
( आमीर खान चित्रपटसृष्टीशी संबंधित असल्याने चित्रपट या ग्रुपमधे हा धागा आहे. व्यक्ती म्हणून त्याचं योगदान अनेक क्षेत्रात असल्याने अॅडमिन समितीस योग्य वाटेल त्या ग्रुपमधे धागा हलवू शकता).
आमिर खानच्या कारकिर्दीचा आढावा
आमीर खानचं संपूर्ण नाव मोहम्मद आमिर हुसेन खान असं आहे. त्याचा जन्म १४ मार्च १९६५ रोजी मुंबईत झाला.
आजवरची त्याची कारकीर्द ३० वर्षांहून अधिक आहे. याळात त्याची मिस्टर परफेक्शनिस्ट अशीही ओळख निर्माण झाली कारण तो निर्माण करत असलेल्या चित्रपटासाठी किंवा कुठल्याही प्रोजेक्ट्स साठी प्रचंड मेहनत घेतो. नॅशनल चॅनल वर त्याने देशापुढील वेगळ्या समस्या मांडण्यासाठी एक शो बनवला होता त्यात त्याचा हा गुण ठळक झाला.
आमिर खानचा जन्म एका ज्या कुटुंबात झाला त्या कुटुंबाचा फिल्म इंडस्ट्रीशी अनेक दशकांचा संबंध आहे. त्याचे वडील ताहिर हुसेन हे निर्माते होते, तर काका नासिर हुसेन हे प्रसिद्ध निर्माते आणि दिग्दर्शक होते. भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील नेते मौलाना अबुल कलाम आझाद यांच्याशी संबंध आहे, तसेच तो भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. झाकीर हुसेन यांच्याशीही नातेसंबंधाने जोडला गेला आहे.
आमिरने आपल्या कारकिर्दीची सुरुवात बालकलाकार म्हणून केली. वयाच्या अवघ्या आठव्या वर्षी आपल्या काकांच्या *यादों की बारात* (१९७३) या चित्रपटात बालकलाकार म्हणून पदार्पण केले. त्यानंतर *मदहोश* (१९७४) मध्येही तो दिसला होता. यादों कि बारात आता बघताना तो लगेचच ओळखू येतो.
त्याची हिरो म्हणून कारकीर्द कयामत से कयामत तक पासून सुरू झाली असे आपल्याला वाटते. पण राख आणि १९८४ मध्ये केतन मेहता दिग्दर्शित *होली* या चित्रपटातून त्याने अभिनेता म्हणून पदार्पण केले होते. हे दोन्ही सिनेमे लक्ष वेधून घेऊ शकले नाहीत खरी प्रसिद्धी त्याला १९८८ मध्ये मन्सूर खान दिग्दर्शित *कयामत से कयामत तक* या चित्रपटाने मिळाली. हा सिनेमा त्याच्या काकाच्या म्हणजे नासीर हुसेनच्या बॅनरखाली बनला होता. नासीर हुसेन यांचा मुलगाही दिग्दर्शक म्हणून डेब्यु करत होता. त्याला आपल्या वडलांच्या हरवले सापडले किंवा मल्टीस्टारर पण सरधोपट पिक्चर पेक्षा वेगळं काही तरी बनवायचं होतं. वडलांच्या आग्रहास्तव आणि त्यांचा अनुभवाचा सल्ला ऐकून त्याने लव्हस्टोरी बनवायची ठरवलं. त्या वेळी मन्सूर खान नवखा होता. त्यामुळं अनेक नायकांकडून त्याला नकार आल्यावर मग नवीन हिरोला घेऊन प्रोकेट सुरू करायचं ठरवलं आणि आमीरखानची निवड झाली.
या चित्रपटाने त्याला रातोरात स्टार बनवले आणि त्याला सर्वोत्कृष्ट नवोदित अभिनेत्यासाठी फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.
या चित्रपटाने त्याची इमेज चॉकलेट बॉय अशी झाली . पण यानंतर आमीर खानने कुणाचाही सल्ला न घेता येतील ते सिनेमे धडाधड स्विकारायला सुरूवात केली. त्याच्या कयामतचं यश एन्कॅश करण्यासाठी अनेक सुमार दर्जाच्या चित्रपटात त्याला घेतलं. परिणाम हा झाला कि त्याची स्टार व्हॅल्यू कुमार गौरव प्रमाणेच संपण्याच्या टोकावर येऊन ठेपली. अधून मधून काही हिट मिळाले होते पण त्याला एका बड्या हिटची आवश्यकता होती.
