शशक - १ - निरोप - शर्मिला र.

Submitted by शर्मिला. on 28 August, 2025 - 01:47

शशक - १ - निरोप - शर्मिला र.

तिच्याशिवाय एक दिवसही घालवायची कल्पनाच त्याला सहन होत नव्हती. खूप प्रेम होतं त्याचं तिच्यावर.

पण.. आता अगदी नाईलाजच झाला होता.

‘मी आता या वयात अजिबात बदलणार नाही, तुझा निर्णय तू घे.’ आईचे निर्वाणीचे शब्द होते.

ती आणि आई एका छताखाली रहाणं शक्यच नव्हतं.

आईही हवीच तर होती त्याला. म्हणूनच गेले काही दिवस अस्वस्थ होता तो.

त्याच्यातला बदल तिलाही जाणवत होताच. पण विचारणार कसं?

‘हिला कळणार आहे का, सांगून काही?’ तो मूक होता.

‘काही महीने फक्त...’ त्याचा गळा दाटून आला होता.

आणि तिने विस्मयचकीत नजरेने त्याच्याकडे बघितले.

तिथे बरेच ‘म्याव.. ‘ ऐकू आले.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>>>नालायका, तू असा वागशील मला वाटले नव्हते Happy
हाहाहा ऋन्मेष चापलूसगिरी केलीये हां तुम्ही. दुसरं शशकही घुसडलय गुपचूप Lol यु डु समथिंग लाईक धिस आणि तुमचे सर्व गुन्हे माफ होतात.

मुलाकडे ही सिच्युएशन येऊ घातली आहे>> पण ती आई मी नसून सुनेची आई+ वडील आहे.
सून मुलगा × तिचे आई वडील हा सामना येत्या महिन्यात होणार आहे.
मी इथे बसून टेन्शन घेतेय. दोन्ही पार्टीना दुसऱ्याची बाजू समजावून सांगायचा प्रयत्न करतेय. ( धोका... धोका... कुठल्याच गटाला मी आपली वाटत नाहीय)

आह्ह गॉट इट Happy शर्मिला म्हणजे विस्मयचकित नजरेने बायको ने नवर्‍याकडे पाहीले कारण नवर्‍याने स्वतःच्या म्हणजे त्याच्या सासूच्या आगमना प्रीत्यर्थ एवढी मोठी तडजोड करण्याचा निर्णय घेतला Happy
------------
शर्मिला, तू टेन्शन घेऊ नकोस. मजा येते अर्थ लावायला.

दोन्ही पार्टीना दुसऱ्याची बाजू समजावून सांगायचा प्रयत्न करतेय. ( धोका... धोका... कुठल्याच गटाला मी आपली वाटत नाहीय) >> Lol आता उलट प्रयत्न करुन बघू शकता. कदाचित जास्त मज्जा येईल. Lol

आता उलट प्रयत्न करुन बघू शकता. कदाचित जास्त मज्जा येईल.
>>>>>>
अमितव हो Proud
दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ झाला पाहिजे अशीच आपल्याला शिकवण आहे Proud

तिथे बरेच ‘म्याव.. ‘ ऐकू आले. >> शेवटचा ट्विस्ट छान झालंय..
नाहीतर आधी बायकोच असेल असं वाटतं .

आईखतर काही महिन्यासाठी माऊला पेट केअरमध्ये ठेवायला निघालेला मुलगा ,
म्हणजे नक्की अमेरिकेचा( परदेशात राहणारा असावा) / कदाचित तुमचीच गोष्ट असेल असा अंदाज होता..
Happy

Pages