शशक २- धक्का- अजिंक्यराव पाटील

Submitted by अजिंक्यराव पाटील on 29 August, 2025 - 11:59

काहीतरी बिनसलंय आजकाल.. कांदेपोहेपासून ते मध्यरात्रीच्या आईस्क्रीमपर्यंतचा प्रवास, त्याची स्वप्नं, त्याच्यातलं लहान मूल. लग्नानंतर चार वर्षं हरवलंच.. सतत काम, तणाव, चिडचिड..असा कसा बदलला?

बेलने तंद्री भंगली, दारातून म्हटला, "तयारी कर.. बाहेर जायचंय"

गाडी शहराबाहेर येऊनही एक शब्दही बोलला नव्हता. अचानक एका ठिकाणी त्याने गाडी थांबवली. नजर जाईल तिथवर शेतात कुणी चिटपाखरूही नव्हतं. एका बाजूला जुनाट बंगला.. त्याने तशाच मेलेल्या डोळ्यांनी खिशातून काहीतरी बाहेर काढलं आणि त्याच्या डोळ्यात एक वेगळीच झाक दिसली.. ती जवळजवळ ओरडलीच..

"मला वाटले नव्हते, तू कधी असा वागशील!"

आणि
.
.
.
ती त्याला घट्ट बिलगली!

आता त्याच्या डोळ्यातलं ते बाळ म्हणत होतं..

आपलं पहिलं स्वप्न, आपला बंगला!

Group content visibility: 
Use group defaults

हुकली नाही म्हणता येणारं पण एकदा पुन्हा वाचून बघता का !

विरामचिन्हे जागच्या जागी आहेत का आणि काटछाट करताना (१०० शब्दांसाठी) एखादा महत्त्वाचा शब्द उडालाय का?