
मित्रहो,
या उपक्रमासाठी लिहिताना मनात खूप चलबिचल झाली. आपल्या आयुष्यातील आपल्याला अभिमानाचा वाटणारा क्षण आपण स्वतःच शब्दांकित करताना त्यात संकोच होणार आणि आत्मस्तुतीचा दोषही येणारच. तरीसुद्धा हा सगळा विचार करूनच संयोजकांनी हा विषय ठेवला असणार !
म्हणून तो दोष पत्करून चार शब्द लिहितो. प्रत्येकाच्या आयुष्याप्रमाणे असे काही मोजके प्रसंग माझ्याही आयुष्यात आलेले आहेत. त्यातला योग्य तो इथे निवडताना एक विचार केला. व्यक्तिगत, कौटुंबिक किंवा व्यावसायिक जीवनातील प्रसंग लिहिण्याऐवजी जर आपल्या सर्वांशी संबंधित असलेल्या आपल्या लाडक्या संस्थळासंदर्भातच घडलेला एक प्रसंग या उपक्रमात लिहिला तर ते समुचित ठरावे. म्हणून इथल्या एका जुन्या घटनेची ही पुनर्भेट आहे.
मग करतो सुरुवात त्या कथनाला . . .
30 जून 2023चा तो दिवस. सकाळी अकराची वेळ. रिमझिम पाऊस पडून गेलेला आणि एकंदरीत कुंद असे वातावरण. कामातून जरा फुरसत मिळाली म्हणून निवांतपणे पाय पसरून बसलो होतो आणि सहजच चाळा म्हणून मोबाईल हाती घेतला. पाहतो तर तिथे इ-मेल आल्याची पूर्वसूचना दिसत होती. मग इनबॉक्स उघडली. सकाळी १०.५९वाजता आलेली तिथे दिसणारी इ-मेल मायबोलीच्या संपर्कातून आलेली आणि त्याच्या अग्रभागी ठळक अक्षरात लिहिलेले होते :

क्षणभर चक्रवून गेलो. पटकन लक्षातच येईना की मी कोणाला काय व कधी मदत केलेली आहे, की त्याचे त्याने एवढे दशलक्ष आभार मानावेत ?
मग अत्यंत उतावीळपणे खालच्या चौकटीतील ई-मेल वाचू लागलो. इ-मेल एका मायबोलीकर असलेल्या रुणाची. त्याने त्यावर्षीच्या २४जून रोजी त्याच्यावर गुदरलेल्या तब्येतीच्या प्रसंगाचे ओघवते वर्णन केलेले, आणि पुढे रुग्णालयात आलेला अनुभव, तपासणीत झालेली दिरंगाई, त्यानंतरचे योग्य उपचार असे करत करत इ-मेलच्या शेवटाकडे आलो आणि तिथला भावस्पर्शी मजकूर असा होता :
वरचे सगळे पत्र वाचता वाचताच माझ्या डोळ्यातून किती आनंदाश्रू गळले असतील याची गणती नाही ! आनंद, भावनातिरेक, काहीसा थरकाप या अवस्थेत अक्षरशः सुन्न झालो होतो. एव्हाना आपल्या वाचकांच्या कदाचित लक्षात आलेच असेल की ही इ-मेल शशांक पुरंदरे या आपल्या मायबोलीकर मित्राची होती.
या घटनेचा अर्थातच मनापासून आनंद वाटला. परंतु इथे अभिमान वगैरे शब्द न वापरता मी म्हणेन की, आपण या संस्थळावर करत असलेल्या आरोग्यविषयक लेखनाचे चीज झाले असे मात्र मनापासून वाटले. किंबहुना तो क्षण कृतार्थतेचा होता. एखाद्या लेखकाला याहून अधिक काय हवे असते?
इथल्या एखाद्या लेखनाचा स्वतःला झालेला उपयोग संबंधित लेखकाला तसेच सार्वजनिकरित्या इथे सर्वांना कळविण्यात शशांक पुरंदरे यांच्या मनाचा मोठेपणा आहे हे निःसंशय. त्यासंबंधीचे आत्मकथन त्यांनी यापूर्वीच केलेले असल्याने त्याची सविस्तर पुनरुक्ती टाळतो.