या फेजमधून त्याच्या मदतीला पुन्हा त्याचा भाऊ मन्सूर खान मदतीला आला. त्याच्या बॅनरखाली बनलेल्या जो जिता वही सिकंदरने पिटातल्या प्रेक्षकांपासून ते समीक्षकांपर्यंत सर्वांची शाबासकी मिळवली. भारतातला हा पहिलाच स्पोर्ट्स शी संबंधित यशस्वी सिनेमा असावा. यानंतर ९० च्या दशकात त्याचं स्टारडम बहरू लागलं. इथे आमीर खानने आपली चूक सुधारली आणि तो मोजकेच चित्रपट स्विकारू लागला.
१९९० च्या दशकात आमिरने अनेक यशस्वी चित्रपटांमधून आपली छाप पाडली. *दिल* (१९९०), *दिल है की मानता नहीं* (१९९१), *जो जीता वही सिकंदर* (१९९२), *हम हैं राही प्यार के* (१९९३), आणि *रंगीला* (१९९५) यांसारख्या चित्रपटांनी त्याला व्यावसायिक आणि समीक्षकांच्या दृष्टीने यश मिळवून दिले. १९९६ मध्ये *राजा हिंदुस्तानी* या चित्रपटासाठी त्याला पहिला फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार मिळाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर प्रचंड यश मिळवले.
पण आमीरला आपली वेगळी ओळख बनवायची असल्याने त्याने स्वतःच निर्माता बनण्याचा निर्णय घेतला. १९९९ मध्ये त्याने बनवलेल्या सरफरोश या चित्रपटातील त्याच्या अभिनयाने समीक्षकांची विशेष प्रशंसा मिळवली. हा सिनेमा सुद्धा समीक्षकांनी गौरवला होता. याच काळात त्याने *अंदाज अपना अपना* (१९९४) सारख्या चित्रपटात सलमान खानसोबत काम केले, जो रिलीजच्या वेळी फ्लॉप ठरला, परंतु नंतर कल्ट क्लासिक बनला. या काळात आमीर खान म्हणजे हमखास चांगला सिनेमा असा विश्वास प्रेक्षकांच्या मनात रुजायला सुरूवात झाली होती. या काळात त्याने खूप काळजीपूर्वक सिनेमे केल्याने त्याचे अव्वल नंबर, तुम मेरे हो सारखे तद्दन फालतू सिनेमे लोकांनी माफ करून टाकले.
१९९९ मध्ये आमिरने आमिर खान प्रोडक्शन्स या निर्मिती संस्थेची स्थापना केली. या संस्थेचा पहिला चित्रपट *लगान* (२००१) हा ऑस्करसाठी सर्वोत्कृष्ट परदेशी चित्रपट श्रेणीत नामांकित झाला. या चित्रपटाने त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी फिल्मफेअर पुरस्कार मिळवून दिले. याच वर्षी *दिल चाहता है* मधील त्याच्या अभिनयाने तरुण प्रेक्षकांना भुरळ घातली.
चार वर्षांच्या विश्रांतीनंतर त्याने २००५ मध्ये मंगल पांडे: द रायझिंग या चित्रपटातून पुनरागमन केले. २००६ मध्ये रंग दे बसंती आणि फना यांसारख्या चित्रपटांनी त्याला पुन्हा एकदा यशाच्या शिखरावर नेले. २००७ मध्ये त्याने *तारे जमीन पर* या चित्रपटाचे दिग्दर्शन केले, ज्याने त्याला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळवून दिला. हा चित्रपट डिस्लेक्सियासारख्या सामाजिक विषयावर आधारित होता आणि त्याला प्रचंड यश मिळाले.
२०१० नंतरच्या काळात आमिरने *गजनी* (२००८), ३ इडियट्स (२००९), धूम ३ (२०१३), पीके (२०१४), आणि दंगल (२०१६) यांसारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांमधून आपली लोकप्रियता कायम राखली. दंगल हा चित्रपट भारतातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी एक ठरला आणि विशेषतः चीनमध्ये त्याने २००० कोटींहून अधिक कमाई केली.
