
तर.......वरणभाताला फारच ग्लॅमर प्राप्त झाले आहे .

आणी शिरा बिचारा उपेक्षित राहिला. इतका की अगदी मीम्स मटेरियल झाला. कुठे विचारताय...
इथे बघा.
https://www.maayboli.com/node/87033?page=9#new
तर.....अजून फार मीम्स येण्याच्या आत, झटपट शिर्याची
सजावट बघा आणी सांगा कशी झाली आहे. हा रव्याचाच पण वेगळ्या पद्धतीने बनवलेला माखंडी शिरा आहे.
रेसिपी:
साहित्य
१ वाटी रवा
२ वाटी दूध
१ वाटी साखर
१ वाटी साजूक तूप
वेलची पूड
हवा तेवढा सुका मेवा
रवा दुधात भिजत घातला. साधारण तासभर. आवडत असेल तर कढईत तूप गरम करून त्यात सुकामेवा तळून घ्यावा . तो काढून बाजूला ठेवावा . आता महत्त्वाची स्टेप.
गरम तूपात साखर घालावी कॅरॅमलाईज करून घ्यावी. जास्त केल्यास कडू होईल . त्यात भिजवलेला रवा घातला. छान मिक्स करून घ्यावा . छान वाफ द्यावी . नंतर त्यात सुकामेवा व वेलची पूड घालावी . शिरा तयार आहे.
सुरेख सजावट.
सुरेख सजावट.
सुरेख सजावट.. विशेषत: such
सुरेख सजावट, विशेषत: such sharp clean lines !
फार आवडली 👌
निल्स, जवळ जवळ सर्व
निल्स, जवळ जवळ सर्व प्रकारच्या स्पर्धेत भरघोस यश प्राप्त केल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन !
(No subject)
सुंदरच.
सुंदरच.
Pages