निवडणूक आयोगाच्या गमतीजमती

Submitted by भरत. on 17 August, 2025 - 10:00

सध्या देशात सगळ्यांत जास्त गमतीजमती कोण करत असेल तर आपला निवडणूक आयोग. याची सुरुवात तशी बरीच आधी झाली आहे. पण आता त्यांचा गंमतीजमती करण्याचा वेग भलताच वाढला आहे आणि गंमतीजमतींची पातळीही अस्मानाला पोचली आहे. त्या गंमतीजमतींचा आढावा इथे घेऊयात.

मायबोलीकरांना विनंती : नुसत्याच टिप्पण्ण्या कर ण्या ऐवजी आयोगाच्या जुन्या गंमतीजमती इथे लिहा.

तसंच अशा गमतीजमती ७० वर्षांपासून होत होत्या आणि या गमतीजमती नाहीतच मुळी अशा प्रतिसादांचीही प्रतीक्षा आहेच.

तर पहिल्या तीन - चार गमतीजमती मतदानाच्या सीसीटीव्ही रेकॉर्डिंगबद्दल

१. पूर्वी निवडणुकीसंबंधीचा सगळा इले क्ट्रॉनिक रेकॉर्ड कुणालाही पाहायला मिळू शकत असे. केंद्र सरकारने गेल्या वर्षी या नियमात बदल करून उमेदवारांचे आणि मतदानाचे व्हिडियो रेकॉर्डिंग फक्त उमेदवारांनाच पाहता येईल. इतर कोणाला ते पाहायचे असेल तर न्यायालयाकडून तसा आदेश आणावा लागेल. हे फुटेज पाहिल्याने मतदान गुप्त राहणार नाही आणि ए आय चा वापर करून फेक नॅरेटिव्ह पसरवता येईल, असं कारण सांगितलं.

२ या जून महिन्यात आयोगाने राज्यातील निवडणूक अधिकार्‍यांना मतदानाचं रेकॉर्डिंग ४५ दिवसांनी नष्ट करण्याचे आदेश दिले.

३. माजी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी एका पत्रकार परिषदेत - काय करणार तुम्ही सीसीटीव्ही फुटेज बघून ? आणि रोज ८ तास फुटेज पाहिलं तरी सगळं बघायला ३६०० वर्षे लागतील . कशाला बघायचंय ते? ज्याला ते बघायचंय, त्याला हा प्रश्न विचारूया - अशी विधाने केली होती.

४ आजच्या पत्रकार परिषदेत सध्याचे मुख्य आयुक्त ज्ञानेश / ग्यानेश गुप्ता यांनी " आपल्या आयाबहिणींलेकींसह कोणा मतदाराचं सीसीटीव्ही फुटेज आयोगाने लोकांना दाखवावं का? - असा काळजाला हात घालणारा प्रश्न विचारला.

निवडणूक आयोगाच्या आजच्या पत्रकार परिषदेचा व्हिडियो

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

त्यांच्याकडून उत्तर मिळणार नाही. त्यांना निवडणूक आयोगाचे कार्यक्षेत्रच आणि जबाबदारी माहीत नाही.

उत्तर, मला कायम सगळ्यातलं सगळं कळतं याच्या बाहेर नाही. .. रादर तुमच्यापेक्षा अंमळ जास्त समजतं.... रादर तुम्हाला माझ्यापेक्षा कमी समजतं. इतकंच असावं असा माझा कयास आहे. Wink

वरळीत एकाच खोलीचा पत्ता देणारे २८ मतदार कसे झाले? जागा सोडून गेले पण हा पत्ता मतदारांनी बदलला याचा अर्ज दिला नाही. तपासणीत तिथे कुणी त्या नावाचे मतदार सापडले नाहीत. नाव रद्द झाली. आता काय करायचं?