२०२५ मध्ये आलेला *सितारे जमीन पर* हा चित्रपट त्याच्या नवीनतम प्रकल्पांपैकी एक आहे, ज्याला प्रेक्षक आणि समीक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला. हा चित्रपटही सामाजिक संदेश देणारा आहे आणि त्याच्या कारकिर्दीतील आणखी एक मैलाचा दगड ठरला आहे.
आमिर खान केवळ अभिनयापुरता मर्यादित नसून, तो सामाजिक कार्यातही सक्रिय आहे. त्याच्या *सत्यमेव जयते* या टेलिव्हिजन शोने सामाजिक मुद्द्यांवर प्रकाश टाकला आणि समाजात बदल घडवण्याचा प्रयत्न केला. शिक्षण, लिंगभेद, आणि सामाजिक समानता यांसारख्या विषयांवर त्याने आपल्या चित्रपटांमधून आणि शोमधून सातत्याने आवाज उठवला आहे.
आमीरच्या कारकिर्दीतल्या नकारात्मक बाजू
आमीर खान अनेकदा वादात अडकला. त्याच्या काही वक्तव्यांमुळे वादळ उठलं. यामुळे त्याच्यावर बहीष्काराचं पाऊल उचललं गेलं होतं. याचा फटका त्याला बसला.
तसेच ज्या वेळी त्याची प्रतिमा ही चांगले सिनेमे बनवणारा अभिनेता अशी झाली त्या वेळी त्याने काही अचाट आणि function at() { [native code] }अर्क्य सिनेमे स्विकारल्याने काही प्रेक्षकांना धक्काच बसला. उदाहरणार्थ गझनी. हा यशस्वी सिनेमा असला तरीही तो काही त्या वेळच्या आमीर स्विकारत असलेल्या चित्रपटांशी सुसंगत नक्कीच नाही. तो चालला कारण आमीरचा सिनेमा म्हणजे चांगला या डोळे झाकून विश्वास टाकण्याच्या प्रेक्षकाच्या सवयीने. याबद्दल आमीर खानला विचारले असता त्याने मी मनोरंजन क्षेत्रात काम करतो, त्यामुळं प्रत्येक सिनेमात संदेश असला पाहीजे असं काही गरजेचं नाही असं मत व्यक्त केलं होतं.
सत्यमेव जयते हा चांगला शो आहे. पण छोट्या पडद्यावर त्याचं दर्शन सतत होत राहीलं, पाणी पंचायत मुळे तो गावोगावी फिरत राहिला. या काळात त्याला सिनेक्षेत्रातल्या कारकिर्दीकडे लक्ष देता आले नाही. अती दर्शन ही बाधक आणि मोठी गॅपही बाधक अशा दोन्हीचा त्याला फटका बसला. पण दंगल, तारे जमीन पर सारख्या उत्कृष्ट सिनेमामुळे तो पुन्हा सन्मानाने मेन स्टॄम मधे परतला.
पण यानंतर त्याने ठग्ज ऑफ हिंदुस्तान सारख्या सिनेमात काम करून लोकांची तीव्र नाराजी ओढवून घेतली.
धूम ३ हा सुमार दर्जाचा बिग बजेट पिक्चर आधीच्या धूम चित्रपटांपेक्षा जास्त चालला. पण त्यासाठी आमीरचे गुडविल खर्च झाले.
त्यानंतर आलेला त्याचा लालसिंग चढ्ढा हा आश्चर्यकारक रित्या आपटला. दोनशे कोटीचं बजेट असताना फक्त साठ कोटी इतकाच धंदा झाला.
याचे कारण बहीष्कार सांगितले जाते.
