आमीर खान : एक अष्टपैलू व्यक्तीमत्व

Submitted by रानभुली on 23 August, 2025 - 06:12

( आमीर खान चित्रपटसृष्टीशी संबंधित असल्याने चित्रपट या ग्रुपमधे हा धागा आहे. व्यक्ती म्हणून त्याचं योगदान अनेक क्षेत्रात असल्याने अ‍ॅडमिन समितीस योग्य वाटेल त्या ग्रुपमधे धागा हलवू शकता).

आमिर खानच्या कारकिर्दीचा आढावा
0cddc6fd555c10289310a7e382fcf151.jpg
आमीर खानचं संपूर्ण नाव मोहम्मद आमिर हुसेन खान असं आहे. त्याचा जन्म १४ मार्च १९६५ रोजी मुंबईत झाला.
आजवरची त्याची कारकीर्द ३० वर्षांहून अधिक आहे. याळात त्याची मिस्टर परफेक्शनिस्ट अशीही ओळख निर्माण झाली कारण तो निर्माण करत असलेल्या चित्रपटासाठी किंवा कुठल्याही प्रोजेक्ट्स साठी प्रचंड मेहनत घेतो. नॅशनल चॅनल वर त्याने देशापुढील वेगळ्या समस्या मांडण्यासाठी एक शो बनवला होता त्यात त्याचा हा गुण ठळक झाला.

आमिर खानचा जन्म एका ज्या कुटुंबात झाला त्या कुटुंबाचा फिल्म इंडस्ट्रीशी अनेक दशकांचा संबंध आहे. त्याचे वडील ताहिर हुसेन हे निर्माते होते, तर काका नासिर हुसेन हे प्रसिद्ध निर्माते आणि दिग्दर्शक होते. भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील नेते मौलाना अबुल कलाम आझाद यांच्याशी संबंध आहे, तसेच तो भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. झाकीर हुसेन यांच्याशीही नातेसंबंधाने जोडला गेला आहे.

आमिरने आपल्या कारकिर्दीची सुरुवात बालकलाकार म्हणून केली. वयाच्या अवघ्या आठव्या वर्षी आपल्या काकांच्या *यादों की बारात* (१९७३) या चित्रपटात बालकलाकार म्हणून पदार्पण केले. त्यानंतर *मदहोश* (१९७४) मध्येही तो दिसला होता. यादों कि बारात आता बघताना तो लगेचच ओळखू येतो.
81fb2b4d44e6fbd808181ab238482e46.jpg

त्याची हिरो म्हणून कारकीर्द कयामत से कयामत तक पासून सुरू झाली असे आपल्याला वाटते. पण राख आणि १९८४ मध्ये केतन मेहता दिग्दर्शित *होली* या चित्रपटातून त्याने अभिनेता म्हणून पदार्पण केले होते. हे दोन्ही सिनेमे लक्ष वेधून घेऊ शकले नाहीत खरी प्रसिद्धी त्याला १९८८ मध्ये मन्सूर खान दिग्दर्शित *कयामत से कयामत तक* या चित्रपटाने मिळाली. हा सिनेमा त्याच्या काकाच्या म्हणजे नासीर हुसेनच्या बॅनरखाली बनला होता. नासीर हुसेन यांचा मुलगाही दिग्दर्शक म्हणून डेब्यु करत होता. त्याला आपल्या वडलांच्या हरवले सापडले किंवा मल्टीस्टारर पण सरधोपट पिक्चर पेक्षा वेगळं काही तरी बनवायचं होतं. वडलांच्या आग्रहास्तव आणि त्यांचा अनुभवाचा सल्ला ऐकून त्याने लव्हस्टोरी बनवायची ठरवलं. त्या वेळी मन्सूर खान नवखा होता. त्यामुळं अनेक नायकांकडून त्याला नकार आल्यावर मग नवीन हिरोला घेऊन प्रोकेट सुरू करायचं ठरवलं आणि आमीरखानची निवड झाली.

या चित्रपटाने त्याला रातोरात स्टार बनवले आणि त्याला सर्वोत्कृष्ट नवोदित अभिनेत्यासाठी फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.
या चित्रपटाने त्याची इमेज चॉकलेट बॉय अशी झाली . पण यानंतर आमीर खानने कुणाचाही सल्ला न घेता येतील ते सिनेमे धडाधड स्विकारायला सुरूवात केली. त्याच्या कयामतचं यश एन्कॅश करण्यासाठी अनेक सुमार दर्जाच्या चित्रपटात त्याला घेतलं. परिणाम हा झाला कि त्याची स्टार व्हॅल्यू कुमार गौरव प्रमाणेच संपण्याच्या टोकावर येऊन ठेपली. अधून मधून काही हिट मिळाले होते पण त्याला एका बड्या हिटची आवश्यकता होती.