एका खोलीत शेकडो मतदार हे राहुलने त्याच्या पत्रकार परिषदेतही दाखवलं होतं. बिहारमध्ये एस आय आर नंतरही असे प्रकार आहेत.
---
बिहार मतदार यादी पुनर्निरीक्षणाच्या मोहिमेत आयोगाने डुप्लिकेट मतदार शोधायचं सॉफ्टवेअर वापरलं नाही.
https://www.reporters-collective.in/trc/eci-skipped-its-fraud-busting-so...

आपले महान मुख्य आयुक्त ग्यानेश कुमार म्हणतात there was no need to undertake standard computerised deduplication of voter IDs because only criminally minded voters would enlist twice.
https://x.com/sanjg2k1/status/1982856208886411561 इथे व्हिडियो आहे.

शिवाय आयोगाने राजकीय पक्षांना मशीन रीडेबल मतदार याद्या दिल्या नाहीत. काँग्रेसने कर्नाटक, महाराष्ट्र, हरयाणा साठी मागणी केली, तिथे नाही आणि बिहारच्या एस आय आर दरम्यानही नाही.
---
राहुलने पत्रकार परिषदेत एका मत दाराचं नाव तीन राज्यांतल्या मतदार याद्यात असल्याचं दाखवून दिलं होतं. मीडियाने त्याला शोधून काढलं. तो म्हणाला , मी स्थलांतर केलं आणि नव्या जागी पत्ता बदलायचा अर्ज दिला. मग मी डोंबिवलीहून बोरिवलीला आलो आणि आयोगाला पत्ता बदलायचा अर्ज दिला, तर डोंबिवलीतल्या यादीतून माझं नाव न उडवता बोरिवलीतल्या यादीत जोडलं गेलं असेल, तर त्याला जबाबदार कोण? की डोंबिवलीला जाऊन इथून माझं नाव उडवा, असा अर्ज मीच द्यायला हवा?

अर्धवट माहिती कुणीतरी फेकतो.
--------
जिथे एकाच पत्त्यावर अनेक मतदार आहेत किंवा होते त्यांचे मतदान कुठे होणार? कोणत्यातरी एकाच केंद्रावर( नवीन पत्त्यावर )त्यांचे नाव असणार. ( नाव रद्द झाले तपासणीत तर कुठेच होणार नाही.)
मतदारांनाच फिकिर नाही तर काय करायचे?

मला माझ्या आधार कार्डवरील नाव आणि पत्ता बदलून घ्यायचे आहे. ह्या धाग्यावरील माहिती वाचून निवडणूक आयोगाचे खात्री वाटत नाही . पण पत्ता तर बदलावाच लागेल तर काय करू की सगळे व्यवस्थित होईल?

माझ्या आधारवरच्या पत्त्यात मी ऑनलाइन करेक्शन केलं होतं. पत्ता बदलला नव्हता. आणि ते झालं होतं. काय करावं लागलं ते आठवत नाही.
या लिंका उपयोगी ठराव्यात
https://uidai.gov.in/en/my-aadhaar/update-aadhaar.html
https://uidai.gov.in/images/commdoc/List_of_Supporting_Document_for_Aadh...
https://uidai.gov.in/images/Form_1_Eng.pdf

आधार कार्डवरील नाव ऑनलाइन बदलता येत नाही. त्यासाठी जवळील आधार सेवा केंद्र किंवा पोस्ट ऑफीसमध्ये करता येईल. पत्ता,मोबाईल नंबर बदल इत्यादी ऑनलाइन विनाशुल्क करता येते. ऑफलाईन फी ₹.५० आहे. कार्ड पोस्टाने आठ ते दहा दिवसात घरपोच पाठवले जाते. शक्यतो ऑफलाईन करा.

<मतदारांनाच फिकिर नाही तर काय करायचे?> समजा मी आयोगाला पत्ता बदलाय अर्ज दिला तर तिथल्या कर्मचार्‍याच्या डोक्यावर उभं राहून तो माझा पत्ता बदलतो आहे की नाही, हे पाहणे ही मतदार म्हणून माझीच जबाबदारी आहे. तसं मी नाही पाहिलं आणि आयोगाने माझा जुना पत्ता कायम ठेवून नव्या ठिकाणी माझे नाव त्याच किंवा वेगळ्या मतदार क्रमांकाने नोंदवले तर मलाच मतदार म्हणून फिकीर नाही.