आमीरचे मॅनरिजम अतिपरिचित झाल्याने आणि त्याचा वापर टाळता न आल्याने तसेच पीकेच्या प्रभावाखालून निघता न आल्याचा फटका त्याला बसला असे म्हणतात. नेटफ्लिक्सने याच काळात टॉम हँक्सचा फॉरेस्ट गंप प्रदर्शित केल्याने त्याचाही फटका बसला. लालसिंग हा सिनेमा फॉरेस्ट गंपशी तुलना झाली नाही तर चालायला हरकत नव्हती. पण तुलना झाली तर त्यातले वैगुण्य ठळक होणारच. फॉरेस्ट गंपच्या वेळी ऐतिहासिक व्यक्तींसोबत टॉम हँक्स पडद्यावर दिसला. या सीजी करामतींचे कौतुक झाले होते. त्या वेळी जुरासिक पार्क सुद्धा याच करामतींमुळे हिटझाला होता. इतकेच नाही तर अशा करामतींचा फॅन असलेल्या कमल हसनने त्याच्या इंडीयन मधे सुभाषबाबूं सोबत कमल स्वतःला दाखवल्याने त्याचीही क्रेझ निर्माण झाली होती. लालसिंग चढ्ढाच्या वेळी या सर्व गोष्टी नॉर्मल झाल्या होत्या. त्यामुळे या सिनेमाचा युएसपी काय हाच कळीचा मुद्दा होता.
ट्रेण्डसेटर होण्याच्या वेडापायी त्याने आत्मघातकी निर्णय घेतले आहेत.
लालसिंगच्या रिलीजच्या आधी नेटफ्लिक्सची मिळालेली १६५ कोटींची ऑफर नाकारून सहा महीन्यांनी ओटीटीवर पिक्चर रिलीज करण्याचा त्याचा आग्रह अव्यावहारीक असल्याने ओटीटी वाल्यांनी त्याच्याकडे पाठ फिरवली.
सितारे जमीन पर या सिनेमालाही पुन्हा एकदा १४५ कोटी मिळत असताना त्याने युट्यूबवर सिनेमा प्रदर्शित करण्याचा काहीच्या काही निर्णय घेतला. या निर्णयाचा फटका त्यालाच बसला.
एखाद्या नव्या सिनेमाच्या गेट अप मधे सतत फिरत राहण्याने त्याच्या स्टारडम वर परिणाम होतो. सतत ती विचित्र दाढी, चित्रविचित्र केशभूषा यातच इंटरव्ह्यू देत राहिल्याने त्याच्या इमेजलाही धक्का बसतो.
आमिर खानला त्याच्या कारकिर्दीत अनेक पुरस्कार मिळाले आहेत:
फिल्मफेअर पुरस्कार : ९ पुरस्कार, यात सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आणि सर्वोत्कृष्ट चित्रपट यांचा समावेश आहे.
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार : ४ पुरस्कार.
पद्मश्री (२००३) आणि पद्मभूषण (२०१०) हे भारत सरकारचे सन्मान.
-चीन सरकारचा मानद पुरस्कार** (२०१७), त्याच्या चित्रपटांच्या चीनमधील लोकप्रियतेमुळे मिळाला.
एकंदरीत यशस्वी असूनही अनेक चढ उतार असलेली कारकीर्द, वादग्रस्तता, खासगी जीवनातल्या अनेक गोष्टींमुळे नाराजी, भावाचे आरोप ते उत्तम चित्रपटनिर्माता म्हणून ओळख अशी त्याची कारकीर्द बहुरंगी, बहुढंगी असूनही त्याच्या बद्दल एव्हढी चर्चा मायबोलीवर नाही.
आभार : या निबंधासाठी संदर्भ म्हणून ग्रोकची मदत घेतली आहे.
>>>>रूठ के हम से कहीं जब चले
>>>>रूठ के हम से कहीं जब चले जाओगे तुम..
ये ना सोचा था कभी, इतने याद आओगे तुम
अरेच्या मला हे गाणे आठवत नाही. बघते आता. तुम्हाला माझे मत सांगते. कारण मलाही पेहेला नशा फार आवडते.
----------------
मी ऐकले ते गाणे. मला सिच्युएशन आवडली, टचिंग आहे. पण गाणे ठिकठाक वाटले.
जतिन ललित कमालीचे म्युझिक
जतिन ललित कमालीचे म्युझिक कंपोजर होते.
एवढे की त्यांच्यावर लिहायचे म्हटले तर वेगळा धागा काढावा लागला.
नाईन्टीज मेलोडी मध्ये त्यांचा फार मोठा वाटा होता.
वर मी उल्लेखलेले गाणे जतिन यांनी स्वतः गायले होते.