या फेजमधून त्याच्या मदतीला पुन्हा त्याचा भाऊ मन्सूर खान मदतीला आला. त्याच्या बॅनरखाली बनलेल्या जो जिता वही सिकंदरने पिटातल्या प्रेक्षकांपासून ते समीक्षकांपर्यंत सर्वांची शाबासकी मिळवली. भारतातला हा पहिलाच स्पोर्ट्स शी संबंधित यशस्वी सिनेमा असावा. यानंतर ९० च्या दशकात त्याचं स्टारडम बहरू लागलं. इथे आमीर खानने आपली चूक सुधारली आणि तो मोजकेच चित्रपट स्विकारू लागला.

१९९० च्या दशकात आमिरने अनेक यशस्वी चित्रपटांमधून आपली छाप पाडली. *दिल* (१९९०), *दिल है की मानता नहीं* (१९९१), *जो जीता वही सिकंदर* (१९९२), *हम हैं राही प्यार के* (१९९३), आणि *रंगीला* (१९९५) यांसारख्या चित्रपटांनी त्याला व्यावसायिक आणि समीक्षकांच्या दृष्टीने यश मिळवून दिले. १९९६ मध्ये *राजा हिंदुस्तानी* या चित्रपटासाठी त्याला पहिला फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार मिळाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर प्रचंड यश मिळवले.
21f11771fc20e485fd209a01f4d0a0f4.jpg

पण आमीरला आपली वेगळी ओळख बनवायची असल्याने त्याने स्वतःच निर्माता बनण्याचा निर्णय घेतला. १९९९ मध्ये त्याने बनवलेल्या सरफरोश या चित्रपटातील त्याच्या अभिनयाने समीक्षकांची विशेष प्रशंसा मिळवली. हा सिनेमा सुद्धा समीक्षकांनी गौरवला होता. याच काळात त्याने *अंदाज अपना अपना* (१९९४) सारख्या चित्रपटात सलमान खानसोबत काम केले, जो रिलीजच्या वेळी फ्लॉप ठरला, परंतु नंतर कल्ट क्लासिक बनला. या काळात आमीर खान म्हणजे हमखास चांगला सिनेमा असा विश्वास प्रेक्षकांच्या मनात रुजायला सुरूवात झाली होती. या काळात त्याने खूप काळजीपूर्वक सिनेमे केल्याने त्याचे अव्वल नंबर, तुम मेरे हो सारखे तद्दन फालतू सिनेमे लोकांनी माफ करून टाकले.

१९९९ मध्ये आमिरने आमिर खान प्रोडक्शन्स या निर्मिती संस्थेची स्थापना केली. या संस्थेचा पहिला चित्रपट *लगान* (२००१) हा ऑस्करसाठी सर्वोत्कृष्ट परदेशी चित्रपट श्रेणीत नामांकित झाला. या चित्रपटाने त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी फिल्मफेअर पुरस्कार मिळवून दिले. याच वर्षी *दिल चाहता है* मधील त्याच्या अभिनयाने तरुण प्रेक्षकांना भुरळ घातली.

चार वर्षांच्या विश्रांतीनंतर त्याने २००५ मध्ये मंगल पांडे: द रायझिंग या चित्रपटातून पुनरागमन केले. २००६ मध्ये रंग दे बसंती आणि फना यांसारख्या चित्रपटांनी त्याला पुन्हा एकदा यशाच्या शिखरावर नेले. २००७ मध्ये त्याने *तारे जमीन पर* या चित्रपटाचे दिग्दर्शन केले, ज्याने त्याला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळवून दिला. हा चित्रपट डिस्लेक्सियासारख्या सामाजिक विषयावर आधारित होता आणि त्याला प्रचंड यश मिळाले.

२०१० नंतरच्या काळात आमिरने *गजनी* (२००८), ३ इडियट्स (२००९), धूम ३ (२०१३), पीके (२०१४), आणि दंगल (२०१६) यांसारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांमधून आपली लोकप्रियता कायम राखली. दंगल हा चित्रपट भारतातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी एक ठरला आणि विशेषतः चीनमध्ये त्याने २००० कोटींहून अधिक कमाई केली.