असो. या निमित्ताने पुन्हा एकदा शशांक पुरंदरे यांना दीर्घायुष्य चिंतितो आणि शुभेच्छा देतो. त्याचबरोबर हवे ते आणि हवे तेवढे लिहिण्याचे स्वातंत्र्य देणाऱ्या मायबोली संस्थापकांनाही मनापासून धन्यवाद !
आणि हो . . .
यंदाच्या गणेशोत्सव उपक्रमांच्या सर्व संयोजकांनाही धन्यवाद तसेच आपणा सर्वांना मंगलमय शुभेच्छा !
**************************************************************************************************************
खरोखर अभिमानाचा क्षण.
खरोखर अभिमानाचा क्षण.
या उपक्रमात आत्मस्तुतीचा दोष पत्करून कुणी कसं भाग घेणार हा खरंच प्रश्न होता. पण डॉक्टरच्या जीवनात येणारे असे अभिमानचे क्षण मानवतेच्या अभिमानाचे असतात. कुमार सरांचे अभिनंदन करायला आपण खूप लहान आहोत. पण असे अभिमानाचे क्षण वारंवार येवोत.
ही त्यांच्या मायबोलीवरील वैद्यकीय जागृतीच्या सेवेची पावतीच आहे.
धन्यवाद कुमार सर तुमच्या या अनमोल सेवेबद्दल.
रानभूली +११
रानभूली +११
आपल्या किंवा आपल्या आप्तांच्या जीवनातील अभिमानास्पद क्षण ह्या उपक्रमात लिहायचे आहेत. आत्मस्तुती होईल असे वाटत असेल तर परिचितांविषयी लिहू शकता.
तो धागा वाचला होता सर.. ते
तो धागा वाचला होता सर.. ते ग्रेटच होते!
आता हा तुमचा धागा उघडताना तसेच काही अनुभव वाचायला मिळतील असे वाटले होते. शक्य झाल्यास जरूर लिहा.
तुम्हाला आत्मस्तुती होते वगैरे विचार करायची गरज नाही. उलट तुम्ही लिहिलेल्या अनुभवातून सुद्धा कित्येक जणांना नवीन माहिती मिळेल. तरी कोणाला त्यात आत्मस्तुतीचा हेतू आढळला तर तो वाचकांच्या बुद्धीचा दोष ठरेल.
अभिमान वाटायलाच हवा असा क्षण!
अभिमान वाटायलाच हवा असा क्षण!
छान क्षण.
अभिमान वाटावा असाच क्षण.
वाचलेला तो प्रसंग (धागा)
<<या निमित्ताने पुन्हा एकदा शशांक पुरंदरे यांना दीर्घायुष्य चिंतितो आणि शुभेच्छा देतो. त्याचबरोबर हवे ते आणि हवे तेवढे लिहिण्याचे स्वातंत्र्य देणाऱ्या मायबोली संस्थापकांनाही मनापासून धन्यवाद !>> +1
ममो,
ममो,
सामान्य माणसाच्या जीवनात येणारे अभिमानाचे क्षण आणि डॉक्टरच्या जीवनात डॉक्टर म्हणून येणारे अभिमानाचे क्षण यात खूप फरक आहे असं मला वाटतं. डॉक्टरसाठी जो अभिमानाचा क्षण असतो तो संपूर्ण मानवजातीच्या अभिमानाचा क्षण आहे असं म्हटलं आहे. तुम्हाला हा अर्थ पोहोचला याबद्दल आभार. __/\__
तुम्हाला आत्मस्तुती होते वगैरे विचार करायची गरज नाही. कोणाला त्यात आत्मस्तुतीचा हेतू आढळला तर तो वाचकांच्या बुद्धीचा दोष ठरेल. >>
डॉक्टरांचे दोष दाखवण्यासाठी प्रतिसाद लिहीला आहे असा अर्थ अन्य कुणाला काढायचा असल्यास पूर्ण स्वातंत्र्य आहे. आत्मस्तुती आढळली तर तिथे प्रतिसाद न देण्याचा मार्ग उपलब्ध असताना असे कोण का करेल?
सर्वांना मनापासून धन्यवाद !
सर्वांना मनापासून धन्यवाद !
