शशक - १ - निरोप - शर्मिला र.

Submitted by शर्मिला. on 28 August, 2025 - 01:47

शशक - १ - निरोप - शर्मिला र.

तिच्याशिवाय एक दिवसही घालवायची कल्पनाच त्याला सहन होत नव्हती. खूप प्रेम होतं त्याचं तिच्यावर.

पण.. आता अगदी नाईलाजच झाला होता.

‘मी आता या वयात अजिबात बदलणार नाही, तुझा निर्णय तू घे.’ आईचे निर्वाणीचे शब्द होते.

ती आणि आई एका छताखाली रहाणं शक्यच नव्हतं.

आईही हवीच तर होती त्याला. म्हणूनच गेले काही दिवस अस्वस्थ होता तो.

त्याच्यातला बदल तिलाही जाणवत होताच. पण विचारणार कसं?

‘हिला कळणार आहे का, सांगून काही?’ तो मूक होता.

‘काही महीने फक्त...’ त्याचा गळा दाटून आला होता.

आणि तिने विस्मयचकीत नजरेने त्याच्याकडे बघितले.

तिथे बरेच ‘म्याव.. ‘ ऐकू आले.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

“मला वाटले नव्हते, तू कधी असा वागशील!”
हे आधी वाचले असते तर विस्मय चकित नजरे नंतर इथेच घातले असते. टू इन वन..

आवडली Happy
हे निर्णय आधीच घ्यायचे असतात..
किंवा मनाची तयारी आधीच करायची असते.

म्याव नाही कळाले पण>> आणि मला वाटले मी संत्रे सोलले. मालिदो.

लिहितांना काही गोष्टी आपल्या मनात, नजरेसमोर असतात. तेव्हा लक्षातच येत नाही की जे आपल्या मनात आहे ते इतरांना आपोआप कसं कळणार..

आता मला लक्षात येतय... कथेतील ही सिच्युएशन मी गृहीत धरली आहे.

शेवटचे वाक्य काय ते कळले की झाले>> तेच वाक्य तर सोलण आहे.
नाहीतर सास बहु एकता कपूर ड्रामा झाला असता.

नाहीतर सास बहु एकता कपूर ड्रामा झाला असता.>>>> मला आधी वाटलं होत की मला ते वाक्य समजलंय. पण आता रकता कपूर मुळे पुन्हा बुचकळ्यात पडलोय.

मला वाटले की मला कळाली आहे. फक्त शेवटचे वाक्य काय ते कळले की झाले
>>>>>>

म्हणजे तुम्हाला कळली नाहीये निकु Proud

पण ते वाक्य नंतर टाकले असेल तर आधीच्याना कसे कळले आणि काय कळले हा प्रश्न पडला.

मला वाटले सास बहू ड्रामाच चालू ए Proud . सुनेला सासू बरोबर रहायचे नाही. पण आता सासूचे काहीच दिवस उरलेत Sad

सोला आता नव्याने ! माझा पास बाई ! (मला ते मीम आठवले शार्क टँकरवाले "out of syllabus")

अरे देवा.. मी तर संत्रे भरवायचे शिल्लक ठेवले आहे.
अर्थात मीच चुकीचा अर्थ काढला नसेल तर Proud

ओह
त्याने मांजर care सेंटर मध्ये ठेवलंय का
आणि काहै महिने फक्त म्हणतोय म्हणजे त्याची आई एकदम आजारी आहे का?

एका म्याँवला बरेच म्याँव ऐकू येतील अश्या जागी काही महिन्यासाठी ठेवले.. का ते कथेत आहेच.>> बरोबर आहे ऋन्मेष . टाळ्या....

आई सध्या तरी थोडे दिवस येणार आहे.

बाकी ही situation नुकतीच येऊ घातलीय मुलाच्या घरी म्हणून सुचली कथा.
लिहिते सविस्तर थोड्या वेळाने.

कळली ,मस्त आहे.
मांजर जास्त दिवस पिलांना जवळ ठेवत नाही सुरुवातीचे दूध पाजयचे काही महिने सोडले तर . माझ्याकडे आहे असं सोडलेलं पिल्लू.तीन महिन्याने सोडलेलं .आता वर्षांने पिल्लुची आई ओळखही दाखवत नाही पिल्लू जवळ गेलं की गुरगुरून निघून जाते.

>>>>एका म्याँवला बरेच म्याँव ऐकू येतील अश्या जागी काही महिन्यासाठी ठेवले.. का ते कथेत आहेच.
हे वाचून कळली थोडीफार.
फक्त हे कळले नाही की आई म्हणजे ह्युमन आई (पाळणारी आई) आहे की त्याची खरी माऊ आई आहे Sad
माबुदो.

मांजराची आई नाही तर मुलाची आई.
मुलाने मांजर पाळली असते.
त्याची आई वेगळी राहत असते.
पण आता काही महिन्यासाठी मुलाकडे राहायला येणार असते.
पण तिला मांजरी सोबत राहणे नको असते.
म्हणून मुलाला आपल्या लाडक्या मांजरीची काही महिन्यासाठी वेगळी सोय करावी लागते.
ती वेगळी सोय म्हणजे मांजरीचाच प्ले ग्रुप नर्सरी असते. म्हणून शेवटी बरेच म्याँव ऐकू येतात.
तिथे पोहोचल्यावर ती विस्मयचकित नजरेने त्या मुलाकडे बघते,
आणि मनातल्या मनात म्हणते,
नालायका, तू असा वागशील मला वाटले नव्हते Happy

७५ शब्द झाले

कोणीतरी मीम बनवा याचे म्हणजे लोकांना लवकर समजेल Proud

"ती आणि आई एका छताखाली रहाणं शक्यच नव्हतं">>>> म्हणजे मांजराची आई नाही तर मुलाची आई.+1 बरोबर आहे तुमचं ऋन्मेष.

प्ले ग्रुप नर्सरी वाला अँगल बरोबर आहे ,मी शेवटचं फक्त "म्याव" वाचून वेगळ्या अँगल ने विचार केला

@ऋन्मेष
धन्यवाद धन्यवाद......

७५ शब्द झाले>> अजून २५ येऊ द्या. म्हणजे दोन शशक एकत्र.

Pages