२०२५ मध्ये आलेला *सितारे जमीन पर* हा चित्रपट त्याच्या नवीनतम प्रकल्पांपैकी एक आहे, ज्याला प्रेक्षक आणि समीक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला. हा चित्रपटही सामाजिक संदेश देणारा आहे आणि त्याच्या कारकिर्दीतील आणखी एक मैलाचा दगड ठरला आहे.

आमिर खान केवळ अभिनयापुरता मर्यादित नसून, तो सामाजिक कार्यातही सक्रिय आहे. त्याच्या *सत्यमेव जयते* या टेलिव्हिजन शोने सामाजिक मुद्द्यांवर प्रकाश टाकला आणि समाजात बदल घडवण्याचा प्रयत्न केला. शिक्षण, लिंगभेद, आणि सामाजिक समानता यांसारख्या विषयांवर त्याने आपल्या चित्रपटांमधून आणि शोमधून सातत्याने आवाज उठवला आहे.

आमीरच्या कारकिर्दीतल्या नकारात्मक बाजू
आमीर खान अनेकदा वादात अडकला. त्याच्या काही वक्तव्यांमुळे वादळ उठलं. यामुळे त्याच्यावर बहीष्काराचं पाऊल उचललं गेलं होतं. याचा फटका त्याला बसला.

तसेच ज्या वेळी त्याची प्रतिमा ही चांगले सिनेमे बनवणारा अभिनेता अशी झाली त्या वेळी त्याने काही अचाट आणि function at() { [native code] }अर्क्य सिनेमे स्विकारल्याने काही प्रेक्षकांना धक्काच बसला. उदाहरणार्थ गझनी. हा यशस्वी सिनेमा असला तरीही तो काही त्या वेळच्या आमीर स्विकारत असलेल्या चित्रपटांशी सुसंगत नक्कीच नाही. तो चालला कारण आमीरचा सिनेमा म्हणजे चांगला या डोळे झाकून विश्वास टाकण्याच्या प्रेक्षकाच्या सवयीने. याबद्दल आमीर खानला विचारले असता त्याने मी मनोरंजन क्षेत्रात काम करतो, त्यामुळं प्रत्येक सिनेमात संदेश असला पाहीजे असं काही गरजेचं नाही असं मत व्यक्त केलं होतं.

सत्यमेव जयते हा चांगला शो आहे. पण छोट्या पडद्यावर त्याचं दर्शन सतत होत राहीलं, पाणी पंचायत मुळे तो गावोगावी फिरत राहिला. या काळात त्याला सिनेक्षेत्रातल्या कारकिर्दीकडे लक्ष देता आले नाही. अती दर्शन ही बाधक आणि मोठी गॅपही बाधक अशा दोन्हीचा त्याला फटका बसला. पण दंगल, तारे जमीन पर सारख्या उत्कृष्ट सिनेमामुळे तो पुन्हा सन्मानाने मेन स्टॄम मधे परतला.

पण यानंतर त्याने ठग्ज ऑफ हिंदुस्तान सारख्या सिनेमात काम करून लोकांची तीव्र नाराजी ओढवून घेतली.
धूम ३ हा सुमार दर्जाचा बिग बजेट पिक्चर आधीच्या धूम चित्रपटांपेक्षा जास्त चालला. पण त्यासाठी आमीरचे गुडविल खर्च झाले.
त्यानंतर आलेला त्याचा लालसिंग चढ्ढा हा आश्चर्यकारक रित्या आपटला. दोनशे कोटीचं बजेट असताना फक्त साठ कोटी इतकाच धंदा झाला.
याचे कारण बहीष्कार सांगितले जाते.

आमीरचे मॅनरिजम अतिपरिचित झाल्याने आणि त्याचा वापर टाळता न आल्याने तसेच पीकेच्या प्रभावाखालून निघता न आल्याचा फटका त्याला बसला असे म्हणतात. नेटफ्लिक्सने याच काळात टॉम हँक्सचा फॉरेस्ट गंप प्रदर्शित केल्याने त्याचाही फटका बसला. लालसिंग हा सिनेमा फॉरेस्ट गंपशी तुलना झाली नाही तर चालायला हरकत नव्हती. पण तुलना झाली तर त्यातले वैगुण्य ठळक होणारच. फॉरेस्ट गंपच्या वेळी ऐतिहासिक व्यक्तींसोबत टॉम हँक्स पडद्यावर दिसला. या सीजी करामतींचे कौतुक झाले होते. त्या वेळी जुरासिक पार्क सुद्धा याच करामतींमुळे हिटझाला होता. इतकेच नाही तर अशा करामतींचा फॅन असलेल्या कमल हसनने त्याच्या इंडीयन मधे सुभाषबाबूं सोबत कमल स्वतःला दाखवल्याने त्याचीही क्रेझ निर्माण झाली होती. लालसिंग चढ्ढाच्या वेळी या सर्व गोष्टी नॉर्मल झाल्या होत्या. त्यामुळे या सिनेमाचा युएसपी काय हाच कळीचा मुद्दा होता.