त्या काळी वयाने लहान असल्याने गीतकार आणि संगीतकार यांच्यावरून गाणी ओळखायची अक्कल नव्हती. त्यांची पडद्यावर दिसणाऱ्या हिरोवरूनच ओळख ठेवली जायची. आपली तेव्हाची आवडती गाणी कोणी कंपोज केली होती ही अक्कल त्या मानाने उशीराच आली. अन्यथा मी तेव्हाच या जोडीचा चाहता झालो असतो जे नंतर झालो.
अपवाद ए आर रहमान, कारण त्याने आल्याआल्या म्हणजे माझ्या आठवणीप्रमाणे रोजापासूनच वेगळा ट्रेंड सेट केला.
रूठ से हमसे हे माझंही फेवरीट
रूठ के हमसे कभी... हे माझंही फेवरीट आहे. त्याचं कारण
त्यातली ओळ आहे ना.... "फिर भी मेरा बचपन ना संम्हला था तुमबिन"
त्यात त्याला दोघांचं लहानपण आठवत असतं, त्या वेळी त्याच्या डोळ्यात अश्रू असतात.
पण सायकल वर बसताना तो भावाची चड्डी खाली ओढतो त्या आठवणीने चटकन हसू येतंं.
बरेच जण म्हणतात ना, एका डोळ्यात अश्रू दुसर्या हासू... ते अक्षरशः दाखवलंय त्याने.
ललित पंडीत चा आवाज.
गझनीचा सेकंड हाफ मलाही नाही आवडला. एव्हढ्या चांगल्या लव स्टोरी नंतर एव्हढा व्हायोलन्स.
बघवला नाही.
समो
समो
तुम्ही गझनी न पहाल तर बर. उगीच झोप येणार नाही,
आता सगळी गाणी ऐजतो.
अरे बाप रे व्हायोलन्स. नको.
अरे बाप रे व्हायोलन्स. नको. धन्यवाद केकु. मी आज विकत घेणार होते गझनी. आजचा आमचा प्लॅन होता, घर स्वच्छ आवरुन, लाँड्री करुन, आमीरचा एक सिनेमा घ्यायच व एन्जॉय करायचा कारण कालच बिर्याणी मागवलेली आहे जी की खूप उरलेली आहे. म्हणजे स्वयंपाकास सुट्टी!! साई सुट्ट्यो
पण गझनी नको, मला वाटतं 'जो जीता' पाहीन आज.
फना पाहिला नसेल तर छान आहे.
फना पाहिला नसेल तर छान आहे.
आम्ही काल हम है राही प्यार के पाहिला . जुही - आमीर. मस्स्त जोडी.
राभु फना तर फारच छान आहे.
राभु फना तर फारच छान आहे. पाहीलेला आहे. 'हम है राही प्यार के' नाही पाहीलेला. फील गुड आहे वाटतं, नावावरुन.
९० - २००० टिपीकल महेश भट
९० - २००० टिपीकल महेश भट स्टाईल रोमँटीक कॉमेडी.
ओह ओके धन्यवाद.
ओह ओके धन्यवाद.
गझनी हा नोलानच्या मोमेंटो
गझनी हा नोलानच्या मोमेंटो वर आधारित आहे.
जुऐदचा Loveyapa सिनेमा आला
जुऐदचा Loveyapa सिनेमा आला आणि गेला.
पण त्यातले हे गाणे भन्नाट आहे.
Loveyapa Ho Gaya
https://www.youtube.com/watch?v=5JOvMP7PMow
सूर्याचा suriya तमिळ चित्रपट
सूर्याचा suriya तमिळ चित्रपट गजनी ghajini याच नावाने होता. नायिकाही असीन. त्याच चित्रपटाच्या दिग्दर्शकाने A. R. Murugadoss अमीरचाही गजनी केला.
हे माहित आहे पण त्या सर्वांचा
हे माहित आहे पण त्या सर्वांचा उगम मोमेंटो मध्ये आहे.
हम है राही प्यार के' नाही
हम है राही प्यार के' नाही पाहीलेला. फील गुड आहे वाटतं, नावावरुन.
>>>>
हाहा..
It's more than feel good...
Full on entertainment.
तुम्हाला मिळाला आजचा पिक्चर.. बघून टाका बिनधास्त..