उपक्रमाच्या शीर्षकाबद्दल वर झालेली चर्चा पण योग्य असून आवडली.
आतापर्यंतच्या आयुष्यातला हा सर्वोच्च आनंदाचा व कृतार्थतेचा क्षण होता म्हणून अन्य काही जुने प्रसंग आठवत बसलो नाही.
डॉक्टर साहेब तुमचे पुन्हा
डॉक्टर साहेब तुमचे पुन्हा एकदा अभिनंदन.
अभिमान वाटायलाच हवा असा क्षण!
अभिमान वाटायलाच हवा असा क्षण! + १
डॉक्टर, तुम्ही माझ्या प्रेगन्सी मध्येही मी चिंतीत असताना योग्य मार्गदर्शन केले होते . आपण कधीही भेटलो नाही आहोत तरीही तुम्ही आपुलकीने आधार आणि मार्गदर्शन केले . त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
रानभूली , तुमचा मुद्दा मला
रानभूली , तुमचा मुद्दा मला कळला नाही.
डॉ हे संपूर्ण मायबोलीचा अभिमान आहेत ह्याबद्दल कोणाचे ही दुमत असणार नाही. शशांक ह्यांनी ही ह्यावर धागा काढला होता ते ही स्मरणात आहेच. डॉ रांचे धागे हे नेहमीच सामान्य लोकांना नजरेसमोर ठेवून लिहिलेले असतात त्यामुळे आपल्याला त्याचा फायदाच होतो. त्यामुळेच त्यांचे अभिमानाचे क्षण ही वेगळ्या स्तरावरचे असतात
मला फक्त एवढेच म्हणायचे होते की बहुसंख्य लोकांना स्वतःच्या अभिमान वाटणाऱ्या क्षणांना शब्दबद्ध करायचे आहे असे वाटत आहे असं मला वाटलं म्हणून मी खुलासा केला. सामो ऋन्मेष आणि डॉ ह्यांनी स्वतःचे क्षण लिहिले आहेत ते छानच आहे पण धागा तेवढ्या पुरता सीमित नाहीये , कोणी अन्य व्यक्तींबद्दलचे अभिमानाचे क्षण इथे शेअर केले तर धागा अधिक समृद्ध होईल हाच माझ्या पोस्टचा हेतू होता.
ह्यावर अधिक चर्चा इथे न करता त्या उपक्रमाच्या धाग्यात करणे जास्त योग्य होईल . असो.
पुन्हा एकदा डॉक्टरांचे अभिनंदन आणि शशांक ह्यांना दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा ...
रानभूली, माझा प्रतिसाद का कोट
रानभूली, माझा प्रतिसाद का कोट केले समजले नाही. आणि तो स्वतःवर का ओढवून घेतला हे देखील समजले नाही.
त्याचा तुमच्या प्रतिसादाशी काही संबंध नव्हता. मुळात तो असेलच कशाला?
डॉक्टरांनी लेखात आत्मस्तुतीचा दोष होईल म्हटले त्यावर मी म्हटले की तुमच्यासारख्या व्यक्तीच्या लेखात ज्याला आत्मस्तुती दिसेल तो त्याचा दोष.
त्यांनी असे क्षण, असे अनुभव जास्त लिहावेत अशी माझी अपेक्षा आहे कारण त्यातून वाचकांना देखील बरेच नवीन समजेल.
असो,
गैरसमज टाळूया आणि पुढे जाऊया...
सर्वांना गणपतीच्या शुभेच्छा
आम्हा सर्वांना तुमचा अभिमान
आम्हा सर्वांना तुमचा अभिमान वाटावा असा हा क्षण. तुमचा धागा वाचला होता व तेव्हा त्या इमेलनंतर तुम्ही काही दिवस साहजिक काही लिहिण्याच्या परिस्थितीत नव्हता हे आठवतंय. अत्यंत कृतार्थ वाटावं असे क्षण आयुष्यात येणं हे महद्भाग्य.
वाह! काय विलक्षण क्षण आहे
वाह! काय विलक्षण क्षण आहे डॉक्टर. एखाद्या व्यक्तीचे प्राण वाचणे, तसेच ती व्यक्ती त्या जीवघेण्या संकटातून, सहीसलामत बाहेर पडणे. या क्षणाची अन्य कशाबरोबर तुलनाच होउ शकत नाही.