ट्रेण्डसेटर होण्याच्या वेडापायी त्याने आत्मघातकी निर्णय घेतले आहेत.

लालसिंगच्या रिलीजच्या आधी नेटफ्लिक्सची मिळालेली १६५ कोटींची ऑफर नाकारून सहा महीन्यांनी ओटीटीवर पिक्चर रिलीज करण्याचा त्याचा आग्रह अव्यावहारीक असल्याने ओटीटी वाल्यांनी त्याच्याकडे पाठ फिरवली.

सितारे जमीन पर या सिनेमालाही पुन्हा एकदा १४५ कोटी मिळत असताना त्याने युट्यूबवर सिनेमा प्रदर्शित करण्याचा काहीच्या काही निर्णय घेतला. या निर्णयाचा फटका त्यालाच बसला.

एखाद्या नव्या सिनेमाच्या गेट अप मधे सतत फिरत राहण्याने त्याच्या स्टारडम वर परिणाम होतो. सतत ती विचित्र दाढी, चित्रविचित्र केशभूषा यातच इंटरव्ह्यू देत राहिल्याने त्याच्या इमेजलाही धक्का बसतो.

आमिर खानला त्याच्या कारकिर्दीत अनेक पुरस्कार मिळाले आहेत:
फिल्मफेअर पुरस्कार : ९ पुरस्कार, यात सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आणि सर्वोत्कृष्ट चित्रपट यांचा समावेश आहे.
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार : ४ पुरस्कार.
पद्मश्री (२००३) आणि पद्मभूषण (२०१०) हे भारत सरकारचे सन्मान.
-चीन सरकारचा मानद पुरस्कार** (२०१७), त्याच्या चित्रपटांच्या चीनमधील लोकप्रियतेमुळे मिळाला.

एकंदरीत यशस्वी असूनही अनेक चढ उतार असलेली कारकीर्द, वादग्रस्तता, खासगी जीवनातल्या अनेक गोष्टींमुळे नाराजी, भावाचे आरोप ते उत्तम चित्रपटनिर्माता म्हणून ओळख अशी त्याची कारकीर्द बहुरंगी, बहुढंगी असूनही त्याच्या बद्दल एव्हढी चर्चा मायबोलीवर नाही.

आभार : या निबंधासाठी संदर्भ म्हणून ग्रोकची मदत घेतली आहे.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

राजा हिंदुस्तानी मला बंडल वाटलेला.
गाण्यामुळे त्याची मार्केटिंग झाली होती.
आणि ते परदेशी परदेशी गाण्याला बरीच हाईप मिळालेली तेव्हा. मला ते गाणे फार चिरके वाटायचे.

चला कशाला तरी बंडल म्हटले मी..
नाहीतर कौतुकाची गाडी सुसाट सुटली होती
उगाच चिडून शाहरुखचा रात्री मला फोन आला असता Happy

जो जीता… मधली गाणी खुप आवडतात. पहेला नशा.. गाणे व कोरियोग्राफी दोन्ही मस्तच. जो जीता यायच्या आधी त्याचा ओरिजिनल एन्ग्रजी चित्रपट दु द वर पाहिलेला. काही दृष्ये जशीच्या तशी आहेत.. असो. शेवटी एंड रिझल्ट पाहायचा. जो जीता चांगला बनवलाय.

मन मला खुप आवडलेला. त्यातले सुनो ओ प्रिया, मैने तुमको दिल दिया…खुप आवडते. शेवटच्या पाऊण तासाची स्टोरी त्याआधी निदान दोन चित्रपटात तरी पाहिलीय (भिगी रात व बर्निंग ट्रेन). आणि मनिषा कोइराला कधी फारशी आवडली नाही.

अकेले हम अकेले तुम… ची गाणी छान होती. चित्रपट अजिबात आवडला नव्हता. चित्रपट अर्धा होईपर्यंत स्वतःत व स्वतःच्या नसलेल्या करियरमध्ये गुंतलेला आमिर ती सोडुन गेल्यावर मात्र ते सगळे गुंडाळुन ठेऊन घरात बसुन पोराला संभाळतो. बायकोत जास्त टॅलेंट आहे हे आधीच ओळखुन तिने बाहेरचे काम करायचे आणि त्याने घर सांभाळायचे अशी व्यवस्था स्विकारली असती तर जास्त चांगले झाले असते. आमिरने अर्थातच मस्त काम केले होते.