अहो पण ते चाईल्डिश जोक्स मला
>>>>>>>>Full on entertainment.
अहो पण ते चाईल्डिश जोक्स मला अजिबात रुचत नाहीत. तो कोणता एक सलमान खान आणि आमीर खानचा विनोदी सिनेमा मला तो कॉमेडी असूनही पाहावला नाही. काहीतरी दर्जा हवा ना.
हां अंदाज अपना अपना.
मला सिच्युएशन आवडली, टचिंग
मला सिच्युएशन आवडली, टचिंग आहे. पण गाणे ठिकठाक वाटले.
>>>>>>
मलाही पिक्चर पाहिला तेव्हा हे गाणे इतके विशेष नव्हते आवडले किंवा नोटीस केले गेले नव्हते. नंतर कधीतरी घुसले आत. तेव्हापासून बाहेर नाही आले.
बाकी ते आपले आवडते गाणे असते. सर्वांनाच आवडावे असा हट्ट त्यात नसतोच
हम है राही प्यार के वेगळा आहे
हम है राही प्यार के वेगळा आहे त्यापेक्षा..
हलकीफुलकी रोमांटिक आणि पोरांची कॉमेडी आहे..
तुम्ही म्हणाले तसे फील गुड कॅटेगिरीच आहे
आमिरचा सुरवातीच्या काळात एक
आमिरचा सुरवातीच्या काळात एक चित्रपट होता जो मुळ साऊथचा हिंदी रिमेक होता. चित्रपटाचा विषय गंभीर होता - हुंडा व त्याच्या लालसेपायी सुनेचा छळ. पण ट्रिटमेंट अगदी विनोदी होती. म्हणजे गंभीर विषय विनोदी आवरणाखाली पेश केलेला. मी मुळ चित्रपट दु द वर बघितला होता. आमिरने हिंदीत मजा आणलेली.
आमिर दिसायला गोंडस असला तरी बुटका आहे. तो आला तेव्हा सहा फुटी महानायक सगळ्यांच्या डोक्यात होता. हिरो म्हणजे सहा फुट उंची हवीच. पण बुटका असुनही आमिर कुठे कमी पडला नाही. रंगीलात काय कमाल काम केलेय. शेवटच्या दृष्यातही टेम्पोच्या टपावर पडुन जाणारा आमिर लक्षात राहतो.
त्याच्या पोरसवदा दिसण्यातून
त्याच्या पोरसवदा दिसण्यातून तो चॉकलेट हिरो इमेजेत अडकला असता पण नाही अडकला
अंदाज अपना अपना >>> त्या वेळी
अंदाज अपना अपना >>> त्या वेळी तुफान आवडलेला.. टुकार विनोदसकट. गाणी छान होती.. जुन्या वळणाची (एलो एलो..)
कृष्ण तेव्हाही(?) थोडी बावळट थोडी सुंदर दिसायची . आता बावळट झाक कमी झाली आहे.
हम है राही प्यार के >> जुही आमिर दोघंही मस्त. आवडलेला.
गजनी पण आवडलेला.
आता सगळ्यांचे प्रतिसाद वाचताना जाणवतंय.. आमिरचे बहुतेक सगळे चित्रपट बघितलेत.
तेव्हा वाटायचं / थोडा राग यायचा की ह्याचे चित्रपट इतके कमी किंवा उशिराने का येतात? मी. परफेक्शनिस्ट वेळ घेऊन चित्रपट करायचे.. १-२ वर्षात १ चित्रपट
चॉकलेट हिरो ... >>> आधी
चॉकलेट हिरो ... >>> आधी कितीतरी वर्ष तो चॉकलेट हिरो च होता. अडकला नाही पण बऱ्याच उशिरा...
रूठ के हमसे कभी >>> सुंदर गाण
रूठ के हमसे कभी >>> सुंदर गाण आहे.
पण हा चित्रपट म्हणजे पहिला नशा हे समीकरण जास्त फिट्ट बसलय.
>>>>चॉकलेट हिरो च होता
>>>>चॉकलेट हिरो च होता
आधी कमावुन मग आवडेल ते केले त्याने. वेल-प्लॅन्ड!
.