अरे वा!
अरे वा!
खरंच अभिमान वाटण्याजोगा क्षण.
अभिनास्पद कामगिरी आहेच
अभिनास्पद कामगिरी आहेच निश्चित. हे एक माहित असलेलं उदाहरण पण तुम्ही तुमच्या वैद्यकीय सेवेत कितीतरी जीव वाचवले असतील.
मायबोलीचं वैभव गीतकार वैभव जोशींच्या शब्दात सांगता करतो.
देवाजीनं सोपवला हा मुलखावेगळा भार
अडल्या नडल्या जीवांना तू घेऊन जायचं पार
कामी येण्या सारखं दुसरं काम घरंदाज नाही
भरतीचा माज नाही ओहटीची लाज नाही
सगळ्यांनाच अभिमान वाटावा असा
सगळ्यांनाच अभिमान वाटावा असा क्षण आहे. पहिल्या परिच्छेदातच कळलं मेल कुणाचा आहे ते
! अशीच सेवा तुमच्याकडून होत राहो _/\_
छान.
छान.
खरोखर अभिमानाचा क्षण. >>+११
खरोखर अभिमानाचा क्षण. >>+११
डॉ हे संपूर्ण मायबोलीचा अभिमान आहेत >> क्या बात ममो! अनुमोदन!
आपले लेखन आम्हाला नेहमी असेच मार्ग दाखवत राहो व असे अनेक क्षण तुमच्या आयुष्यात आले असतीलच पुढेही येत राहोत ही गणेशाचरणी प्रार्थना!
मस्त!
मस्त!
शशांक पुनदरेंचा लेख आठवतोय. तेव्हाही त्यांच्यातला वाचकाच, नियमितपणे स्वतःच वैद्यकीय ज्ञान सामान्य लोकांना समजेल अशा सोप्या भाषेत आणण्याच्या सातत्याच कौतुक / अचंबा वाटलं होता.
खरंच कृतार्थ वाटावं असा क्षण
ममो, विपू पहा.
ममो, विपू पहा.
ऋन्मेष, हा डॉक्टरांचा धागा असल्याने मला वायफळ लिहावंसं वाटत नाही ही माझी अडचण आहे. काही लाडके लोक उलटून प्रतिसाद देतात तसे करणे प्रत्येकाला योग्य वाटत नाही. तुमचे वाक्य कोट केले कारण असे डॉक्टरांना कोण का म्हणेल ? इथे कुणी असा प्रतिसाद दिला आहे हे समजले नाही. त्यामुळे गैरसमजास हातभार लावणार्या अनावश्यक साळसूदपणाची आवश्यकता नव्हती असं मला वाटलं. माझे प्रतिसाद अगदी स्पष्ट आहेत. यापुढे मला स्पष्टीकरण द्यायची गरज नाही आणि ओढवून घ्यायचीही नाही.
सर्वांना धन्यवाद !
सर्वांना धन्यवाद !
वरती दसा यांनी उद्धृत केलेल्या वैभव जोशींच्या गीतानुसार मायबोलीची अशीच अधिकाधिक भरभराट होत राहो ही सदिच्छा. असे कृतार्थ क्षण कुणा एकट्यादुकट्या मायबोलीकराचे नसून ते सर्वार्थाने आपल्या मायबोलीचेच आहेत.
तसाही आज मायबोलीचा तिथीने वर्धापनदिन आहे. तिसाव्या वर्षात पदार्पण केलेल्या आपल्या मायबोलीला मनापासून शुभेच्छा !
👏 🙏
परिच्छेदातच कळलं मेल कुणाचा
परिच्छेदातच कळलं मेल कुणाचा आहे ते Happy ! >> माझाही तोच अंदाज होता.
डॉक्टर, मी माझ्या heart
डॉक्टर, मी माझ्या heart treatment साठी जवळपास महाराष्ट्र व इतर राज्यात १२-१३ hospitals चा अभ्यास केला व बऱ्यापैकी गोंधळात होतो. शेवटी आपणांस विचारणा केली व आपण दिलेल्या सल्ल्याप्रमाणे निर्णय घेतला. देवकृपेने व डॉक्टर कृपेने (त्यात तुम्हीपण आहात ) आज मी हे व्यवस्थितपणे लिहू शकतोय..!!