पण मला चित्रपट आवडला नाही यासाठी की दिग्दर्शक एक चांगला वास्तववादी चित्रपट करता करता अचानक यु टर्न मारुन नेहमीचा हिंदी मसाला दळायला लागला. मन्सुर खानकडुन माझी ती अपेक्षा नव्हती. हा चित्रपटही मुळ हॉलीवुडचाच होता पण त्याच्या नखाचीही सर याला आली नाही त्याचे कारण हे अचानक केलेले घुमजाव.

राजा हिंदुस्थानी न बघण्याची दोन कारणे.
पहिलं अल्ताफ राजा आणि दुसरं जब जब फूल खिले बघितलेला असणे. त्यातल्या गाण्यांची सर नाही राहिं ला.

एक्झॅक्टली. जब जब फुल खिले … च्या व शशिबाबाच्या प्रेमात मी इतकी आहे की त्याची कॉपी बघुच शकत नाही. आणि करिष्माला कोण सहन करणार. तिचा अभिनय म्हणजे आनंदच…

मन मला खुप आवडलेला. त्यातले सुनो ओ प्रिया, मैने तुमको दिल दिया…खुप आवडते >>> मन सुपरहीट झाला होता आणि बक्कळ कमाई होऊनही निर्माता कफल्लक झालेला. कारण त्यातली सर्वच्या सर्व गाणी चोरलेली होती. यातला बहुधा कोरियन कि जपानी सिंगर होता त्याची दोन गाणी चोरलेली होती. त्याने केस केली आणि जी नुकसान भरपाई द्यावी लागली ती कमाईच्या कितीतरी पट होती Lol

जब जब फुल खिले … च्या व शशिबाबाच्या प्रेमात मी इतकी आहे की >> माझ्याकडून नकळत आमीरच्याच दोन पिक्चरच्या बाबतीत झालं हे. राजा हिंदुस्थानी जब जब वर आधारीत आहे म्हणून तो पाहिला मग राजा हिंदुस्थानी ओटीटीवरून गेला तरी नाही पाहिला. तसंच लालसिंग चढ्ढा रिलीज व्हायच्या आधी फॉरेस्ट गंप बघा या प्रचाराला बळी पडून तो पाहिला. मग लालसिंग नाहीच पाहिला.

'परदेस' जन्मतात तसेच 'राजा हिंदुस्तानी'ही.

ऋन्मेष, बाहरवालीके बारे मे जादा ना बोलो. घरवाली बुरा मान जायेगी.

साजिरा, परदेश आणि तुमचा काय आकडा आहे 36 चा याची कल्पना नाही. पण ते आपण एखाद्या शाहरुख धाग्यात बोलूया. इथे आमिरला इनसेक्युरिटी नको यायला Happy

आमिरचा अव्वल नंबर कोणी पाहिला आहे का?

क्रिकेटप्रेमी असल्याने मी तेव्हा बघायला सुरुवात केलेली.
क्रिकेट द्वेष्टा व्हायच्या आधी स्वतःची सुटका करून घेण्यात यशस्वी झालो.

कोणी पूर्ण पाहिला असेल तर शेवटी काय होते ते सांगेल का मला?
शक्य झाल्यास आधी काय होते ते सुद्धा सांगा. ते ही विसरलो आता...

आमिरला इनसेक्युरिटी नको यायला
>>
वोही तो बोल रहा ना मामू. शारुक मधला श पण काढु नको बघू, आणि मग पुढे बोल. इतर कुणी असेल, तर मिळालेलं अवार्ड घ्यायला येत नाही आमिर. त्याच्या धाग्यावर इतर फाल्तु पोस्ट्स कशा आवडतील त्याला?

>>सुनो ओ प्रिया, मैने तुमको दिल दिया…खुप आवडते >>> मन सुपरहीट झाला होता आणि बक्कळ कमाई होऊनही निर्माता कफल्लक झालेला. कारण त्यातली सर्वच्या सर्व गाणी चोरलेली होती. यातला बहुधा कोरियन कि जपानी सिंगर होता त्याची दोन गाणी चोरलेली होती. त्याने केस केली आणि जी नुकसान भरपाई द्यावी लागली ती कमाईच्या कितीतरी पट होती <<

याला काही पुरावा आहे का दिलं आपलं ठोकून? म्हणजे ती मूळ गाणी मी ऐकली आहेत पण अशी केस वगैरे झाल्याचे मी ऐकले नाही

वरचे खरे खोटे माहीत नाही. पण जगभरातील म्युजिक इंडस्ट्री अर्धी अधिक चोरल्या गाण्यावर जगते. केस होऊन नुकसान भरपाई मिळणे खरे असेल तर अश्या हजारो केस दाखल व्हायला हव्यात Happy

इथे मन मधल्या संगीतचोरीबद्दलच्या केस चा उल्लेख आहे. इथून पुढे ड्युआयडी द्वारे केलेल्या आरोपांना (खुंदक) उत्तर मिळणार नाही.