दुसरीकडे आयोग चुक्कून कोणाचं नाव उडवत नाही. अगदी क्वचित कोणाचं तरी उडतं. तरीही मतदाराने आपलं नाव यादीत आहे की नाही, किती ठिकाणी आहे हे वरचेवर तपासत राहावं. नाहीतर मतदारालाच फिकीर नाही.

बिहारमधल्या एस आय आर मध्ये जिवंत मतदारांना मृत दाखवलं असं होतं चुकून. ते मेलेत हे आयोगाला कोणी सांगितलं ? काय कागदपत्रं दिलं ते विचारायचं नाही. ही माहिती गोपनीय असेल Wink

आयोगाचा पुळका येण्यात गैर नाही, परंतु त्याअगोदर कोषातून बाहेर या, आजूबाजूला सरकारी कामांसाठी सामान्य जनतेला काय समस्या येतात त्या जवळून प्रत्यक्ष बघा. ह्याला अपवाद, त्याला अपवाद असू शकेल असे बोलून आयोगाची पाठराखण करणे सोडा. कित्येक जागरूक नागरिक मतदार यादीत आपले वगळलेले नाव पुन्हा नोंदवण्यासाठी ऑनलाइन/ऑफलाईन प्रयत्न करतात. तरीही मतदार यादीत नावनोंदणी होण्याचे प्रमाण कमी आहे. लोकांनी कामधंदे सोडून हीच कामे करावी असे निवडणूक आयोगाला वाटत असावे. म्हणूनच स्वतःची जबाबदारी नागरिकांवर टाकून मोकळे झाले.
माझ्या मृत आई वडिलांचे मतदार यादीतील नाव दोन वेळा कागदपत्रे सादर करूनही अद्याप वगळली गेली नाही. मागे जुन्या पत्त्यावर त्यांची निवडणूकओळखपत्रे आली होती. माझे नाव फक्त पदवीधर निवडणुकीच्यावेळी मतदार यादीत असायचे. लोकसभा ,विधानसभा निवडणुकीच्यावेळी गायब व्हायचे. ऑनलाइन ऑफलाईन प्रयत्न करूनही नावनोंदणी होत नव्हती. मागच्या वर्षी यश आले. ( आई वडिलांच्या नावाने कोणी मतदान करू नये म्हणून मी सहा तास प्रवास करून जुन्या मतदार वॉर्डात जाऊन ते रोखतो. ) प्रत्येकाला हे शक्य नाही. त्यामुळे निवडणूक आयोगाने स्वतः कष्ट घेतले पाहिजे.

तिकडे टांझानिया देशाच्या निवडणूक आयोगाने सत्ताधाऱ्यांना 98% मतं मिळाल्याचे जाहीर केले आणि संपूर्ण देशात हिंसाचार उफाळला.

बऱ्याच लोकांनी ही मुलाखत बघण्याची तसदी घेतली नसेलच.

आणि माझं तर असं म्हणणं आहे की राहुल गांधींनी आता ह्या असल्या परिषदा घेणे बंद करावं.

मुर्दाड जनता आहे आपली.

राहूल गांधींनी त्यांचे काम चोख बजावले. आता मीडियाने राहूल गांधींना प्रश्न न विचारता निवडणूक आयोगाला प्रश्न विचारून भंडावून सोडावे. अर्थात मिडियात तेव्हढा दम नाही.

आधी बांगलादेशी वगैरे घुसपेठी लोक बोगस मतदान करायचे.

आता ब्राझीलची सुपर मॉडेल करते.