अवांतर -
चं रास - कर्क, नक्षत्र - पुष्य
अवांतर -
अवांतर -
चं रास - कर्क, नक्षत्र - >>>>
काय सांगता??? सेम हियर…
आमिर खानचे कितीतरी चित्रपट
आमिर खानचे कितीतरी चित्रपट युट्यूब वर आहेत.
अकेले हम अकेले तुम
वर आला नाहीये. पण खूप आवडलेला. कितीही वेळ बघितला तरी प्रत्येक वेळी डोळ्यात पाणी येईल असा..
कितीही वेळ बघितला तरी
कितीही वेळ बघितला तरी प्रत्येक वेळी डोळ्यात पाणी येईल असा..
>>>>>>>>>
येते...
स्वतः बाप झाल्यापासून जास्तच
मनीषा कोइराला त्याला सोडून निघून जाते तिथपासून खरा पिक्चर चालू होतो.. मी तिथून जास्त वेळा बघितला आहे
त्याच्यात सुद्धा राजा को रानी से प्यार हो गया है गाणे मेलोडीयस, ऐसा जखम दिया है सुद्धा लोकप्रिय.. पण मला भिडणारे गाणे.. दिलं मेरा चुराया क्यू.. जब ये दिल तोडना ही था.. हम से दिल मिलाया क्यू.. हम से मूह मोडना ही था..
आणि त्या ओ आय लव्ह यू पापा गाण्यातील एक कडवे एक ओळ खूप आवडते.
कौन है फिर इस दुनिया में हमसफर... मै हु डॅडी
सेंटी मूड झाला आहे तर मन
सेंटी मूड झाला आहे तर मन चित्रपट विसरू नका.
बहुतांश चित्रपट एव्हरेज आहे.
पण शेवटचा अर्धा पाऊण तास छान आहे. त्यामुळे क्लायमॅक्स मध्ये डोळ्यातून पाणी येते. जेव्हा त्याला तिच्या पायाबद्दल समजते. मनीषा कोइरालाने सुद्धा कमाल अभिनय केला आहे त्या दृश्यात.
पहला नशा गाण्याची सुरुवात
पहला नशा गाण्याची सुरुवात होताना ज्या ओळी आहेत त्या कमाल रोमँटिक आहेत...
चाहें तुम कुछ ना कहो, मैने सुन लिया

के साथी प्यार का मुझे चुन लिया, चुन लिया
मैने सुन लिया.....
त्या ऐकताना काश कोई लडकी मुझे प्यार करती फिलिंग येतात
रंगीला रे गाणे आमच्या बेलापुर
रंगीला रे गाणे आमच्या बेलापुर रेल्वे स्टेशन व आजुबाजुचा परिसर येथे चित्रित झालेय. तेव्हा म्हणजे १९९३-९४ मध्ये हे स्टेशन पुर्ण रिकामे असायचे, तासाला एक गाडी
गुलामी मधला आमिर, राणी व दिपक तिजोरी मधला सिन सानपाडा स्टेशनात चित्रित झालाय.
लाइफ इन मेट्रो मध्ये कोपरखैरणे स्टेशन शायनी आहुजासोबतच्या बर्याच प्रसंगात आहे.
लाइफ इन मेट्रो मध्ये
लाइफ इन मेट्रो मध्ये कोपरखैरणे स्टेशन शायनी आहुजासोबतच्या बर्याच प्रसंगात आहे.
>>>>>
हायला..
बघायला हवा मग हा पुन्हा..
बघताना लक्षात आले नसणार..
त्यानंतर काही वर्षांनी कोपरखैरणे माझ्या आयुष्यात आले आणि मी सुद्धा तिथे आताची बायको आणि तेव्हाच्या गर्लफ्रेंड सोबत गप्पा मारत बसायचो. कारण मी जॉबला स्टेशनच्या अलीकडे तर ती पलीकडे..
गुलाम चित्रपटात तर सानपाडा नाव घेतलेच होते. तिथूनच ट्रेन सुटणार होती. मी रिलायन्सला जॉबला लागलो तेव्हा सानपाडा स्टेशन पाहिले आणि पहिला विचार हाच मनात आला की अरे हे तर आपले दस दस की दौडवाले स्टेशन.. ते प्रत्यक्षात आहे याचा कोण आनंद झाला होता
Pages