Wikiwand (Iwan Syahman): लेखात थेट उल्लेख आहे: "He took legal action against Bollywood music producers for the unauthorized use of his song 'Yang Sedang-sedang Saja' and won the case, receiving compensation

https://www.youtube.com/watch?v=B0dZ5UdO6BU

https://www.youtube.com/watch?v=YtG7KpJkYEk&list=RDYtG7KpJkYEk&start_rad...

मन आला तेव्हा त्याबद्दल निगेटिव जास्त बोलले गेले होते. कथा फ्लॉप आहे असेच एकंदर वाचले होते, तो शर्मिला टागोरवाला पार्ट तर कोणालाच आवडला नव्हता. मला वाटले होते की चित्रपट फ्लॉप झाला. कदाचित ओवरसिज मार्केटात जास्त चालला असेल.

गाणी गाजलेली पण केसचे काही ऐकले नव्हते. अर्थात ही काय सनसनाटी खुनाची केस नव्हती सगळ्या पेपरात फ्रंट पेजवर यायला. त्यामुळे झाले असेल. तक्रार आली, ठळठळीत पुरावा समोर होताच त्यामुळे निवाडाही लगेच झाला. Happy

पण असे खरेच झाले असेल तर प्रितम कसा काय सुटला यातुन?? त्याचे पुर्ण करियरच कोरियन गाण्यांवर आधारीत आहे. की त्यानेही नुकसानभरपायी देऊन भागवले?

भारतात गाजलेली कॉपीराईट चोरीची केस एकच - भप्पी लाहिरीचे गाणे एका अमेरिकन संगितकाराने त्याच्या गाण्यात वापरले. ही केस अशासाठी गाजलेली की भप्पीदाने कित्येक अमेरिकन गाणी जशीच्या तशी उचललेली, कोणाचाही मुलाहिजा न बाळगता आणि त्याचे गाणे उचलले तेव्हा सरळ केस ठोकली व जिंकलाही Happy Happy

असो. माझे अवांतर जरा जास्तच होतेय.

चांगला आढावा घेतला आहे, आमिर आवडता कलाकार आहे. अस्सल अभिनय करतो. दिसणे, अभिनय सर्वच मस्तं. शाळेत असताना फोटो असायचा माझ्या खोलीत Lol

त्याचं पर्सनल काय असो, श्रेय लुबाडले/किती लग्नं केलीत वगैरे.. पण त्याने दारूच्या नशेत कोणाचा जीव नाही घेतला Wink
ह्या धाग्यावर बाळ ऋन्मेष मुक्त सुसाट सुटलं आहे..

तिन खानावळीमधला सलमान असंस्कृत आहे. बाकी दोघेही पब्लिक मध्ये आब राखुन आहेत. व्यक्तिगत आयुष्य व्यक्तिगतच ठेवलेय.

आमिरचे मला एक आवडले. लग्न केले, प्रेम संपल्यावर लग्न संपवले. परत प्रेमात पडल्यावर परत लग्न केले. हे करताना कुठेही पब्लिक स्पेसमध्ये व्यक्तिगत आयुष्य चव्हाट्यावर मांडले नाही. घरी पण संबंध टिकवुन ठेवले, मुलीच्या लग्नात सगळे हसरे चेहरे घेऊन वावरले.

qsqt च्या वेळेस त्याचे लग्न झालेय हे लपवुन ठेवले होते, चॉकलेट बॉय इमेजला तडा जाईल म्हणुन. लोकांना तरी कळलेच, पण फरक पडला नाही.

ह्या धाग्यावर बाळ ऋन्मेष मुक्त सुसाट सुटलं आहे..
>>>>
धन्यवाद.
बरेच लोकांना वाटते मी शाहरुख एके शाहरुखच करतो. पण एकेकाळी त्याचा समकालीन प्रतिस्पर्धी ओळखला जाणारा आमिर सुद्धा किती आवडीचा आहे हे त्यांना कळेल अशी अपेक्षा. अर्थात ते कळावे हा माझा इथे पोस्ट लिहायचा हेतू नाही. मी माझ्या आनंदासाठी लिहित आहे Happy

.

