संगिता सेल्फी काढत होती. इतक्यात तिचा प्रियकर मकरंद तिथे पोहचला.
“अ ला वाटले नव्हते, तू कधी असा वागशील!” आल्याआल्याच संगीने मक्याला झाडला.
“हा अ कोण आहे? आणि त्याला वाटण्याचा काय संबंध?” मक्याचा बावळट चेहरा आणखीनच बावळट झाला.
“अ नाही अी”
“आता ही अी कोण? अ ची प्रेयसी आहे का? नक्की कोणाबद्दल बोलतीयेस तू?”
“आज्या अद्दल”
“कोण हे आज्या अद्दल? मला फक्त अजय-अतूल माहिती आहेत.”
“अरे आकडा .....”
“कोणता आकडा? आकङे सांगायला मी काय पप्पू मटकेवाला आहे का?”
“अरे गाढवा मी मी मी. माझ्याबद्दल बोलतीय मी. शेवटी केलीसच ना माझी लिपस्टिक खराब. आता मसणात जा, माकडा.”
(टीप : पुलंच्या केशर अडगावकर वरून प्रेरित)
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
“ ते दुसर्या एका पुस्तकात
“ ते दुसर्या एका पुस्तकात आहे. नक्की कोणत्या ते आठवत नाही.” - ते “असा मी, असामी“ मधेच आहे. पुस्तकात आहे, ऑडिओमधे नाहीये. केशर मधूला ‘एक वेळ ह्यांच्याबरोबर जाईन, पण तुझ्याबरोबर येणार नाही‘ सांfunction at() {
[native code]
}ए तेव्हा.
हो फेफ ते आता आठवले. पण माझा
हो फेफ ते आता आठवले. पण माझा संदर्भ हसवणूक मधल्या एका लेखाचा होता
श्रद्धाने आठवण करून दिली.
सॉर्री जरा अवांतर झाले. माबो वाचक - शशक जमली आहेच मस्त. त्याबद्दल लिहायचे राहिले. एकदा क्लू मिळाला की बर्याच ठिकाणी तो "अ" वापरला आहे ते पुन्हा वाचताना लक्षात येते
मात्र मूळ कल्पनेप्रमाणे इथे लिपस्टिक बिघडली ती फक्त "स्वतःच्याच" ओठांना ओठ लागल्याने, हे वाचून जरा भ्रमनिरास झाला
जमली आहे शशक.
जमली आहे शशक.
स्वतःच्याच" ओठांना ओठ लागल्याने, हे वाचून जरा भ्रमनिरास झाला >>>
ओठाला ओठ न लावता बोलणारी ‘(
ओठाला ओठ न लावता बोलणारी ‘( स्वतःच्या) आपली सरोज खरे‘. >>
केशर मडगावकर>>>> वर्ण आणि केस सोडून बाकी सगळ कसं पांढर सफेद
लिपस्टिक वरची शशक छान जमलीये.
लिपस्टिक वरची शशक छान जमलीये.
जबरी! आवडली.
जबरी! आवडली.
भारीये. आअदद्ल एकशे एक ओदक!
भारीये. आअदद्ल एकशे एक ओदक!
अत्यंत भारी जमली आहे ही शशक!
अत्यंत भारी जमली आहे ही शशक!
केशर मडगावकरचा संदर्भ एकदम बरोबर आहे. सरोज खरेही तसंच बोलते.
भारी !!
भारी !!
Pages