आपले लिखाण हे ज्ञानपूरक आणि मार्गदर्शक असते... असेच लिहीत रहा !
खरंच अभिमानाचा (सरांच्या
खरंच अभिमानाचा (सरांच्या भाषेत कृतार्थतेचा) क्षण!
तेव्हाही त्यांच्यातला वाचकाच, नियमितपणे स्वतःच वैद्यकीय ज्ञान सामान्य लोकांना समजेल अशा सोप्या भाषेत आणण्याच्या सातत्याच कौतुक / अचंबा वाटलं होता......+१.
चोवीस जून 2023 ---- हा माझ्या
चोवीस जून 2023 ---- हा माझ्या जीवनातील खरोखरीच "संस्मरणीय" दिवस. डाॅ. कुमार यांच्या या वरील लेखाने तो सगळा दिवस परत डोळ्यासमोर उलगडला गेला.
डाॅ. कुमार यांनी मायबोलीवर ट्रोपोनिनविषयक अतिशय शास्त्रशुद्ध व सर्वसामान्यांनाही कळेल अशा पद्धतीने जो लेख लिहिला तो माझ्याकरता तर जीवनदायीच ठरला !
पण याचबरोबरीने मायबोलीचे संस्थापक/वेमा यांचेही मनःपूर्वक आभार !
डाॅ. कुमार व वेमा या दोघांचाही मी आजन्म ऋणीच आहे.
त्याचबरोबर अनेक मायबोलीकरांनी मला त्या धाग्यावर उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या/आताही दिल्या आहेत --- त्या सर्वांचाही मी ऋणीच आहे. तसेच फोनवरुन वा प्रत्यक्ष भेटूनही काही मायबोलीकरांनी संपर्क साधला --- या सर्वांचेही ह्रदयपूर्वक आभार !!
वरील एका अभिप्रायात म्हटल्या प्रमाणे डाॅ. कुमार हे संपूर्ण मायबोलीचाच अभिमान आहेत हे अक्षरशः खरे आहे.
सर्वांना पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद !!
सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामया,
सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चिद् दुःख भागभवेत।
ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः
_____/\______
आपुलकीने प्रतिसाद देणाऱ्या
आपुलकीने प्रतिसाद देणाऱ्या सर्वांचेच आभार !
ज्या घटनेशी संबंधित हे लेखन आहे त्या घटनेचे खुद्द नायकच, म्हणजे शशांक इथे आल्याने आनंद द्विगुणीत झाला.
वर जाई आणि यक्ष यांनी लिहील्यानुसार माझ्या किंचित सल्लामसलतीचा त्यांना उपयोग झाल्याचे दिसते. यातून समाधानाच्या क्षणांमध्ये अजूनच भर पडलेली आहे.
असेच कृतार्थ क्षण गरजेनुसार अनुभवण्यास येवोत !
शशांकजी, तुम्हाला
शशांकजी, तुम्हाला दीर्घायुष्यासाठी अनेकानेक शुभेच्छा !
असेच कृतार्थ क्षण वारंवार
असेच कृतार्थ क्षण वारंवार अनुभवण्यास येवोत ! >>
फक्त तेव्हढे नाकी..
अशी वेळ ( डॉक्टरांकडे जाण्याची/ सल्ला मसालत करण्याची) शक्यतो कोणावर येऊ नये.
आमच्या कडे एक बिन होता.. डॉक्टरांनी नवीन हॉस्पिटल/ दवाखाना काढला तर त्याला काय शुभेच्छा द्याव्यात ?..
हा धागा वाचल्यावर लक्षात येते की कुमार१ ह्यांनी अजूनही बऱ्याच लोकांना मदत/ जीवनदान दिले असेल.
ते बघता मला वाटतं
कुमार१ मायबोलीवरील/(काही) मायबोलीकरांसाठी देवमाणूस ठरले असावेत.
खरोखर अभिमानाचा क्षण. छान.
खरोखर अभिमानाचा क्षण.
छान.
खरोखर अभिमानाचा क्षण. छान.
खरोखर अभिमानाचा क्षण.
छान.
Pages