शाळेत असताना फोटो असायचा माझ्या खोलीत
>>>>
येस, माझ्या ओळखीच्या बरेच मुलींकडे याचा फोटो असायचा. याबाबतीत तिन्ही खानांमध्ये हा नंबर एक होता.
मी दहावीला ज्या मुलीच्या प्रेमात होतो तिच्याही वहीत होता अशी खबर मला एका मित्राने दिली होती. त्यामुळे आपण आमीर सारखे दिसले वागले स्टाईल मारली पाहिजे असा विचार डोक्यात क्षणभर चमकून ते जमणार नाही म्हणून गायब झाला होता.

.

त्याचं पर्सनल काय असो, श्रेय लुबाडले/किती लग्नं केलीत वगैरे.. पण त्याने दारूच्या नशेत कोणाचा जीव नाही घेतला
>>>>>>>

सलमान सोबत याची तुलनाच न केलेली बरे.. तो तर आता मला गुंड प्रवृत्तीचाच वाटतो.

आणि लग्न कितीही केली तरी ते काही अपराध, गुन्हा किंवा चूक नाही. ती करताना काही कांड झाले असतील तर ती गोष्ट वेगळी.

आमिर विरुद्ध शाहरुख करत भांडणारे बरेच चाहते हा मुद्दा उचलतात की तुमच्या आमिरने कसे तीन तीन लग्न केले, त्यात हिंदू मुलींना फसवले, त्याउलट आमचा शाहरुख बघा एका हिंदू मुलीवर प्रेम केले आणि तिचा धर्म न बदलता तिच्याशीच एकनिष्ठ राहिला वगैरे वगैरे...
पण अश्या गॉसिप मध्ये न पडलेले बरे. एकतर खरे खोटे आपल्यापर्यंत नेमके पोहोचत नाही. पण आमिरच्या लग्नाबाबत त्याने कोणाला फसवले आणि काही ड्रामा झाला असे ऐकण्यात आले नाही. निदान माझ्या तरी..

श्रेय लुबाडले हे समजले नाही.
कोणाचे श्रेय लुबाडायचा आरोप आहे त्यावर? तो दिग्दर्शकाच्या कामात लुडबूड फार करतो हे मागे वाचलेले. पण तो माणूसच परफेक्शनिस्ट आहे तर ते करणारच हे स्वाभाविक आहे.

>>>> पण तो माणूसच परफेक्शनिस्ट आहे तर ते करणारच हे स्वाभाविक आहे.
अगदी चोक्कस बात. परफेक्श्निस्ट माणसे, हपा (आपले हपा नाहीत) प्रत्येक गोष्टींत, लुडबुड करण्यात फार पुढे असतात.

तेव्हा वाटायचं / थोडा राग यायचा की ह्याचे चित्रपट इतके कमी किंवा उशिराने का येतात? मी. परफेक्शनिस्ट वेळ घेऊन चित्रपट करायचे.. १-२ वर्षात १ चित्रपट >>> अगदी बरोबर छन्दिफन्दी

गुलामी मधला आमिर, राणी व दिपक तिजोरी मधला सिन सानपाडा स्टेशनात चित्रित झालाय. >> गुलाम ना ?
लाइफ इन मेट्रो मध्ये कोपरखैरणे स्टेशन शायनी आहुजासोबतच्या बर्‍याच प्रसंगात आहे.
गुलाम चित्रपटात तर सानपाडा नाव घेतलेच होते. >>> एव्हढ्यातच कोपरखैरणे वरून आलो. इथेच आहे ना सानपाडा ? आधी माहिती असतं तर बघितलं असतं.
Aashu 29 >> वेलकम आणि धन्यवाद.
नत्याचं पर्सनल काय असो, श्रेय लुबाडले/किती लग्नं केलीत वगैरे.. >>
आमिरचे मला एक आवडले. लग्न केले, प्रेम संपल्यावर लग्न संपवले. परत प्रेमात पडल्यावर परत लग्न केले. हे करताना कुठेही पब्लिक स्पेसमध्ये व्यक्तिगत आयुष्य चव्हाट्यावर मांडले नाही >> पांढर्‍या कपड्यावरच डाग उठून दिसतात. सेलेब्रिटींबद्दल चर्चा होणारच. उगीच नाही ते पीआर वगैरे ठेवत. त्यांनाही हवी तेव्हां चर्चा झालेली आवडतेच. आपल्या पिढीत त्यांच्या खासगी पणाबद्दल अवेअरनेस आला आहे. नाही तर आधी फिल्मी सेलेब्रिटी म्हणजे नंदनवनातले लोक, त्यांची दुनिया वेगळी असाच समज होता.
आपण सेलेब्रिटी नाहीत, पण चारचौघात म्हणा किंवा कॉलनीत जरी ओळखत असतील तर कसं वागावं याचं भान असतंच. लोकांच्या जिभा धरता येत नाहीत. त्यातून आमीर ने सत्यमेव जयते मधून जे इश्यू मांडले होते तेव्हा त्याने मांडलेली मतं जर आचरणात आणली नाही तर मग लोक बोलणार.