मेरे देश बदल रहा है
आगे बढ़ रहा है

FB_IMG_1762336115767.jpg

आपल्या इकडच्या गाई आणि गोवा नॉर्थ ईस्ट कडच्या गाई यांच्यात जसा फरक आहे तसाच आपल्या कडच्या आया बहिणी आणि ब्राझीलच्या आया बहिणी यांच्यात असणार.

पत्रकार परिषदा .........

आणि अमुक तमुक नेते घेणार आहेत हे किंचाळून सांगणे. ( कधीतरी सहा महिन्यांत एखादी झाली तर बातमी आहे. )

विश्वगुरूंनी साडे अकरा वर्षांत पत्रकार परिषद घेतली नाही, याची सारखी बातमी होते. तात्यांनी जबरदस्तीने उभं केलं आणि यांनी एकच प्रश्न घेईन असं सांगितलं. तो प्रश्न अदाणीबाबत. यांनी उत्तरात वसुधैव कुटुंबकम सांगितलं.
हे जर किंचाळून वाटत असेल तर फडणवीस बोलतात , त्याला काय म्हणणार?
पत्रकार परिषदे घेतली त्याचा त्रास होतो. त्यात मांडलेल्या मुद्द्यांशी काही देणंघेणं नाही. कारण आम्ही सोयीने त्रयस्थ आहोत.

राहुल गांधींना दात विचकून " शपथपत्र द्यावे लागेल, अन्यथा माफी मागा " हे सांगायला ग्यानी पत्रकार परिषद कधी घेणार आहेत? मागच्या वेळेस राहुल गांधींनी फाट्यावर मारल्यामुळे नवीन काहीतरी धमकी देतील. नाही दिली तर त्यांच्यात सुधारणा झाल्याचे समाधान होईल. अशीच मतदार यादीतही सुधारणा होईल अशी अपेक्षा करतो. त्याचे श्रेय राहुल गांधीनाच देईल.

भाजपचे माजी राज्यसभा खासदार प्रा राकेश सिन्हा
५ फेब्रुवारी २०२५ दिल्ली विधानसभे साठी मतदान केलं https://x.com/RakeshSinha01/status/1887075547194261745
आज ६ नोव्हेंबर २०२५ बिहार विधानसभेसाठी मतदान केलं https://x.com/RakeshSinha01/status/1986292943687459174

ते म्हणतात
राजनीति इतनी हल्की हो सकती है इसका अंदाजा मुझे नहीं था ।संविधान में आस्था रखने वालों पर सवाल करने वाले पर सवाल करने वालों को सौ बार सोच लेना चाहिए ।मेरा नाम दिल्ली के मतदाता सूची में था । बिहार की राजनीति में सक्रियता के कारण मैंने अपना नाम गाँव मनसेर पुर (बेगूसराय) करा लिया । क्या इस आरोप के लिए मैं मानहानि करूँ ?

तुम्ही इकडे गंमत आणि विनोदाचे धागे काढत बसलात आणि तिकडे भैय्या लोकांनी मोदींना तीनदा निवडून आणलं. आता जरा मनावर घ्या, गंभीर धागे काढा आणि पुढच्या निवडणुकीत रागा कसे जिंकतील ते बघा.

बिहार कालच्या मतदानाच्या वेळी व्यवस्थित चाललेले मतदान यंत्र बदलायला वरून माणूस पाठवला.

दानापूर - नदी पार करून मतदानाला लोकांना अडवलं

याशिवाय आपल्या जागी भलतंच कोणी आधीच मतदान करून गेल्याचा अनुभव अनेकांना आला.
मतदाराची माहिती असलेली स्लिप - नाव , एपिक, यादी क्र. इ. नाही म्हणून मतदानकेंद्रात घेतलं नाही असाही अनुभव आला. स्थानिक प्रशासनाने आशी स्लिप अनिवार्य नाही, असं ट्विटरवर सांगितलं.
एस आय आर दरम्यान कागदपत्रे जमा करूनही आपली नावे मतदार यादीत नाहीत, हाही अनुभव अनेकांना आला.

किती बेजबाबदार आहेत ना हे मतदार!

Pages