ट्रोलिंग वेगळं ,लोकलज्जा वेगळी. आताच्या या पिढीत पूर्ण कल्पना बदलल्या आहेत. धागा आमीरचा आहे याची मलाच आठवण राहिली नाही Lol

काल रंगीला परत पाहिला.

रंगीला म्हटले की उर्मिलाच आधी आठवत असली तरी काल जाणवले की हा पुर्ण आमिरचा चित्रपट आहे.

आधीचा बिनदास्त टपोरी मुन्ना, मिलीच्या तोंडी ‘कमल कमल’ मंत्र ऐकुन हादरलेला मुन्ना, ती पार्टीला जाते म्हणुन मीही मोठा आहे हे तिला दाखवण्यासाठी फाइव स्टार हॉटेलात नेणारा मुन्ना, स्वतःच्या इन्सेक्युरिटिज लपवण्यासाठी पक्यावर खेकसणारा मुन्ना, ती स्टार होतेय, तिचे व आपले जग वेगळे होतेय समजुन निराश झालेला मुन्ना, तरी जाण्याआधी मनकी बात एकदा सांगणारा मुन्ना…. काय जबरदस्त रंगवलीत त्याने ही सगळी रुपे.

संवाद तर आहेतच पण त्याने डोळ्यांतुन, देहबोलीतुन जो टपोरी बिनदास्त अ‍ॅरोगंट मुन्ना उभा केलाय् त्याला तोड नाही. मिली पक्याबद्दल विचारते तेव्हा त्याचे डोळे आजुबाजुला क्षणभर नजर टाकतात आणि नंतर तो पक्याची गोष्ट सांगतो. त्या नजरेवरुनच कळते तो पक्याबद्दल खोटे बोलतोय. कदाचित पुढे काही संदर्भ असेल आणि एडिटिंगमध्ये उडाला असेल. मिलीला फाइव स्टार हॉटेलात नेतो तेव्हाचे त्याचे चालणे, हातवारे पाहिले आणि
असे कित्येक त्या क्लासमधले लोक डोळ्यासमोर आले जे त्यांच्यासाठी नसलेल्या वातावरणात आल्यावर एकदम अ‍ॅरोगंट असल्याचे दाखवतात. आमिरने तो स्वॅग बरोबर पकडलाय.

आमिरने रंगिलामध्ये जो स्वॅग पकडलाय त्याचे कौतुक मला यासाठी वाटते की आमिर सुसंकृत घरातुन आलाय. स्ट्रगलच्या दिवसात फुटपाथवर झोपुन दिवस काढले असेही झाले नाहीय. तरीही एक अनपढ उनाड टपोरी त्याने जशाच्या तसा उभा केलाय. त्याच्या आवाजाचा टोनही जरा हार्श आहे.

हा पाहिल्यावर लगेच सरफरोश पाहायला हवा. तिथे दुसरे टोक आहे. तिथे तो एक सुशिक्षित, खानदानी,आदबशीर पोलिस ऑफिसर आहे

त्याने डोळ्यांतुन, देहबोलीतुन जो टपोरी बिनदास्त अ‍ॅरोगंट मुन्ना उभा केलाय् त्याला तोड नाही. >>> +१

कौतुक मला यासाठी वाटते की आमिर सुसंकृत घरातुन आलाय. स्ट्रगलच्या दिवसात फुटपाथवर झोपुन दिवस काढले असेही झाले नाहीय. तरीही एक अनपढ उनाड टपोरी त्याने जशाच्या तसा उभा केलाय. >> +१
पण या न्यायाने संजय दत्तला जीवनगौरव ऑस्कर द्यायला पाहीजे. Wink

राभु, वाशी- बेलापुर/पनवेल लाईनवर सानपाडा लागते (हार्बर लाईन) व वाशी/नेरुळ्/पनवेल - ठाणे लाईनवर कोपरखैरणे आहे( ट्रान्सहार्बर लाईन).

गुलाम चित्रपट. मला नाव निट आठवत नव्हते.

Pages